Oct 24, 2021
कथामालिका

कष्टांची किंमत भाग 2

Read Later
कष्टांची किंमत भाग 2

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
दुसऱ्या दिवशी राजेश ऑफिसमध्ये येतो. सगळेजण राजेशकडे बघत असतात. राजेशला थोडं विचित्र वाटलं सगळे असे बघत होते म्हणून, राजेश त्याच्या डेस्क वर जाऊन बसतोच की, पिऊन निरोप घेऊन येतो. सरांनी केबिन मध्ये अर्जंट बोलावलं आहे .

राजेश ड्रेसिंग नीट करून सरांच्या केबिन बाहेर उभा राहतो आणि दरवाजा ठोकतो.

"मी आय कम इन सर......." राजेश

"येस......प्लिज, कम इन मिस्टर राजेश" सर

राजेश आत येतो.

"येस सर......." राजेश

या.....बसा....... मिस्टर राजेश.......गेल्या दोन महिन्यात तुमचा ऑफिस रेकॉर्ड फार चांगला नाही. सॉरी टू से पण..... सध्याची परिस्थिती पाहता मला तुम्हाला कामावरुन काढून टाकावं लागत आहे. खरंतर असं तडकाफडकी निर्णय घ्यावा लागला, पण काय करणार??? माझा नाईलाज आहे........तुम्हाला या महिन्याचा पूर्ण पगार मिळेल आणि प्लस पुढच्या महिन्याचा सुद्धा मिळेल. पुढच्या महिन्याचा देतोय कारण एका महिन्यात जॉब भेटला तर चांगलीच गोष्ट आहे......नाही भेटला तर बायको मुलाची आभाळ होऊ नये म्हणून एक्सट्रा पेमेंट करतोय.

हे..........हे तुमच पेमेंट.......दोन्ही महिन्याची यातच आहेत.कॅशचं दिली आहे...... मोजून घ्या......."सर

सर......अहो पण......मी आता या परिस्थितीत कुठे जॉब शोधू.....मी माझ्या कामात बेस्ट देण्याचा पुन्हा प्रयत्न करेन हवं तर, पण असं जॉब वरून काढून नका टाकू. प्लिज सर हात जोडतो.........प्लिज अस नका करू......"राजेश

आय एम सॉरी मिस्टर राजेश.........पण मला हे करावंच लागेल. मला पण इतर पंचवीस जणांच कुटुंब चालवायचं असत. तुमच्या कमी परफॉर्मन्समुळे इतर लोकांच्या कामावर परिणाम होत आहे. तुम्ही मला समजून घ्याल अशी आशा करतो."सर

राजेश हे ऐकून शांत राहतो.........टेबलवर पाण्याचा ग्लास असतो तो सगळा एका घोटात पोटात ढकलतो आणि त्याच एनवोलप घेऊन सरांना थँक्स म्हणून निघून जातो.

जड पावलांनी तो त्याच्या डेस्क जवळ येऊन स्वतःची बॅग उचलतो आणि ऑफिस बाहेर पडतो.कुणाशी काहीच बोलत नाही. तासाभरात राजेश घरी पोहोचतो. राजेशला अचानक दारात पाहून स्मिताला वाटते त्याची तबब्येत ठीक नाही.

"काय ओ....... काय झालं? असं अचानक घरी आलात? तबब्येत ठीक आहे ना? बरं वाटत नाही का?" स्मिता (राजेश चपला काढून आत येत होता आणि स्मिता त्याच्या पाठी पाठी चालतच प्रश्न विचारत होती.)

"डोकं दुखतंय खूप.......जरा आलं घालून चहा करतेस का???" राजेश

"हो.......आत्ता आणते."स्मिता

स्मिता पटकन किचन मध्ये जाऊन आलं,मिरी, तुळशीची पानं टाकून कडक असा चहा बनवते. राजेश हॉल मध्ये बसून कसल्यातरी विचारत आहे असं स्मिताला वाटत होतं, पण कधी त्याला काही विचारलं, तर त्याच धड उत्तर त्याने कधीच दिल नाही. म्हणून ती चहा घेऊन जाते नि त्याच्या हातात देते.

"काळजी करण्यासारखं काही असेल तर एवढा विचार नका करू......त्याच्यावर उपाय शोधा...... विचार करत राहिलात तर डोकेदुखी थांबणारच नाही........"स्मिता

एवढं बोलून स्मिता पुन्हा किचनमध्ये जायला वळते तोच राजेशचा आवाज येतो.

"मला जॉब वरून काढून टाकलंय...... "राजेश

तो एकदम निर्विकार पणे बोलला.त्याच बोलणं ऐकून स्मिता त्याच्या जवळ आली. दमदाटी करणार सतत कशावरूनही बायकोला पाण्यात पाहणारा....... आज तिच्याच कुशीत लहाण्यांसारखा रडत होता. स्मिताने पण त्याला मोकळं होऊ दिलं. त्याच्या डोक्यावरून मायेनं हात फिरवला.

"हे बघा.....काळजी करू नका.....सगळं होईल ठीक. काही तरी मार्ग नक्की मिळेल. असं रडत नाही बसायचं. चला उठा बरं. "स्मिता

"दुसरा जॉब भेटेपर्यंत खर्च पण थोडा आवरता घ्यावा लागेल. गावी आई बाबांना पैसे पण पाठवता येणार नाहीत. "राजेश

स्मिता पटकन उठून त्यांच्या बेडरूममध्ये जाते आणि लॉकर मधून काही कॅश घेऊन येते. स्मिता बाहेर आल्यावर राजेश त्याच्या हातातील एनवोलप स्मितापुढे धरतो आणि स्मिता तिच्या हातातील पैसे त्याच्या पुढे धरते.

"हे काय?" स्मिता

"पन्नास हजार आहेत. सरांनी या महिन्याचा पूर्ण पगार आणि दुसऱ्या जॉब ची सोय होईपर्यंत एका महिन्याचा जास्तीचा पगार दिला आहे. "राजेश

स्मिता त्याच्या हातातील एनवोलप घेते आणि देवाजवळ ठेवते.

पुन्हा राजेशच्या जवळ जाऊन तिच्या हातातील पैसे त्याच्या हातात देते.

"हे काय??? एवढे पैसे? तुझ्याजवळ कुठून आले???"राजेश

" गेल्यावर्षी पासून मी फंडात दर महा दहा हजार द्यायची. कालच वर्ष पूर्ण झालं आणि त्या ताईंनी बोलावून घेऊन आपले पैसे दिले. एक लाख वीस हजाराला तीस हजार व्याज त्याप्रमाणे दीड लाख आहेत.आता हे दोन्ही पकडून आपल्याकडे दोन लाख आहेत आणि जॉब भेटेपर्यंत एवढी रक्कम खूप झाली आपल्याला. गावी आईबाबांना 2000 तर द्यायचे असतात उगाच त्यात खोडा कशाला."स्मिता.

" दर महिन्याला एवढी रक्कम फ़ंडात देऊन घर कस चालवत होतीस." राजेश

"काही नाही ओ...... घरात बसून बसून अस पण कंटाळा येतो म्हणून कधी लाडू,चिवडा किंवा तोरणं, उलन चा स्वेटर अश्या ऑर्डर आल्या की त्या घ्यायची आणि त्या पैशातून घरातली नड भागवायची. भाजीपाला आणि घाऊक किरणाचे पैसे सुटायचे त्यातून आणि मग तुमचा पगार बाजूला ठेवायची. अडीअडचणीला उपयोगी यायचा. मग गेल्या वर्षी पासून पगारातले थोडे आणि खर्चातले पैसे असे दोन्ही मिळून दहा हजार द्यायला लागली."स्मिता

राजेश विचार करत होता...अडाणी म्हणून किती वाईट बोललो हिला पण हिने तर खूप मोठी गोष्ट केली आज.पण शेवटी पुरुष तो त्याचा इगो त्याची चूक मान्य कसा बरं करेल.

राजेश सगळे पैसे एकत्र करतो आणि लागलीच बँकेत ठेऊन येतो असं सांगून घराबाहेर पडतो. राजेशचं थोडं टेन्शन कमी झालेला बघून स्मिता पण सुखावते.

क्रमशः..........

कथेचा हा भाग कसा वाटला हे तुमच्या कमेंट मधून जरूर कळवा.
धन्यवाद?


❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Shravani Lokhande

Housewife

I like reading