लढाई अस्तित्वाची... भाग २

लढाई एका आईची जी आपल्या मुलीच्या अस्तित्वासाठी काहीही करू शकते...

कर्णबधिरत्व म्हणजे काय ?
कर्णबधिरत्व म्हणजे एखाद्या व्यक्तीचे दुस-याशी बोलणे व वातावरणातील इतर ध्वनी ऐकण्याविषयी अक्षमता. कर्णबधिरत्व कानातील एखाद्या भागाला इजा झाल्याने किंवा एखाद्या रोगामुळे कानाच्या अनैसर्गिक विकासामुळे, जन्माआधी किंवा जन्मानंतर आलेले असते. कर्णबधिरत्वामुळे ऐकण्याच्या क्षमतेला मर्यादा पडतातच पण त्याचबरोबर बोलण्यातही दोष निर्माण होतात. भाषा विकासही खुंटतो.
श्रवणदोषाची अनुवंशिक व परिस्थितीजन्य ही दोन मुख्य कारणे आहेत.
श्रवणदोष व त्याचे वर्गीकरण

अ.क्र.                      डेसिबल व श्रवणदोष

( १)                                  ० ते २५ डी. बी.                        सामान्य श्रवण (श्रवणदोष नाही)
( २)                                  २६ ते ४० डी. बी.                      सौम्य श्रवणदोष
( ३)                                  ४१ ते ५५ डी. बी.                      मध्यम श्रवणदोष
(४)                                   ५६ ते ७० डी. बी.                      मध्यम ते तीव्र श्रवणदोष
(५)                                   ७१ ते ९० डी. बी.                        तीव्र श्रवणदोष
( ६)                                    ९१ डी. बी. च्या पुढे                    अति तीव्र श्रवणदोष

अस श्रवणदोषाच वर्गीकरण केल ज़ात. 

बघा
जस तुम्हाला दुरच किंवा जवळच दिसत नाही म्हणून तुम्ही चश्मा लावला ना!!! तसच ऎकु बरोबर येत नाही म्हणून श्रवण यंत्र लावतात. त्यात वावग अस काय आहे हो.”

त्यांनी मोक्षाला मांडिवर घेतल आणि बी॰टी॰ई॰ Behind the ear च अगदी छोट श्रवणयंत्र लावल. अक्षरशः तिने लावलेल यंत्र त्यांना दिसलही नाही.
त्यांनी computerised Manually setting करून ते यंत्र तिच्या श्रवण क्षमतेनुसार सेट केल. 
“Hello”,तिच्या कानाला लावुन ते testing करू लागले.
तिने लगेच हसुन प्रतिसाद दिला. तिच स्मित बघुन दोघेही सुखावले.
“बघा कशी हसते आहे. पहिला शब्द ऎकुन ती किती आनंदी झाली”.

त्यांचेही डोळे डबडबलेले होते. खर किती चिंतित होते ना ते. हे अस त्यांच्याच नशीबात होत काय? का म्हणून अस आपल्यासोबतच व्हाव?  हि शिक्षाच असावी आपल्याठायी? असे किती तरी प्रश्न त्यांना त्यावेळला भेडसावत होते. 

“बर एक सांगा आपण एवढे शिक्षित आणि सुजान पालक असुन असे अश्रु गाळले तर त्या बाळाच्या सर्वांगीन विकासावर परिणाम होईल दुसर तिसर काहीच नाही होणार. लोकांच काय त्यांना संधी हवी असते याच्या त्याच्या घरात डोकावायची ती त्यांना दयायचीच नाही. ती सर्वसामान्य मुलांप्रमाणेच जगेल फक्त तुम्ही तिला कसे ट्रीट करता. या बद्दल तुमचा दृष्टिकोन कसा आहे यावर तिच उभ भविष्य निर्भर करत. ईतर कोणीही ते घडवायला येत नाही. आपल प्राक्तन आपणच घडवतो. हे नेहमीच लक्षात असु द्या.”

