Mar 02, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

कृष्णसख्याची जडली बाधा भाग 3

Read Later
कृष्णसख्याची जडली बाधा भाग 3

कृष्णसख्याची जडली बाधा भाग 3

मागील भागात आपण पाहिले अविनाश एका पेशंटला तपासल्यावर उदास होतो. त्यानंतर वरद त्याला काही प्रश्न विचारतो. अविनाश आणि रंजना आपली प्रेमकहाणी मुलाला सांगायचे ठरवतात. आता पाहूया पुढे.


दुसऱ्या दिवशी अवीला पहाटे अचानक हॉस्पिटलला जावे लागले. रंजना आणि वरद दोघे एकटेच होते.

"वरद,कोणते कॉलेज निवडायचे ठरवले आहेस तू?"

"बी. जे. मॉम.जिथे माझे आई बाबा भेटले तेच."

"वा,आमच्या खूप आठवणी आहेत तिथे."

"मॉम,सांग ना तुमची स्टोरी. अधलेमधले ठाऊक आहे पण संपूर्ण सांग ना."

"स्टोरी आमच्या दोघांची आहे. तेव्हा सांगायला पण दोघे असणार. आज संध्याकाळी तयार रहा. फक्त डॉक्टर्स लाईफ तुला ठाऊक आहेच. तर सलग तुला सांगता येणार नाही. पण पुढील काही दिवसात तुला सगळे सांगू आम्ही."

आनंदाने उडी मारून वरद अंघोळीला पळाला.


इकडे हॉस्पिटलला एक तातडीची केस हाताळून अवी ओ. पी. डी. मध्ये आला.

"नेक्स्ट पेशंट कोण आहे?" त्याने विचारले.

पलीकडून नाव ऐकताच तो सावरून बसला. अगदी काही सेकंदात प्रचंड देखणा पण तणावात असलेला अभय प्रधान आत आला. पस्तिशी ओलांडलेला एक उमदा तरुण आज हताश होऊन बसला होता.

"मिस्टर प्रधान,कॉफी घेणार?" त्याने मानेने नाही असे सांगितले.

"तुम्ही आमचा सेकंड ओपिनियन घेताय. आमचा संदर्भ कोणी दिला."

"माझा भाचा तुमच्या मुलाचा वर्गमित्र आहे. तर ताईने सुचवले तुमचे नाव."

बोलताना तो प्रचंड संकोचत होता.

"हे पहा प्रधान,मेडिकल सायन्स प्रचंड प्रगत आहे. आपण तुमच्या टेस्टीकल मध्ये स्पर्मस आहेत का? याची टेस्ट करू. तसे ते असतील तर काहीच अडचण येणार नाही."

"डॉक्टर,माय सेक्स लाईफ इज नॉर्मल. आय नेवर हॅव एनी इश्यू अबाऊट दॅट.मग हे कसे काय? माझे पुरुषत्व पूर्ण आहे का?"

त्याचा उडालेला गोंधळ पाहून अविनाश त्याला समजावत होता.

"प्रधान तुम्ही तुमच्या बायकोला सोबत घेऊन या. मी काही टेस्ट लिहून देतो त्या करून घ्या. मग आपण पुढचे ठरवू."

तो बाहेर जाताना त्याच्या चेहऱ्यावर असलेला ताण अविनाशला अस्वस्थ करत होता.


संध्याकाळी घरी यायला जवळपास रात्रीचे दहा वाजले होते. समोर जेवणाचा टेबल तयार होता. अविनाश आणि रंजना फ्रेश होऊन आले. जेवण झाले आणि मग वरद तीन कप कॉफी घेऊन आला.

"येस माय रोमिओ अँड जुलियट आता तुमची सुंदर स्टोरी सुरू करा."

रंजना आणि अविनाश एकमेकांकडे पाहून मंद हसले. अवीने खुणावताच रंजनाने सुरुवात केली.

" कोल्हापूरच्या ग्रामीण भागात माझी आई शिक्षिका होती. बाबा मला आठवत नाहीत. ते आमच्याबरोबर का नाहीत? आजही आई त्याचे उत्तर देत नाही. तर दम लागेस्तोवर खेळायचे आणि मान दुखेपर्यंत अभ्यास करायचा. त्यामुळे बारावीला पोत्याने मार्क्स मिळाले. आईची शिस्तच तशी होती.

पुण्याला बी. जे. मध्ये शिकायला जायचे. आईने भरपूर शिकवणी घेतली. सगळे लक्ष शिक्षणावर हवे. तर आईचे उपदेशाचे डोस पिऊन कॉलेजला प्रवेश झाला आणि पहिल्याच दिवशी हा खडूस भेटला."


"मी खडूस काय? एकतर एवढ्या जोरात धडक दिलीस की माझे डोके दुखायला लागले होते." अवीने हसत कबुली दिली.

"मॉम पुढे काय झाले? तुमची मैत्री झाली ना?" वरदने विचारले.

तसे दोघे खोखो हसत सुटले."मैत्री? अरे हिने धडक दिली आणि कॅन्टीन मध्ये बसलो. तेवढ्यात बाहेरून आरडाओरडा ऐकू आला. सगळे धावत बाहेर गेलो.

पाहतो तर काय मैदानात आमच्या सिनियर वर्गातील तीन पोरी विव्हळत पडलेल्या आणि अंजू गुप्ताला खाली पाडून तिच्या अंगावर धुळीने भरलेली एक मुलगी बसली होती."

"मॉम! तू चक्क मारामारी केलीस?"

"नाहीतर काय? अरे एकतर मला त्या काकूबाई म्हणाल्या. वरून माझ्या केसांना हात लावत अंजी म्हणाली,"किती गावंढळ,आईने शिकवले नाही का काही?"

असे म्हणून तिने माझ्या वेणीची रिबीन खोलली. मग काय कोल्हापुरी हिसका दाखवला."

गोष्ट रंगात आली असताना अचानक वरदचा फोन वाजला.
"काय म्हणालास? थांब मी बाबांना घेऊन येतो."

"वरद काय झाले? काही गंभीर आहे का?"

"आई,प्रणवच्या मामाने घरात फाशी घ्यायचा प्रयत्न केला आहे. बाबा चला ना लवकर."

अविनाशला सकाळी आलेली शंका खरी ठरली होती.अभय प्रधानला कसे समजावणार अवी? रंजना आणि अवीची मैत्री कशी होईल? प्रधान आणि आपल्या नायक नायिकेच्या गोष्टीचा काय संबंध?

वाचत रहा.
कृष्णसख्याची जडली बाधा.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Kunjir Prashant Vishwanath

Primary Teacher

Primary Teacher In Z P Pune A Writer,A Poet An Anchor

//