Login

कटू घोट

Goht
प्रियाला किती वर्षात एक ही स्थळ चालून आले नव्हते, त्यात तिची लग्न न करण्याची अट आता आई बाबांचा जीव टांगणीला लावत होती, किती समजवले ,अग लग्न म्हणजे आपला कोणी तरी हक्काचा माणूस आपल्या आयुष्यात येणं असते, तो म्हणजे आधार असतो ,नवीन नाती जुळून येतात,आईला आता जशी जशी प्रिया नकार देत तसे तसे पुढचे दिवस आणि भविष्य आठवून त्रास होत ,कधी bp वाढत तर कधी अचानक चक्कर येत. तरणी मुलगी हीच आपल्या नंतर काय होईल याची आता काळजी वाटत होती.आता तर सगळे नातेवाईक ही कंटाळे होते स्थळ सुचवून आणि मध्यस्थी होऊन अपमान करून घेण्यापेक्षा माघार घेतलेली बरी,हेच सगळे तिला प्रियामुळे ऐकवू लागले होते. तिचा ही धीर सुटत जात होता कधी चीड चीड कधी कशावरुन उगाच वाद होत तिचा प्रिया सोबत तर कधी नवऱ्या सोबत. घरात शांती आणि स्वास्थ्य खराब झाले होते. तिला हितगुज करण्याची संधी मिळाली की प्रिया तिला कल्टी मारून रूम मध्ये निघून जात किंवा मैत्रिणी कडे जात.

हळूहळू प्रियच्या एक एक मैत्रिणीच्या ही लग्न ठरल्याचा बातम्या ऐकू येत होत्या, आता तिच्या सोबत एक ही मैत्रीण उरली नव्हती की जिच्या कडे ती काही वेळ निवांत घालवेल, आता नात्यातील आत्याच्या मुली,मावशीची मुलगी,मामाच्या मुली ज्या तिच्या पेक्षा लहान होत्या त्यांचे ही लग्न बघता बघता मार्गी लागत होते, सगळ्या खुस होत्या. हे बघून प्रिया आता कुठे तरी जरा जरा स्वतः ही tension मध्ये येतांना दिसत होती. तिला ही आता मन खत होते, आईचे शब्द आठवत होते.

आज सहज तिला मनातून एकटे वाटत होते, घरात सगळ्यांच्या पत्रिका येऊन पडल्या होत्या, पण तिच्या उत्सुकता दिसली नाही,ना खरेदी ची घाई होती ना लग्नाला जाण्याची आवारा आवर दिसत होती. मन उदास झालं होतं. आज बहिणींचे ही तिला फोन आले नाही,कोणी तिला लग्नाला ये हे साधे बोलले ही नाही. सतत फोन करणाऱ्या मैत्रिणी आणि बहिणी आपल्या shopping मध्ये मश्गुल झाल्या होत्या. प्रत्येक जण आप आपल्या होणाऱ्या, झालेल्या नवऱ्या सोबत सेल्फी काढून टाकत होत्या. कोण खरेदीला गेली,कोण हनिमून ला गेली,कोण सासरच्या घरी सगळ्यांची आवडती झाली हे पाहून तिला आपण लग्न न करण्याची,आलेल्या प्रत्येक स्थळाची उगाच हेटाळणी केली असे वाटू लागले होते, आई म्हणत होती ते अगदीच चूक नव्हते हे तिला जाणवू लागले होते.

आई तिला सांगत होती ," राणी आग आई आहे मी तुझी ,दुष्मन नाही ग, उगाच उशीर झाला की मनाला येणाऱ्या कोणत्या ही स्थळाला मन मारून  हो म्हणावं लागत हं ,माझे ही असेच झाले होते म्हणून तुला मी सांगते तू असे काही वेड्या सारखे निर्णय घेऊ नकोस ,वेळ आपल्यासाठी बसून राहील पण चांगले मुलं आणि स्थळ रहात नाहीत "

पण तेव्हा ती हवेत होती असे आता तिला पटत होते, आईशी ही हितगुज करावी असे आता तिला वाटू लागले होते. ती आता शांत चिंतेत बसलेल्या आई कडे मन मोकळं करून रडत होती,तिला तिची चूक कळली होती.आईने तिला कुशीत घेतले, जशी ती उदास होती तशी आज प्रिया ही उदास होती. आईने प्रियाला एक स्थळ आहे ,जर तू हो म्हणशील तर बघू .तुला आवडला तरच पुढे बोलू.

प्रिया आईचा हात हातात घेऊन ,म्हणाली ,आई तू म्हणशील तसे करू ,मी आता तुझ्या शब्दात राहीन .?