चक्रव्यूह भाग 21

कथेचा नायक कथा भूतकाळाच्या चक्रव्यूहात अडकतो आणि कसे नियतीचे फासे फिरतात ते नक्की वाचा
STORY
चक्रव्यूह भाग 21
भाषा – मराठी
      दुपारची झोप पूर्ण झाली होती. अंगावरच्या जखमा त्या अपघाताची आठवण करून देत होत्या. मी उभं राहण्याचा प्रयत्न करत होतो. भिंतीजवळ वॉकर होता. भिंतीचा आणि टेबलाचा आधार घेत मी वॉकर जवळ आलो. दोन्ही पाय मजबूत दुखत होते. वॉकरच्या सहाय्याने मी खोलीच्या बाहेर आलो. जीव गुदमरून गेला होता.हळूहळू धापा टाकत माजघरात आलो.  तोच स्वयंपाकघराच्या दारातून राधाची मुलगी आली.

मुलगी – अरे.. कशाला उठलास ? काही हवं होतं तर मला किंवा बंडूला हाक मारायचीस.

तिने माझ्या हाताला घट्ट धरलं. अरे हिचा स्वभावही राधा सारखा आहे.. काळजीवाहू.

मी – बंडू कुठाय ?

मुलगी – आत आहे.

मी – बोलाव त्याला..

मुलगी – काय काय आहे ते मला सांग, मी करते.

मी – बंडूलाच बोलाव !

मुलगी – बंडूकाकाssss..   

बंडू आतून धावतच आला.

बंडू – हा दादा , बोला. कसं वाटतंय आता ?

मी – सकाळपेक्षा थोडं बरं वाटतंय. मला जरा बाथरूमपर्यंत चल घेऊन..

त्याने माझा हात पकडला आणि बाथरूमपर्यंत घेऊन गेला. बाथरूमातून बाहेर आलो तेव्हा तो बाहेरच उभा होता.. किती साधा होता हा बिचारा. बाकी सगळ्यात हा मला प्रामाणिक वाटतो. लहानपणापासून ते आत्तापर्यंत मला नेहमीच साथ देत आलाय. त्याने पुन्हा हात पकडला आणि माजघरात घेऊन आला.. ती मुलगी माजघरात माझी वाट पाहत उभीच होती.

मुलगी – गोळ्या घेतल्यास का संध्याकाळच्या ?

बंडू – नाही घेतल्या त्यांनी ! थांबा मी देतो.

माझ्या औषधांबाबत सगळी बंडूलाच माहीती. तोच मला त्याच्या हाताने औषधं देतो. त्याने खोलीत जाऊन औषधांचा डबा आणला आणि गोळ्या घेण्यासाठी भाग पाडलं. गोळ्या घेऊन झाल्या. ती माझ्याकडे एकटक पाहत होती.

मी – तुझा तो मित्र कुठे गेला ?

मुलगी – आपल्या बागेत फिरतोय बंडूकाकाच्या मुलासोबत.

मी – बंडू.. तू सुध्दा जरा बागेत जा. एक अर्धा तास तरी येऊ नका आत.. मला हिच्याशी जरा बोलायचंय !

बंडू – मी पण थांबतो की दादा ..

मी – तू प्रामाणिक आहेस बंडू . तू उगाच मनाशी तर्क बांधत नको बसूस.. पण काही गोष्टी अशा आहेत ज्या तिच्याशीच बोलणं गरजेचं आहे.

बंडू – ठिक आहे दादा..

बंडू आज पहिल्यांदा माझ्याशी नजर न मिळवता जोरजोरात पावलं टाकत बागेत निघून गेला.

मी – ऐक .. काय नाव म्हटलीस तुझं ?

मुलगी – स्वतः च्या मुलीचं नावही तुला माहीती नाहीये.

मी – मी अजूनही तुला मुलगी मानलं नाहीये.

मुलगी – आराधना. आरा़धना नाव माझं. आराधना मनोहर जो..

मी – घरातील सर्व दारं खिडक्या लावून घे.. मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय. 

ती दारं खिडक्या लावून , घरातले दिवे लावून माझ्यासमोर उभी राहीली.

मी – माझ्या कपड्यांच्या बँगा आण जरा इथे..

एका क्षणाचाही विलंब न करता तिने माझ्यासमोर बँगा ठेवल्या. तिने मला एका खुर्चीत बसवलं नंतर ती जमिनीवर बसली.

मी – ती .. लाल बँग उघड..

तिने पटकन ती बँग उघडली..

मी – त्यात तो फोटो आहे तो बाहेर काढ..

तिने तो बँगेतला फोटो हातात घेतला आणि तिचे हात अचानकपणे थरथरू लागले.

मुलगी ( आराधना ) – हा.. हा.. फोटो ?

आप्पा आणि त्या बाईचा तो फोटो होता.

मी – तुला काय माहीती आहे ह्या फोटोबद्दल ?

मुलगी – नाही. काही नाही माहीत !

