Login

कर्तव्य ( भाग 1)

देशसेवा करत रक्षाबंधनाचे वचन पाळणारा भाऊ

हॅलो .... ! कोण ...? "जा बाबा ,तू तर बोलूच नको माझ्याशी ",मला नाही बोलायचं तुझ्याबर ... अस करत का कोणी ... असा भाऊ बघितलायस का तू कुठे ... तीन दिवस झाले आम्ही वाट बघतोय तुझ्या फोन ची ... ना एखादा फोन ...ना मॅसेज .... म्हनलं निदान रक्षाबंधन ला तरी फोन करशील ...पण नाही पुरा दिवस निघून गेला ... रात्री पण किती वेळ जागी होते मी ...म्हनलं चुकून आलाच तर तुझा फोन ... पण नाही महाशय ! तिकडे गेले आणि आम्हाला विसरले ... मान्य आहे देशसेवा ... देशरक्षा ....करणं फर्ज आहे तुमचा ... आमच्या आधी ते महत्वाचं आहे ....
पण आपल्याला एक आई आहे जी एवढी माया लावते ... एक बहीण आहे ...जी एवढी काळजी करते ... एक बायको आहे जी वाटेवर डोळे लावून बसलेली असते तिचा प्रियकर ... जिवलगा केव्हा येणार ... आणि आता एक सानुली ... छकुली पण आहे ,"बरं का ! जी माझे लाडके पापा केव्हा येणार अस विचारत असते .... पण नाही तुम्हाला काही त्याची खबरचं नाही ...होय ना !"
"अगं ! वंदना , काय सांगतेस तू ? समीर ला बस वेड लागायचं बाकी होतं ...आनंदाने तो किंचाळलाच .... वंदनाने ,त्याच्या बहिणीने त्याला एवढी छान खुशखबर जी दिली होती.. मी पापा झालो... एका लाडक्या बाहुली चा .... आणि तुम्ही मला आता सांगताय हे ... बाळ झाल्या झाल्या का नाही सांगितलं .... अरे ! दादूड्या , मग मगापासून का ओरडतेय मी तुला ... की तीन दिवस झाले तू फोन का नाही केला ... म्हणून तर बोलत होते मी ... हीच खूषखबरी सांगायची होती तुला पण तू काय ... आम्हाला फोन करायलाच तयार नाही ... तू त्या दिवशी वहिणीबरोबर बोललास .. आणि त्याच रात्री तिच्या पोटात दुखायला लागलं ...मग रात्रीच आम्ही घेऊन गेलो वहिनीला दवाखान्यात ....डॉ.नी ऍडमिट व्हायला सांगितलं... चार एक तासाने .. झाला बघ तुझ्या परीचा जन्म ... तीन दिवस झाले डिलिव्हरी होऊन ...वहिनी आणि बाळ अगदी ठीक आहेत ...तू काळजी नको करू ... फक्त बाळाला बघायला केव्हा येणार ते सांग ...

