पुनर्विवाह (कृष्ण सखी)- १०४

कृष्ण सखी एक रांगडी प्रेमकथा!
कृष्ण सखी १०४


सखीची झोप लागलेली. अगदी गाढ झोप लागलेली.
गाढ झोपत असतानाही तिला बिडीचा वास येऊ लागला. झोपेतही तो वास तिला नकोसा झाल्याने तिने कुस बदलली तरी तो दर्प सरळ मेंदूपर्यंत शिरला आणि झोपेतही ठसकी लागली. त्या ठसकीने आणि बिडीच्या वासाने सखी जागी झाली.. तरं लाईट चालूच होती. ती अजूनही कुशीवर होती पण खोलीभर बिडीचा वास दरवळत होता. याचा अर्थ..
नितीन आला… या विचारानेच ती भीतीने थरथरली.


हाताची मूठ आवळून सखी कृष्णाचा धावा करत स्वतःशीच बडबडली,
"कृष्णा ऽ अशी कशी झोप लागली रे.. आता माझं काही खरं नाही."

तिची झोप लागलीये हे बघून कमीतकमी आजतरी तिच्यावर दया दाखवून तो तिला सोडेल.. त्याच्या उलट्या काळजाला पाझर फुटेल या वेड्या आशेने सखी बेडशीट हाताच्या मुठीत घट्ट आवळून डोळे बंद करून जीव मुठीत घेऊन पडून राहिली.

तिच्या मागून येणारा तो गरम दर्प ती मानेवर आणि तोंडावर सहन करत राहिली. खोकल्याची उबळ आतमध्ये दाबत राहिली पण तिचं दुर्दैव तिच्यासोबत होतं.

क्षणात तिच्या अंगावरून ब्लॅंकेट बाजूला झालं आणि तिच्या विस्कटलेल्या साडीतून तो देह बघून नितीनला पिसळण्यासाठी कारण मिळालं.


"कृष्णा ऽ.. किती रे जनावर आहे हा.."
सखी बंद डोळ्यांनी आसवं गाळंत होती की त्याच्या खरबडीत स्पर्शासोबत तिची साडी वर वर निघाली तशी सखी भीतीने थरथरली.

तिला झोपेचं सोंग घेऊन भीतीने थरथरताना बघून नितीन "खी…. खी‌… खी‌‌…." विकृतासारखा हसायला लागला.

एखाद्या विक्षिप्त मुलाने मांजरीच्या पिल्लाला जसा त्रास द्यावा आणि त्या पिलाला त्रास झालेला पाहून त्या मुलाने हसत टाळ्या वाजवाव्या. अगदी तसाच आनंद नितीन चेहऱ्यावर होता.

त्याला हसताना ऐकून सखीचं अवसान गळून गेलं.

"रंभा ऽ ऽ ऽ ऽ…."

त्याचा रंगेल आवाज आला आणि सखीने भीत संथपणे त्याच्याकडे पाहिलं.


तो नाका तोंडातून धूर सोडत तिच्याकडे छंदी हास्य, राग, वासना आणि नाना तऱ्हेचे विक्षिप्त भाव घेऊन तिच्याकडे पाहत होता‌.

सखी आपली थरथर लपवत जागीच उठून बसली. नितीनची खालून वरपर्यंत आणि पुन्हा वरून खालपर्यंत फिरणारी नजर तिला नेहमीसारखी असहनीय होत होती.

तिच्या चिंधड्या चिंधड्या विस्कटून पाहिल्यावर ही.. कधी न पाहिल्यासारखा.. हा रोज रोज असा काय पाहतो हे सखीच्या कल्पनेच्या पलीकडे होतं. त्याच्या रंगेलपणाचा तिच्या बुद्धीला अंदाज येणं हे अशक्यच होतं.


त्याची तिच्या गोऱ्या, वळणदार पोटरीवर अडकलेली नजर पाहून सखीने अंगचोरून खाल मानेनेच गुडघ्यापर्यंत आलेली साडी खाली केली. तसं तिच्या मनगटाला हिसका देऊन त्याने सर्रकन साडी वर सारली आणि तिच्यावरच खेकसला,
"ए ऽ रंभे ऽ, मस्ती आले का? जिरवू का इथंच?"

सखी साडी गुडघ्यापर्यंत सिमित ठेवत आपल्या मुठीत आवळून खाल मानेनेच घाबरून बोलली,
"तुम्हाला जेवायचं असेल ना… म्हणून.."

"म्हणून काय? मी यायच्या आधीच झोपलीस?"
बोलताना रागात त्याने तिचा पाय पिरघळला तशी सखी जागीच तडफडली,
"आह कृष्णा ऽ …. सोडा ना प्लीज… "

तिच्या डोळ्यांतील वेदनेचा अश्रू गालावर ओघळायच्या आधीच तिच्या गालात एक जोराची चपराक बसली आणि सोबतच जळजळीत शब्द ही कानांवर आदळले,
"पुन्हा त्या याराच नाव जीभेवर जरी आलं ना…. तरं…"

सखी बेडवर आदळलेली. ती आपली डोळे पुसत मागे मागे सरत भीतीने नाही अशी मान हलवत रडत बडबडली,
"नाही बोलणार … कधीच नाही बोलणार…पण प्लीज… मला.. मला मारू नका."

दोन बोटांमध्ये बिडीचा सुस्कारा ओढून धूर आपल्या नाकातून बाहेर काढत नितीन मग्रुरीने बोलला,
"आज पुन्हा मी याच्या आधी झोपलीस?"

"सॉरी … सॉरी चुकून झोप लागली…. प्लीज, प्लीज मारू नका." सखी बेडला टेकूनच थरथरत हात जोडून गयावया करत होती.

सखीकडे बघतच त्याने आपलं शर्ट अंगावेगळं केलं. त्याचा तो उघडा, ताडमाड, चेहऱ्यासारखाच निबर देह पाहताना सखीची थरथर अजून वाढली आणि ती गुडघे उराशी घट्ट आवळून स्वतःशी बोलल्यासारखी विनवणी करत बोलली,
"प्लीज… प्लीज आज नको ना… कणकण जाणवतीये."

तो रंगेलपणे तिच्या पदराला हात घालत बोलला,
"म्हणजे माझी रंभा आज गरम असणार तरं…"

पहिला तिचा पदर.. नंतर तिची साडी अंगावेगळी होताना सखी डोळे बंद करून कृष्णाचा धावा करत होती,
"कुठंयस तू कृष्णा.. एकदा तरी माझी लाज राख की रे.. त्या द्रौपदीसारखीच मलाही गरज आहे रे तुझी…कृष्णा… प्लीज ये ना…"

आपल्या घट्ट बंद डोळ्यांतून अश्रूंना वाहू देत ती अंत:र्मनात तिच्या कृष्णाचा धावा करत राहिली. तिच्या शरीराला होणाऱ्या किळसवाण्या स्पर्शापासून स्वतःचा अंतरात्मा वाचवण्याचा प्रयत्न करत राहिली.

त्या खोलीत त्याचा आवाज, त्याचे वाढलेले हुंकार आणि वेदनेने तिचे अस्फूट हुंदके घुमत राहिले.

ती निपचीत पडून होती. नितीन मात्र तो नाजूक देह ओरबाडून तिच्यावर स्वार होऊन स्वतःचा पुरुषार्थ गाजवत राहिला. घामाने ओलाचिंब झाल्यावर अवाढव्य शरीर थकल्यावर नितीन तिच्यापासून दूर झाला पण अजूनही त्याचं मन भरलं नव्हतं.

पुन्हा जोश येण्यासाठी त्याने बीडी पेटवली आणि तो सुडौल बांधा, ते स्त्री सौंदर्य पुन्हा नजरेनेच पित बिडीचा झुरका ओढत त्याने .. मांजराच्या पिल्लाशी जसं विकृतपणे खेळावं अगदी तसंच तिला त्रास देत त्याने ती जळती बिडी तिच्या पायाला लावली. तिच्या बधीर होत चाललेल्या देहाला चटका बसल्यावर ती भीतीने थरथरली आणि क्षणात उठून बसली.


सखी आताही थरथरून क्षणात उठून बसलेली. तिने जे आता पाहिलं ते स्वप्न होतं? की सत्यच स्वप्नात उतरलेलं? पण जे काही होतं ती स्वप्नात पुन्हा जगलेली. त्या क्षणांच्या आठवणीने ती अजूनही थरथरत होती‌.

तिची नजर कृष्णावर गेली. त्याला आपल्या अंथरुणात पाहून.. इतक्या जवळ पाहून आणि अशा अवस्थेत पाहून सखी खोलवर दुखावली. आपल्या उघड्या पायावर त्याचा असणारा हात पाहताना नितीनची चपराख सुद्धा तिला कमीच वाटली आणि डोळ्यांत टचकन पाणी आलं.

तिचा घाणेरडा भूतकाळच जणू मोहक रूप घेऊन तिच्या समोर बसलेला.

कृष्णा तिला काय वाटलेला! तिने त्याला काय समजलेलं आणि तोही असाच निघावा? फक्त पुरुष!
तो ही बाईतील बाईला भाळला? तोही तिच्यावर मर्दानगी गाजवतोय? तो ही तिच्या नजरेत पुरुष म्हणून साफ हरला.. एका क्षणात वेदनादयी विचारांनी सखी भरडली गेली. अतीव दुःखाने तिचे डोळे आक्रोश करू लागले आणि ती कृष्णाकडे बघून रडू लागली.

ती अजूनही थरथरत होती. आपल्या पायावरचा त्याचा हात काढण्याची अजूनही तिच्यात हिम्मत नव्हती. तिला त्याच्या हाताकडे बघून रडताना पाहून कृष्णाने क्षणात आपला हात काढला आणि तिचा पाय खाली ठेवून त्यावर पुन्हा पांघरून घातलं.

