Feb 28, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

कृष्णसख्याची जडली बाधा भाग 9

Read Later
कृष्णसख्याची जडली बाधा भाग 9कृष्णसख्याची जडली बाधा भाग 9

मागील भागात आपण पाहिले की रंजनाने तिच्या आईला सगळे सांगितले. अवी तिच्याकडे दुर्लक्ष करत होता. एक दिवस रंजना तिची वही अवीकडे विसरली. आता पाहूया पुढे.


"वा,मॉम किती भारी शब्दात लिहिलं आहेस. ते वाचून बाबाने होकार दिला का?" वरद विचारत होता.
"हे तुला त्यालाच विचारावे लागेल." रंजना मंद हसत म्हणाली.

"बाबा सांग ना? काय उत्तर दिलेस तू?" वरद आता उत्तर ऐकायला उतावीळ झाला होता.


अवी एक क्षण शांत झाला आणि मग त्याने उत्तर दिले.

"पूर्ण पुरुष तो कृष्णसखा ग,
तुझ्या स्वप्नीचा दुजा असे.

सखा शोधिशी मजपाशी जर तू
मृगजळाचा हा भास सखे."

उत्तर ऐकताच वरद क्षणभर शांत झाला."काय,तू असे उत्तर दिले. चक्क मॉमला नकार दिलास. कारण काय पण?"


अविनाश शांत बसलेला पाहून रंजना पुढे झाली. "वरद,आम्हाला थोडासा वेळ हवा आहे. तुला हे सगळे सांगायचेच होते. थोडा वेळ दे." एवढे बोलून दोघेही शांत झाले.

"मॉम,तुम्हाला दुखावले का? असे असेल तर आय एम सॉरी." अवी आणि रंजनाने उठून वरदला कुशीत घेतले.
"तुला सगळे जाणून घ्यायचा हक्क आहे. आता ती वेळ आलीय. फक्त थोडासा वेळ दे." तिघेही शांत होऊन झोपायला गेले.

खोलीत जाताना रंजना आणि अविनाश दोघांनी एकमेकांकडे पाहिले.
रंजना अलगद अवीच्या मिठीत विसावली आणि कृष्ण रंगाची रात्र पुन्हा रंगीत होऊन गेली.

दुसऱ्या दिवशी अविनाश वरदला म्हणाला,"आज माझ्याबरोबर थांबशील."

तिघेही एकत्र हॉस्पिटलला आले. वरद लहान असताना अनेकदा येत असे. दिवसभर तिथे थांबल्यावर त्याला काही गोष्टी नीट समजू लागल्या.

अवी आणि रंजना फक्त त्याच्याकडे पहात होते. संध्याकाळी जाताना तो म्हणाला,"बाबा,अरे पुरुष काहीच भाग घेत नाहीत. सगळ्या तपासण्या,सगळी औषधे सगळे स्त्रियांनाच."

"कारण,पुरुष पूर्णच असतो. असा आपला समज. त्याला सेक्स करता आला,लैंगिक सुख घेता आले म्हणजे त्याचात दोष नसणार." अवी शांतपणे उत्तर देत होता.

"बाबा,पण एक डॉक्टर म्हणून तुम्ही हे सगळे सांगताच तरीही."

"आता अभय प्रधानचे उदाहरण घे. सुरुवातीला जवळपास पाच वर्षे त्याने स्वतः ला तपासलेच नाही. नंतर त्याला हा रिपोर्ट मानसिकदृषट्या स्वीकारणे जमत नाही." रंजना एकेक मुद्दा उलगडत होती.

"आपण जितक्या लवकर एखादी गोष्ट स्वीकारतो तेवढी ती सोपी जाते." अविनाश वरदच्या खांद्यावर थोपटत बोलत होता.

बोलता बोलता घर जवळ आले." पण बाबा,अभय मामाला काही उदाहरणे देऊन समजावू शकतो ना?" वरद अस्वस्थ झाला होता.

"त्याचे अंतिम रिपोर्ट येऊ देत.मग निश्चित दिशा ठरवता येईल." अविनाश शांत होत म्हणाला. तेवढ्यात घर आले.आज जेवायला मस्त कढी भात, भाजलेला पापड पाहून अविनाश खुश झाला.

स्वयंपाकी निघून गेल्यावर वरद बोलला,"बाबा,आता सांगशील तू मॉमला नकार का कळवला."

"वरद,स्त्रीला मातृत्वाची अगाध ओढ असते. आई झाल्याशिवाय पूर्णत्व नाही असाच विचार स्त्री करत असते. पण जर एखाद्या पुरुषाला समजले की तो बाप होऊ शकत नाही तर त्याने स्त्रीचा स्वीकार करावा का?"

"बाबा म्हणजे मी?" वरद अस्वस्थ झाला.

"वरद,आम्हीच तुझे जैविक आई वडील आहोत. प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून."

"पण मग बाबाला हे असे काय आणि कसे समजले?"

"ऐक,त्यावेळी आणि आजही मेडिकल स्टुडंट्स स्पर्म डोनेट करतात. त्यावेळी असेच एम.बी.बी.एस.च्या दुसऱ्या वर्षी मी केले.
त्यानंतर आमच्या लॅबचे प्रमुख डॉक्टर नटराजन यांनी मला बोलावले.
"डॉक्टर अवी,आता मी जे विचारीन त्याची निसंकोपणे उत्तरे द्या."
"काही गंभीर आहे का सर" मला दडपण येत होते.

डॉक्टरांनी सिमेन ॲनालिजिस रिपोर्ट माझ्या समोर ठेवले. माझ्या जवळ आले आणि खांद्यावर हात ठेवून म्हणाले,"देअर आर अलमोस्ट झिरो स्पर्मस माय डियर."

मला संपूर्ण हॉस्पिटल माझ्याभोवती फिरते आहे असे वाटले.

"बट सर आय डोन्ट हॅव एनी इश्यू अबाऊट इरेक्टाइल अँड आय मास्टरबेट अल्सो"

"येस माय सन यू आर फिजिकली फाईन बट.." अवी कपाळावरील घाम पुसत थांबला.

वरद हळूच उठून त्याच्याजवळ गेला आणि शांतपणे त्याला खांद्यावर थोपटत राहिला.


"मॉम,पण हे सगळे तुला कसे समजले? तरीही तू बाबाला स्वीकारले? तुला भीती नाही वाटली?


ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे पाहुयात पुढील भागात. ही प्रेमकहाणी आता कोणते वळण घेईल.

वाचत रहा.
कृष्णसख्याची जडली बाधा.
©®प्रशांत कुंजीर.
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Kunjir Prashant Vishwanath

Primary Teacher

Primary Teacher In Z P Pune A Writer,A Poet An Anchor

//