बंध प्रेमाचे...भाग १

आता दोघींचा मूड पण फ्रेश झाला होता. घरी येऊन जेवता जेवता दोघी रेवतीला आणि प्रियाचे बाबा पिक्चरची स्टोरी सांगत होत्या. जेवणं झाली. दोघी प्रियाच्या रूम मध्ये निघून गेल्या.

प्रिया आणि प्रीती खूप चांगल्या मैत्रिणी होत्या. अगदी लहानपणा पासून. दोघी पण हुशार आणि दिसायला एकदम सुंदर. त्यांची घर पण जवळ जवळ होती त्यामुळे कधी प्रिया प्रीती कडे, तर कधी प्रीती प्रिया कडे राहायची. त्यांच्या घरच्यांना पण कधीच आपत्ती नव्हती. ते सुद्धा नेहमी दोघींची ओळख करून देताना आमच्या दोन मुली आहेत प्रीती आणि प्रिया अशीच देत. नातेवाईकांना पण माहीत होतं त्यांची मैत्री किती घट्ट आहे ते.

"अरे यार खूप बोर होतंय प्रिया, चलना कुठे बाहेर जाऊ, मस्त मूव्ही बघायचा का आपण? चलना यार प्लिज, काय ते डोकं खुपसून बसली आहेस पुस्तकात. तुझ्याशी बोलतेय मी ... कानात वार जातंय का?"
असा म्हणत प्रीती चिडली आणि "प्रिया यार .."ओरडत प्रियाच्या हातातलं पुस्तक खेचून घेतलं.

प्रिया तिच्याकडे बघून हसत होती.

प्रीती: हसतेस काय मूर्ख... कितीवेळची बोलतेय मी तुझ्याशी...

प्रिया: हसू नाहीतर काय करू? आरती ओवाळू तुझी? एक मिनिट खरतर आरतीच ओवाळली पाहिजे तुझी....

प्रीती: ए गप ग..

प्रिया: अगं खरंच, दोन दिवसांनी फायनल एक्झाम आहे आणि तुला मूव्ही बघायला कसं काय सुचतंय.? आईला समजलं ना तर झाडूने आरती ओवळेल तुझी आणि सोबत माझी पण.

प्रीती: अरे मला जरा ब्रेक हवा आहे, थोड फ्रेश वाटेल तर लक्षात राहील वाचलेलं, म्हणून म्हणतेय मी.

त्यात आपण CL&P (company law and practice) चा study करतोय सो थोडा ब्रेक गरजेचा आहे. मग करू की आपण अभ्यास. तुला माहितीये ना की एकदा फ्रेश झाले मी की संपूर्ण रात्र बसू शकते. पण आता अजिबात काही डोक्यात जात नाहीये. हे बघ आता संध्याकाळचे 4 वाजत आलेत. मला भूक पण लागली आहे, मी किचन मध्ये जाते काकूंना मदत करते sandwiches बनवायला ते खाऊ आणि मग मूव्ही बघायला जाऊ.

प्रिया: हो सगळं माहित आहे मला पण, अग आई पाठवेल का?

प्रीती: तू काकूंची चिंता नको करुस, get ready, मी बोलते काकूंना. त्यांना ही माहीत आहे. की त्यांच्या मुली खूप अभ्यास करून थकल्या आहेत, त्यांना मनवते मी, So you just don’t worry about it.

रेवती: जा जा मूव्ही बघायचा आहे ना जा, फ्रेश होऊन या, पण त्या आधी गरमा गरम sandwiches खा.

असा म्हणत रेवती म्हणजे, प्रियाची आई तिच्या रूम मध्ये sandwiches घेऊन आली. सोबतीला छान फोमची कॉफी पण होती.
मला माहित आहे, तुम्हाला भूक लागली असेल. म्हणून आधीच बनवले मी sandwiches आणि coffee. प्रिया अगं प्रीती बरोबर बोलतेय या जरा फ्रेश होऊन, दोन दिवसांपासून एकच रूम मध्ये पॅक करून बसला आहात, बाहेर गेलात की बरा वाटेल आणि नंतर अभ्यास चांगला होईल, आल्यावर करा परत अभ्यास, मी जेवण तयार ठेवेल तुमचं, जेवून लगेच लागा अभ्यासाला मग तर झालं. आणि हो बाहेरचं काही खाऊ - पिऊ नका, परीक्षा आहे, आजारी नका पडू.

रेवतीच बोलणं ऐकून प्रिया आणि प्रीती खुश झाल्या.

आम्ही बाहेर काहीच खाणार पिणार नाही असं एका सुरात म्हणाल्या.

तिघींनी sandwiches चा फडशा पडला, कॉफी घेतली, सोबतीला गप्पा होत्याच. मग प्रिया आणि प्रीती मूव्ही बघायला गेल्या. ....

आता दोघींचा मूड पण फ्रेश झाला होता. घरी येऊन जेवता जेवता दोघी रेवतीला आणि प्रियाचे बाबा पिक्चरची स्टोरी सांगत होत्या. जेवणं झाली. दोघी प्रियाच्या रूम मध्ये निघून गेल्या.

अभ्यासाला बसायच्या आधी प्रीतीने तिच्या घरी आईला फोन करून इती वृत्तांत सांगितला. आणि उद्या येते घरी, माझा आणि प्रियाच्या स्वयंपाक करशील असं सांगून फोन ठेवला.

 प्रिया आणि प्रीती दोघी पण CS च्या फायनल एक्झामची तयारी करत होत्या, सोबतच एलएलबी पण करत होत्या. त्यामुळे अभ्यासाचं ओझं जरा जास्तच होतं.



क्रमशः

🎭 Series Post

View all