आपल्यामुळे अपघात झाला असे वाटल्यामुळे रुद्रच्या मनात अपराधीभाव दाटला होता.
" आय एम सॉरी. " रुद्र म्हणाला.
" कोई नि. बिल किती झाले ? " समिधा म्हणाली.
" तुम्ही आराम करा. त्याची काळजी करू नका. " रुद्र म्हणाला.
" जिम ट्रेनर काही कामाचे नाहीत. तुमची फिटनेस बघून वाटलं तुम्ही ट्रेनर असते तर छान झाले असते." समिधा म्हणाली.
" उद्यापासून मी ट्रेनर बनेल तुमचा. " रुद्र म्हणाला.
" पण तुमची फीस ?" समिधा म्हणाली.
" तुमची फिटनेस हीच माझी फीस. " रुद्र म्हणाला.
" ओह. प्लिज मला घरी सोडाल का ? घरचे वाट बघत असतील. " समिधा म्हणाली.
" ठिके. चला. " रुद्र म्हणाला.
समिधा आणि रुद्र खाली आले. समिधा रुद्रच्या बुलेटवर बसली.
" तुमची बुलेट छान आहे. हे मॉडेल नवीनच आले आहे ना मार्केटमध्ये ?" समिधा म्हणाली.
" हो. मला आवड आहे बुलेटची. टाईमपास म्हणून घेतली. "
रुद्र इतका श्रीमंत होता की त्याने फक्त टाईमपास म्हणून महागडी बुलेट घेतली होती. त्याचे स्वतःचे महागड्या गाड्यांचे कलेक्शन होते. समिधाने पत्ता सांगितला आणि रुद्रने तिला तिच्या घराजवळ सोडले.
" इथे माझा मित्र राहतो एक. राधेय. " रुद्र म्हणाला.
" ओह. तो माझा पुतण्या आहे. " समिधा म्हणाली.
" वाटत नाही तुम्ही त्याची आत्या असाल म्हणून. " रुद्र म्हणाला.
" आमची खूप मोठी जॉइंट फॅमिली आहे. मी त्याची दूरची चुलत आत्या पडते. चल मी येते. आणि मला आरेतुरे केलं तरी चालेल. " समिधा म्हणाली.
***
राधेय खिडकीतून दोघांना बघत होता. समिधा एका मोठ्या बंगल्यात राहत होती. राधेय समिधाच्या बेडरूममध्ये गेला.
" आत्या , रुद्रपासून दूर रहा. तो तर आपल्या जातीचीही इज्जत करत नाही. माझा मित्र आहे तो. श्रीमंत बापाचा बिघडलेला मुलगा आहे तो. पाण्यासारखा पैसा कश्यातपण ओततो. " राधेय म्हणाला.
" बापाचा पैसा पोरगा नाही उडवणार मग कोण उडवणार ? जात तर आपल्या दोघांचीही सारखीच आहे. " समिधा म्हणाली.
" आपल्या पोटजातीची थट्टा उडवतो तो. हायब्रीड म्हणतो आपल्याला. " राधेय म्हणाला.
" उडवू दे. तुला काय करायचे ते. तू तुझं बघ आणि मला नको शिकवू. " समिधा म्हणाली.
राधेय तिथून निघून गेला.
***
जिममध्ये हळूहळू रुद्र-समिधाची मैत्री वाढत होती आणि त्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. राधेयने त्याचे मित्र जिममध्ये पेरून ठेवले होते आणि या प्रेमप्रकरणाच्या खबऱ्या त्याच्या कानापर्यंत येऊन पोहोचल्या होत्या. एकेदिवशी रुद्रने समिधाला कॉफीसाठी बोलावले आणि तिथून बुलेटवर बसवून सरळ एका हॉटेलमध्ये नेले. रूमवर जाताच त्याने दरवाजा बंद केला आणि सिगरेट पेटवली.
" रुद्र , आपण इथे का आलोय ?" समिधाने विचारले.
" सोबत काही गोड क्षण घालवण्यासाठी बेबी. " रुद्र सिगरेटचा धूळ समिधावर सोडत म्हणाला.
मग त्याने समिधाच्या नाजूक खांद्यावर घट्ट हात ठेवला आणि तिचे नाजूक गुलाबी ओठ ओठात घेतले.
क्रमश...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा