कसे असते नशीब भाग 2

Kse


त्या मुलीच्या घरच्यांनी किती अपमानित केले होते सगळ्या नातेवाईकांच्या समोर... तो अपमान ते विसरले नव्हते... परत तिच्या आईने दिलेले श्राप... आणि कटू शब्द ,त्यांच्या वेदना...

तिच्या बाबांनी लग्नासाठी केलेला अमाप खर्च... किती किती पैसे त्यांनी खर्च केले होते..शेत विकले होते मुलीच्या लग्नासाठी..कर्ज काढले होते... किती नातेवाईकांना पत्रिका पाठवल्या होत्या... आहेर घेतला होते... पाहुण्यांना वाटण्यासाठी साड्या घेतल्या होत्या... जेवणाचा खर्च...भांड्यांचा खर्च...बँड चा खर्च...हॉल चा खर्च...नवरीच्या दागिन्यांचा खर्च..तिचा बस्ता....आणि इतर किती तरी खर्च कर्ज काढून..शेत विकून केला होता...


नवरीच्या घरच्यांना हा दुःखाचा डोंगर अचानक समोर आला होता... बापाने तर स्वतःला मारून घेतले होते... किती मोठी नाचक्की झाली होती...कोण भरून काढणार होते हे दुःख...लेकीच्या बाबाला फक्त एकच हे खर्च नव्हते तर लग्न मोडले ह्याचे खूप जास्त दुःख होते...

तिच्या आई वडिलांना चिंता वाटत होती की, आता आपल्या मुलीच्या नावाने डाग लागला...तिलाच सगळे लग्न मोडल्याचा दोष देणार...मग पुन्हा लग्न जमवता जमवता नाके नऊ येणार...ह्या चिंतेत तो पूर्ण बुडाला होता...

इकडे सागरच्या वडिलांना एकच दुःख खात होते की, भिकेला लागला होता तो बाप माझ्या ह्या सुपुत्रामुळे...ह्याला जर लग्न करायचेच नव्हते तर मग तेव्हाच म्हणायचे होते की ,मी हे लग्न करणार नाही.

सागर ने निदान सांगायचे होते की ,तुम्ही मुलगी बघू नका...माझी मी सोय केली आहे... का कोणाच्या मुलीचे आयुष्य बरबाद करायचे होते त्याने... का इतकी विटंबना करायची त्या सोन्या सारख्या मुलीची..तिला रडू आवरते नव्हते बराच वेळ ती भान ऋण बसली होती...तिला काहीच सुदरत नव्हते...


लग्न घरात त्यादिवशी आता हसत होती, आनंदाचा क्षण होता तिच्यासाठी...तिच्या घरच्यांसाठी...सगळी कडे सगळे नातेवाईक म्हणत होते नशीब काढले मुलीने..मुलगा किती गुणाचा..आम्हाला सगळे नावाजत होते... आमचे उपकार मानत होते... बिना हुंड्याची तुम्ही आमची मुलगी करून घेतली..आणि आम्हाला देवच पावला... तुमची जणू देव म्हणून धावून आलात...रिमाला आपली सून म्हणून स्वीकारली...आणि आमचे नशीब चमकले...हे थोर उपकार कधीच नाही विसरणार तुमचे आम्ही...आणि कीतीदा त्यांनी माझा हात हातात घेतला...आणि त्यांच्या माथा त्यावर टेकवला.... मला त्यावेळी माझ्या मुलाचा किती अभिमान वाटला की, इतके दिवस बाहेर राहून ही तो कोणत्या मुलीच्या प्रेमात पडला नाही..आणि त्याने मी म्हणेल त्या मुलीशी लग्न केले...आज त्याने मान उंचवली म्हणत होतो...उर भरून आला होता...समाजात माझे नाव आदराने घेतले जात होते...हा सोहळा सुख संपन्न होणार ह्यात पूर्ण खात्री होती...मुलाचा रिमासोबत सुखी जीवन प्रवास होणार हे दिसत होते...सगळी कडे वाजंत्री...मंगलमय गीत ऐकू येत होते... आणि इतक्यात त्याचा फोन वाजला.... मला किती तरी वेळानंतर दिसला...दादाचा फोन आला होता...तो तर समोर बसलेला होता...पण मग अचानक कुठे गायब झाला, मी त्याला बघत होतो...आता येईल..आणि मग मी त्याच्या कडे जाऊन प्रत्यक्ष विचारणा करेन हा फोन का केला, तो ही इतके कॉल का केलेस.. .. पण तो कुठेच दिसत नव्हता.. शेवटी नवरी मुलगी ही कंटाळून उभी राहिली...आणि तिच्या बाबांकडे गेली...तिच्या बाबांना झालेली हकीकत सांगितली..."

नवरीचे बाबा आले ,सोबत मामा ,काका, तिचे भाऊ, त्यांचे इतर नातेवाईक ही आले,माझ्या भोवती गोळा झाले, आणि मी एकटा त्यांच्या कडे प्रश्नार्थक नजरेने बघत होतो..ते जणू विचारत होते, कुठे गेला तुमचा मुलगा, कुठे गायब झाला आहे, किती तरी वेळ झाला आहे, तो अजून ही कसा आला नाही...काय भानगड आहे...जर लग्नच करायचे नसेल तर हा खेळ का करायचा होता त्याला...

