Dec 05, 2021
प्रेम

कोकीला

Read Later
कोकीला

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
कोकीलाम्माची आणि माझी पहिली भेट माझ्या आॕफीसमध्ये झाली. तिचा नवरा मेल्यानंतर तिला पेन्शन सुरू झाले नव्हते म्हणून ती माझ्याकडे आली. काळीसावळी, धरधरीत नाक, तिशीच्या आतलीच असेल. डोळे मात्र मोठे पाणीदार, चेहऱ्यावर उदास भाव ,स्वरात अजीजी. याअगोदर ती दोनचारदा येऊन गेली होती पण कागदपत्र अपुरे असल्याने मंजूर होत नव्हते. मला तिची दया आली.मी तिला कोणते कागदपत्रे हवीत ते व्यवस्थित समजावून दिले.तिचे समाधान झाले.बहुदा इतके व्यवस्थित तिला कोणी सांगितले नसेल. तेवढ्यात आॕफीसचा चहा आला , ती नकोनको म्हणत असतांनाही मी तिला देऊ केला. ती निघून गेली.

त्यानंतर दोनतीन फेऱ्यात तिचे काम झाले. काही फॉर्म मी भरून दिले.साहेबांची सही घेतली. पेन्शन मंजूर झाले.बोलताबोलता तिचा नवरा चपराशी होता आणि खूप दारू पिऊन मेला हेही तिने मला सांगितले.माझ्याशी तिची चांगली ओळख झाली आणि तिचा माझ्यावर विश्वासही बसला.
पेन्शन मिळाल्यावर ती आली.माझ्या समोर बसली. मी नजरेनेच विचारले काय झाले?
काहीशी घाबरतच तिने माझ्यापुढे पन्नास रूपयाची नोट ठेवली.
"वो साब आपका बक्षीशी?"

" किसलिए?"

"वो साब आपनेही कोशीश की तो पैसा मिलना चालू हो गया."

मी तिच्या हातात ती नोट परत दिली.
" कुछ पैसा देनेकी जरूरत नही."

" साब,चायपानीके लीए रखलो"

"ठीक है.पुरे आॕफीसके लिए चाय बोलदो." मी तिला सांगितले .साहेबांपासून ते चपराशापर्यंत चहा सांगितला असता तरी दहा बारा रूपयाच्या वरती खर्च आला नसता.(गोष्ट तीस वर्षापूर्वीची आहे)

त्यानंतर कोकीलाचे आॕफीसला येणे बंद झाले.दरम्यान मी जिथे राहात होतो त्या घरमालकांच्या मुलाचे लग्न ठरले. जोडप्यासाठी रूमची आवश्यकता असल्याने त्यांनी मला दुसरीकडे रूम पहायला सांगितली. कदम म्हणून माझा मित्र होता.त्याने अजितनगर म्हणून गावापासून थोड्या दूर असलेल्या भागात घर बांधले होते.तिथली एक रूम रिकामी होती.नवीन बांधकाम,आधुनिक सुविधा , हवेशीर.छान होते सर्व.थोडी दूर होती रूम ,पण माझ्याकडे सायकल होती.मी तिकडे शिफ्ट झालो.

ज्या बाजूला मी राहात होतो त्याबाजूला जाण्यासाठी एक शाॕर्टकटपण आहे हे मला काही दिवसांनी समजले. थोडा रस्ता कच्चा होता आणि वस्ती तुरळक पण पावसाळा सोडला तर वापरण्याजोगा होता. मधे मधे झाडी होती. मी तिथून जाऊ लागलो. एकदा शनीवार म्हणून लवकर सुट्टी झाली.रमतगमत चाललो होतो सायकलवर. अचानक एका झोपडीवजा घरासमोर कोकीला अंगण झाडतांना दिसली. त्याचवेळेस तिचेही माझ्याकडे लक्ष गेले.
"अरे..साब आप?"
मी सायकलवरून उतरलो.

"हा..यही रहता हू आगे.अजितनगरमे."

"आओ साब घरपे.चाय पिलाती आपको."

मीही फारसे आढेवेढे घेतले नाही.तिचे घर छोटेसे पण छान होते.स्वच्छ. एक प्लास्टीक खुर्ची होती, समोर काही फोटो .एक काळासावळा कुरळ्या केसांचा तरूणाचा फोटो होता.तो नवरा असावा तिचा.घराच्या अंगणात गुलाब कर्दळी लावली होती. ती चहा घेऊन आली. कोकीला बदलत होती.पैशाचा परिणाम होतोच.दुर्मुखलेली ओढलेली कमी बोलणारी कोकीला आता शांत ,समाधानी वाटत होती.थोडीफार बोलली.त्यात "साब आपने काम कर दिया मेरा." हे पालूपद होतेच. कोकीलाला एक मुलगी होती.सहा सात वर्षाची.हेही मला समजले.मी तिचा निरोप घेतला.

