कृष्ण सखी -१७५
नानाशी बोलल्यानंतर कृष्णाला आता बरं वाटत होतं. नानाने दिलेला त्रास त्याला पुन्हा परत केल्यावर जरा हलकं हलकं वाटत होतं. मोबाईल खिशात ठेवून कृष्णा हसतच उठला. सखीला मात्र कृष्णाचं नानाला त्रास देणं आवडलं नाही. सखीही उठली आपली ओली साडी हलकेच झाडून कृष्णा सोबत पाऊल उचलत बोलली,
“का त्रास दिला नानाला? बिचारा रडत असेल आता. आवाज ऐकला ना त्याचा, किती घाबरला तो.”
कृष्णा चालता चालता सवयीने सखीचा हात हातात घेत हसत बोलला,
“रडू द्या रडला तरं.. आणि काही बिचारा नाही तो.. प्रेम केलं तर पहिलं मित्राला सांगणं कर्तव्य असतंय. त्याने नाही सांगितलं मग त्याला शिक्षा मिळायला नको काय?”
सखी नाराजीने बोलली,
“म्हणून एवढी मोठी थट्टा?”
कृष्णा तोऱ्यात बोलला,
“हा मग.. दोस्तीत चालतंय सगळं. तुम्ही नका टेन्शन घेऊ चला.”
‘बिचारा नाना! कृष्णा, तू धीर दे रे त्याला.’
सखी नानासाठी तिच्या सख्याजवळ प्रार्थना करतच होती की पलीकडून नानाचा फोन आला आणि कृष्णा मोबाईल दाखवत हसत बोलला,
“बघितला काय, आता बघा पोपट कसा फडाफड बोलतोय.”
सखी नानासाठी तिच्या सख्याजवळ प्रार्थना करतच होती की पलीकडून नानाचा फोन आला आणि कृष्णा मोबाईल दाखवत हसत बोलला,
“बघितला काय, आता बघा पोपट कसा फडाफड बोलतोय.”
कृष्णाने काहीच झालं नसल्यासारखं नेहमीसारखी संवादाला हसत सुरवात केली,
“बोल नाना, काय बोलतोयस?”
पलीकडे नाना शांत!
शांत म्हणजे फुल टेन्शनमध्ये.. त्यात एका मागोमाग एक प्रेमभंगी गाणी रेडीओवर चालू होती त्यामुळे तर नानाच्या डोळ्यांतून पाणी येऊ लागलेलं.
शांत म्हणजे फुल टेन्शनमध्ये.. त्यात एका मागोमाग एक प्रेमभंगी गाणी रेडीओवर चालू होती त्यामुळे तर नानाच्या डोळ्यांतून पाणी येऊ लागलेलं.
नानाला शांत पाहून कृष्णाने पुन्हा विचारलं,
“नाना, बोलतोयस काय.. का ठेवू फोन?”
“नाना, बोलतोयस काय.. का ठेवू फोन?”
“थांबे बाबा ऽ! मला बोलायचंय..”
नाना रडलेल्या आवाजात बोलला.
कृष्णाला थोडंस हसू आलं,
“बोल, काय बोलतोयस?”
नाना विषय खाजगी असल्याने दुकानातून बाहेर येत दुकानातील पोरांना रेडीओवरून ओरडला,
“कामं करताना रेडिओ बंद ठेवत जा की.. आणि रडकी गाणी कशाला ऐकता रे.. जरा हॅप्पी एडिंगवाली गाणी ऐकत जा की.”
कृष्णाने हसून विचारलं,
“कुठलं गाणं लागलंय.”
नाना दुःखाने बोलला,
“दिल के तुकडे आंसूओ मैं बह गये..”
कृष्णा हसत बोलला,
“बेन्या, कधी जन्म झाला या गान्याचा?”
नाना आपल्या काळजावर हात ठेवून तसाच दुःखाने बोलला
“आत्ताच जन्म झालाय.. माझ्या या दुःखी हृदयातून त्याचा उगम झालाय.”
कृष्णा आपलं हसू लपवत बोलला,
“तुला काय झालंय दुःखी व्हायला?”
नाना तसाच दुःखाने बोलला,
“तुला एक गोष्ट सांगायचीये कृष्णा.”
“तुला एक गोष्ट सांगायचीये कृष्णा.”
“सांग की मग वाट कसली बघतोयस?”
बोलता बोलता कृष्ण सखी आता टेकडी चढू लागलेले.
सखीला नानाचं बोलणं ऐकू येत नव्हतं पण कृष्णाच्या बोलण्यावरून अंदाज येत होता. नाना पलीकडून लय गंभीरपणे बोलला,
“कृष्णा तुला आधीच सांगणार होतो पण राहिलं. माझं…… म्हणजे आमचं! नैनाचं आणि माझं एकमेकांवर लय प्रेम आहे बघ.”
“कृष्णा तुला आधीच सांगणार होतो पण राहिलं. माझं…… म्हणजे आमचं! नैनाचं आणि माझं एकमेकांवर लय प्रेम आहे बघ.”
कृष्णा आश्चर्य वाटल्यासारखा बोलला,
“काय सांगतोयस नाना! खरंच! का नेहमीसारखं…..”
“नाही नाही.. थट्टा नाही करत.. खरंच सांगतोय यार. सिच्युएशन ओळख की, यावेळी मी थट्टा करीन का?” नाना केविलवाण्या आवाजात बोलला.
कृष्णा मुद्दामून थट्टेने बोलला,
“तू मला सांगायला लय उशीर केलास लेका. आता सगळं अवघड झालं बघ. कालच दत्ताने त्या मुलाची कुंडली दाखवली मला. मुलगा चांगला वाटला म्हणून मी सुद्धा पसंती कळवली. दोन चार दिवसात….”
‘म्हणून काल नैना टेन्शनमध्ये बोलली नाही माझ्याशी? आता सगळं संपलं.’ विचाराने नाना घाबरला आणि बघता बघता टेन्शनमध्ये तो रडायला लागला,
“कृष्णा, काय करू मी? मला काहीच सुचेना..”
त्याला रडताना ऐकून कृष्णा पाघळला. तो नानाला समजावत बोलला,
“ए ऽ ए ऽ नाना, रडतोय काय असा? गप्प बसतोय काय आता.. मी मस्करी होतो.”
नाना लगेचच डोळे पुसत आशेने बोलला,
“म्हणजे नक्की कुठली मस्करी?”
“म्हणजे नक्की कुठली मस्करी?”
“गाढवा, कुठली नाही कशाची बोल?”
कृष्ण मध्येच त्याचं वाक्य दुरुस्त करत.
कृष्ण मध्येच त्याचं वाक्य दुरुस्त करत.
काळजावरचं ओझं उतरल्याने नाना आपले डोळे पुसत हसत बोलला,
“समजा ओ मास्तर ऽ.. ते सगळं तुम्हीच समजा..”
“समजा ओ मास्तर ऽ.. ते सगळं तुम्हीच समजा..”
कृष्णा हसतच चालू मध्ये मोबाईल सखी पुढे करत बोलला,
“बोला तुम्ही.”
सखी हसतच मोबाईल कानाला लावून..
“नाना, बरा आहेस का रे?”
“नाना, बरा आहेस का रे?”
“सखी, तू सुद्धा तिथेच आहेस?”
नाना आश्चर्याने बोलला.
“हो आणि मीच सांगितलं क्रिष्ण् ला.. तुझं आणि नैनाताईंच!” सखी हसून बोलली.
नाना आश्चर्याने विचारलं,
“पण तुला कोणी सांगितलं?”
“पण तुला कोणी सांगितलं?”
सखी हसून बोलली,
“मला माझ्या कृष्णाने!”
“मला माझ्या कृष्णाने!”
नाना हसत बोलला,
“च्यामारी! तुझा कृष्णा तरं लयीच हुषार निघाला.”
“च्यामारी! तुझा कृष्णा तरं लयीच हुषार निघाला.”
सखी हसत बोलली,
“वेड्या, तो हुषारच आहे. ते जाऊदे तू नको टेन्शन घेऊस.. क्रिष्ण मघापासून मस्करी करत होते.”
“वेड्या, तो हुषारच आहे. ते जाऊदे तू नको टेन्शन घेऊस.. क्रिष्ण मघापासून मस्करी करत होते.”
नाना अजूनही धडधडणाऱ्या आपल्या काळजावर हात ठेवत बोलला,
“तुझ्या नवऱ्यामुळे मला इकडे अॅटॅक यायचा बाकी होता.”
सखी हसली,
“आता जरा तू ही लग्नाच मनावर घे.”
“आता जरा तू ही लग्नाच मनावर घे.”
बोलून झाल्यावर सखीने लगेच मोबाईल कृष्णाकडे दिला आणि नाना पलीकडून लाजून बोलला,
“मनावर मी नाही आता तुम्ही घ्यायचं. मला लाज वाटते.”
“मनावर मी नाही आता तुम्ही घ्यायचं. मला लाज वाटते.”
कृष्णा हसत बोलला,
“ए ऽ लाजाळू, आता मी काय सांगतो ते ऐक. आज मंगळवार.. तरं रविवारपर्यंत नैनाशी बोलू नकोस. एक शब्दही नाही.”
“ए ऽ लाजाळू, आता मी काय सांगतो ते ऐक. आज मंगळवार.. तरं रविवारपर्यंत नैनाशी बोलू नकोस. एक शब्दही नाही.”
नाना टेन्शनमध्ये बोलला,
“कालच्यापासून बोललो नाही तर मला कसंतरी वाटतंय आणि तू रविवार पर्यंत सांगतोयस?”
“कालच्यापासून बोललो नाही तर मला कसंतरी वाटतंय आणि तू रविवार पर्यंत सांगतोयस?”
कृष्णा त्याला समजावत बोलला,
“हे बघ नाना, लग्न म्हणजे पोरखेळ नाही. तुझं तिच्यावर प्रेम आहे ठीक आहे पण तिचं ही तितकंच प्रेम आहे का हे पण बघायला नकोय काय? रविवारी मी तुझ्या समोरच नैनाशी शेवटचं बोलतो आणि नंतर दत्ताजवळ विषय काढतो.”
नाना टेन्शनमध्ये बोलला,
“ठीक आहे पण कृष्णा यार ... मामी ऐकल्या नाहीत तर आम्ही पळून जाणार..”
कृष्णा आवाजात जरब आणत बोलला,
“गप्प बसतो काय? तसं केलंत तरं दोघेही फटके खाल माझे. चांगली वाजत गाजत घेऊन जायचं नैनाला.. तुझ्यात काय कमी आहे नाही म्हणायला, मी बघतो की.. तू कशाला घाबरतोयस.”
“गप्प बसतो काय? तसं केलंत तरं दोघेही फटके खाल माझे. चांगली वाजत गाजत घेऊन जायचं नैनाला.. तुझ्यात काय कमी आहे नाही म्हणायला, मी बघतो की.. तू कशाला घाबरतोयस.”
“थँक्स यार कृष्णा, तू काही पण कर पण नैना सोबत माझं लग्न लावून दे. हवं तर लग्नात आहेर पण करू नकोस.” नाना टेन्शनमध्ये बोलला आणि कृष्णा हसला.
कृष्णाचं लगेचच प्रेमाचं बोलणं आलं,
“व्हयं काय? बेन्या, माझ्या दोन्ही लग्नात एक रुपयाचा आहेर केला नाहीस मला आणि आहेराच्या वार्ता माझ्याशी करतोयस?”
“व्हयं काय? बेन्या, माझ्या दोन्ही लग्नात एक रुपयाचा आहेर केला नाहीस मला आणि आहेराच्या वार्ता माझ्याशी करतोयस?”
त्याचं बोलणं ऐकून सखी सुद्धा हसली आणि पलीकडे नाना हसून बोलला,
“मग आता देतो की.. त्याला काय होतंय? मागणं पण देतात की.”
“मग आता देतो की.. त्याला काय होतंय? मागणं पण देतात की.”
