कोणत डोकं दुखतंय माहीत नसल्याने रावण परेशान.(विनोदी कथा)

रामायणाच वृत्त क्रिकेट मॅचच्या स्वरूपात.एक फैंटसी विनोद

आमच्या रायटयर ग्रुपच्या उपक्रमात अतंरंगी वाक्यावर एक कथा लिहायची होती तिच लिहली आहे.
वाक्य होतं.कोणत डोकं दुखतंय माहीत नसल्याने रावण परेशान


ही एक फँटसी कल्पना आहे.. विनोद समजुनच वाचावी.कोण्याचाही भावना दुखावण्याची माझी मनषा नाही.????


इरा वृत्तपत्रांतून सभार

बातमीचे नाव:दहापैकी नेमकं कुठलं डोकं दुखतंय हे समजत नसल्याने रावण परेशान.

प्रतिलिपी प्रतिनिधी वृषाली गुडे यांच्या सुत्रामार्फत क्रिकेट प्रेमीं साठी आणलेली खास सनसनाटी बातमी...

श्रीलंकनवासी रावणतुंगे ह्यांच्या क्रिकेट टीमला शुक्रवारी रामटीम बरोबर होणाऱ्या टेस्ट मॅचमध्ये नामुष्की पत्करावी लागली..

ही सीता ट्रॉफी मॅच खुपच अटीतटीची होती त्यामुळेच ह्याबद्दल लंकन क्रिकेट टीमवर चौकशी समिती नेमावी अशी मागणी करण्यात येत आहे.तर आम्ही पूर्ण मॅचचे वृत्तांकन खालीलप्रमाणें देत आहोत.


ह्या पराजयाची संपूर्ण जबाबदारी रावण व त्यांच्या टीमवर टाकण्यात आली आहे..त्यांना ह्या मॅचमध्ये बॉलर हनुमानने मारलेले गुगली बॉल  झेलता आले नाही ...तसेच कुंभकर्ण ,इंद्रजीत सारखे बॉलरसुद्धा राम आणि लक्ष्मण यांचे सिक्सर अडवु शकले नाही त्यामुळेच ही मॅच हरले तसेच बिभीषणरत्ने या स्लो बॉलरने यांनी  रामकुमार टीमला अधिकाधिक नोबॉल रन दिले व वाइड बॉलचाही वर्षाव केला . तसेच तिसऱ्या दिवशी आउट झालेल्या वी.लक्ष्मण यांना लंकन वैद्य नावाच्या थर्ड अंपायरनेही अचानाक संजीवनी रिव्यू घेउन नॉट आउट ठेवले. ह्याचा परीणाम स्वरूपी शेवटच्या दिवशी रावण यांना स्वत: आपल्या इतर नऊ साथीदार फलंदाजासह पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले

जसे आपणास सांगितले कॅप्टन रावण ह्यांना नामुष्कीसाठी लंकन जनता क्रिकेट समितीला सामोरे जावे लागले. आताच आलेल्या सुत्रानुसार रावण यांनी स्वत:ची बाजु सावरत त्यांच्या टीममधील कोणा एकाचे डोके दुखत असल्याचे कारण दिले त्यामुळेच पुर्ण टीम फॅार्म मध्ये नव्हती. नाहीतर ते कधीच ही मॅच हरले नसते असेही स्पष्टीकरण दिले.

पण..तो कोण होता.?ज्याचे डोके दुखत होते.
स्वत: रावणतुंगे,इंद्रजीत पिल्ले, शूर्पणखा नाके,का कुंभकर्ण अटपट्टु... का रावणचा सख्खा भाऊ विभीषणरत्ने तुंगे ज्यांनी वाइड आणि नो बाॅलची खैरात केली.

कोण होता तो ?रावण कुणाला वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत हे अजुन गुलदस्त्यातच आहे...
लवकर ह्याची माहीत मिळाल्यावर आपणास सांगितली जाईल.