रोज मी त्याच रस्त्याने जात असलो तरी कोकीला क्वचितच बाहेर दिसायची. मी दिसलो तर ओळखीचे हसायची.पुढील शनीवारी मी तसाच दुपारी घरी जात असतांना ती बाहेर दिसली.ती कोणतेच काम करत नव्हती.उभी होती.मी पुढे जाणार तोच तिने हाक मारली."साब?"

मला तिने घरी बोलावले. आॕफीसकडून एक पत्र आले होते ते इंग्लीशमध्ये होते. ते दाखवण्यासाठी तिने मला बोलावले होते. ते तांत्रिक बाबींबद्दल होते. अनुकंपा तत्वावर जी नौकरी मिळते ती कोकीलाने मुलीला देण्यात यावे असे कळवले होते त्याची खातरजमा झाली होती. पत्र त्यासंबंधीचे होते. मी तिला तसे सांगितल्यावर तिला बरे वाटले.चहा अर्थातच झाला.ती साउथची असून कॉफी का करत नाही असा मला प्रश्न पडला.ह्यावेळेसही थोड्या गप्पा झाल्या. नवरा वारल्यावर तिच्या माहेरच्या आणि सासरच्या मंडळीनी तिची साथ सोडली ह्याचा तिला राग होता. ती पैसे मागेल म्हणून त्यांनी येणेच रद्द केले अशी तिला खात्री होती.ती आणखीनच काही काही सांगत होती.मग एकदम थांबत म्हणाली
" माफ करना साब,आपका टाईम खराब किया."

मी खरेतर तिच्या बोलण्यात गुंगून गेलो होतो.नाईलाजाने निघालो. दिवस जातच होते. आता प्रत्येक शनिवारी तिच्याकडचा चहा हक्काचा झाला.तिच्या मुलीसाठी काहीबाही खायची वस्तू ,कधी फौन्टन पेन घेऊन जात होतो. तिच्याकडे जाण्याबद्दल तिची काही आडकाठी दिसली नाही.मुळात वस्ती तुरळक होती. तिच्या घरापासून काही अंतरावर काही लोहारांची घरे होती. ते लोक तसे मदतीला तत्पर असले तरी बाकी बाबतीत फारसे लक्ष घालणारे नव्हते. आणि आमच्यातल नात कोकीला आणि साब एवढेच होते.पण मला आता शनीवारची ओढ वाटू लागली होती.कोकीलाही मनमोकळेपणाने बोलत होती. तिच्या मनाचा अंदाज येत नव्हता.पण माझ्याबद्दल विश्वास नक्की होता. मी पुढचे पाऊल उचलण्याचे ठरवले.

एका शनिवारी चहापाणी होताच तिची मुलगी घरात नाही हे पाहून मी कोकीलाला म्हणालो.

"कोकीला ,थोडा बात करनेका है तेरेसे."

"बोलो ना साब."

"कितना दिनतक एसेही अकेली रहेगी?"

"मै समझी नही साब"

"शादी करेगी मुझसे?"

एखादा बॉम्ब फुटावा तशी कोकीलाची अवस्था झाली.
चेहऱ्यावरचा घाम पूसून कोकीला थरथरत म्हणाली

"क्या बोलते साब? आप कहा मै कहा.और मेरी बच्चीभी है. नको साब,मै जी लूंगी अपनी जिंदगी.आपको तो अच्छी पढी लीखी मैडम मिलेगी."

"मुझे मैडम नही ,तू चाहीये."

"नही साब.क्यू बेवाके पिछे अपनी जवानी खराब करते हो.नही साब.अच्छेसे रहो." अजूनही ती धक्यातून सावरली नव्हती.

"अगर मेरे बारेमे तुझे शक है तो आॕफीसमे आके पुछ सकती है.मै दारू नही पीता,जुवा नही खेलता.गावमे एक माॕ है."

"नही साब. नही." ती मान हलवत म्हणाली.आता तिच्या डोळ्यातून अश्रू येत होते.

"तेरेसे कुछ छुपाउंगा नही.मेरी एक शादी हो गयी थी.लेकिन बीबी चली गयी मुझे छोडके."

ही गोष्ट खरी होती.लग्नानंतर चारचं महिन्यात रेवती मला सोडून तिच्या प्रियकराबरोबर पळून गेली होती.तिचे त्याच्यावर खूप प्रेम होते म्हणतात. माझी काहीच चूक नव्हती.पण समाजात,मित्रमंडळीत,आॕफीसमध्ये मी टींगलीचा विषय झालो. बायको सांभाळता आली नाही याचा अर्थ तिला मी शारीरिक सुख देऊ शकलो नाही असा सोयीस्कर अर्थ सगळ्यांनी काढला.अखेर कंटाळून मी विनंती करून गावापासून खूप दूरच्या गावी बदली मागून घेतली.इथे निदान मला ओळखणारे कमी होते. माझे कोकीलाकडे लक्ष गेले.ती डोळे विस्फारून माझ्याकडे पहात होती.