डाॅक्टरांनी सांगीतलेल त्यांच्या मनाला पटण्यासारख़ होत. त्यांचे विचार खोलवर परिणामुन गेले. पण एवढा मोठा आघात त्यांच्या मनावर झाला होता कि तो ताण लगेच कमी करणे सोप नव्हत. जसा जसा वेळ जाईल त्यांचा ताण कमी होईल आणि नवीन जिवनाची रोज़ एक सोनेरी पहाट होईल.
      अजुनही बरेच प्रश्न त्यांचे अनुत्तरित होते. त्याकरिता त्यांनी स्पीच थेरेपिस्ट कड़े पाठविले. अगदी दुसऱ्या दाराला लागुन त्यांच कॅबिन होत.
“या या... खूप सारे प्रश्न मनात हेलकावत असतील. त्या सगळयांची उत्तर मी प्रश्न न विचारताच देतो”. 
     थेरेपिस्ट डाॅक्टरांच्या पहिल्याच वाक्यने त्यांच्या मनातील तांडव जरा शांत झाला. शेवटी आधार तो आधारच.
मोक्षाला जवळ बसवुन त्यांनी तिला तिच्या कानाला हेडफ़ोन लावले आणि म्हणाले,”किती ग शाहाण बाळ... अगदी धिट.”
 दोघेही तिच्या प्रतिसादाला बघुन आनंदी झाले.
“बघा आता काय चमत्कार होणार आहे”, त्या दोघांकडे बघत ते म्हणाले.
हेडफोनचा माईक हातात घेवुन,” आई शब्द उच्चारला”...
“आई”, मोक्षा हळुच म्हणाली आणि तिने पहिल्यांदा आई अशी हाक मारल्याने तिचे आनंदाश्रु लगेच डोळयातन गालावर सरसावले. 
“बाबा”
“बाऽऽऽऽऽबाऽऽऽऽऽ”
    बाबाची हाक ऐकताच संजयच ही ऊर भरुन आल आणि त्याच्याही भावनेचा बांध फुटला. 
“अरे आई बाबा बघ किती आनंदी आहेत.”
   ती नुसतीच त्यांच्याकडे बघत होती. केवलवाणी होऊन.

“आई बाबांना सांग मी खूप खूप मोट्ठी होणार आहे. आपले आनंदाश्रु त्या वेळेकरीता जपुन ठेवा.”
    तिघेही एकामेकाच्या नजरेत बघुन काही तरी गुज सांगीत होते. 
“हे बघा किती सोप आहे!! हो ना? बस आज पासन तिला सगळ ऎकायला येणार आहे फक्त तिच्याशी सतत बोलायच आणि तिला ऐकायला प्रोत्साहित करायच. बस ऐवढच !! ती ईतर सामान्य मुलांप्रमाणेच प्रगती करेल कदाचित त्यांच्या पेक्षाही जास्ती. तिचा बुध्यांक अगदी सामान्य आहे. ती तुमच्या आमच्यासारखीच आहे. आधी हे स्वीकारा सगळ आपोआपच सोप जाईल. तिच निदान लवकर झालय म्हणजे प्रगतिही लवकर होईल. बिंधास्त जगा, भरपूर स्वप्न बघा. तुम्ही तुमच्या मुला बाळांसाठी बघीतलेली सगळीच स्वप्न लवकरच पुर्ण होतील. मुल कर्णबधिर आहे म्हणून त्यात बदल वगैरे करायची काहीच गरज नाही उलट त्यात भर घाला. ती तुमच्या अपेक्षेबाहेरच जग तुम्हाला दाखवणार आहे. So be ready and Don't worry. या व्यतिरिक्त आणखीन काही प्रश्न असतील तर आताच विचारा.मग घरी गेल्या गेल्या हे राहील ते राहील अस नको व्हायला.”
“खर तर खूप प्रश्न होती पण आपसुकच सगळे उत्तर उलगडले.”

“कर्णबधिरत्व हे वरवर न दिसून येणारे अपंगत्व आहे आणि इथेच सगळयात मोठी अडचण आहे. ती अशी की ते दिसत नसल्यामुळे वयाच्या साधारणपणे तिसर्‍या वर्षापर्यंत ते लक्षातच येत नाही. अर्थात हल्ली सायन्स व टेक्नॉलॉजीमुळे गरोदरपणातही या अपंगत्वाचे निदान होऊ शकते. याबाबत आजही हवे तसे प्रबोधन आढळत नाही. ज्या वयात सर्वसाधारण मूल बोलायला लागते त्या वयातही आपलं मूल `बोलत नाही आणि आवाजही ऐकत नाही` हे लक्षात यायला हवे असतं. पण अंधत्व, मतिमंदत्व किंवा शारीरिक व्यंग या अपंगत्वासारखा डोळ्याला काहीच पुरावा दिसत नाही, त्यामुळे त्याचे निदान होत नाही. त्याहीपेक्षा आपल्या मुलाच्या अपंगत्वाचा स्वीकार करणं अवघड जातं. या बाबतची मानसिकता तयार होऊन त्याच्या भवितव्याचा विचार करेपर्यंत मुलाने `भाषाविकासाची अत्यंत संवेदनक्षम अशी वयाची तीन वर्षे कधीच पार केलेली असतात. `श्रवणर्‍हास लक्षात येऊनही लवकरात लवकर त्यावर उपचार सुरू केले नाहीत, तर `भाषा व वाचा`ची समस्या निर्माण होते. या समस्या वेळीच योग्य प्रकारे हाताळल्या नाहीत तर `शैक्षणिक समस्या` डोकं वर काढू लागते आणि या समस्या जर वेळीच थांबवल्या नाहीत, तर मात्र याचा उलट परिणाम मुलाच्या लेखन, वाचन, वैचारिक, सामाजिक व भावनिक वाढीवर होतो. 
मुलाचे वय शाळाप्रवेशाच्या वेळी कधी ७-८ तर कधीकधी १२-१३ वर्षेही असते. पण आपल्याबाबतीत अस अजिबात घडल नाही. आपण अगदी निखालस वेळेवर आलात. तुम्ही खूप नशीबवाण आहात आणि तुमच्याहीपेक्षा हे बाळ. जे आपल सुवर्ण भविष्य तुमच्या हातुन घडवायला आल.”

