Mar 01, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

कृष्णसख्याची जडली बाधा भाग 4

Read Later
कृष्णसख्याची जडली बाधा भाग 4कृष्णसख्याची जडली बाधा भाग 4

मागील भागात आपण पाहिले अभय प्रधान ह्या पेशंटला काही गोष्टी समजावत असताना डॉक्टर अविनाश अस्वस्थ होते. त्याचवेळी त्यांनी वरदला स्वतः ची गोष्ट सांगायला सुरुवात केली. दरम्यान प्रधान आत्महत्या करायचा प्रयत्न करतात. आता पाहूया पुढे.दोन विंग पलीकडे प्रणवचे घर होते. वरद आणि अविनाश धावतच तिथपर्यंत पोहोचले. तोपर्यंत प्रणव आणि त्याच्या बाबांनी अभयला वाचवले होते.

"सर्वांनी बाजूला व्हा. त्यांना आता काहीच बोलू नका." अविनाश भरभर सूचना देत होता.

"मिस्टर गुप्ते सुसाईड केस आहे. पोलिसांना कळवा." अविनाश शांतपणे म्हणाला.

"काहीही काय डॉक्टर. आमची बदनामी होईल."

"जर यांनी दुसऱ्यांदा प्रयत्न केला आणि ते नाही वाचले तर काय होईल?" अविनाश चिडून बोलला.

मग अचानक शांत होऊन तो बोलू लागला,"इन्स्पेक्टर माझे मित्र आहेत. ते फक्त समज देतील. तोवर मी त्यांना झोपेचे इंजेक्शन देतो."

त्यानंतर अविनाशने अभयच्या ताईला बोलावले,"यांच्या मिसेस कुठे आहेत? त्यांना बोलावून घ्या आणि उद्या मला भेटायला पाठवा."

सगळे आवरून घरी यायला रात्रीचे बारा वाजले होते. "कसा आहे अभय? तुम्ही दोघे बसा. मी छान कोल्ड कॉफी घेऊन येते."


रंजना कॉफी घेऊन आली. वरद एकदम शांत झाला होता.

रंजना त्याच्या हातावर थोपटत म्हणाली,"काहीही होणार नाही. तुला आमच्या गोष्टीतून सगळी उत्तरे मिळतील. प्रणवच्या मामाला आपण नक्की मदत करू.""मॉम,तू सिनियर मुलींना मारलेस. जाम राडे झाले असतील ना?" वरद आता थोडा शांत झाला होता.

"राडे,अरे हिरो झाले होते मी ज्युनियरची. सगळ्या पोरी जल्लोष करत होत्या." रंजना सांगत होती.

"पण एक माणूस धावत आला मैत्रिणींना वाचवायला."

अवी म्हणाला,"मी तेव्हा सगळ्यांना घेऊन गेलो नाहीतर पहिल्या दिवशी तुझ्या मम्मीला बाहेर हाकलले असते डीनने."


"फक्त मला? तुझ्या मैत्रिणींनासुद्धा हाकलले असते. त्यानंतर मी ज्युनियर मुलींची नेता ठरले. अंगात कोल्हापुरी रग होती. त्यानंतर दोन दिवसांनी सगळ्या कॉलेजात काकूबाई! असे लिहिलेले पोस्टर लागले.मी सरळ सिनियर पोरींना शोधत कॅन्टीन मध्ये गेले."


"पुढे काय झाले मॉम?" वरद आता उत्सुक होता.


"काही नाही तुझ्या मॉमने सुवर्णा जकातेच्या नाकावर गुद्दा मारला. त्याबरोबर ती कोलमडून खाली पडली. कॅन्टीनमध्ये राडा सुरू होणार इतक्यात मी सरळ समोर जाऊन मुलींना म्हणालो जर असेच मारामारी कराल तर तुम्ही एकमेकींना नक्कीच विद्रूप करून ठेवाल. त्यापेक्षा आपण चर्चेने प्रश्न सोडवू."


"काय? तू असे म्हणालास बाबा? इतका कूल होतास तू?"

वरदच्या डोक्यात टपली मारून अविनाश म्हणाला,"नाहीतर अशी सुंदर बायको उगाच नाक तोंड फोडलेल्या अवस्थेत मिळाली असती ना? तर कसेबसे पोरींना शांत करून मी घेऊन गेलो."


पुढचे मी सांगते,"त्या गडबडीत माझे आईने दिलेले घड्याळ हरवले. मी हॉस्टेलवर आल्यावर माझ्या लक्षात आले. प्रचंड चीड आली. सगळीकडे शोधूनही घड्याळ सापडेना. दुसऱ्या दिवशी सकाळी खोलीबाहेर माझे घड्याळ फुटलेल्या अवस्थेत ठेवलेले होते.


प्रचंड रडू आणि राग येत होता. मी सरळ आत निघून गेले. घड्याळ उचलून आत आणले. दोन तीन दिवस मी प्रचंड अस्वस्थ होते. रोज मी त्या तुटलेल्या घड्याळाकडे पहात होते.

एक दिवस अचानक ते ही गायब झाले. त्यानंतर पाच सहा दिवसांनी माझ्या खोलीबाहेर एक पत्र होते. जर तुम्हाला घड्याळ हवे असेल तर कॉलेजजवळच्या मैदानात या.


आता यात सिनियरचा काही डाव असेल का? जावे का नाही? मी ते पत्र मैत्रिणींना दाखवले. आम्ही सगळ्यांनी ठरवले की सगळ्यांनी मिळून जायचे आणि जो कोणी असेल त्याला जोरदार मार द्यायचा.


प्रॉपर प्लॅनिंग करून आम्ही पाच जणी मैदानात पोहोचलो. कोणीतरी पाठमोरे उभे होते. त्या व्यक्तीच्या हातात लांबून घड्याळाचा पट्टा दिसला आणि आम्ही काहीच विचार न करता आणलेल्या काठ्या घेऊन मारायला सुरुवात केली."


रंजना थांबली आणि वरद हसला,"आय गॉट इट. ही डोक्यावरची खूण तीच आहे तर. पुढे काय झाले? तक्रार झाली का?"


अविनाश हसला,"बापाची धुलाई झालेली पाहून मजा येते काय बेट्या? चल झोपायला. बाकीचे नंतर. उद्या हॉस्पिटल आहे. त्या प्रधानाला पण समजवायचे आहे."पुढे काय होईल? अविनाशला मारल्याचे काय परिणाम होतील? प्रधान आणि त्याच्या बायकोला समजावताना वरदला त्याच्या प्रश्नाची उत्तरे मिळतील का?


वाचत रहा.
कृष्णसख्याची जडली बाधा.
©®प्रशांत कुंजीर.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Kunjir Prashant Vishwanath

Primary Teacher

Primary Teacher In Z P Pune A Writer,A Poet An Anchor

//