"इतने भले आदमीको छोड दिया?" ती पुटपुटली.

"फिरभी साब आपको मेरेसे अच्छी औरत मिल जाएगी."

मी काही बोललो नाही. सायकल घेतली ,एकदा कोकीलाकडे वळून बघीतले, ती खाली बसून अश्रू पूसत होती. एकदा वाटले उगाच घाई केली आपण.जे चालले होते ते बरे होते.आठवड्यातून एकदा तरी घरगुती वातावरण अनुभवत होतो. तरीही एक गोष्ट बरी झाली होती.ती तटकतोडपणे नाही म्हणाली नव्हती किंवा माझ्यावर संतापली नव्हती.(तशी शक्यता कमीच होती.)

आता मी रूममवरूनआॕफीसला जायचा रस्ता बदलला.दुरच्या रस्त्याने जाऊ लागलो. तिने नाही सांगितल्यावर पुन्हा तिच्याकडे जायला बरे वाटेना. काही महीने गेले. नियमाप्रमाणे तीन वर्षानंतर माझी बदलीही झाली आणि प्रमोशनही. त्या दिवशी माझा सेन्डाॕफ होता. माझे स्टाफशी जवळचे संबंध नसले तरी त्रासही नव्हता.शिवाय मी सडा असल्याने अनेकांची आॕफीसची कामे करून देत होतो.नेहमीप्रमाणे भाषणे हारतुरे झाले.बाहेर आलो.सायकल घेऊन कम्पौन्डच्या बाहेर आलो तर एका झाडाखाली कोकीला आणि तिची मुलगी उभी होती. माझ्याकडे बघून तिने नेहमीचे स्माईल दिले.मी जवळ जाताच तिने हातातला फुलांचा गुच्छ दिला. तिच्या वागण्यात सहजता होती.
"थैंक्यू. लेकीन तुझे कैसे पता की मेरा तबादला हो गया है."

"वो साब..," ती पुढे बोलली नाही.याचा अर्थ तिही माझ्यावर लक्ष ठेऊन होती.
"चलो साब घरपे चाय पिते है." नाही म्हणणे शक्यच नव्हते.
मी सायकलचा दांडा धरून पायीपायी तिच्या घरी गेलो.ती फारशी बोलत नव्हती.मी तिच्याकडे बघितल्यावर दुसरीकडे नजर वळवत होती.

आम्ही घरी पोहचलो. बराच वेळ झाल्यानंतर तिने कॉफी आणली . पहिल्यांदाच. मी काहीच बोललो नाही.बोलण्यासारखेकाही राहिलेच नव्हते म्हणा.
"साब..थोडा रूकते क्या? आज खाना खाके जाओ."
खरेतर रात्रीची गाडी होती.सामान(अगदी थोड असले तरी) रवाना करायचे होते.पण तिचा आग्रह मोडवेना.
थोड्याच वेळात तिने गरमागरम भात रस्सा (रसम्) टाकून आणला.रस्स्याची चव जरा उग्र होती पण कितीतरी दिवसांनी घरचे खात होते.तृप्त होईपर्यत जेवलो.

उठलो. खिशातून दहाची नोट काढली.पोरीच्या हातात दिली. पोरगी धावत काहितरी घ्यायला गेली. मी कोकीलाला म्हणालो
" चलता हुँ. याद रखना." नाही म्हटले तरी आवाज जरा जडच झाला.

कोकीला माझ्याकडे पहात म्हणाली
" साब ..एक बात पुछनी थी. आप अभी दुसरे गाॕव जा रहे हो या माॕ के गाव?"

"दुसरे गाव.जहा तबादला हुवा."

"मै सोचती हुँ के मा के गाव चले जाव"

"क्यू?"

" मैभी साथ चलुंगी.शादीसे पहेले माॕजीका आशीर्वाद लेलू."

"क्या?" मी आश्चर्याने ओरडलो.एकदम कोकीलाला जवळ घेतले. पटकन दूर होत कोकीला म्हणाली.

"साब,लडकी कभीभी आ जायेगी."

तरीही मी तिचा हात धरून ठेवला. कोकीलेने लाजून मान खाली घातली.

"साब लेकीन माँ नाराज तो नही होगा?"

आता तिला काय सांगणार? आईला तर माझ्यापेक्षाही जास्त आनंद होणार होता.
(समाप्त )
©®विवेक चंद्रकांत वैद्य.नंदूरबार .

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Vivek Vaidya

Blogger

Doctor (general practitioner)