अगदी मन एक चित्त करुन दोघेही त्यांच बोलण ऐकत होते. 
“अरे फक्त मिच बोलतो आहे. अहो तुम्हाला, काहीही विचारायच असल तर नक्की येवुन भेटा आणि हो वेळोवेळी विशेष शिक्षकाचे सहकार्य घ्या.”
“हो माझी मैत्रीणच आहे. तिनेच आमच्या हे लक्षात आणुन दिल.”
“अरे वाऽऽ छान. All The Best”.

       मनात माजलेल काहुर शांत झाला होता. त्यांच्या वागण्यात बरयापैकी आत्मविश्वास उत्पन्न झाला होता. 
 तिघेही हातात हात घालुन घरी परतले. तिने फोन करून प्रितीला घरी बोलावुन घेतले. ती हि लगबगीने आली. तिने येताच तिला आवाज दिला आणि तिने लगेच वळुन बघीतल. 
“बघ आता सगळ नाॅर्मल झाल.”
“केवळ तुझ्यामुळे”, प्रितीला घट्ट मिठीत घेवुन मुक्ता म्हणाली.
“अग ते सगळ जावु दे. आता तू कामाला तिला सगळ शिकव म्हणजे आता तिला ऐकायला येतच पण ते कस ऐकायच ते आपण तिला शिकवु. मी ज्या ऑरल ऒरल स्कुलमध्ये आहे आपण तिला तिथे ट्रेनिंग देवु.”
“तू जस म्हणशील आपण तसच करू.”
         प्रितीमुळे त्यांना बरयाच लवकर सगळ उलगळल. आता एक मोट्ठ आवाहन त्यांच समोर होत. घरच्या ईतर मंडळींना तिच्या कर्णबधिरत्वा बद्दल माहिती दयायची होती. ते कसे रिअॅक्ट करतील? काय म्हणतील? तिला स्वीकारेल कि तिचा तिरस्कार करेल? जुन्या विचारांची लोक त्यात धार्मिकतेचा भरभक्कम पगडा सगळ खूप अवघड होत.पुढे त्यांना अनेक आवाहनांना त्यांना सामोरे जायच होत. कोणी काहीही म्हणो आपण मागे हटायच नाही. ती आपली मुलगी आहे. देवु सगळयांना तोंड असा पक्का निर्णय त्या दोघांनी घेतला होता. 
    दोघांनी आपआपल्या घरच्यांना सांगायचा निर्णय घेतला ते हि घरी बोलावुन. दोघांच्याही आई बाबांना जे आहे ते खर खर सांगायच,”पुढे त्यांची इच्छा साथ दयायचा असेल तर देतील नाही तर आपण दोघच पुरे आहोत तिला” अस म्हणून दोघांनी एकामेकाचा हौसला वाढवला आणि फोन करून माहेर आणि सासरच्या मंडळींना बोलावुन घेतल. सगळी जण ऐकुन विस्मयीत झाली. काहीही गंमत नका करू? अस नाही होवु शकत? अग पण आपल्याकडे असली कुणाची हिस्ट्री ही नाही? अग पण वाटत तर नाही हिला बघुन? अशी अनेक प्रश्न त्यांनाही भेडसावली आणि त्यांच ही उर भरून आल. 

          “पण हे बघ बाई दुसऱ्या मुलाचा आता जरा विचार करा. म्हणजे तुमचा ताण कमी होईल आणि कसली खंत हि उपजणार नाही जीवनात.”, सासुबाई मुक्ताला म्हणाल्या.

क्रमशः

    पगोपगी त्यांच्या पुढे नवीन आह्वान येवुन ठाकत होते. कशी लढणार एक आई आपल्या ज़िद्दीची लढाई बघुया पुढील भागात..
       Stay tune....
     पुढचा भाग आपल्या भेटीला लवकरच...

धन्यवाद!!
©️®️अश्विनी दुरगकर.