Mar 03, 2024
गोष्ट छोटी डोंगराएवढी

कृष्ण हवा

Read Later
कृष्ण हवा


कथेचे नाव _कृष्ण हवा

विषय_...आणि कृष्ण भेटला


"यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत|
अभ्युत्थान धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम ||"

"जब जब इस पृथ्धीपर धर्म की हानी होंती है, विनाश का कार्य होता है और अधर्म आगे बढ़ता है , तब तब मैं इस पृथ्वीपर अवतार लेता हूं | "

पण, आजच्या युगात काही पुरुष कंसाप्रमाणे वागत असतात. आज माणूस किती आप्पलपोटी आणि स्वार्थी झाला आहे. आपलं आणि फक्त आपलं पहायचं. इतरांच्या व्यथेवर बोटं ठेवून फक्त हसायचं.
नात्यांच्या गोंधळात मी पणा जपायचा. कामापुरते बोलायचं. नाहीतर शेजारी बसलेली व्यक्ती ओळखीची असूनही तिच्याकडे सपशेल दुर्लक्ष करायचं.
खरंच आज माणूस माणुसकी विसरत चालला आहे. फ्लॅट संस्कृती मध्ये तर शेजारी कोण राहते. याची पुसटशी कल्पना देखील ‌नसते. म्हणून एक कृष्ण हवा आहे.

माणूस भावबंधाचे विश्व सोडून भौतिक सुखाच्या मागे पळत सुटला आहे. सर्व काही आहे. पण, माणसाची हाव मात्र कमी होत नाही.

"दुर्गा भागवत" म्हणतात, कृष्णा तू युद्धासाठी नको येऊन. तर आम्ही माणसं म्हणजे एक एक बेट झालो आहे. तेव्हा तू नात्यांचा पूल बांधायला ये !

म्हणून एक कृष्ण हवा आहे.

या डिजीटल युगात हाय, हॅलो, सगळ्या प्रकारचा संवाद साधला जातो. पण, कोणाच्या घरी जायला आणि कोणाला घरी बोलावायला वेळच नसतो. फक्त पैसा असला तरच सुरू जुळतात आणि गरीबांचा मात्र उपहास करतात. "नात्यांचा हा खेळ ,आयुष्याचा प्रवास, हा अतिशय महत्वाचा असतो. तेव्हा कृष्णा तू ये.
\"शहाण्याला शब्दांचा मार\" पुरेसा असतो. पण, माणुसकीला प्रेमाचा रंग पुरेसा असतो. जात, पात, धर्म , भेद विसरून सगळ्यांना एकोप्याने धरून चालणारा कृष्ण हवा आहे.

स्त्रियांवर अत्याचार करतांना, तिच्या शरीराची अवहेलना करतांना , विटंबना करतांना , तिच्या शरीराचे लचके तोडणारा माणूस हा हैवान असतो. अशावेळी एका कृष्णाची खरोखरच गरज असते.
पण, तेव्हा कोणीही धर्माच्या आड येत नाही. आपल्या संस्कृती, परंपरांचा विचार करीत नाही. पण, लग्न करतांना मात्र अनेक विचार मनात डोकावून जातात.

नकळत सारे कसे पलटून जाते. कोणी नशीबाला दोष देतो. तर कोणी आपल्या आयुष्याला. अनेक अडचणींचा सामना करत आपण आनंदाने आयुष्य जगत असतो. तेव्हा श्रीमंत, गरीब असा भेदभाव देव करतच नसतो. अशावेळी आपण देवाचा धावा करतो ना. मग कोणत्या ना कोणत्या स्वरूपात कृष्ण आपल्या समोर येऊन उभा राहतो.
अनेक विविध रुपातून तू आम्हांला भेटतो. कधी
डॉक्टरच्या रुपात , कधी पोलिसांच्या रुपात, कधी आईच्या रुपात , कधी बहिणीच्या रुपात, कधी तुझ्या नटखट बालगोपाल तुझे दर्शन होते , कधी दुर्गादेवीच्या रुपात दिसते.

तुझे ते निळे सावळे रूप अजूनच खुलून दिसते. अनंततेचे प्रतिक म्हणजे कधीही न संपणारे तुझें अस्तित्व या ठायी ठायी, या प्रत्येक कणा कणात नाद करीत आहे. तू चराचरात नांदत आहे. पण, प्रत्यक्षात आता तुझी गरज निर्माण झाली आहे.
अहिंसा आणि सत्याचा शोध घेतांना तुझी उणीव भासत आहे रे.
कर्म धर्म संयोगाने आपल्याला मनुष्य रूपी जन्म मिळाला आहे. तेव्हा प्राण्यांसारखे वर्तन करू नका. बोलून चालून मोकळे व्हा. स्वतः मनमुराद हसा. पण, इतरांना रडवू मात्र नका.

आपण कृष्ण तर बनू शकत नाही.पण, चांगल्या वागणुकीने इतरांचे मनात आणि हृदयात मात्र नक्कीच स्थान निर्माण करू. अशी आशा वाटते.

©® आश्विनी मिश्रीकोटकर
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Ashwini Suhas Mishrikotkar

Housewife

Love Singing, Rangoli

//