कुचंबणा

' अमृता वाईट नको वाटून घेऊ आईचा स्वभाव तू जाणतेस म्हातारपणी तिला जिथे आवडेल तिथेच तिने राहावे हे योग्य नाही कां?असे म्हणून अमृताची समजूत काढायचा प्रयत्न केला. अमृता समजायचे ते समजली आपण आई लाआनंदी ठेवू नाही शकलो याचे तिच्या मनाला खूप लागले. -----------------------------------------
*कुचंबणा*

अमृता ने फुलांचा हार करूनआई च्या फोटो ला घालून नमस्कार करत"आई तुझ्या अमु ला क्षमा कर ग "म्हणत रडू लागली.
तिला रडताना पाहून बाबांनी अमृताच्या पाठीवर हात फिरवत तिला शांत केले "अमृता अग आई होती तुझी, तुझ्यावर राग नाही तिचा".
बाबा म्हणत अमृता सुरेश रावांच्या कुशीत शिरली.
आईला जाऊन आज बरोबर एक वर्ष झाले. अमृताला तिचे बालपण आठवले. नम्रता ताई आणि अमृता, नम्रता आईची लाडकी तर अमृता बाबांची.
अमृता चे लग्न सौरभ शी ठरले. सौरभ ला दिल्लीलानौकरी होती.
नम्रता ताई चे सासर उज्जैन म्हणजे इंदौर जवळच.
"मला इतक्या दूर का पाठवतेस "?? असे अमृता ने म्हणताच "अगं या काही हात च्या गोष्टी असतात का हे तर ज्याचं त्याचंनशीब आहे.
"आणि \"दूर आहे म्हणून हातात आलेलं चांगलं स्थळ सोडून देऊ का \""??
अगं याच देशात आहे ना बघ त्या सर देसाई ची मुलगी अमेरिकेत आहे, त्यामानाने दिल्ली काहीच दूरनाही. विमानाने तर दोन तासात पोहोचता येते .
हाताने विमाना ची एक्टिंगकरत बाबा बोलले तशी अमृता सकट सगळे हसू लागले.
आणि" एका माणसाला सौरभ इतका आवडला आहे तर आम्ही तरी नाही कसं म्हणणार ??नम्रता ने तिला चिमटा काढून भोळेपणाचा आव आणत म्हटले तशी "काय ग ताई" म्हणत अमृता लाजून पळाली.
लग्न होऊन अमृता आता दिल्लीला स्थायिक झाली. वर्ष भरात तिला छान नोकरी लागली. पुढे स्वप्निल व साक्षी चा जन्म झाला त्यावेळेस तिच्या सासूबाई बरोबर होत्या.
बाबा रिटायर्ड झाले त्याच सुमारास नम्रता ताई चा स्कूटर अपघात झाला त्यामुळे आई व बाबा ताईजवळ तिच्या घरी राहू लागले. जवळ जवळ एक वर्ष लागले ताईला बरे व्हायला.
भाऊजी तिथे नव्हते त्यामुळे ताईला आई बाबांची खूप मदत झाली .
काळ आपल्या गतीने पुढे सरकत होता आई बाबांच पण वय जाणवायला लागल.
सौरभ ला प्रमोशन मिळालं पण ट्रान्सफर हि झाली. आई-बाबां अमृता कडे रहावयास आले
आई-बाबा आल्याने अमृताला खूप आराम झाला घरी कोणीतरी आहे या भावनेने तीकामात जास्त लक्ष देऊ लागली..

एक दिवस तिला यायला उशीर झाला घरी आली तो वातावरण गंभीर होते साक्षी आणि
आईची काहीतरी वादावादी चालली होती
"अमू जरा हिच्या कपड्यांकडे लक्ष दे काय घालते? इतके उघडे छोटे कपडे बरे दिसतात कां? आणि काय हा भडक मेकअप?
"आजी आमच्या सगळ्या मैत्रिणी असेच कपडे घालतात आणि मी पार्टीला जाते आहे मग काय सलवार कुडता , दोन वेण्या घालून जाऊ ?--काकूबाई म्हणतील मला, साक्षी चिडून म्हणाली.
आई-- मी पाहते समजावते तिला, म्हणत अमृताने आईला शांत केले.
साक्षी आईसमोर जरा नीट रहा. आणि आई तू पण थोडं समजून घे, हे दिल्ली शहर आहे हे आपलं छोटं गाव नाही. आज-काल अशीच फॅशन आहे असे म्हणत अमृताने विषय बदलला.

दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये सौरभ आला तेव्हाचा प्रसंग अमृताला‌ आठवला.
खूप दिवसांनी सौरभ घरी आला म्हणून त्याचा व मुलांचा प्रोग्राम ठरला "बाबा आज आपण मस्तपैकी आउटिंग जाऊया ना, तिथेच खाऊ पिऊ "??
अमृताने हो जाऊया, मी आईला सांगते .
तेवढ्यात अमृताची आई, शोभाताई म्हणाल्या"अगं दिवाळीच्या फराळाची भाजणी आज भाजून ठेवूया तू मला ते साहित्य काढून दे अनारस्या चे पीठ पण करून ठेवू,"
"अग आई सौरभआज बाहेर जायचं म्हणतात आहे आपणभाजणी उद्या करू"!?
" अग बाई आता दिवाळी डोक्या वर आली केव्हा तयारी होणार"?
रेडीमेड आणू, भाजणी मिळते इकडे आज-काल.अमृता ने विषय संपवला.
"हो बाई सर्व मिळते पण-- त्याला घरची चव कशी येणार?
हो ग-- पण यांनाही चार च दिवस सुट्टी आहे!
बघ बाई तू म्हणशील तसं !आई बोलली --पण मनातून ती नाखूष आहे हे दिसत होते...

