Login

कोथिंबिरीची भाजी

Coriander Recipe Kothimbirichi Bhaji


कोथिंबीर बहुतदा आपण कोथिंबीर वड्या किंवा वरून पदार्थावर घालण्यासाठी वापरतो परंतु माझी आई या कोथिंबरीची भाजीसुद्धा करते आणि ती खूप टेस्टी होते. बघुयात कोथिंबिरीच्या भाजीची रेसिपी .....

साहित्य -

1- 1 जुडी किथिंबीर

2- 4 ते 5 हिरव्या मिरच्या

3- 3/4 लसूण पाकळ्या

4 - पाव वाटी भाजलेले शेंगदाणे

5 - एक मध्यम आकाराचा चिरलेला कांदा

6- पाव चमचा जिरे

7 - पाव चमचा मोहरी

8- तेल

9 - मीठ

कृती -

1 - कोथिंबीर निवडून स्वच्छ धुऊन बारीक कापायची. त्यानंतर ती थोडी कोरडी होऊ द्यायची.

2 - हिरवी मिरच्या, लसूण , शेंगदाणे मिक्सरवर एकत्र बारीक करायचे हे मिश्रण पूर्ण बारीक न करता थोडेसे जाडसर ठेवायचे .

3- कढईत एक मोठा चमचा तेल गरम करायला ठेवायचे.त्यात जिरे , मोहरी आणि चिरलेला कांदा घालायचा . कांदा लालसर झाला की त्यामध्ये बारीक केलेले मिरचीचे मिश्रण घालायचे सगळे व्यवस्तिथ 2/3 सेकंद परतून घ्यायचे त्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर घालायची. मंद गॅसवर दहा मिनिट भाजी शिजवायची.

चविष्ट अशी कोथिंबिरीची भाजी तयार.