बाबा नवरीचे ,नवऱ्याच्या बाबाला म्हणाले," हात जोडतो साहेब, माझ्या मुलीच्या आयुष्यातील हा खूप मोठा क्षण आहे, आणि तुमचा मुलगा गायब झाला आहे, तो कुठे गेला आहे हे तर तुम्हाला माहीत असेलच.. त्याने तुम्हाला सांगितलेच असेल...कारण कोणी नवरदेव असा आपल्याच लग्नातून भर मांडवातून.. सगळ्यांच्या समोरून..काही न सांगता जाणे याचा अर्थ मला माहित आहे..पण मला तुम्हाला विचारायचा आहे. ?? आज जर माझ्या लेकीचे लग्न झाले नाही तर आमची इज्जत पार धुळीला मिळेल हो .हा बाप बघतच राहील...आणि काही करू शकणार नाही..मी माझ्या लेकीच्या डोळ्यात अश्रू पाहू शकणार नाही.. मी तिला दुःखात ढकलले आहे असे वाटत आहे...कृपा करा माझ्या मुलीच्या सुखाला कोणाची नजर लागू देऊ नका, पाया पडतो तुमच्या...कायमस्वरूपी ऋणी राहील मी तुमचा..."

सागराचे बाबा स्तब्ध उभे होते, सगळं काही आता सागरच्या हातात होते...त्याने आता उसवलेले नीट करावे अशी त्यांना खूप मनापासून अपेक्षा होती...सागर जर खरंच गेला नसेल आणि काही महत्वाचे त्याला काम आले असेल तर तो येईल आणि पुन्हा लग्नाला उभा राहील...सावरून घेईल..रिमाला साथ द्यायला आणि लग्नातील साथ फेरे घ्यायला तो परत येईल..

आई...बघा ना सागरला काही फोन लावून..माझा जीव टांगणीला लागत आहे..मला नवऱ्या मुलीकडील माहेरच्या लोकांचे हाल बघवत नाहीत, आणि लोकांच्या नजरा ही सहन होत नाहीत...सागर कुठे गेला असेल आधी त्याला फोन लावा...आणि तुम्ही ही जरा स्वतःला आवरा...तुम्ही आम्हाला महत्वाचे आहात...तुम्हाला काही झालेले सहन होणार नाही...

रुपाली...मी लावते त्याला फोन बाबा, तुम्ही मग त्याच्याशी बोला...आई ,बाबा तुम्ही दोघे ही बसा जरा वेळ...मामा आणि मी त्याला कॉल करतो..

सागरला येणारे कॉल दिसत होते, पण त्याची हिम्मत होत नव्हती ते कॉल उचलण्याची..त्याला वाटत होते की आपला निर्णय खूप चुकला आहे अगदी ह्या लग्नाला अति घाई करून होकार देण्याची.. आणि त्यातली त्यात रिमासोबत जुळवून घेण्याची..

रुपाली आणि मामा, तर कधी काका ही सतत सतत फोन लावत होतेच..

इकडे सागर पुन्हा पुन्हा येणारे फोन बघत होता पण तो फोन घेत नव्हता...

नवरी मुलगी ही हे सगळे बघत होती...इतके सगळे जण कॉल करत असून ही हा कॉल घेत नाही ,म्हणजे हा जाणूनबुजून निघून गेला आहे... तरी तिच्या मनात आलेच की मग मला का त्याने प्रेमात पडण्याचे प्रयत्न केले, ते सगळे काय होते..

ती उठते,डोळे पुसते आणि तिच्या आईकडे दिलेला फोन घेते आणि त्याला स्वतःच कॉल करते...

आता खुद रिमाचा कॉल आला हे पाहून तर तो अजूनच शोक मध्ये असतो...रिमा कॉल करते..म्हणजे आतापर्यंत सगळ्यांनाच कळले आहे ,की मी लग्नसोडून पळालो आहे..आणि आता तिथे माझ्या नावाचा एकच गोंधळ सुरू झाला आहे..

रिमा खूप प्रयत्न करते पण तो तिचा ही फोन उचलत नाही.. ती आता समजून चुकली की त्याने तिला अर्ध्यावर सोडले ,लग्न मोडले..आणि तो निघून गेला हे बंध तोडून...


सागर ने खूप मोठा निर्णय घेतला होता,तो ही ज्याची झळ आता सगळ्यांना सोसावी लागली होती ,समाजात असलेली प्रतिष्ठा धुळीस मिळवली होती..

असा निर्णय का घेतला त्याने अचानक... तरी लग्न जमवण्याआधी त्याला त्याचे मत विचारले गेले होतेच...


सागरला रिमा तर त्याला बघताच आवडली होती...कितीदा तर तो तिच्या घरी तिला भेटायला ही गेला होतो ,तिला गिफ्ट घेऊन...तिच्या आवडीचे चॉकलेट घेऊन...तिला आवडतात म्हणून गुलाब घेऊन गेला होता... मग कधी तरी नको सगळ्यांमध्ये कारण मोकळं व्यक्त होता येत नाही म्हणून हॉटेल मध्ये ही घेऊन गेला होता... सगळे तर अलबेल चालू होते... जोडी अनुरूप होती एकमेकांसाठी...मग माशी शिंकली कुठे...


कथा आवडल्यास नक्की पावती देत जावी ,जेणे करून पुढील भाग लिहायला उत्साह वाटतो ,लेखक ही तुमच्या प्रतिक्रियांसाठी अतुरलेला असतो..




क्रमशः..

🎭 Series Post

View all