Dec 01, 2021
कथामालिका

काय फरक पडतो???(भाग ४)

Read Later
काय फरक पडतो???(भाग ४)

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

भाग 1 https://www.facebook.com/581606972323826/posts/1033838273767358/?sfnsn=wiwspwa&funlid=qIdaFHbMD6ibihnO

भाग 2
https://www.irablogging.com/blog/kay-fharak-padtopart-1_4732

भाग 3
https://www.facebook.com/581606972323826/posts/1035841593567026/

मधुरा चे पप्पा तिची आणि नितेश ची ओळख करून देतात.दोघांचं ही हाय-हॅलो करून होतं. नितेश एक मेकअप आर्टिस्ट असतो. मोठं मोठ्या मॉडेल्स आणि हिरॉईन ना तोच तयार करायचा त्यामुळे त्याची सॅलरी ही खूप चांगली असते. मधुरा ला त्याचं बोलणं आणि तो खूप आवडला पण फक्त एक व्यक्ती म्हणून.....मधुरा सगळ्यांची खरेदी बघून तिच्या खोलीत निघून जाते.थोड्या वेळाने मधुरा चे पप्पा तिच्या खोलीत येतात.
झोपली नाहीस बेटा."मधुरा चे पप्पा"
अं........नाही..... अॅकचुली उद्या सकाळी सात ला माझी कॉन्फरन्स मिटिंग आहे त्यासाठी थोडी तयारी करते आहे.... म्हणजे उद्या कुठली गडबड नको....."मधुरा"
बरं........ मी तुला काही विचारायला आलो होतो......तर  थोडा वेळ मिळेल का बोलायला आमच्या मॅडम जवळ."मधुरा चे पप्पा"(थोड्या चेष्टेच्या स्वरातच बोलले)

काय हो पप्पा तुम्ही पण.......बोला.....काय बोलायचं आहे(मधुरा हातातला लॅपटॉप बाजूला ठेवत बोलली)

 

बेटा....... मी तुझ्यासाठी नितेश ला पसंद केलं आहे.... माझ्या मित्राचा मुलगा आहे तो....चांगला आहे, कुठलं व्यसन नाही की कुठली चुकीची गोष्ट नाही...... म्हणजे खरं तर मी ठरवूनचं आलो आहे, पण तरी तुझ्या मनात कोण असेल तर सांग??"मधुरा चे पप्पा"

काय????????तुम्ही जर का सगळं ठरवून आलाच आहात तर मग मला विचारायच्या फॉर्मलिटी तरी का करताय?????डायरेक्ट लग्नच लावून द्यायचं होत ना माझं!!!! आणि आता मला कोण आवडत का हे विचारताय.......छान......"मधुरा"

अगं बाळा......तसं नाही ग ......तू अगदी टोकाचा विचार नको करू आणि मी फक्त ठरवून आलो आहे ते सांगतोय तरी तुझ्या संमती शिवाय काहीचं होणार नाही....... शब्द आहे माझा......"मधुरा चे पप्पा"

अहो पप्पा........पण हे सगळं त्यांच्याशी बोलण्याआधी ठरवण्या आधी मला विचारायचं ना....सगळं बोलून झाल्यावर मला विचारताय........"मधुरा"

मी तुझ्यावर जबरदस्ती नाही करत आहे...... जो तुझा निर्णय असेल तो सगळ्यांना मान्य असेल आणि खूप दिवसांनी मित्र भेटला त्यामुळे भावनेच्या भरात मी ठरवून टाकलं आहे!!!!!पण तरी तुझा निर्णय हा अंतिम असेल बेटा......."मधुरा चे पप्पा"
(मधुरा पप्पांच्या गळ्यात पडते आणि रडू लागते.)

अगं.......इकडे बघ आधी.....काय झालं????का रडतेस... मी म्हंटल ना तुला......तुझ्यावर कोणी जबरदस्ती नाही करणार????मग माझी राणी का बरं रडते???(मधुरा चे पप्पा उजव्या हाताच्या बोटांनी तिची हनुवटी पकडून तिचा चेहरा वर करतात आणि डाव्या हाताने तिचे डोळे पुसतात.)

मधुरा परत पप्पांच्या कुशीत शिरते,आणि थोडावेळ तशीच शांत असते.

काही वेळाने मधुरा तिच्या पप्पांना कैवल्य आणि तिच्या नात्याबद्दल सांगते....तीच आणि कैवल्य च गेल्या सहा वर्षांपासून एकमेकांवर प्रेम आहे आणि पुढे त्यांना लग्न करायच आहे असं सांगते.कैवल्य फार काही मोठ्या घरातला नाही..... त्याची फॅमिली आणि इतर त्यांच्याबाबतीतल्या सगळया गोष्टी थोडक्यात त्यांच्या कानावर घालते...मधुरा च बोलणं ऐकून तिचे पप्पा थोडे उदास होतात,कारण राणी सारखी राहिलेली लेक एवढ्या छोट्या खोल्यांच्या घरात कशी राहील???

