बंध प्रेमाचे..भाग १०

दुसऱ्यादिवशी प्रीती त्याला सोडायला एअरपोर्ट वर गेली होती. जाताना त्याने प्रीतीला एक घट्ट मिठ??

मागील भागात आपण बघितले...

प्रीती, प्रिया आणि अमरची अचानक भेट होते. अमरचे वागण प्रियाला खटकतं. ह्या संदर्भात प्रीतीशी बोलू असं ठरवून प्रिया झोपी जाते.

रेवती आणि रमेशराव अमर बद्दल बोलत असतात. ज्याची कल्पना प्रियाला नाही.

आता पुढे ...

दुसऱ्या दिवशी सकाळी सागरने प्रीतीला फोन केला. प्रीती त्याच्याशी बोलली पण अगदीच थोडक्यात. त्यानंतर दिवसभरात तिने सागरला फोन आणि मेसेज केलाच नाही. त्याला वाटले की कामात बिझी असेल.

संध्याकाळी नेहमी प्रमाणे प्रिया आणि प्रीती भेटल्या. पण आज प्रिया जरा गप्प होती.

प्रीती: “ काय गं काय झालंय? अशी गप्प का?”

प्रियाने प्रितीकडे बघितले. तिच्या मनात अजूनही संभ्रम होता की अमर बद्दल बोलावे की नाही. तसं तिने मनात काही ठरवून बोलायला सुरुवात केली.

प्रिया : “ काही विशेष नाही.”

प्रीती: “मग कसल्या विचारात मग्न आहेस?”

प्रिया: “ प्रीती अमरची आणि तुझी चांगलीच मैत्री झाली आहे. नाही का?”

प्रीती: “ हो, खरंच मस्त आहे तो एकदम. त्याच्या सोबत वेळ कसा जातो ना कळतच नाही. जॉली बॉय आहे तो. नेहमी हसवत राहतो.”

तिचं बोलणं मध्येच तोडत...

प्रिया: “ आणि सागर? त्याच्याबद्दल काय वाटतं तुला?"

प्रीती: “ तो चांगला आहे पण त्याच्या सोबत वेळ घालवायला तो आहे कुठे इथे?”

असं म्हणत प्रीती परत अमर बद्दल भरभरून बोलू लागली. आता प्रियाला तिचा राग येत होता शेवटी न राहून तिने प्रीतीला स्पष्ट बोलायचे ठरवले .

प्रिया: “ हे बघ अमर कितीही जॉली बॉय असला तरी सागर तुझा होणारा नवरा आहे हे विसरू नकोस. स्पष्टच सांगायचे तर मला वाटतं की अमर तुझ्या जास्तच जवळ येतो.”

प्रीतीला प्रियाचे हे बोलणे आवडले नाही. ती एकदम चिडली.

प्रीती : “ तुला म्हणायचंय काय? अमर फक्त माझा मित्र आहे त्याला माहित आहे की माझं लग्न ठरलं आहे. तुझ्या डोक्यात असं आलं तरी कसं?”

प्रिया:” चिडू नकोस मला वाटलं ते मी बोलले. फक्त मित्र असेल तर चांगलंच आहे पण यापुढे जाऊ नकोस इतच सांगायचं आहे मला.”

 एवढं बोलून प्रिया निघून गेली. त्या नंतर जवळ जवळ एक आठवडा दोघी भेटल्या नाही. दरम्यान प्रीती आणि सागरचे बोलणें अगदी मोजकेच होत होते. लग्नाला एक महिना राहिला होता. प्रीतीला फोनवर बोलणें आवडतं नाही हे त्याला माहीत होतं म्हणून कदाचित ती जास्त बोलत नसेल असं त्याला वाटलं. लग्नाच्या मेन खरेदीसाठी एक दिवस अचानक सागर मुंबईला आला आणि सकाळीच प्रीतीला भेटायला गेला.

त्याला असं अचानक बघून प्रीती गोंधळली. त्या दिवशी तिने ऑफिस मधून दोन दिवसांची रजा घेतली. प्रियाला सुद्धा बोलावून घेतले. पण प्रिया ऑफिस मधून हाफ डे करून दुपारी जेवायला त्यांना भेटणार होती.

