Oct 18, 2021
कथामालिका

चक्रव्यूह भाग 14

Read Later
चक्रव्यूह भाग 14
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now

    माझ्या सोबत एक प्रकारचा ‘ डिजीटल बलात्कार ’ झाला होता. मी त्या काळ्या भोकाला हात लावला . पाहतो तर काय.. तिथे एक सीसीटीव्ही बसवला होता. मी त्या camera ला बाहेर काढलं. आता तर माझा पारा चढला होता. हे काम नक्कीच डॉक्टरांचं होतं याची खात्री होती मला. मी जोरात ते बाथरूमचं दार उघडलं. डॉक्टर आरशात बघून केस विंचरत होते. मी त्यांच्यापाशी येऊन त्यांना एकटक पाहत होतो. डोळे लालभडक झाले असावेत.

“ काय झालं जोशी ? असे का पाहताय ? ” डॉक्टरांनी केस विंचरतच विचारलं.

“ हे काय आहे डॉक्टर ? ” मी हातातला अगदी छोटासा असलेला सीसीटीव्ही त्यांच्या समोर ठेवला आणि त्यांचं केस विचारणं थांबलं. त्या सीसीटीव्हीकडे त्यांची एक गोंधळलेली नजर गेली .

“ सीसीटीव्ही ? ”

“ हो. तुम्ही बाथरूमध्ये सुध्दा माझ्यावर लक्ष्य ठेवण्यासाठी सीसीटीव्ही ठेवला होतात. शी ! At least बाथरूम तरी सोडायचं हो ! काय मिळतं तुम्हाला माझ्यावर सतत लक्ष्य ठेवून ? तुम्ही नक्की डॉक्टरच आहात ना ? मला तुम्ही डॉक्टर कमी आणि डिटेक्टिव वगैरे जास्त वाटताय ! ”

“ हे बघा , माझं ऐकून घ्या ! ”

“ आत्तापर्यंत तुमचंच ऐकत आलोय डॉक्टर ! अजून किती आणि काय ऐकून घ्यायचंय ? ”

“ पहिली गोष्ट म्हणजे इथे बाथरूमात मी सीसीटीव्ही लावलेला नाही . मला तुमच्यावर लक्ष्य ठेवण्यासाठी सीसीटीव्हीची गरज नाही वाटत. ”

“ मग कोणी केलं ? तुमच्या व्यतिरिक्त घराची किल्ली कुणाकडेच नसते. ”

“ आय नो. पण जेव्हा तुम्ही आजारी होता तेव्हा ह्या घरात ती व्यक्ती राहत होती . ”

“ ती व्यक्ती म्हणजे कोण नक्की ? ”

“ ज्या व्यक्तीने मला तुमच्यावर नजर ठेवायला सांगितली होती ना , ती व्यक्ती इथे राहत होती. गेली 23 वर्ष ती व्यक्ती इथेच राहत होती . ”

“ what ? ”

“ हो. तुमच्यावर आणि माझ्यावर लक्ष्य ठेवण्यासाठी त्या व्यक्तीने ह्या घरातल्या प्रत्येक कोपऱ्यात सीसीटीव्ही सेट केलेत . ”

हे ऐकून तर मी डोक्याला हात लावून बसलो. सालं काय झालंय माझं हे ? मी करत असलेली प्रत्येक गोष्ट कोणीतरी , कुठेतरी लाईव्ह बघतंय ! शी ! आता अजून काय वाढून ठेवलंय ? मला त्या व्यक्तीला गाठणं गरजेचं आहे . मी डोळे मिटून माझा राग आवरू लागलो. डॉक्टरवर चिडून काहीच फायदा नव्हता. ह्या खेळामागचा सूत्रधार कोणी वेगळाच होता. ह्या सूत्रधाराला गाठण्यासाठी कोकणात जाण्याशिवाय पर्याय नव्हताच.

“ निघायचं ? ” मी शांतपणे स्वतःला सावरत विचारलं.

“ अं.. हं. जाताना माझ्या घराकडून कपड्यांची बँग घेऊन जाऊ . तुम्ही झालात ना तयार ? “

“ तयार होणं गरजेचं आहे ना ! ” मी उदासतेने म्हटलं. तो सीसीटीव्ही कचराकुंडीत टाकला. सगळ्या खिडक्या बंद केल्या. बँग घेतली आणि घरातले सर्व दिवे बंद करून आम्ही घरातून बाहेर पडत लिफ्ट मध्ये घुसलो.

“ पहाटेपर्यंत पोहचू कोकणात.. गाडीत तुम्ही शांतपणे झोपा आता . ” डॉक्टर सहजच म्हणून गेले पण माझी मात्र आयुष्यभराची झोप उडाली होती. ह्यांना झोपा म्हणून बोलायला काय जातंय ? लिफ्ट मधून बाहेर पडत पार्किंग एरियात आम्ही गाडीत बसलो. डॉक्टरांनी लगेच एसी सुरु केला आणि थंडी वाजू लागली.

“ डॉक्टर प्लीज , एसी बंद करता का ? का एसी सुरू कर असं त्या व्यक्तीनेच सांगितलंय ? ” मी मारलेला टोमणा त्यांना कळला होता. निमूटपणे त्यांनी एसी बंद केला. आता प्रवासाला सुरूवात झाली होती. गाडी चालवता चालवता त्यांनी कुणालातरी फोन लावला .

“ ऐक , बँगेत 5-6 कपडे टाक माझे आणि बँग घेऊन खाली ये. मला अर्जंट कोकणात जावं लागतंय ! हो. ये. लगेच ये . 5 मिनिटात पोहचतोय मी. ”

काही मिनिटांनी गाडी एका इमारतीच्या खाली उभी होती. डॉक्टर गाडीतून उतरले. इमारतीच्या गेटपाशी एक स्त्री हातात बँग घेऊन उभी होती. डॉक्टर तिच्या जवळ गेले. त्या स्त्रिला एक मिठी त्यांनी मारली. गाडीतच बसून मी हे दृश्य पाहत होतो. ती कोण होती वगैरे प्रश्न नाहीच पडले मला. त्यांनी त्या बाईला मिठी मारली म्हणजे ती त्यांची बायकोच होती हा समज माझा झाला होता. त्यांनी तिच्या हातातली बँग घेतली आणि डॉक्टर गाडीच्या दिशेने येऊ लागले. ती बाई आता माझ्याकडेच बघत होती. ती गळ्यात असलेल्या मंगळसूत्राशी चाळे करत होती. अतिशय जुलमी नजरेने वगैरे बघत होती. खूपच मादक दिसत होती. शी ! दुसऱ्यांच्या बायकांवर आपली नजर ? मी लगेच तिच्याकडे बघणं बंद केलं. डॉक्टरांनी डिक्कीत बँग ठेवली. ड्रायव्हिंग सीटवर येऊन बसले. गाडीतून तिला त्यांनी बाय करत फ्लाईंग किस दिला . मी तर तिचं सौंदर्य पाहून घायाळ झालो होतो. आम्ही तिथून निघू लागलो. मी मनातच एक गाणं गुणगुणू लागलो , “.डोळे हे जुलमी गडे , रोखून मज पाहू नको ” . आमची गाडी पुढे निघाली . डॉक्टरांनीच विषय काढला , “ ही बायको माझी. ” मी त्यापुढे काहीच म्हणालो नाही. गाडी सिग्नलला थांबत थांबत पुढे जात होती. आमच्यात काही बोलण्यासारखं नव्हतंच. मी काही विचारणार त्यावर त्याचं एक उत्तर ठरलेलं होतं त्यामुळे काहीतरी विचारून सारखं सारखं तेच तेच उत्तर ऐकून घेण्यात काहीच रस नव्हता. हा खरंच डॉक्टर आहे ना अशी शंका मला येऊ लागली होती. प्रश्नाला अनेक फाटे फुटत होते. उत्तरं कुठेच नव्हती. कोकणात जाऊन आपण नोकरीचं बघूया का ? निदान 5000 ची नोकरी मिळाली तरी बास .

“ नोकरीचा विचार करताय ना ? ” गालातल्या गालात हसत त्यांनी विचारलं. आयला आता यांना कसं समजलं ?

“ मी लोकांचा चेहरा वाचण्यापेक्षा लोकांचं मन वाचतो . तुम्ही फक्त चेहरा वाचता. म्हणून मी असा का हे कधीच कळत नाही तुम्हाला जोशी ! ”

“ आता तर मला वाटू वागलंय की तुम्ही माणूस नाही आहात , भूत वगैरे आहात. ” मी जोरजोरात हसत म्हणालो. त्यांनी थोडा गाडीचा वेग कमी केला.

क्रमशः

SWA Membership No. 51440

®© poornanand Mehendale

Circle Image

Poornanand

Writer

Author