अगं ! येईन मी ... लवकरात लवकर सुट्टीत टाकून ...इथे जरा आतंकवादी हालचाली जास्त वाढलेत त्यामुळेच मी तुमच्याशी काही कॉन्टॅक्ट नाही करू शकलो ... तशी आम्हाला सक्त ताकीद होती वरच्या ऑफिसर्स कडून ....मिशन वर होतो आम्ही ...त्यामुळे फोन वगैरे सगळं बंद ... लक्ष एकच मिशन फत्ते करायचं आणि दुष्मनांचा खात्मा... आणि माझ्या बाळाचा पायगुण बघ त्यात यशस्वी झालो आम्ही ... " बोल ...लाडक्या बहिणी ...बोल ...एवढी छान खूशखबर दिलेयस... काय ओवाळणी हवेय रक्षाबंधन ची ... "
समीर असं बोलताच... वंदना च्या डोळ्यातून आपोआप अश्रू येऊ लागले...
अगं ! वेडाबाई , असं रडतं का कोण .... भाऊ आहे मी तुझा ... रक्षाबंधनची ओवाळणी तर द्यायला हवी ना ..माझ्या छोट्या बहिणीला ....
वंदना ! हमसून हमसून रडतचं होती ....बाबा गेल्यापासून ...पहिल्यांदा कोणीतरी तिला इतकं प्रेमाने ... आपुलकीने विचारपूस करत होतं.. म्हणजे तसे सगळेचं तिच्यावर प्रेम करायचे की ...पण लेकी, ...., आई .. भाऊ ... बहीण या पेक्षा ...बापांच्या जास्त लाडक्या असतात... एक वेगळाच जिव्हाळा असतो ...बाप लेकीत ...
त्यामुळे तिला भरून आलं .. त्यांचे बाबाही लष्करातच होते ...शत्रूशी लढता लढता वीरमरण आले होते त्यांना ....पण या मायलेकी डगमगल्या नाहीत ... आईने आपल्या नवऱ्याचं ...वंदनाने आपल्या वडिलांचं वीरमरण हसत हसत स्वीकारलं .. आणि एकुलत्या एक भावाला देखील लष्करात भरती करायचं ठरवलं ... "असं मरण तर सगळेच मरतात पण वीरमरण येऊन तिरंग्यात लपेटून जाण्याची मजाच काही और"... असं तिच्या आईचं म्हणणं होत ...
खूप कौतुक वाटलं वंदनाला आपल्या भावाचं ... खरंच किती मोठा झाला माझा भाऊ ... बाबांची कमी ...माझा भाऊ पुरी करणार म्हणत तिने आपले डोळे पुसले...आणि बोलली ...
" दादा , तू जे देशसेवेच काम करतोयस ना . . तीच खरी सर्वात मोठी ओवाळणी आहे माझ्यासाठी... देशसेवेपेक्षा मोठा कोणताच धर्म नाही ... तरीही एक गोष्ट मला हवेय तुझ्याकडून... "मला वचन दे ! देशसेवा करत करत ... तू ,....मी आणी माझ्यासारख्या असंख्य बहिणीचं रक्षण करशील ...कोणत्याही बहिणी मातेवर कसलीही आच येऊन देणार नाही ... आणि आलीच तर त्या संकटांना दोन हाथ करून ... माझ्यासारख्या असंख्य निष्पाप मुलींची रक्षा करशील .....

" हो ग ! माझ्या लाडक्या बहिणी ..." जरी प्रत्यक्षरीत्या त्या मुली माझ्या हातात राखी बांधत नसतील तरी ... माझं कर्तव्य आहे ... भारत देशाचा एक सुज्ञान नागरीक म्हणून .... आणि देशाचं रक्षण या देशातील प्रत्येक व्यक्तीच रक्षण ... हे आम्हा जवानांच कामच आहे ते...
तू काळजी नको करू ... जोपर्यंत मी आहे तोंपर्यंत तुला कोणालाही घाबरायची गरज नाही .... तुझा भाऊ सक्षम आहे ... "देशसेवा करत करत आपल्या बहिणीच ,रक्षाबंधनाचं वचन पूर्ण करायला " ... आणि हा माझा शब्द आहे ...
बरं ... चल वेडाबाई मला फोन ठेवावा लागेल इथं जास्त वेळ फोन वर बोलन मना आहे ... आता तरी खुश ना ... मी फोन केला... आईला सांग, दादा अगदी ठीक आहे काळजी नको करू ... आणि वहिनीला सांग तुझ्याबरोबर बोलायला उद्या फोन करेन ... आजची वेळ संपली ... आणि बाळाला म्हणावं लवकरच पापा येतील तुला भेटायला ...
"चल बाय ". बर दादा ! बाय... काळजी घे ... जपून रहा .. आम्ही वाट बघतोय तुझी ... लवकर ये ...


   © vaishu patil


(मैत्रीनींनो लेख आवडला असल्यास कंमेंट ..लाईक जरूर करा ... आशा आहे भावा बहिणीतील हे प्रेमळ नातं तुम्हाला नक्की आवडेल )