मी – खोटं नको बोलू माझ्याशी . माझ्याशी खोटं बोलण्याचे परिणाम वाईट होतील.

मुलगी – मी ह्याबाबत तुला नाही काही सांगू शकत.. तुला आधीच सांगितलंय की योग्य वेळी तुला सगळ्या गोष्टी कळतील.

मी – मग कधी येणार ती योग्य वेळ ?

मुलगी – लवकरच..

मी – काय लवकरच लवकरच लावलंय ? इथे झगडतोय मी आयुष्यात ! भूतकाळाच्या आठवणीतून बाहेर जायचंय मला.. मला नाही सहन होत हे सगळं. कुणीही येतंय माझ्या आयुष्यात . गेल्या 28 वर्षात काय घडलं ते मला जाणून घ्यायचंय. माझे नातेवाईक कुठे आहेत ? जिवंत आहेत की मेलेत ? हे मला जाणून घ्यायचंय. भूतकाळाचा शोध घेता घेता वर्तमानकाळातलं माझं अस्तित्व मी हरवून बसलोय. नोकरी गेली , जवळची माणसं गेली , राधा गेली ..

मुलगी – तुझ्यामुळेच गेली ना ती ? तूच मारलंस ना ?

मी – अं ?

मुलगी – तूच मारलंस ना आईला म्हणजे तुझ्या आईला ?

मी – म्हणजे तुला माझ्या भूतकाळ ..

मुलगी – हे सुध्दा तुला सांगितलंय की मला तुझ्या भूतकाळातल्या सर्व घटना माहीतीयेत. श्रीधर काका तुझा शत्रू बनला तेही मला माहीतीये. तुला आठवतंय का ?

     माझी तिच्यावरची नजरच हटली. त्यावेळी घरात राधा प्रेग्नंट आहे आणि आम्ही एकमेकांवर प्रेम करतो हे सांगायचं धाडस होत नसतानाच आप्पांनी घरातल्या सर्वांना माजघरातून हाक मारली..

आप्पा – जरा सगळ्यांनी इकडे येता का ? मला एक महत्वाचं सांगायचंय ! आसावरीsss , प्रभाकरsss , सुलभा वहीनीsss , श्रीधराss , इंदेss , विद्याधरा , पौर्णिमा वहीनीsss , सदा , बंडू , मनोहरा या जरा इथे..

सगळे हातातली कामं सोडून माजघरात जमले. आप्पांच्या समोर दोन जन्म पत्रिका वगैरे असं बरंच काहीसं दिसत होतं. आप्पांचा चेहरा फारच प्रसन्न होता.

आप्पा – तर .. इथे तुम्हाला बोलावण्याचं कारण एवढंच की निला , कुसूम आणि विद्याधराच्या लग्नानंतर पुन्हा एकदा बऱ्याच वर्षांनी आपल्या घरात एक मंगलमय योग जुळून आलाय..

प्रभाकर – म्हणजे ?

आप्पा – प्रभाकरा , मागील काही महिन्यांपासून आपण आपल्या लाडक्या श्रीधर साठी मुलगी शोधत होतो. श्रीधर आता 24 वर्षाचा झालाय. कचेरीत काम करून चांगला पगार आहे . त्याला एक चांगली समज आलीये हे आपण सगळेच जाणतो. जबाबदारी उत्तम प्रकारे निभावू शकतो. समजूतदार आहे. आता त्याचं वय वाढायच्या आत दोनाचे चार हात होणं गरजेचं आहे..माझ्या ओळखीत श्रीधर साठी एक सुयोग्य मुलगी आहे. त्या मुलीचे वडील आणि मी खूप चांगले मित्रही आहोत. मुलीसाठी चांगला मुलगा ते देखील बघत होतेच. मग त्यांच्याकडून मी तिची पत्रिका मागितली. श्रीधर आणि त्या मुलीची पत्रिका पाहील्यावर एक गोष्ट मनात पक्की झाली. ती मुलगी ह्या घराची सून होण्यास , श्रीधरची पत्नी होण्यास योग्य आहे कारण पत्रिकेत दोघांचेही गुण जुळून येताय्त. गुण जूळून आले की मन जुळायला वेळ लागणार नाही.

श्रीधर थोडासा लाजत होता. त्याचं असं लाजरं रूप पाहून मला हसायला येत होतं.

प्रभाकर – पण दाद्या , त्या मुलीचं नाव वगैरे सांगशील की नाही ?

आप्पा – मुलगी आपल्या मन्याच्या वयाचीच आहे.. राधा निळकंठ परांजपे .

हे ऐकून श्रीधर जरी लाजत असला तरी माझं हसणं नष्ट होऊन चेहरा लालभडक झाला. एका क्षणापूरता आप्पांच्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता. मी जिच्यावर प्रेम करतो , जिच्या पोटात माझ्यामुळे जीव वाढतोय ती राधा आता श्रीधरची होणार ? हा असा कसा नियतीचा खेळ ?
क्रमशः
SWA membership no. 51440
Written by Poornanand Mehendale

🎭 Series Post

View all