एक दिवस गोड खाऊन कंटाळा आला म्हणत सौरभ चिकन घेऊन आला.
अरे हे काय ? आई बाबा नाही खात .
ठीक आहे आपण खाऊ या.
अमृताला कळत नव्हते सौरभ ला कसे समजावे आईला तर वास ही सहन होत नाही.
त्या दिवशी आई काही न खाता तशीच झोपली, मग --अमृताला ही जेवण गेलं नाही ,काय करावे?
आईच्या म्हणण्याप्रमाणे चालावे तर सौरभ नाराज त्याचेही बरोबर आहे चार दिवसासाठी आला आहे आपल्या घरी.
सौरभ परत गेला नीआईचा मूड परत आला, सर्व तिच्या मना प्रमाणे होत होते.
बाबा कधी कधी आईला म्हणत" अगं हा संसार तीचा आहे शोभा, आपण गरज पडली तरच लक्ष घालायचे त्यांना त्यांचे निर्णय घेऊ द्यावे .
पण जन्मभर आपल्याच मर्जीनेआई वागली तो स्वभाव सहजासहजी कसा बदलणार? त्यातून ताईआजारी होती त्यामुळे ताईकडे आईवर सगळी जबाबदारी होती म्हणून ती ठरवेल ते प्रमाण ,
लवकरच सौरभ ची ट्रान्सफर दिल्लीला परत झालीप्रमोशन वर. खूप मोठी पार्टी केली अमृताने ताई व भाऊजी पण आले जाताना आई-बाबांना घेऊन गेले. सौरभ आल्याने अमृताची काळजी मिटली , मुलंआनंदात होती घराला घरपण आले.

असेच दिवस चालले होते .एक दिवस नम्रता ताईचा फोन आला "अगं सोनाच्या बाळंतपणासाठी अमेरिकेला जायचे आहे दोन-तीन महिने तरी तिकडे राहणार . अमृता समजली ताई काय म्हणू इच्छिते तिने आई बाबांना इकडे येण्याविषयी गोष्टी केल्या.
सौरभ जरी बोलला नाही तरी तो फारसा खुष दिसत नव्हता, काही इलाज नव्हता.
आई बाबा आले मुल मागच विसरून खूष होती.आज्जी च्या मागेपुढेकरत होते.
काही दिवस छान गेले पण परत ये रे माझ्या मागल्या.
सौरभ ची भुणभुण तर आईची तणतण तिच्या कानावर येऊ लागली, आई बोलता-बोलता भाऊजी कसे शांत किती समजूतदार वगैरे वगैरे सांगत असे, आणि सौरभ ला ते मुद्दाम वाटत असे," मी काय त्रास देतो ग यांना"
\"अरे तू मनाला लावून नको घेऊ तिचे बोलणे, तिकडे असली की इकडचं कौतुक करत असते" असे म्हणून अमृता सौरभ चा मूड ठीक करायचा प्रयत्न करे.
एक दिवस साक्षी आणि स्वप्नील चे भांडण झाले आईने स्वप्नील ची बाजू तर सौरभ साक्षी ची बाजू.
अशा अनेक घटनांनी अमृताचे मन अस्वस्थ होत असे ,आईची बाजू घ्यावी तर नवरा नाराज आणि आईला नको पडू या सगळ्यात म्हणावं तर \"हो बाई काही झाले तरी मी परकी\" असा आईचा त्रागा .
मग मग तर अमृताने या सगळ्याकडे लक्ष देण सोडून दिलं.
ताईने परत यायचे कळवले तेव्हा आई खूप उत्साहात होती. किती दिवस झाले ग तुला भेटून म्हणत तातडीने रिझर्वेशन करवले.

अमृताला आॅफिस च्या कामाने बाहेरगावी जायचे होते, तिने मी आल्यावर जा मी पण येईन असे सुचवले पण आई हट्टालाच पेटली बाबांचा नाईलाज होता.
अमृता परत आली तेव्हा आईबाबा निघून गेले होते, आपले सर्व सामान घेऊन.
अमृता ला काहीच कळेना, ताईला फोन केला तेव्हा तिच्या कडून सर्व कळले.
\" अमृता वाईट नको वाटून घेऊ आईचा स्वभाव तू जाणतेस म्हातारपणी तिला जिथे आवडेल तिथेच तिने राहावे हे योग्य नाही कां?असे म्हणून अमृताची समजूत काढायचा प्रयत्न केला.

अमृता समजायचे ते समजली आपण आई लाआनंदी ठेवू नाही शकलो याचे तिच्या मनाला खूप लागले.
बाबांनी तिची नेहमीप्रमाणे समजूत काढली अगं जरा काही काळ जाऊ दे तिचा राग निवळेल मग येऊ आम्ही.
पण ती वेळ आलीच नाही आणि आई अचानक जग सोडूनच गेली.

आई व सौरभ दोघ ही आपलेच, पण या दोन विरुद्ध स्वभावाच्या माणसांना आनंदी ठेवण्या च्या प्रयत्नात अमृताची किती कुचंबणा झाली ते ती कोणाला सांगणार होती.??
-------------------------------------------लेखिका. सौ. प्रतिभा परांजपे