Login

कृष्ण भेटतो सगळ्याच्या रुपात....

Krushna bhetto saglyachya rupat

विषय:-.....कृष्ण भेटतो सगळ्याच्या रुपात...                                 आज आपल्याला कोणाच्या ना कोणाच्या रुपात कृष्णा भेटतो....मग तो कोणीही असो... आई वडील भाऊ बहिण मित्र मैत्रीणी... संकट आल्यावर जो मदतीला येतो तो कृष्णच तर असतो.... संकट जन्माला आल्यावर त्याचे निराकरण करण्यासाठी कोणीतरी येतेच ना... कधी कधी अनोळखी सुद्धा ओळखीचे होऊन जातात... आणि कधी ओळखीचे अनोळखी झाल्यासारखे वागतात...असो...प्रत्येक वेळी आपल्या अडचणी सोडवायला कोणतरी येईल असे नाही ना?? आपले प्रश्न आपल्यालाच सोडवावे लागतील ना.... कृष्णा आहेच की हो कोणाच्या तरी रुपात येऊन तुम्हाला सत्याचा मार्ग दाखवायला.... जीवनात कितीही संकटे आले तरी खचून जाऊ नका.... नव्या उमिदेने परत उभे रहा .... आणी नवीन ध्येये गाठा... भगवतगितेत सगितल्याप्रमाने कोणतीही गोष्ट तुम्हाला फुकट मिळणार त्यासाठी मेहनत कष्ट घ्यावेच लागणार... स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा ...की ती गोष्ट मी करू शकतो ...आणि ती मला करायचीच आहे... कृष्ण नेहमी म्हणतात तू फक्त कर्म करत रहा ... फळाची अपेक्षा धरू नये... आयुष्यात कितीही संकटे आली तरी मी तुझ्या पाठीमागे नक्की उभा राहील... तू जे ठरवले आहे ,जे आवडते ते कर, त्यातून काय होईल तू चूकशील,हरशील, तू शिकशील तुझा अनुभव तुला मिळेल आणि त्या अनुभवाच्या जोरावर तुला पाहिजे ते यश नक्की मिळेल व जगात परिवर्तन नक्की करशील.... जर कृष्ण अर्जुनाच्या पाठीमागे ऊभे राहिले नसते तर आपल्याला जीवनाचे  अनमोल तत्त्वज्ञान माहिती झाले नसते...