त्याला किती टोकच अपराधी वाटत होतं हे फक्त तिच्या कृष्णालाच ठाऊक! कृष्णा प्रचंड अपराधीपणे बोलला,
"सखी तुम्हाला वाटतंय तसं नाहीये… एकदा ऐकून तरं घ्या."

सखी तुटलेली, दुःखाने.. विश्वासघाताने! त्याच्याकडून अशा वागण्याची तिची अपेक्षाच नव्हती. ती तोंडावर हात ठेवून रडत होती. तिच्या दुःखाला सीमाच नव्हती.

तिला असं रडताना पाहून कृष्णाच्या डोळ्यांत सुद्धा पाणी आलं. त्याचा किती निर्मळ हेतू होता पण एका स्त्री आणि पुरुषामध्ये जे नातं असतं तेच नडलं आणि ज्याची त्याला भीती होती तेच झालं. तिचा गैरसमज झाला आणि त्याच्या चारित्र्याला डाग लागला.

कृष्णा आपल्या शेजारची तेलाची बॉटल तिला दाखवत घोगऱ्या आवाजात बोलला,
"तुमच्या कृष्णा शपथ.. मी फक्त तुमच्या पायाला तेल लावत होतो. तुम्हाला झोपेत स्पर्श करताना माझ्या मनात पाप नव्हतं सखी."


त्याच्या हातात तेलाची बॉटल बघून सखीने घाईत डोळे पुसले. त्या झिरो बल्बमध्ये सुद्धा त्याचा तेलकट हात, ती तेलाची बॉटल पाहून सखीने घाईतच आपल्या पायाचा तळवा पाहिला आणि तिथेही तेल पाहून तिला किती आनंद झाला.

म्हणजे कृष्णा तिच्याजवळ नव्हता आला.. तो तसा नाहीच. तिला जसा वाटतो कृष्णा अगदी तसाच आहे, या गोष्टीचा किती किती तिला आनंद झाला. ती आनंदाने पुन्हा रडायला लागली.

तिला रडताना पाहून कृष्णा प्रचंड अस्वस्थ झाला. तिचा अजूनही विश्वास बसेना हे पाहून कृष्णा खूप टेन्शनमध्ये आला. आपण सखीच्या नजरेतून उतरलो याचं दुःख त्याच्या ही डोळ्यांत नव्याने उतरलं.

किती मुश्कीलीने त्याला त्याची सखी मिळालेली आता ती सुद्धा हरवली. त्याची सखी हरवण्याचं दुःख डोळ्यांत ठेवूनच तो हात जोडून अगदी मनापासून घोगऱ्या आवाजात बोलला,
"मी खरंच बोलतोय सखी, माझ्यावर एकदा विश्वास ठेवा. मला फक्त तुमच्या पायाला तेल लावायचं होतं
तरीही चुकून जर इकडे तिकडे स्पर्श झाला असेल तरं… तरं फक्त एकदा माफ करा."

त्याला हात जोडलेले पाहून सखीने लगेच त्याचा हात खाली घेतला.

तो रडवेला होत बोलला,
"कसा विश्वास पटवून देऊ तुम्हाला…?"

त्याचा हात घट्ट पकडून सखी मुसमुसत बोलली,
"विश्वास आहे मला.. "

कृष्णा आनंदला,
"खरंच काय?"

"हम्म ऽ ऽ…."
सखी हुंकारली आणि त्याचा हात दोघी हातांनी घट्ट पकडून पुन्हा रडू लागली. त्याच्या स्पर्शात किती आश्वस्तपणा होता!

तिला रडताना पाहून तिच्या डोक्यावर हलका हात फिरवत कृष्णाने काळजीने विचारलं,
"तुम्ही रडताय काय अशा? भुताचं स्वप्न बघितलं काय?"

नितीनचा चेहरा नजरेसमोर येऊन सखी त्याचा हात आधारासाठी अजून घट्ट पकडत थरथरत बोलली,
"ते.. ते जनावर…"

"कर्र ऽ ऽ……" हवेच्या झोताने खिडकी हलली आणि सखी पुन्हा भीतीने थरथरली.

तिला खिडकीकडे भेदरलेल्या नजरेने पाहताना बघून कृष्णा तिला समजावत बोलला,
"कोणी नाहीये तिथं.. हवेने हलतेच ती."

"कर्र ऽ ऽ…" पुन्हा तसाच आवाज आल्यावर सखी पुन्हा तशीच थरथरली.

तुलाही आजच वाजायचं होतं?
या नजरेने कृष्णाने उच्छवास टाकत खिडकीकडे पाहिलं.

सखी त्याचा एक हात घट्ट पकडून मुसमुसत होती. कृष्णा तिच्या शेजारीच बसून होता. हळूहळू सखी शांत झाली आणि तिच्या मानेने त्याच्या खांद्याचा आधार शोधला.

©प्रियांका सुभा कस्तुरी
२२/०२/२०२४

…………

(समिक्षांची वाट पाहतीये..

भेटू लवकरच!)

🎭 Series Post

View all