कृष्णा हसत बोलला,
“जावा, गल्ल्यावर बसा आणि काय सांगितलंय ते लक्षात ठेवा.” पलीकडे नाना लग्नाची बोलणी करायला कृष्णा मध्यस्थी असल्याने निश्चिंत झाला.
“जावा, गल्ल्यावर बसा आणि काय सांगितलंय ते लक्षात ठेवा.” पलीकडे नाना लग्नाची बोलणी करायला कृष्णा मध्यस्थी असल्याने निश्चिंत झाला.
त्याने फोन ठेवल्यावर सखी उत्साहात बोलली,
“त्याने आहेर केला नसला तरी आपण दोघांनी मिळून काहीतरी देऊया का त्याला?”
कृष्णा हसत बोलला,
“आहेर म्हणजे पैशांचा आला हो.. मी त्याबद्दल त्याला गमतीने छेडलं.
“आहेर म्हणजे पैशांचा आला हो.. मी त्याबद्दल त्याला गमतीने छेडलं.
उलट नानाचंं लग्न म्हणजे आपल्याला खर्चीक बाजू.. आत्तापासूनच पैसे बाजूला ठेवायला हवे. ते बेनं पन्नास हजारात लग्न करणार आहे.” कृष्णा हसत बोलला.
सखी ही स्वतःशीच बडबडली,
“त्याचं लग्न म्हणजे आपल्याला शंभर कामं.. दिवाळीची सुट्टी त्याच्या लग्नातच जाईल वाटतं.”
बोलता बोलता काही वेळातच ती छोटी टेकडी सुद्धा पार झाली आणि कृष्णा वस्ती दिसायला लागल्यावर तिथेच थांबला. त्याची सोबत इथपर्यंतच हे ओळखून सखी ही तिथेच थांबली.
आपल्या हातातील पिशवी तिच्या हातात देत तो प्रेमाने बोलला,
“नीट जा आणि काळजी घ्या.”
“नीट जा आणि काळजी घ्या.”
इतका वेळ सोबत असून सुद्धा आत्ताच भेटल्यासारखे दोघांचेही चेहरे झाले आणि सखी उगाच हसून बोलली,
“उतरंडीचा रस्ता चांगला नाहीये, त्यामुळे थोडे सावकाश जा.”
“आधी तुम्ही जा.. मग मी जातो.”
कृष्णा तिथेच उभा राहिला.
कृष्णा तिथेच उभा राहिला.
“मास्तर ऽ ऽ ऽ ऽ.. “ दुरून हाक आली आणि ती गुडघ्यावर मळकट धोतर असलेली व्यक्ती वावराचा बांध तुडवत लगबगीने कृष्णाकडे यायला निघालेली पाहून सखी हसून बोलली,
“आता मी निघते आणि तुम्हीही वेळेत निघा.”
“आता मी निघते आणि तुम्हीही वेळेत निघा.”
कृष्णा समोरच बेताची उंची असलेली सखी खांद्यावरून पदर घेऊन कधीकाळी अडखळणाऱ्या रस्त्यावरून, आता चिखलाने भरलेल्या त्या हिरवळीदार बांधावरून सराईतपणे चालत गेली.
सखीच्या दोन-तीन दिवसांच्या सुट्टीचा लोड पुढे चार-पाच दिवस तिला सहन करावा लागला. ही तिची पहिलीच मोठी सुट्टी होती. तिच्या लक्षात आलं की लहान लहान मुलं लगेच विसरतात, रोज उजळणी तितकीच महत्त्वाची असते. हे झालं अभ्यासाचं पण रोज चिखलाने मढलेला डोंगर चढून उतरून ती ही तितकीच थकत होती. पलंगावर पडल्या पडल्या तिचा डोळा लागत होता. कृष्णा मात्र तिला मनसोक्त नजरेत साठवून नंतरच डोळे झाकत होता.
शेवटी सुट्टीचा वार उजाडला. मोहित्यांच्या घरात सगळेच आतुरतेने वाट पाहणारा वार म्हणजे रविवार! या रविवारी त्या सगळ्यांपेक्षा नानासारखी कोणी या रविवारची वाट पाहिली नसेल. नाना आपलं आवरून दुकानावर गेलेला. पळसगावात संध्याकाळी जायचं होतं, पण आतापासूनच काळजीने नानाचे हातपाय गार पडलेले.