सागर आणि प्रीती नाश्ता करून शॉपिंग साठी निघाले. दुकानात पोहोचतो ना पोहोचतो तोच प्रीतीला एक कॉल आला. त्या कॉल वर प्रीती तब्बल अर्धा तास बोलत होती. फोन ठेवल्यावर ऑफिस मधून फोन होता असं तिने सांगितलं. महत्त्वाच्या विषयावर ती आणि अमर बोलत होते. त्यानंतर दोन तीन वेळा असच झालं. प्रीतीच शॉपिंगमध्ये लक्ष नव्हतं. सतत कोणालातरी मेसेजेस करत होती.

काहीवेळाने प्रिया पण आली. दुपारची जेवणाची वेळ होती. त्यामुळे तिघे एका हॉटेलमध्ये गेले. फोन टेबलवर ठेवून प्रीती वॉशरूमला गेली. तेवढ्या वेळात अमरचे दोन कॉल्स आणि चार पाच मेसेजेस आल्याचे प्रिया आणि सागरने बघितले. तरी असेल काही ऑफिसचे काम असा विचारकरत सागरने दुर्लक्ष केलं.

फ्रेश होऊन आल्यावर प्रीतीने मेसेजेस बघितले. त्याचा reply दिला. तिघांनी जेवण झाल्यावर शॉपिंग केली. त्यांनतर प्रीतीने अमरचा फोन उचलला नाही.

 दोन दिवस शॉपिंग मध्ये गेले. दुसऱ्या दिवशी सागर आणि प्रीती डिनर साठी गेले. सागरशी बोलताना तिच्या ओठांवर सतत सागरच्या ऐवजी अमरचे नाव येत होते. सागरला अजिबात ते आवडले नाही तरी तो गप्प बसला. प्रीतीला त्याने घरी सोडले आणि प्रियाला कॉल केला. घडलेलं प्रकार त्याने तिला सांगितला. त्याची समजूत काढत प्रियाने त्याला सांगितले की, “ अमर तिचा कलिग आहे, दिवसभर दोघे सोबत असतात त्यामुळे सवाईप्रमाणे त्याचे नाव तिच्याकडून घेतलं गेलं असेल. त्याला माहित आहे की प्रीतीचे लग्नं ठरले आहे. ते दोघे फक्त मित्र आहेत. तू काळजी करू नकोस.”

प्रियाच्या ह्या बोलण्याने सागरला जरा धीर आला.

तरी प्रियाला मात्र काळजी वाटतं होती. पण प्रीती आणि तिच्या झालेल्या आधीच्या वादामुळे आता हा विषय काढून नवीन वाद नको म्हणून तिने गप्प रहायचं ठरवलं. “ आपण उगाच विचार करतोय. प्रीतीला असं काही वाटत नाहीये मग काळजीचे कारण नाही.” असं ती मनातच बोलत होती.

दुसऱ्यादिवशी प्रीती त्याला सोडायला एअरपोर्ट वर गेली होती. जाताना त्याने प्रीतीला एक घट्ट मिठी मारली. तिच्या कपाळाला किस करत “आय लव्ह यू” म्हणाला आणि परत बँगलोरला निघून गेला.

प्रीती एअरपोर्ट वरून थेट ऑफिसला गेली. आज ती जरा लवकरच आली होती. कोणीच नव्हतं ऑफिस मध्ये. तिक्यात अमर सुद्धा आला. अजून कोणीच आलेले नाही हे बघून तो प्रीतीशी बोलायला गेला. नेहमी गमतीच्या मूड मध्ये असणारा अमर आज अतिशय गंभीर होता. त्याने प्रीतीला डायरेक्ट प्रपोज केलं. त्याचं बोलणं ऐकून प्रीतीला धक्काच बसला.

प्रीती: “ मी तुला फक्त माझा मित्र समजते. तुला माहित आहे की माझं लग्न ठरलं आहे. तरी तू असं कसं करू शकतोस? तू इथूनपुढे माझ्याशी कामाव्यतिरीक्त बोलू नकोस.”

अमर: “ खरंच तुला असं वाटतं की आपण फक्त मित्र आहोत.? स्वतःशी तरी खोटं बोलू नकोस. नीट विचार कर एकदा, स्वतःच्या मनाला विचार. ठिक आहे जोपर्यंत तू स्वतः मला सांगत नाही तोपर्यंत मी तुझ्याशी बोलणार नाही.”

