Mar 02, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

कृष्णसख्याची जडली बाधा भाग 12

Read Later
कृष्णसख्याची जडली बाधा भाग 12

कृष्णसख्याची जडली बाधा भाग 12

मागील भागात आपण पाहिले की रंजना आणि अविनाश दोघांनी पुढे जायचे ठरवले. रंजना आणि अविनाश दोघेही गायनॅक व्हायचे ठरवतात. आता पाहूया पुढे.


वरद आणि अविनाश गाढ झोपलेले असताना रंजना सकाळी घरी आली. तिच्या चाहुलीने अविनाश जागा झाला.

"कधी आलीस? आराम करतेस का थोडा?" त्याने विचारले.

"अरे हॉस्पिटलच्या रेस्ट रूमवर झोप घेऊन आले आहे." रंजना असे बोलून आवरायला गेली.


नाष्टा करायला जमल्यावर वरद म्हणाला,"बाबा,आम्ही आज मूव्ही पाहायला जातोय."

इतके बोलून तो पळाला. तेवढ्यात मॅसेज वाजला. अविनाश फक्त मंद हसला.

"रंजना,तू आज पुढे जा. माझे एक काम आटोपून येईल." रंजना गाडी घेऊन गेली.

अविनाशने गाडी काढली आणि वरदने दिलेल्या पत्त्यावर निघाला. कॅफेमध्ये अभय आधीच त्याची वाट पहात होता.


"कॉफी सांगू का?" अविनाशने संभाषण सुरू केले.

"डॉक्टर,खर तर तुम्हाला भेटायचे होतेच. मला प्रचंड दडपण आले आहे. हा रिपोर्ट समजल्यापासून मी नीट...." बोलताना अभय संकोचत होता.

" मिस्टर प्रधान,डॉक्टर पासून काहीही लपवू नये. रादर तुम्ही मला मित्र समजा. तसेही तुमचा भाचा माझ्या मुलाचा मित्र आहे."

"डॉक्टर,मला ते सुख घेताना कधीही अडचण आली नाही. गेली चार वर्षे माझी पत्नी आपण डॉक्टरकडे जाऊ असे सुचवत होती. तिला तुझी तपासणी करून घे. मी एकदम फिट आहे असेच ऐकवत असे."

"अभय,हीच चूक आपण करत असतो.पुरुष ते करू शकला म्हणजे मग सगळे ठीक. असाच समज असतो." अविनाश सांगत होता.

" डॉक्टर रिपोर्ट कळला आणि माझा आत्मविश्वास गेला. आता मी माझ्या पत्नीला सुख देऊ शकणार नाही." अभय नजर चोरत बोलत होता.

"अभय,बऱ्याच पुरुषांना प्रॉब्लेम मानसिक असतो. परंतु ते समजून घेत नाहीत. तुम्ही खात्री बाळगा सगळे ठीक होईल. फक्त या क्षणी कोणतीही बळजबरी किंवा काहीही सिद्ध करायला जाऊ नका. स्वतः ला वेळ द्या. तुमचे रिपोर्ट दोन दिवसात येतील."

आता अभय बराच शांत झाला होता."डॉक्टर आता खूप छान वाटत आहे."

"अभय मी स्वतः हे सगळे भोगले आहे. ट्रस्ट मी आपण सगळे ठीक करू." अविनाश त्याला धीर देत होता.संध्याकाळी रंजना आणि अविनाश आले. पाहतात तर संपूर्ण घरात लाल फुगे,सुंदर सजावट.

"वरद हे काय आहे? आता काही वाढदिवस वगैरे नाही." दोघे एकदम बोलले.


"आज मी ह्या खास प्रेम कहाणीचा शेवट ऐकणार आहे. तेव्हा सब कूछ स्पेशल पाहिजे."

दोघे छान जेवले.

"बाबा,तुम्ही पुढे कसे सामोरे गेलात ह्या सगळ्याला?"

"रंजना पुढे तू सांगशील?"अवीने तिच्याकडे पाहिले.

"आम्ही एकमेकांना कबुली देताच पुढे चट मंगणी पट ब्याह असे झाले. लग्न झाले. देवदर्शन आणि कुळाचार करून आम्ही घरी परत आलो.

मला अवीच्या चेहऱ्यावर दडपण स्पष्ट दिसत होते.

पराग सहज म्हणाला,"डॉक्टर आता परफॉर्मन्स अव्वल पाहिजे."

अवीच्या हसण्यात मला एक वेदना दिसली. सगळे आवरून आम्ही बेडरूम मध्ये आलो.मंद प्रकाश आणि सजलेली नववधू. गुलाब आणि मोगरा दरवळत होता.

अवी मात्र अवघडलेल्या अवस्थेत उभा होता. मी हळूच त्याच्या जवळ गेले त्याला हाताला धरून खाली बसवले आणि त्याच्या दाट केसांत हात फिरवत गाऊ लागले,

"एकांताची धुंदी साजना,डोळ्यात उतरते आहे.
मधुमास फुलून आला,तुझी प्रिया बावरते आहे."


ते सुंदर गाणे ऐकून अवी नकळत कविता म्हणू लागला.


"मधुचंद्राची रात साजनी,
समीप तुझिया साजन ग.
प्रणयाचा धुंद कैफ हा,
दे हात तुझा हातात ग.


नकळत आमचे हात एकमेकांत गुंफले.मी पुढे होऊन त्याच्या कानात म्हणाले,


" तोड सारी आज बंधने,
घे सामावून मज सखया रे.
गात्रामधून अधीर स्पंदने,
स्पर्शाने तुझिया उठती रे.


अवीने मला जवळ ओढले. दोघांचे श्वासही एकमेकांत मिसळत जातील इतके जवळ.


मधुरस तुझिया ओठातला,
दे आज साजनी चाखाया.
देह होऊ दे चांदणचुरा,
अन् रात असू दे जागाया.


अविमधला सगळा ताण संपला. एक डॉक्टर म्हणून आणि एक प्रेमिका म्हणून मी माझा कृष्णसखा परत मिळवला.


दुसऱ्या दिवशी माझा पूर्वीचा अविनाश मला परत मिळाला. आता आम्ही सज्ज होतो एक वेगळी लढाई जिंकायला.


मातृत्व आणि पितृत्व मिळवायच्या मार्गातील ही लढाई अवी आणि रंजना जिंकतील का? पाहूया कथेच्या अंतिम भागात.


वाचत रहा.
कृष्णसख्याची जडली बाधा.
©®प्रशांत कुंजीर.
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Kunjir Prashant Vishwanath

Primary Teacher

Primary Teacher In Z P Pune A Writer,A Poet An Anchor

//