रविवार म्हटल्यावर लवकरच जेवण त्यामुळे सखी ही स्वयंपाकाला लागलेली. सोनाईने चहा घेतला आणि केसांवरून कंगवा फिरवत दूधाचा ग्लास फुंकत फुंकत पिणाऱ्या कृष्णाला बोलली,
“किशना ऽ, मावशी आल्या ममयवरनं. मला सुडून यं की म्हंजे पोराबाळांंना बघून यते.”
कृष्णा दुधावर फुंकर घालत शांतपणे बोलला,
“सोडतोय की पण चारच्या गाडीनं परत फिरायचं नाही तर मी संध्याकाळी मावशीच्या घरी आलो तरं आपलं भांडण तिथंच जुंपेल.”
सखी त्याचं बोलणं ऐकून हसली आणि सोनाई केसांचा घट्ट आंबोडा बांधत मान हलवत कुरकुरली,
“सासू न्हाय म्हनून तू सासू झालायंस माजी. कुठं म्हनून यक रात ऱ्हाव देत न्हाय. मेल्याव बी चिरा बनवून आंगनात उभा कर.. जाळू नगंस मला.”
“ए ऽ म्हातारे, गप्पच बस काय.. आता तरं सोडतच नसतो. जा चालत.” कृष्णा नजरेने रागावत दुधाचा ग्लास घेऊन तसाच ओटीवर गेला.
सोनाई पिशवीत, मोबाईल आणि पेपरमध्ये बांधलेल्या भाकरी टाकत ओटीवर असलेल्या कृष्णाकडे बघून बडबडली,
“म्हाळसा ऽ, तुजा नवरा लैच आडगा बया.. कसं व्हयाच तुजं.”
“म्हाळसा ऽ, तुजा नवरा लैच आडगा बया.. कसं व्हयाच तुजं.”
सखी चुलीपुढूनच हसली आणि कृष्णा सोनाईवर नजर रोखून बोलला,
“आपल्यामध्ये सखींना आणायचं नाही काय नाही तर आपलं खरोखर भांडण होईल.”
“आपल्यामध्ये सखींना आणायचं नाही काय नाही तर आपलं खरोखर भांडण होईल.”
सोनाई सुरजच्या डोक्यावरून तेलाचा हात फिरवत बडबडली,
“व्हयं का? घरी आसलास की उठल्यापासन आंधारहुईपरेंत भांडतच आसतोस की नुसता.”
“व्हयं का? घरी आसलास की उठल्यापासन आंधारहुईपरेंत भांडतच आसतोस की नुसता.”
सखी पदराने आपले ओले हात पुसत ओटीवर येत हसत बोलली,
“आई ऽ, जाऊ द्या ना.. बाहेर जाताना कटकट नको.. संध्याकाळी लवकर या. थोडं काम आहे.”
“आई ऽ, जाऊ द्या ना.. बाहेर जाताना कटकट नको.. संध्याकाळी लवकर या. थोडं काम आहे.”
“कसलं काम?” सोनाईचं कुतूहल जागं झालं.
“सखी, दुपारपर्यंत पोटात ठेवा. मला त्या दोघांसोबत बोलू द्या जरा नंतर बघू पुढचं.” कृष्णा बोलल्यावर तरं सोनाईने हळूच सखीला विचारलं,
“कुनाच काय हाये?”
“कुनाच काय हाये?”
सोनाई म्हणजे सखीच्या जीवातील, त्यामुळे कृष्णा बोलून ही सखी ही हळूच बोलली,
“नानाचं आहे.”
“नानाचं आहे.”
सोनाई अनुभवाने अंदाज लावत, अगदीच हळू..
“कंची पुरगी?”
“कंची पुरगी?”
सखी बोलणार एवढ्यात कृष्णा त्यांची बायकांची कुजबूज बघून...
“ए ऽ खुसूरफुसूर, तुम्ही दोघी ही शांत बसता काय जरा.”
सोनाई कृष्णालाच लाडोगोडी लावत हळूच बोलली,
“किशना, सांग की.. नानाच काय? लगीन ठरवायचं हाये का?”
न सांगता सुद्धा सोनाईच्या पांढऱ्या केसांनी बरोबर अंदाज लावला आणि कृष्णा खांदे उडवत बोलला,
“व्हयं. आता पोरगी बद्दल विचारू नको. म्हणून म्हणतोय संध्याकाळी लवकर ये. चल निघूया आता.”
“व्हयं. आता पोरगी बद्दल विचारू नको. म्हणून म्हणतोय संध्याकाळी लवकर ये. चल निघूया आता.”
त्या दोघांच्या आधीच सुरज बाहेर पायरीवर जाऊन उजव्या पायातला सॅंडल डाव्या पायात घालत उत्साहात बोलला,
“आई ऽ मी बी जाते… आज्जी आनि बाबा के सात.”
“आई ऽ मी बी जाते… आज्जी आनि बाबा के सात.”
“म्हाळसा ऽ पाॅरांवर ध्यान आसू दे.. मागच्या आळीला खिळतीतंय. किशना यिल लगीच. घाबरू नगं.” सोनाईने सखीचा निरोप घेतला आणि दोन्ही बाजूला टांग टाकून कृष्णाच्या दोन्ही खांद्याला पकडून बाईकवर बसली. कृष्णा सखीकडे बघून “आलोच” बोलला आणि फॅमिली मॅनसारखा सावकाश निघाला.
गावची वेस ओलांडून कृष्णा पुढेच गेलेला की
योगायोगाने मावशीकडे निघालेल्या मामांची रिक्षा रस्त्यात भेटली आणि मामांसोबत मामींचीही भेट झाली. मग त्याच रिक्षात सोनाई आणि सुरजला बसवून कृष्णा पुन्हा माघारी फिरला की त्याचा मोबाईल वाजला आणि वाजतच राहिला.

असेल कोणीतरी हा विचार करून, बाईकवर बसल्यावर त्याने आरामात मोबाईल पाहिला आणि सखीचं नाव पाहून आपोआप चेहऱ्यावर हसू आलं.
‘सखी ऽ..’
‘सखी ऽ..’
त्याने हसतच फोन उचलला,
“बोला, काय बोलताय..”
“बोला, काय बोलताय..”
“क्रिष्ण् ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ….” सखीचा अस्पष्ट थरथरता आवाज आला आणि कृष्णा इकडे भीतीने थरथरला.
पलिकडे नक्की सखीच आहे ना? हे पाहण्यासाठी त्याने मोबाईलवर एक नजर टाकली आणि घाईतच मोबाईल कानाला लावून तो काळजीने बोलला,
“काय झालंय सखी?”
“काय झालंय सखी?”
“क्रिष्ण् ऽ ऽ ऽ… मी… मी हरले हो ऽ … “ सखी रडवेली होत बडबडली आणि कृष्णा बावरला. त्याला काहीच अंदाज येईना.
“काय झालं सखी?.. मुलं तरं ठीक आहेत ना?”
बाईक चालू करत कृष्णाने घाबऱ्या आवाजात विचारलं.
बाईक चालू करत कृष्णाने घाबऱ्या आवाजात विचारलं.
सखी मुसमुसत बोलली,
“ठीक आहेत.”
“ठीक आहेत.”
“मी… मी आलोच.. तुम्ही रडू नका काय.”
तो घाबऱ्या आवाजात बोलला आणि मनात शंकाकुशंकांचा समुद्र घेऊनच बिथरलेल्या मन:स्थितीत सुसाट वेगाने घरी यायला निघाला.
तो घाबऱ्या आवाजात बोलला आणि मनात शंकाकुशंकांचा समुद्र घेऊनच बिथरलेल्या मन:स्थितीत सुसाट वेगाने घरी यायला निघाला.
उर्वरित भाग पुढे..
© प्रियांका सुभा कस्तुरी
०५/०६/२०२४
०५/०६/२०२४
……..
जे वेळात वेळ काढून समिक्षा देतात त्यांचे मनापासून आभार!
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा