कुवतीतले सल्ले

Salle
दोन सख्या जावा ,छोटी चाणाक्ष हुशार ,मोठी समजदार घरपण जपणारी ,कामाच्या जिच्या तिच्या वाटण्या केल्या आणि म्हणून कोणी कोण्याच्या ही कामात लुडबुड करणार नाही असे चोटीचे मत झाले.

कोणा एकीला जे काम दिले ते किती ही त्रास झाला तरी तिने ते करायचेच पण दुसरीने तिला मदत नाही करायची हे छोटी बोलून गेली होती.

कामाची वाटणी मोठीच्या वाट्याला मोठीच्या मुदाम मोठी आणि त्रासाची घेतली आणि छोटीला घर साफ सफाई दिली, मोठी ने सगळ्यांचे चहा नाश्ता जेवण,आणि त्यांचे भांडे जे पडतील ते करणे.

छोटीला नेहमी छोटे काम ,कमी श्रम असणारे सगळ्यांच्या नजरेत भरणारे असे हवे ,ज्या कामात ती कमी व्यस्थ राहील पण सगळे मात्र तिचेच कौतुक करतील अशी काहीशी ती शक्कल लढवत असत. मोठीला मात्र हे कधी जमलं नाही आणि ती ते जमून ही घेत नसे. ती भली तिचे काम भले.

मोठी एखादे काम वाखनण्या जोगे केले की तिची स्तुती होत, आणि तिला इतरांनी केलेल्या स्तुती ची हवा होत नसत,तिला सगळे आनंदी कसे राहतील हे तिचे प्रामाणिक धोरण,कोणाला माझे काम अवडावे त्याची स्तुती व्हावी,मीच मीच ,माझे कसे छान आणि छोटीचे छोटे काम मग तिची का कोणी स्तुती करावी हा हेवा दावा कधी तिच्या मनात ही आला नाही.

या उलट मोठीला नेहमी वाटत मी इतक्या वर्ष हे घर संभाळे आहे आता तरी कोणी तरी ह्या घराची धुरा सांभाळावी, जर छोटी हे छान प्रकारे करू शकत असेल तर मी काही दिवस निवृत्ती घ्यावी, माझे छंद,आवडी निवडी जोपासाव्यात, आई कडे काही दिवस जाऊन मन सोक्त आराम करावा.

तिला वाटत असपल्या इतकेच तिचे ही कौतुक व्हावे, तिचे मन सगळ्यांनी जाणून तिच्या कष्टा चे मोल व्हावे.

इकडे छोटी जावं आईला फोन करून नको ते मोठ्या जावे बद्दल सांगत होती, ती मुद्दाम स्वयंपाक हातात घेते, सगळ्यांना तिचाच स्वयंपाक कसा आवडतो कोण जाणे, त्याला तर काही चव ही नसते,तरी मला मात्र सल्ले असतात यांच्या कडून तू वहिनी कडून शिक ,बाकी काही करत नाहीच तर हे तरी शिक,त्यांचे काम हलके कर जणू मी काही कामच करत नसल्या सारखे ऐकवता. असा ही तासाभरात स्वयंपाक करून बेड रूम मध्ये लोळायला जाते, आणि परत संध्याकाळी तो स्वयंपाक करते, भाजी पोळीशिवाय  येते तरी काय पण स्तुती तर तीचीच असते.

आईने तिला सांगितले,खरे तर आईला ही माहीत होते आपल्या मुलीला स्वयंपाक येत नाही ,पण तिला नावे ठेवायला खूप छान जमते, माहेरी होते ते ठीक होते पण सासरी गेल्यावर तर तिच्यात बदल होईल पण सासर चांगले असल्यामुळे तिला कोणी एक शब्द ही राग येईल आणि तिचा अपमान होऊन अद्दल घडेल असे कोणी ही वागत नाही ,आणि म्हणून ती त्यांच्या ही डोक्यावर बसत आहे.

आईने तिला सांगितले ,असे कर तूच स्वयंपाक हातात घे,आणि तिला धुनी भांडी करू दे ,सोपा असतो स्वयंपाक, त्यात काय तासाभरात होतो,सनी तू ही जाऊन बेड वर लोळू शकते. तू का मागे रहायचे आणि किती दिवस तू सगळ्यांचे खरकटे काढायचे.

छोटी जाऊ मोठ्या जावे कडे आणि घरच्याकडे गेली,आणि म्हणाली मला आता घराची साफ सफाई करण्यात काही गोडी नाही,आणि ना कोणाची माझ्या मेहनतीने केलेल्या कामाकडे लक्ष आहे,मी आता वहिणींचे काम करणार आणि वहिनी माझे काम करणार.

सगळ्यांना तिचे तर tension आलेच होते पण तिच्या हाताच्या स्वयंपाक कलेचे तर जास्तच tension आले होते, तिला सगळ्यानी सांगितले ही होते तुला जमणार नाही तू करू नकोस,पण ती जिद्दीला पेटली, मी का नेहमी पडके काम करू ,वहिनीला ही करू द्या काही दिवस.

दुसऱ्या दिवशी कामाची अदल बदल झाली, वहिनी सगळ्या कामात माहीर होतीच ,तिला सगळ्या कामाची आवड होतीच ,तिने सगळे काम तासात पूर्ण करून घेतले, आणि अजून छोटी 3 तासापासुन kitchen मध्येच राबत होती, सगळे भुकेने व्याकुळ झाले होते, गम्मत बघण्याची वेळ आता अंगलट येत होती. तिने न राहून वहिनीला हाक मारली,आणि म्हणाली वहिनी मला नको हे काम मी माझेच काम करेन हो उद्या पासून ,आणि मला भूक ही खूप लागली आहे. ?

वहिनी ने तिचे सगळे काम हाती घेऊन सगळ्यांना जेवण दिले

आईचा फोन आला तेव्हा छोटीने आईला सांगितले, तू मला सल्ले देत जा पण माझ्या कुवतीतले ,माझा मान राखला जाईल असे.

आईने आपल्या लेकीला सल्ला दिला जो कोणत्या ही आदर्श आईने आपल्या सुखी संसारात नंदणाऱ्या मुलीला मापात राहण्यासाठी द्यावाच, जर ती चुकत असेल तर तिला शहाणपणाचा मार्ग दाखवावा ,जिथे चांगुलपणा टोचत नसेल तिथे जर मुली उगाच आलं घेत असतील तर आईची नैतिक जबाबदारी असते तिला वेळीच तिची कुवत दाखवावी...... हो ना

लेख आवडल्यास like, share आणि तुमच्या छान comments करा ?