कोथींबीर वडी...!!

मस्त खा.. मस्त रहा.


* कोथंबीर वडी.*

कोथंबीर ,ही " भाज्यांची राणी" असे बरेच शेफ , मास्टर्स,लोक म्हणताना दिसतात.
जेवणाचा मेनू कोणताही असो,कितीही भारीतली भारी रेसिपी असो, ती कोथंबीर च्या शेवट चा टच अप शिवाय पूर्णत्वास गेली आहे.असे वाटत च नाही.
कोणताही स्वयंपाक वरून कोथंबीर च्या गारणीशिंग ( सजावट) केला नाही तर चुकल्यासारखे वाटते.
हर प्रकारच्या मासल्यांच्या वाटणं पासून ते शेवटी काहीही प्रक्रिया न केलेल्या सलाड किंवा कोशिंबीर पर्यंत ह्या कोथांबिर् चा प्रवास चालू असतो.

स्वयंपाकाच्या रुचकर सिनेमातील एक सगळ्यात महत्वाचा,आणि मोठा रोल म्हणून सपोर्ट कॅरेक्टर म्हणून ओळखली जाते.......

" कोथंबीर वडी" हा एकमेव पदार्थ असा आहे की,ज्या मध्ये कोथंबिर् हेच मुख्य पात्र आहे.यांना दुसऱ्या कोणत्याही सपोर्ट सिस्टीम ची गरज भासत नाही.

खुप साधे सुधे वरन भात ,खिचडी भात,मसाले भात ही दोन चार वड्या ही स्पेशल करून टाकतात.

आज काल सोशल मीडिया मुळे पदार्थ आणि त्यांचे बनवण्याचे प्रकार आपल्याला वेगवेगळे दिसून येतात.
" व्यक्ती तितक्या प्रवृत्ती.." प्रमाणे एकाच पदार्थही वेग वेगळ्या पद्धतीने दाखवण्याचे प्रयत्न केले जातात.
कोथांबिर हा पदार्थ खायला जितका रुचकर तितकाच बनवायला ही जास्त वेळ घेणारे काम आहे.
" बनवायला इतका वेळ लागला,अन् संपूनही गेल्या लगेच....."
असे गृहिणी बोलत असतात.
म्हणूनच मी यावर एक उपाय सुचवला . कोथं बीर वड्या एकदाच बनवायच्या पण लगेच संपू ही नये.थोड्या फार स्टोअर रहाव्या,म्हणजे चटणी आणि लोणचे प्रमाणे खराब न होता कधी वाटले की खाता येईल अश्या पद्धतीने बनवायचे.

भाजणीचे पीठ," आपण दिवाळी साठी बनवतोच.त्याच वेळेस पुढेही पुरेल इतके जास्तीचे भाजणीचे पीठ करून ठेवले तर कोथांबिर वडी साठी सोपे काम होऊन जाईल.

भाजणीच्या पीठ मध्ये ,तुमच्या आवडीच्या चवी प्रमाणे मीठ, तिखट,धने जिरे पूड,अगदी थोडीशी हिंग,चमचाभर तीळ,घ्यायचे.....
कोथांबिर,अगदी बारीक बारीक चिरून कापून घेतली असेल तर वड्याही छान कापल्या जातात अन् दिसतात ही छान. को थं बीर सोबतच " चार पाच कडीपत्याची पाने,अन् थोडी पुदिन्याची पाने," बारीक बारीक चिरून घ्यायची.अगदी थोडासा ओवा तळहातावर रगडून घ्यायचा......
आणि हे सर्व भाजणी पीठ मध्ये छान मळून घ्यायचे.जास्त घट्ट वाटत असेल तर थोडासा तेलाचा हाताने मऊ करून घ्यायचे......

आणि कुकरला एका शिटीच वाफेवर ,वाफवून घ्यायचे......
वाफेच्या मस्त वासाने,वातावरण फ्रेश होऊन जाते....
पण घाई न करता,पीठ चांगले थंड झाल्यावर च सुदंर आकारात वड्या कापून घ्यायच्या.....
खूपच पातळ किवा जाड,न करता मध्यम आकाराच्या वड्या कापून घेतल्या की,.....
तेल चांगले गरम झाले की,फक्त जिरे मोहरी ची फोडणी करून मस्त खुसखुशीत तळून घ्याव्यात.( हिरवी मिरची फोडणीसाठी आप्शन आहे,जास्त तिखट आवडणाऱ्या साठी).


या भाजणीच्या पिठातील कोथंबी र वड्या तुम्हाला पाहिजे तेव्हा ,पाहिजे तितक्या बनवून ठेवू शकता....
ह्या खराब ही होत नाहीत,आणि शिवाय कधीही,कोणत्याही जेवण्यासाठी दोन चार वड्या घेऊ शकता.किंवा शाळेत मुलांना ड ब्या साठी ,संध्याकाळी स्नॅक्स म्हणूनही घेऊ शकता....!!

""***हा फक्त कोथंबिर वडी आहे ना....म्हणून करून ठेवलेल्या वड्यांचा डबा संपवण्याची घाई करू नका ,म्हणजे झाले ...***

एकदा करून बघा....आणि रेसिपी आवडल्यास....लाईक करा ...कमेंट करा ....!!
धन्यवाद....!!!!
©® Sush.