जवळ जवळ 2 वर्षानंतर 4 ऑक्टोबर ला 5 वी पासून शाळा सुरु झाल्या, मुलांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण होते, मुलं अतिशय खुश दिसत होती, माझ्या परिसरातील तर अनेक शाळांमध्ये मुलांचे अतिशय सुंदर पद्धतीने स्वागत करण्यात आलं, शाळा हीं थोड्या फार सजवल्या होत्या, मुलं अति उत्साहात होती, सुरवातीला शाळेत गेल्यावर मुलांचे तापमान बघणे, हात सॅनिटाईस करणे हे सर्व झाल्यावर मुलांना रांगेने शाळेत सोडण्यात आलं, मुलांना एका बेंचवर 1 च मुलं अशी सोय करण्यात आली होती, त्यानंतर मुलांचे अभ्यासाचे तास सुरु झाले.. मी शाळा सुटल्यावर मुलांना विचारलं कसा होता आजचा दिवस, तर सर्व मुलांचं उत्तर एकच, खूप मज्जा आली आज, पण त्यांना एकच अडचण आली ती म्हणजे पूर्ण 9 वाजल्यापासून जो मास्क घातला होता तो शाळा सुटल्यावर वरच काढायला मिळाला, त्यामुळे त्यांना मास्क एवढा वेळ घालायची सवय नसल्याने मास्क चा कंटाळा आला.. देवाला एकच मागणे आहे.... . हा कोरोना
लवकर संपव बाप्पा - बिचाऱ्या त्या लहानग्या जीवांना तरी मास्क पासून मुक्ती मिळूदेत..आणि मुलं पहिल्यासारखी मुक्तपणे सगळीकडे फिरुदेत हीच ईश्वर चरणी प्रार्थना............नमस्कार.... सौ.. सोनल गुरुनाथ शिंदे........
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा