लाखात एक ---भाग 3
( मागील भागात--
बोट डळमळीत होऊ लागली. रिया घाबरून ओरडली.
आणि मीराने स्वप्नात बघितले होते अगदी तसेच झाले अनय पाण्यात पडला, गटांगळ्या खाऊ लागला.
फरक इतकाच होता की स्वप्नात त्याचा तोल जाऊन तो पडला असे मीराने बघितले होते तर आता प्रत्यक्षात मात्र उभ्या असलेल्या अनयला मीराने पाण्यात धक्का दिला होता.)
आता पुढे--
"..अनय....," रिया जोरदार किंचाळली.
"मीरा, वेडी आहेस का? काय केलेस तू हे?, " रिया मोठमोठ्याने रडत, मीरावर प्रचंड चिडून बोलत होती.
"ताई, शांत हो, माझे ऐकून घे...," असे म्हणत तिच्याकडे मीरा जात होती.
"खबरदार, माझ्याकडे येऊ नकोस. मला पण पाण्यात ढकलायचा प्लॅन आहे वाटते तुझा. जिथे आहे तिथेच थांब," रिया भीतीने आणि संतापाने थरथर कापत होती.
अविश्वसनीय घटना तिच्या डोळ्यांसमोर घडली आणि ती काहीही करू शकली नाही.
कपाळावर हात मारत ती रडत होती, अस्वस्थ झाली होती.
मीराच्या डोळ्यांतूनही अखंड धारा वाहत होत्या.
मीराच्या डोळ्यांतूनही अखंड धारा वाहत होत्या.
ही घटना घडताच दोन जीवनरक्षक (लाईफ गार्ड्स) किनाऱ्यावरून त्यांच्यापर्यंत येऊन पोचले होते.
एकाने त्या दोघींची बोट सुरक्षित किनाऱ्यावर आणली तर दुसरा अनयच्या शोधात पाण्यात पोहत पुढे निघून गेला.
किनाऱ्यावर बोट येताच रिसॉर्टच्या स्टाफने त्यांना धीर देत खोलीत नेले.
मीरा रडत होती पण शांत होती.
तर रियाची अवस्था मात्र बघवत नव्हती.
रडून रडून हाल बेहाल झालेली रिया, मीरा दिसताच तिच्या अंगावर धावून जात होती, ओरडून चिडून बोलत होती.
अश्याच रागाच्या एका अत्त्युच्य क्षणी रिया खाली कोसळून बेशुद्ध झाली.
मीराने अनयला पाण्यात ढकलले ही बाब तिला सहन करता येत नव्हती.
रियासाठी हा मोठ्ठा धक्का होता आणि ती शुद्ध हरवून बसली.
मीरा खाली मान घालून रियाजवळ बसून राहिली.
तिने केलेल्या कृत्याची संपूर्ण जाणीव तिला होती.
तिने केलेल्या कृत्याची संपूर्ण जाणीव तिला होती.
थोड्या वेळाने रिया शुद्धीवर आली.
तिने बघितले की तिचा हात तिच्या आईच्या हातात होता.
"आई...," आईला तिथे बघून तिला आश्चर्य वाटले पण आधारही वाटला.
ती आईला बिलगली.
"आई, बघ ना, मीराने काय केले. अनयला, आपल्या अनयला तिने पाण्यात ढकलून दिले गं, " बोलता बोलता तिला पुन्हा अश्रू अनावर झाले होते.
"रिया, शांत हो तू आधी. मीरासोबत मी बोलते पण तू आधी शांत हो जरा, " आई रियाला शांत करीत होती.
मीरा एका खुर्चीवर पोटाशी पाय दुमडून एकटक खाली नजर लावून बसली होती, हूं नाही की चू नाही.
मीराकडे कटाक्ष टाकत आवंढा गिळत आई रियाला म्हणाली,
"रियु, तुझ्याशी अतिशय महत्त्वाचे बोलणार आहे मी. तू नीट ऐकून घे. खरेतर आज तुमचे बाबा इथे माझ्यासोबत असायला हवे होते पण फ्लाईट रद्द झाल्यामुळे ते येऊ शकले नाही.."
"रियु, तुझ्याशी अतिशय महत्त्वाचे बोलणार आहे मी. तू नीट ऐकून घे. खरेतर आज तुमचे बाबा इथे माझ्यासोबत असायला हवे होते पण फ्लाईट रद्द झाल्यामुळे ते येऊ शकले नाही.."
