करते काहीतरी असेच उद्योग

Krte Kahitri Asech Udyog
करते काहीतरी असेच उद्योग

विशाल....हाय!! समिधा आज जाऊ आपण बाहेर फिरायला..तू तयार हो

समिधा...हो नक्की, काय घालू सांग...वेस्टर्न की इंडियन ?

विशाल... ऑफकोर्स !! वेस्टर्न घालशील.. तो तुझा टॉप घाल ...

समिधा...ते जाऊदे ,आई काय करत आहेत त्यांना वेळ आहे का ?? मला बोलायचे आहे त्यांच्याशी

विशाल....काय ही नाही, तिच्याकडे वेळच वेळ आहे...घरातच असते...

समिधा....आता काय करत आहेत त्या, दे ना त्यांना जरा फोन

विशाल.....बसली आहे आत काहीतरी शॉपिंग करत तिची ती नेहमीची

समिधा....शॉपिंग, म्हणजे ??

विशाल....अग ती ऑनलाइन शॉपिंग !!

समिधा....ऑनलाईन शॉपिंग, छानच की !! काय खरेदी करत आहेत

विशाल....अग विकते ती ....खरेदी नाही करत.

समिधा.....म्हणजे??

विशाल....करते काही तरी थातूर मातूर विक्री ,कुठे साड्या तर कुठे ड्रेस ,तर कुठे वेस्टर्न

समिधा....मग तर छानच ना हे..!

विशाल....अग काहीतरी छोटे करत बसते ,इतके काही खास नक्कीच नसणार, टाईमपास ग, तिला कुठे चॉईस कसली..

समिधा....काय नाव आहे त्यांचे...??

विशाल....रिमाज फॅशन ,असे काही तरी म्हणत असते ती..

समिधा....अरे ह्या तर खूप फेमस आहेत तर....मी ह्यांच्याकडूनच तर माझे सगळे ड्रेस आणि साड्या घेत असते...आणि ते सगळ्यांना खूप आवडतात..तुला तो वन पिस आवडला तो त्यांच्याच कडून घेतला होता...माझ्या हॉस्टेल मध्ये तर ह्या खूप फेमस आहेत..

विशाल....काय बोलतेस हे तू ??

समिधा.....किती मोठा बिझनेस आहे ह्यांचा तर ...रोज किती तरी मुली ह्यांच्याकडून ड्रेस विकत घेत असतात..

विशाल....मला तर आई इतकी फेमस आहे हे माहीत नव्हते, मी समजयचो करत असेल काही थातूर मातूर .

समिधा....इथेच तर चुकतात तुम्ही मुलं ,आई करते ते नगण्य आणि आपण करतो ते काम...हे आईच्या बाबतीत करणारा माझ्या ही बाबतीत करू शकतो..

विशाल....मी तिच्या गोष्टी कडे कधी लक्ष दिले नाही ग, खूपदा यायची काही समजून घेण्यासाठी पण मी तिला मदत केली पण विचारले नाही का ,कशासाठी !!

समिधा....मला तर दया येते अश्या मुलांची ,जे आईला गृहीत धरतात, कमी लेखात तिच्या कामाला आणि तिच्या धडपडीला..तू ही त्यातला .

विशाल....मी खरंच चुकलो ग, माहीत नव्हते आईला कमी समजणारा मी आज स्वतःच्या नजरेत तुझ्या नजरेत कमी पडलो.

समिधा...आता तरी बघ आईने हे साम्राज्य कसे उभे केले आहे ते...त्यांना विचार...नाहीतर खऱ्या अर्थाने तुझी त्यांना कुठेच गरज लागणार नाही इतकी तुझी किंमत कमी होईल त्यांच्या आयुष्यात..

विशाल....हो खरंय, तू जाणीव करून दिली आहे म्हणून आज कळते की खूप दिवस झाले आहेत तिने मला कसलीच मदत मागितली नाही...

©®अनुराधा आंधळे पालवे

विशाल....