Feb 22, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

कृष्ण सखी (नवीन नात्याचा प्रारंभ) भाग-८

Read Later
कृष्ण सखी (नवीन नात्याचा प्रारंभ) भाग-८


विषय- कौटुंबिक कथा

शीर्षक - कृष्ण सखी (नवीन नात्याचा प्रारंभ) भाग -८

सखी तशीच पदराच टोकं बोटाला गुंफत उभी होती. तिने एकदा त्याच्याकडे पाहिलं आणि कपाळावर हलकीशी आठी आणत बोलली,

"नाना बरोबर बोलला."

"एक गोष्ट किती वेळा सांगायची ??
अंगठी बघा म्हटलं मी."
कृष्णा नजर रोखून बोलला.

आणि सखी ने घाबरून नजर खाली झुकवली आणि होकारार्थी मान हलवत अंगठीचा बॉक्स पाहिला. मग ती अंगठ्या पाहण्यात हरवून गेली . तिला खूप आवडायच्या अंगठ्या पण पहिल्या  लग्नामध्ये तिला अंगठी घातलीच नव्हती. आणि घरून सुद्धा तिला अंगठी केली नव्हती. त्यामुळे आवडून सुद्धा तिच्या जवळ एकही अंगठी नव्हती.

ती प्रत्येक अंगठी बोटात घालत आणि काढत होती. तिच्या सडपातळ बोटांमध्ये अंगठ्या गोल गोल फिरत होत्या.

पाच मिनिट झाले , दहा मिनिट झाले तरीसुद्धा तिच्या मापाची अंगठी भेटेना  आणि जी भेटेल ती  तिला पसंत येईना. शेवटी पंधरा-वीस मिनिटानंतर एक मापाची अंगठी सापडली.  त्या अंगठी कडे सखी नाखुशीनेच पाहत होती.  आधीच इतका वेळ गेलेला त्यामुळे तिने काही न बोलता ती अंगठी बाजूला काढली .


"चला सापडली एकदाची..!"
नाना सुस्कारा सोडत हसत बोलला.

गेले पंधरा-वीस मिनिट कृष्णा तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बारकाईने पाहत होता .तिला अंगठी पसंत करताना हरवलेल पाहून तो गालात हसला. एखादी अंगठी आवडली तर तिच्या चेहऱ्यावर हलकं हसू येत होत पण ती बोटात बसत नाहीये हे पाहून तिचा चेहरा लगेच उतरत होता . एखादी अंगठी बोटात बसली पण ती तिला आवडत नाही हे पाहून तिचं नाव हलकसं वर जात होतं. कृष्णाला तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहण्यात एक गंमत वाटत होती.

'किती साफ मन आहे यांच'
तो मनातच बोलला.

शेवटी तिने एक अंगठी बाजूला काढली.
तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून त्याच्या लक्षात आलेला ही अंगठी सुद्धा तिला आवडली नाही.  फक्त बोटात बसतीये त्यामुळे तिने ती बाजूला काढली.
नाना बोलल्यावर कृष्णा लगेच बोलला,

"नाही ती त्यांना आवडली नाही.
आपण दुसरीकडे पाहूया."

त्याच्या या वाक्यावर नानाने आणि सखी ने त्याच्याकडे  आश्चर्याने पाहिलं.

'यांना कसं कळलं?'
सखी मनातच..

"तुला कसं कळलं ??"
नानाने आश्चर्याने विचारलं.

"असंच ..!"
आणि तो दोघांकडे दुर्लक्ष करत सराफाच्या भावाला बोलला.  तुम्हाला ऍडव्हान्स मी आता देतो . राहिलेली रक्कम दागिना न्यायला येईन तेव्हा देईन .
दागिना  मी नाहीतर हा माझा भाऊ नाना न्यायला  येईल."

सराफाने पावती बनवली.  कृष्णाने ऍडव्हान्स दिला आणि ते दुसऱ्या सराफाच्या दुकानात गेले. तिथे गेल्यावर सखी गपचूप अंगठ्या पाहू लागली.  खूप वेगवेगळ्या डिझाइन्स होत्या. तिला लगेच त्यातील दोन आवडल्या.  तिने दोन्ही घालून पाहिल्या आणि विशेष म्हणजे तिच्या बोटात दोन्ही बसल्या.  तिच्या चेहऱ्यावर हसू आलं.  इतका वेळ त्या दुकानात टाईमपास करून एकही अंगठी आवडली नाही आणि इथे एका मिनिटात दोन अंगठ्या पसंत पडल्या ? आणि बोटात बसल्या सुद्धा. ती दोन्ही अंगठ्यांना निरखून पाहत होती . कोणती घ्यावी हे तिला कळेना

" दोन्ही आवडलेत का ?"
त्याने विचारलं.

"हो ना !"
ती अंगठ्यांकडे बघतच हसत बोलली.

"मग दोन्ही घेऊयात!"

"नाही नको..
एकच पुरे."

"तुम्हाला दोन्ही आवडल्या असतील तर आपण घेऊ या."

"नको !"
ती तोंडातच पुटपुटली आणि तिने नानाकडे पाहिलं.

ती पुन्हा नानाकडे सरकली आणि हळू आवाजात बोलली,

"नाना तू त्यांना सांग दोन दोन कशाला ?
एकच बास."

"तू सांग ना सरळ.
माझ्याजवळ कशाला मी निरोप देतेस?"

"तू सांग ना त्यांना."
ती तशीच पुन्हा बोलली.

त्यावर नाना हसत बोलला,
"अरे दोन बाजूला काढलेत ना..
त्यातील एक घेऊया कुठली पण."

"तुम्ही बघा ."
त्या दोन्ही अंगठ्या  कृष्णा ने तिच्या समोर सरकवल्या आणि तिची बोटे दोन्ही अंगठ्यांवर फिरू लागली.

"तुम्हीच बघा यातील एक ..
मला कळत नाहीये."

तिला दोन्ही आवडलेत हे पाहून कृष्णा सराफाला बोलला,
"या दोन्हींच वजन करा.

"कशाला?"
तिचा बारीकसा आवाज आला.

आणि त्याच सरळ सरळ दुर्लक्ष...

सोनाराने ने वजन केल्यावर दोन्ही दोन दोन ग्रॅमच्या होत्या.

"ठीक आहे दोन्ही पॅक करा. "

"तो ऐकणार नाही .
तू शांत बस"
नाना सखी ला बोलला.

"अजून काही घेतात का? "

"पट्ट्या आणि जोडवी"
सोनाराने माहिती पुरवून मदत केली.

"हो ते विसरलोच की.. दाखवा पट्ट्या आणि जोडी दाखवा."
नाना उत्साहात..

पैंजणांचा सेट काढल्यावर कृष्णाला आरतीची आठवण आली त्याने पहिल्या नजरेतच एक पैंजण बाजूला काढल आणि ते सखीच्या पुढे ठेवलं.
ती सुद्धा तेच पैंजण पाहत होती आणि कृष्णाने तेच उचलून तिच्यापुढे ठेवलं

"मलाही हेच आवडलं "
तिचा पुन्हा लहान आवाज..

"ठीक आहे मी पॅक करतो ."
सोनाराने ते पैंजण पॅक केल. मध्यम आकाराची जोडवी तिच्या पोटात बसतील त्याच मापाने घेतली. बोटे लहान असल्यामुळे जोडवी घेतानाच खुडून घेतली. आणि ती नाना सोबत दुकानाच्या बाहेर आली.

"नाना माझ्यामुळे किती खर्च ‌??
तू मला आधीच का नाही सांगितलं ?"
सखी तोंड पाडून बोलली.

"अग फक्त मंगळसूत्र घ्यायचं होतं ..
या बाकीच्या गोष्टी आता ऍड झाल्या."

"पण मंगळसूत्र तरी माझ्या आवडीचा का ?
त्यांच्या आवडीच चाललं असतं की."

"असं कसं तू घालणार म्हणजे तुझी पसंत नको?"

"पण त्यांची पसंत सुद्धा छान आहे की."

"अरे वा , तुला बरी पसंत पडली त्यांची पसंत ."
नाना हसत बोलला त्यावर सखी ओशाळली.

"नाना विनोद करू नको."

नाना हसत बोलला,
" गंमत करतोय मी."

सखी थोडी संकोचून बोलली ,
"नाना एक बोलायचं होतं."

"बिनधास्त बोल."

"तुला तर माहीतच आहे बाबा लहानपणीच गेले. दादाने खूप मेहनतीने माझं लग्न लावून दिल.  स्वतःच लग्न केलं . त्याच्यावर आधीच कर्ज आहे.  मला आता पुन्हा त्याच्यावर कर्जाचा डोंगर वाढवायचा नाही."
सखी शांतपणे बोलली.

"बरोबर , पण तुला नक्की काय बोलायचं आहे?"
नाना ने न कळून विचारलं.

"यांनी माझ्यासाठी इतकी खरेदी केली मग त्यांना सुद्धा काहीतरी घालावं लागेल ना? नितीन ला चैन आणि अंगठी घातलेली पण यावेळी ते शक्य नाही."
ती टेन्शन मध्ये बोलली.