मधुरा ला तिच्या पप्पांच्या चेहऱ्यावरूनच त्यांच्या काळजीच कारण समजतं तशी मधुरा त्यांच्या हातावर हात ठेवत म्हणते.........काळजी करू नका माझी.... मी एवढ्या लहान घरात कशी राहीन याच विचारात आहात ना????"मधुरा"

हो......"मधुरा चे पप्पा"

पप्पा....... खरचं काळजी करू नका......कैवल्य खूप चांगला मुलगा आहे. आम्ही दोघेही सांभाळून घेऊ."मधुरा"

मधुराच्या बोलण्याने तिच्या पप्पांच्या डोळ्यात पाणी येतं.ते  तिचा डोक्यावरून हात फिरवतात आणि निघून जातात.

मधुरा जरा टेन्शन मध्ये असते.अकरा वाजत आले होते तरी कैवल्य चा फोन आला नव्हता. घरी काय बोलणं झालं असेल याचाच ती विचार करत असते.तेवढ्यात पुन्हा दारावर टकटक ऐकू येते. ती दार उघडून बघते तर, समोर नितेश असतो.(ती मनातच विचार करते की हा आत्ता.... यावेळी इथे कसा..) तेवढ्यात नितेश तिच्यासमोर टिचकी वाजवतो आणि विचारतो, येऊ का आत???
हो बोलू की नाही याच गोंधळात ती असते,पण नाही कसं म्हणायच म्हणून ती त्याला आत घेते.

तुला समजलच असेल.....मी का आलो आहे ते....."नितेश"

हो......पण हे बघ....माझं एका मुलावर प्रेम आहे आणि मी हे लग्न नाही करू शकत.पप्पांना माहिती नव्हतं म्हणून अजाणतेपणी त्यांनी मला न विचारता लग्नासाठी स्विकृती दिली. आमच्या कडून या लग्नाला नकार आहे.... तसं उद्या पप्पा तुझ्या वडिलांना सांगतीलचं, पण आत्ता तू आलाच आहेस तर......म्हणून मी बोलले."मधुरा"

नितेश तिला.......तिच्या ही नकळत पटकन मिठी मारतो आणि गोंधळलेली मधुरा कावरी बावरी होऊन स्वतःला त्याच्या मिठीतुन सोडवण्याचा खूप प्रयत्न करते.....पण त्याची पकड घट्ट असल्याकारणाने ती असमर्थ ठरते....शेवटी ती असेल नसेल तेवढा जोर काढून त्याचे खांदे पकडते नी त्याला दूर ढकलून देते.

आईssssगं sssss
ओरडतच नितेश दाराच्या बाजूलाच असणाऱ्या टेबलवर जाऊन आदळतो आणि त्याच्या डाव्या हाताच्या कोपराला दुखापत होते त्यामुळे तो कळवळतो....

तुला चांगला मुलगा समजत होते तर तू माझ्या चं घरात येऊन माझ्यावरचं जबरदस्ती करतोस काय???? थांब आत्ता पप्पांना बोलावते आणि ही तुझी थेरं..... सांगते."मधुरा" (मधुरा दाराजवळ येऊन तिच्या पप्पांना आवाज देणार तोच पुन्हा नितेश उठून तीच तोंड घट्ट दाबून धरतो आणि तिला मागे खेचून एका हाताने दरवाज्याला लॉक करतो.हे सगळं बघून मधुरा खूपच घाबरते......तो तिला असचं ढकलत नेऊन तिच्या बेड वर आडवा करतो आणि तो तिच्या दोन्ही पायांना आपल्या पायाच्या मध्ये घेऊन ढोपर्यातून तिच्यावर वाकलेला असतो.....मधुरा डोळे मोठे करून श्वास घेण्याचा आणि स्वतःला सोडवण्याचा निष्फळ प्रयत्न करत असते.

क्रमश:
कथेचा हा भाग कसा वाटला हे कमेंटद्वारे जरूर कळवा.कथा पोस्ट करताना ती लेखिकेच्या नावसहित करावी कारण साहित्य चोरी हा कायद्याने गुन्हा आहे तसे आढळल्यास सक्त कारवाई केली जाईल.कथेचे पुढील भाग वाचण्यासाठी मला फॉलो करा.
धन्यवाद????????

 

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Shravani Lokhande

Housewife

I like reading