आई पुढे काही बोलणार तेवढ्यात अनयची आई तिथे येऊन पोहोचली.
"काकू, तुम्ही इथे?"
"हो रिया, तुझ्या आईनेच मला इथे तातडीने बोलावून घेतले.
पण हे काय? काय झालंय तुला? तब्येत ठीक नाही का?," अनयची आई म्हणाली.
पण हे काय? काय झालंय तुला? तब्येत ठीक नाही का?," अनयची आई म्हणाली.
"माझी तब्येत ठीक आहे काकू. पण अनय...," रियाकडून पुढे बोलावल्या गेले नाही.
ती रडायला लागली.
ती रडायला लागली.
"काय झाले? अनयला काय झाले? कुठे आहे तो? तुम्ही सोबत आले होता ना?," इति अनयची आई.
"रियाची आई, तुम्हीच सांगा. मला इतक्या तातडीने का बोलावून घेतले तुम्ही? फोनवर तुम्ही काही सांगायला, बोलायला तयार नव्हत्या, आता तरी सांगा," अनयची आई गोंधळून गेली होती.
रियाची आई मीराकडे बघत शब्दांची जुळवाजुळव करीतच होती तेवढ्यात रिया म्हणाली,
"मी सांगते काकू.
आम्ही अगदी मजेत बोटींग करीत होतो.
अनय नेहमीप्रमाणेच आम्हाला हसवत होता, गाणी गात होता. बोट नदीच्या मध्यभागी होती आणि अनय... ही, ही मीरा, हिनेच केलं, वेडी आहे काकू ही मुलगी,.." अनय, मीरा असे करत करत रिया सांगण्याचा प्रयत्न करीत होती पण तीचीदेखील हिम्मत होत नव्हती.

"अगं, अनय काय, मीरा काय...काय बोलते आहेस? काय सुरू आहे तुमचे? कुठे आहे माझा अनय," आता अनयच्या आईला पण संशय येत होता.
"काकू, अनय पाण्यात बुडाला...," रियाने एका दमात सांगून टाकले.
"काय?...बुडाला?....अनय?," अनयची आई ओरडली.
"ह्या...ह्या मीराने त्याला पाण्यात ढकलले आणि तो गटांगळ्या खात वाहत गेला, " रिया पुन्हा चेहरा हातांनी झाकून घेत रडू लागली.
"काय? कसे शक्य आहे हे? अनय पाण्यात बुडणे शक्य नाही. तुझा काहीतरी गैरसमज होतो आहे रिया," अनयच्या आईला धक्का बसला होता.
"काकू, तुम्ही बसा इथे, शांत व्हा, पाणी प्या. मी समजू शकते तुमची परिस्थिती. एकदम असे काही ऐकल्यामुळे तुम्हाला धक्का बसला आहे," रिया त्यांना म्हणत होती.
"तू सांगते त्यावर माझा विश्वास बसणे शक्य नाही रिया," इति अनयची आई.
"विश्वास तर माझा पण बसत नाही आहे काकू.
अनय पाण्यात पडला यावरही नाही आणि मीरावरही नाही. मीराने त्याला जाणूनबुजून पाण्यात ढकलले काकू," रियाच्या नाकपुड्या लाल झाल्या होत्या.
अनय पाण्यात पडला यावरही नाही आणि मीरावरही नाही. मीराने त्याला जाणूनबुजून पाण्यात ढकलले काकू," रियाच्या नाकपुड्या लाल झाल्या होत्या.
"काय? मीराने? का पण?," अनयच्या आईला धक्क्यावर धक्का बसत होता.
"सवय आहे तिला असे वागण्याची.
म्हणून तर मला ती सोबत नको असते.
आईला सांगितले होते तिचे औषध व्यवस्थित तिला सांगून देशील म्हणून.
याआधी पण हिने असेच केले आहे काकू.
खुनी आहे ही..., " रियाचा बोलण्यावरचा ताबा सुटत चालला होता.
म्हणून तर मला ती सोबत नको असते.
आईला सांगितले होते तिचे औषध व्यवस्थित तिला सांगून देशील म्हणून.
याआधी पण हिने असेच केले आहे काकू.
खुनी आहे ही..., " रियाचा बोलण्यावरचा ताबा सुटत चालला होता.
तिला भूतकाळ आठवत होता.
क्रमशः
© डॉ समृध्दी अनंत रायबागकर, अमरावती
#अष्टपैलूस्पर्धा2025
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा