कोणीतरी असावं.....

Lovely feeling

कोणीतरी असाव आपलस वाटणार
नकळत आपल्याला समजून घेणार 

सुखात आपल्या सुखी होणार,
दु:खात आपल्या सांत्वन करणार.. 
कोणीतरी असावं आपलसं वाटणार..

हास्यात आपल्या  आनंद शोधणार.
 सुखासाठी आपल्या धडपड करणार, 
कोणीतरी असावं आपलसं वाटणार

चूका झाल्या तर समजून सांगणार
पावलोपावली साथ देणार,
कोणीतरी असावं अपलस वाटणार 

मनमोकळे पणान आपल्याशी बोलणार
हक्कांन आपल्यावर रागवणार
कोणीतरी असाव आपलस वाटणार

​​​​