"एक सखी,  तू देण्या घेण्याच टेन्शन घेऊ नकोस. कृष्णाला काहीच नकोय. श्रीमंत नसला तरी तो खाऊन पिऊन सुखी आहे. त्याला फक्त चांगली मुलगी हवी होती , जी त्याच्या मुलाची आई होईल, त्याचं घर सांभाळेल. आणि तू तशी आहेस ..हे एवढंच पुरे आहे त्याच्या साठी."

"नाही नाना , त्यांना नको म्हणून आपण काही घालायचं नाही. हे मला बरोबर नाही वाटत.

मी काय बोलते."

"बोल"

"मी मुंबईला कामाला जात होते तर थोडीफार सेविंग आहे माझी .. त्यातून मी यांना अंगठी करू शकते, पण चैन जमणार नाही.  तू सांग त्यांना पुन्हा यावरून प्रॉब्लेम नको."

"अग वेडे प्रॉब्लेम कसला ? तुला बघायचं आहे का? एक मिनिट."
तोपर्यंत मागून कृष्णा आला.

नाना अगदी सहज बोलला,
"कृष्णा , अरे बोलीन बोलीन म्हटलं पण् आपलं बोलणं झालंच नाही."

"कशाबद्दल ?"
पिशवीमध्ये सगळे  बॉक्सेस व्यवस्थित घेतलेत ना चेक करत कृष्णा ने विचारलं.

"अरे तुझ्यावर  ही  काहीतरी घालावं लागेल ना ?"

"म्हणजे ??"
हलकीशी आठी आणतं कृष्णा ने विचारलं.


"म्हणजे चैन, अंगठी असं काही..?"

"वेडा झालास का तू? काही गरज नाहीये."
कृष्णा जरा आवाज चढवून बोलला.

आणि नानाने सूचक नजरेने सखी कडे पाहिलं.

"पण काहीतरी???"
सखी बोलतच होती की त्याच आवाजात तिच्याकडे पाहत कृष्णा बोलला,

"सांगितलं ना ?
मला काही नकोय . तुम्ही येणार आहात एवढेच पुरे आहे."

नाना गालात हसला.

"रागात सुद्धा प्रेमाने बोलायला लागलाय कृष्णा.. बदलतोय चांगलं आहे...!"

कृष्णाने आवाज चढवल्यावर सखी घाबरली. तिने खाली बघूनच हो म्हणून मान हलवली.

नाना विषय बदलत बोलला,
"बर सखी, तू कशी जाणार आहेस?"

"कशी म्हणजे बस नी"

"नाही खूप वेळ वाट पाहावी लागेल .सुरज तुमची वाट पाहत असेल . नाना तू सोड त्यांना."

"मी ??"
नाना आश्चर्याने बोलला.

"मग कोण मी???"

"नाही नको ..मी जाईन."
सखी संकोचून बोलली.

इतक्यात नानाचा मोबाईल वाजला. घरून बायकोचा फोन होता . फोन उचलल्यावर ती भडकली,

"कुठे आहात???"
तिने सुरातच विचारलं.

"रविवार ना आज. बाजारात आलोय."

"मुद्दामून गेला ना बाजारात."

"असं का बोलतेस तू?"

"दादांनी आज जेवायला बोलावलय  आपल्याला विसरला का?"

"अरे बापरे खरंच विसरलो ."
नाना ओरडलाच..

"तुमचं ना असंच असतं ..सासुरवाडीला जायचं म्हटल्यावर शंभर कारण तयार असतात."

"अगं नाही ,खरंच विसरलो ."
नाना लाडीगोडी लावत..

"जाऊद्या माझ्याशी बोलूच नका."

"आता रागवू नकोस.. एक काम कर .
तू तयार होऊन बस ,मी पंधरा मिनिटात आलो."

"उडत येणार आहात का ?"
पलिकडून सुरात आवाज..

"अग ती बोलायची पद्धत झाली.. तू तयार हो मी निघतो आता."

फोन ठेवल्यावर नाना गडबडीत बोलला,
" मला निघायला हवं.  अरे सासुरवाडीला जायचं विसरलो ..नाही रागवेल नाही तर."

"यांना तर सोडून जा."

"तू सोड ना"

"तू दुसरा पर्याय ठेवलाच नाहीस, ठीक आहे."

दोघांनीही आपापल्या बाईक काढल्या सखी एकदा त्याच्याकडे तर एकदा त्याच्या बाईकच्या सीट कडे बघत होती. नितीन गेल्यापासून ती पुन्हा बाईकवर बसलीच नव्हती.  नितीन सोबत सुद्धा एक दोन वेळेस योग आलेला आणि आता डायरेक्ट कृष्णा सोबत बाईकवर बसणं म्हणजे तिला थोडं अवघड वाटत .


सखी च सहज लक्ष रस्त्याच्या पलीकडे गेल तर गावातील दोन बायका तिच्याकडे बघून कुजबुजत आहेत असं तिला वाटलं.  ती जास्तच अवघडली खांद्यावरचा पदर नीट करत नजर खाली ठेवून अवघडल्यासारखी उभी राहिली.

"बसणार आहात का?"
कृष्णाने विचारलं.

त्याच्या आवाजाने ती एकदम दचकली .तिने एकदा तिरप्या नजरेने रस्त्याच्या पलीकडे उभ्या असलेल्या त्या दोघींकडे पाहिलं आणि मान अजून खाली घालून तिथेच अवघडल्यासारखे उभी राहिली.

कृष्णाने मागे वळून पाहिलं नाना अजून तिथेच होता त्याने बाईक वळवली आणि नाना जवळ गेला ,

"काय रे?"
त्याला तिथे बघून नानाने गोंधळून विचारलं.

"तू त्यांना सांग ,
जरा स्पष्ट बोलत जा म्हणावं."

"अरे पण झालं काय?"
नाना ने मागे वळून सखुकडे पाहिलं.

ती खांद्यावरून पदर घेऊन पुतूळ्यासारखे खाली मान घालून उभी होती.

"मी गाडीवर बसायला सांगितलं तर या पुतळ्यासारख्या उभ्या आहेत. हो किंवा नाही काहीतरी बोलावं माणसान."
कृष्ण जरा रागात बोलला.

"जरा थंड घे.. मी बोलतो तिच्याशी."

नानाने गाडीवरळवून सखी जवळ आणली ,
"सखी कृष्णा सोबत घरी जा."

"नको नाना माणसं नाव ठेवतील ."
ती काळजीने बोलली.

"मग कशी जाणार आहेस घरी?"

"मी जाईन तशीच."

"तू कोणाचा विचार करू नकोस ,
तू त्याच्यासोबत जा."

"अरे नाना ,
मला नाही येत बसता गाडीवर."
तिने खरं ते सांगितलं.

"गंमत करतेस का?"
नाना हसून बोलला.

"मी खरंच सांगते .माझं लग्न झाल्यानंतर दादाने बाईक घेतली ‌ तोपर्यंत कोणाच्या बायईकर बसलेच नाही आणि लग्न झाल्यावर एक दोनदा नितीन च्या बायकोवर बसलेले. पण मला बाईक वर बसता येत नाही म्हणून ओरड सुद्धा खाल्लेला. त्यानंतर पुन्हा कधी योगच आला नाही बाईकवर बसायचा."नानांनी शांतपणे तिचं बोलणं ऐकून घेतलं .
" ठीक आहे ,मी बोलतो कृष्णा सोबत.\"

नाना पुन्हा बाईक वळवून कृष्णा जवळ आला,
"ती बोलतीये ती जाईल बस ने."

"तुलासुद्धा वेड लागल का ?
नाना इथे यायला त्यांना किती वेळ लागला?
आता बसची वाट पाहत बसणार आहेत का त्या?
मी काही खाणार आहे का त्यांना?"
कृष्णा रागावला.

"अरे बाबा तसं नाहीये. तिला सवय नाहीये बाईकवर बसण्याची ,त्यामुळे ती थोडी अवघडली आहे."

"नक्की हेच कारण आहे."

"हो"

"ठीक आहे, तू जा आता."
कृष्णा सखीकडे तिरप्या नजरेने बघत बोलला.

"ठीक आहे , मी जातो.

हे बघ पुन्हा बायको चा फोन आला,
हिला तर दम धरवतच नाही ."
नानाने फोन कट केला आणि तो त्याच्या घरी जायला वळला आणि कृष्णा ची बाईक सखी जवळ येऊन थांबवली.

टू बी कंटिन्यू..

©® प्रियांका (सुभा) "कस्तुरी"
२४/०८/२०२२

जिल्हा -

सातारा, सांगली

................

(कथा आवडतीये का जरूर कळवा, धन्यवाद)
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

प्रियांका सुभा "कस्तुरी"

लेखिका

लेखणीतून उतरणाऱ्या प्रत्येक शब्दात तुमचं अस्तित्व असतं.

//