Feb 24, 2024
वैचारिक

कृष्ण न उलगडलेला

Read Later
कृष्ण न उलगडलेला

​​​​​​कृष्ण अनेकांचा जीव की प्राण

आहेच तसा तो गोड लडीवाळ

मायेची भुरळ घालितो सर्वांना

तरी वाटतो निरागस बाळ 

 

चक्रव्युह आठवलं की पहिले आठवतो अभिमन्यू आणि नंतर कृष्ण.

कृष्ण म्हणजे अनेकांचा जीव की प्राण फक्त्त महाभारतातच नाही तर घराघरात एकतरी कृष्णप्रेमी दिसतोच.

पण हा कृष्ण नक्की आहे काय, जरा उलगडून बघावा म्हटलं सोप्या भाषेत.

कारण कृष्ण जेवढा उलगडायचा प्रयत्न असतो तेवढाच तो गूढ भासतो.

 

कृष्ण, अंधारात जन्माला रात्रीच्या, त्याचा जन्म गूढ,ह्याचा रात्रीचा जेलमधून नंदाकडे जातानाच प्रवास जसा गूढ आहे तशी ह्याची शिकवणही गूढ आहे.

ती नीट समजून घ्यावी लागते आणि समजून घेताना आपल्यालाच गुंतवत जाते एखाद्या चक्रव्यूहाप्रमाणे.

 

श्रीकृष्णाला समजावून घ्यायचं तर सावधचित्त राहायला हवं.

कारण कृष्ण खोडकर आहे, केव्हा आधार काढून घेईल भरवसा नाही.

तो हात देतो पण मनापासून साद घातली तर...

 

चक्रव्यूह कसा भेदायचा हे 'कृष्णाने' सांगितलं होतं. पण त्यातून बाहेर कसं पडायचं हे, श्रीकृष्णाने सांगितलं नाही की सांगून उलगडलंच नाही.

 

"कृष्ण" आहेच असा अजब, तो फुकटात काही देत नाही. अर्धा मार्ग दाखवतो, रस्ता थोडासा उघडतो. पण पोहोचायचे कष्ट आपल्यालाच घ्यायला लावतो. मोफत काही नाही.

पाण्यात पडलं की पोहोता येतं तसं कृष्ण धडपडायला शिकवतो.

त्याच्या मते, चक्रव्यूहात उतरणार असाल तर उतरा, पण जिंकून बाहेर पडायची माहिती तुम्हालाच घ्यावी लागेल. ते कष्ट तुम्हीच घ्यायचे.

 चक्रव्यूहातून "श्रीकृष्ण" अलगद उचलून बाहेर काढत नाही.

 काढू शकतो, पण काढत नाही कारण तो फार चलाख आहे.

तो तुम्हाला चक्रव्यूहात सोडतो आणि बघत राहतो. सुटायचं तर तुमच्या बळावर सुटा , नाहीतर फसलात. फसल्यावर त्याच्याकडे अपेक्षेने पहात बसाल तर फक्त सौम्य हसतो...

फार गुढ अर्थ आहे ह्या हसण्यामागे...

 

तो फक्त एक नाजूक स्मितहास्य करून सांगतो, जे करायचे स्वतःच्या बळावर करा. शिकून घ्या, समजून घ्या आणि आत्मसात करा.

अर्धवट ज्ञानात राहण्यापेक्षा अज्ञानी रहा. पण धडपडा, स्वतःचा मार्ग शोधा.

 

त्याने आपलं सैन्य दुर्योधनाला दिलं आणि स्वतः एकटाच अर्जुनाच्या पक्षात आला. ज्यामुळे दुर्योधनाला पक्के कळले की अर्जुन जिंकणार नाही. पांडव जिंकणार नाहीत, युद्धाचा निकाल तिथेच लागला होता. पण...

 

श्रीकृष्ण "न धरी शस्त्र करी मी ,गोष्टी सांगेन युक्तीच्या चार" अशी शप्पथ घेऊन रथावर चढला. लोकांना दाखवायला काम केलं फक्त रथ हाकण्याचं. अर्जुनही घाबरला हो कृष्णच्या यां निर्णयाला.

साक्षात महायोद्धा कृष्ण रथावर सोबतीला होता. पण निशस्त्र ! वरून अर्जुनाला ताकीद दिली की तुझं धनुष्य तू उचल आणि लढ. लढत असशील तर मी रथ चालवीन, दिशा दाखवीन.

 

गूढ समजायचं का यातलं. मनुष्य तू कर काहीतरी, तू धडपडतोय तर मी मदत करील बसून राहशील तर, हा मी चाललो...

 

विमोह त्यागून कर्मफलांचा सिद्ध होई पार्था.... 

कर्तव्याने घडतो माणुस जाणुन पुरुषार्था ... 

भाग्य चालते कर्मपदांनी जाण खऱ्या वेदार्था....

लढ तू सत्याने नको पाहूंस स्वतःच्या स्वार्था...

 

श्रीकृष्ण भर रणांगणात वेदार्थ सांगतो, कर्मयोग पटवून देतो. आपण तो नाही पटवून घेतला. नाही आचरणात आणला तर कृष्णाचा काही भरवसा नाही तो मैदान सोडून जाईल.

 

अर्जुनाला बजावले की धनुष्य खाली टाकशील तर मी रथ सोडलाच म्हणून समज.

अर्जुन भर रणांगणात फसला. अखेरीस त्याचा तोच लढला आणि शेवटी जिंकला.

 

कारण अर्जुनामध्ये जिंकण्याची क्षमता आहे. श्रीकृष्णाला हे पक्के ठाऊक होते. आपल्यातही ही क्षमता असते, पण आपण आत्मविश्वास गमावून बसतो.

कोणीतरी मदत करेल ही अपेक्षा ठेवतो. आपली लढाई दुसर्याने लढून द्यावी असे वाटते. अशावेळी कृष्ण मदत करत नाही. आपली लढाई आपल्यालाच लढायला लावतो.

 

यत्र योगेश्वर: कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर: ।

तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम

 

जिथे तो योगेश्वर आहे, श्रीकृष्ण आहे तिथे विजय निश्चित आहे.

 का नसणार? तो सोबतीला उभा राहतो. थोडी फार दिशा दाखवतो. लढायचं आपल्यालाच आहे. जो लढेल, तो निश्चितच जिंकेल.

 

असं म्हणतात की "कृष्ण" जिथे नसावा तिथेही असतो.

 

 दारूचा गुत्ता, जुगारचा अड्डा इथे लपून बसला आहे. माझ्याकडे कोण कोण आकर्षित होतो. कोण येतो हे तो बघत असतो.

 

रंगहीन मी, या विश्वाच्या रंगाने रंगलो...

कौरवांत मी, पांडवांत मी. अणुरेणुत भरलो.

 

तो पांडवांमध्ये आहे आणि कौरवातही आहे. नीतीच्या पक्षात बसला आहे आणि अनीतीच्याही.

त्याला नीती - अनीतीच्या तराजूत तोलता येत नाही कारण तो कुठेही गेला तरी रंगहीन आहे. पण तो रंगपंचमी खेळतो. आपल्याला रंगवून सोडतो. त्याचा काही भरवसा नाही. आपल्यासमोर अनेक रंग पसरवून ठेवतो आणि पाहतो, की आपण कोणत्या रंगातं रंगतों.

 

आपण नेहमी ऐकतो.

"धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे" !!

 

तो म्हणतो की धर्माची स्थापना करण्यासाठी मी प्रत्येक युगात येत राहीन. धर्म म्हणजे मानवता धर्म.

म्हणजे तो काल होता, आज आहे आणि उद्याही असणार आहे. तो आपल्या सोबतही राहणार आहे, फक्त त्याचे म्हणणे ऐकावे लागेल. 

 

*"कृष्ण" सरळ नाही. पण चांगला आहे. समजून घेतलं तर फारच उपयोगाचा आहे.

 

श्रीकृष्णाने आयुष्यात जितक्या गोष्टी सोडल्या, तितक्या त्या इतर कोणालाही सोडता आल्या नाहीत.

 

श्रीकृष्णाने आपली आई, वडील सोडले, त्यानंतर नंद-यशोदाला. मित्र निघून गेले. राधा निघून गेली. गोकुळ सोडले आणि मथुराही सोडली.

 

 आयुष्यभर श्रीकृष्ण काही ना काही सोडतच गेला. श्रीकृष्णाने आयुष्यभर त्याग केला.

तो देवं असून सगळं सोडत गेला, जीव लावून नाती दूर करत गेला आणि आपली आजची पिढी, जी एखाद्या गोष्टीच्या विरहाने कोसळून पडते.

 

खरंतर त्यांनीं श्रीकृष्णालां गुरु बनवावे. ज्याला "कृष्ण" समजला तो कधीच औदासिन्यात (depression) जात नाही.

 

श्रीकृष्ण आनंदाचा देव आहे. एखादी गोष्ट हातातून निसटून गेल्यावरही सुखी कसे रहावे हे 

श्रीकृष्णापेक्षा कोणीही उत्तम शिकवू शकत नाही.

 

 

 

शिका... नाही शिकलात तर यां आयुष्याच्या चक्रव्युहात खितपत पडाल नेहमीसाठी....

 

एवढी मोठी शिकवण सहज सांगणारा देव म्हणजे कृष्ण. 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Pallavi Charpe

Housewife

Always ready to help

//