त्यानंतर प्रीती तिथून रागात निघून गेली. तो दिवस तिने कसाबसा काढला आणि संध्याकाळी प्रियाला भेटली.

भेटल्या भेटल्या प्रीती रडायला लागली आणि प्रियाला सगळं सांगितलं.

प्रीती: “ तू बरोबर बोलत होतीस. मी उगाच रागावले तुझ्यावर सॉरी.”

प्रिया: “ सॉरी नको बोलूस. पण आतातरी अमर पासून दूर राहा आणि सागरला वेळ दे. तुझ्या नकळत झालेल्या चुकीमुळे तो खूप दुखावला गेला आहे.”

प्रियाने प्रीतीला सगळं सांगितलं की सागरने तिला कॉल केला होता आणि त्यांच्यात काय बोलणं झालं.

आता प्रितीच्या लक्षात आले होते की सागर सकाळी इतका इमोशनल का झाला होता.

प्रीती: “ हो. पण खरंच मला त्याला दुखवायचं नव्हतं. तेव्हा ऑफिसच्या कामामुळे मी अमरशी बोलत होते.”

प्रिया: “ ठिक आहे. आता तू शांत हो आणि घरी जा. सागरशी बोल.”

त्यानंतर दोघी घरी गेल्या.

रेवती आणि रमेशराव सोफ्यात बसलेले होते. प्रिया घरी जाताच त्यानी तिला “फ्रेश होऊन ये जरा बोलायचं आहे” असं सांगितलं. प्रिया थोड्यावेळात फ्रेश होऊन आली.

रमेशराव: “ पुढच्या रविवारी काही काम काढू नकोस. ते मुलाकडचे येणार आहेत.”

प्रिया: “बाबा इतक्या घाईत का बोलवत आहात? प्रीतीच्या लग्नानंतर केला असता कार्यक्रम.”

रेवती: “ अगं आधीच आज नको उद्या असं झालं आहे बरेचदा. आता परत नको वाटतं सांगायला. आणि असेही अजून वीसएक दिवस आहेत लग्नाला.”

प्रिया: “ बरं ठीक आहे. मी खूप दमले आहे आज आपण नंतर बोलू. मी पुढच्या रविवारी घरीच असेल.”रेवती: “ अगं मुलगा काय करतो? काही विचारशील की नाही? काहीतरी तर ऐकून घे.”

प्रिया: “फक्त शिक्षण सांग काय झालं आहे बाकी, तुम्ही घेतली ना माहिती? मग झालं तर.”

रेवती: “ अगं मुलगा सुद्धा CS आहे.”

प्रिया; “ ठिक आहे. बाकी विचारेल मी त्याला आवडला तर. चला आता जेवण करू आणि झोपू.”

असं म्हणत प्रिया तिच्या खोलीत निघून गेली.

दोन दिवसांनी प्रिया आणि प्रीती परत भेटल्या.

प्रीती: “ काय झाली का तुझी शॉपिंग?”

प्रिया: “ हो मग तुझ्या लग्नात मटकायचा आहे मला. ऑल सेट आहे.”

प्रीती: “ तुझ्यासाठी पण एखादा मुलगा शोधू आपण लग्नात.”

प्रिया: “ अरे हो मुलावरून आठवलं, तो मुलगा मागे मी सांगितलं होतं ना?”

प्रीती; “ होहो त्याचं काय?”

प्रिया: “ तो येतोय ह्या रविवारी बघायला.”

प्रीती: “ अरे वाह मस्त. पटा पट पसंत कर आपण एकाच मांडवात लग्नं करू.”

प्रिया: “ चूप गं येऊतर देत आधी त्याला.”

दोघींच्या गप्पा चांगल्याच रंगल्या होत्या. पण राहून राहून प्रीतीला अमरची आठवण येतच होती. तिने तसं प्रियाला सांगितले नाही. पण मनात ती त्याचा विचार करत होती.

पुढच्या भागात बघू .. अमर येणार प्रियाला बघायला.. एकमेकांना बघून त्याची प्रतिक्रिया काय असेल?

क्रमशः

माझी कथा कशी वाटली नक्की सांगा आणि लाईक करायला विसरू नका ...

🎭 Series Post

View all