कन्यादान एक कर्तव्य... भाग 6

कन्यादान.


पूर्वार्ध..

सायलीला घरी यायला उशीर झाला म्हणून बाबा आणि आई तिला ओरडतात.
तिच्या मुळेच सिद्धार्थचे घरचे नाराज झाले आणि पुढील बोलणी न करताच निघून गेले… बघुया आता पुढे.



"सिद्धार्थ हे काय आहे, तुला चांगलं माहिती आहे आपल्या संपूर्ण खानदानात मुलगी नोकरी करत नाही. आणि त्यात तू एक पत्रकार मुलगी या घराची सून म्हणून पसंत केली?" आजी थोडी रागावत म्हणाली.


"आजी मला सायली आवडते, अगदी कॉलेजमध्ये असताना पासून मी तिच्यावर प्रेम करतो, फक्त ते आता व्यक्त केले. तिच्याचमुळे मी माझ्या करियरवर फोकस केले कारण मला स्वतःला सिद्ध करूनच तिला माझ्या आयुष्यात घेऊन यायचे होते...." सिद्धार्थ.


"तुला वाटलेच कसे आम्ही अशी मुलगी या घरात स्वीकार करू? सिद्धार्थ, जी मुलगी स्वतःला पाहुणे बघायला येणार असताना उशिरा आली, ती या घराची जबाबदारी काय स्वीकारेल? तुझी यावेळी निवड चुकली आहे, तुझा कुठलाच हट्ट पुरवणार नाही..."सिद्धार्थचे पप्पा.


"मी लग्न करेल तर सायलीशी, नाहीतर कुणाशीच नाही..." बोलून सिद्धार्थ रागात निघून गेला.


आजी, आई, बाबा, रवी दादा सगळे सिद्धार्थचे बोलणे ऐकून टेन्शनमध्ये आले.

"खरचं हा आपलाच सिध्द आहे का?" घरातले मुख्य लोकं एका रूममध्ये जमा होऊन चर्चा करू लागले.

"ज्याने कधीच साधे मान वर करूनही कोणाकडे पाहिले नाही किंवा ओरडुन बोलला नाही, पण आज तो अश्या प्रकारे घरच्यांसमोर बोलतो आहे. त्याला एकदा समजवून सांग, ती मुलगी आपल्या घराची सून बनण्याच्या लायक नाही... "बाबा रवी दादाला बोलले.


"बाबा मला नाही वाटत सिद्ध ऐकेल, पण तरी मी प्रयत्न करेल. पण जर त्याने हट्टच केला आहे तर निदान त्याचा हट्ट तरी पुरावा. त्याला हवे त्या मुलीबरोबर लग्न करून सुखाने राहू दया..."रवी
दादा बोलून बाहेर पडला.

"ती मुलगी नुसती या घरात यावी म्हणून हे दोघे असे वागतात आहे, जर खरचं ती या घरात आली तर काय होईल? आपली मुलं आपली राहणारच नाही.."आजी.


"सायली, सिद्धार्थ खूप चांगला आहे पण त्याच्या घरचे जरा कडक वाटले. त्यांच्या बोलण्यावरून घरातले वातावरण फार काही मोकळे नाही वाटत. तू नीट चौकशी कर बाळा, तुझा बाबा तर तुझ्यावर विश्वास ठेवून काहीही करायला तयार होतो. पण पुढे जाऊन काही अडचण नको म्हणून काळजी घेतलेली बरी असते..."आई रात्री सायलीच्या रूममधे जाऊन तिच्याशी बोलू लागली.


"आई सिद्ध माझे पहिले प्रेम आहे, आणि त्याच्याशी मी आधीही बोलले आहे. तो माझ्याबद्दल, माझ्या करिअरबद्दल खूप सिरियस आहे. तू नको काळजी करुस, तो सगळे सांभाळून घेईल." सायली.


सायलीची आई विचारत पडली, कितीही झाले तरी माणसं बघून त्यांच्या वागण्याचा, स्वभावाचा अंदाज येतोच. पण आता सायलीला हे कळणार नाही, उगीच वेळ गेल्यावर समज येऊन पण फायदा नाही.


"सिद्ध तुला काय वाटते, सायली आपल्या घरात राहू शकेल? आपल्या घरातल्या रीतिभाती तुला चांगले माहित आहे, उद्या तिला या सगळ्यांचा त्रास नको व्हायला. तू तुझा निर्णय घेताना नीट विचार कर, तुझा काहीही निर्णय असेल तरी मी तुझ्या बरोबर आहे..." रवी दादा त्याला समजावत बोलला.


"दादा मला कळते आहे, पण आज पहिल्यांदा मी काहीतरी निर्णय घेतला आहे आणि आता मी मागे नाही हटणार. मी सायली सोडून दुसरे कोणाच विचार नाही करणार.." सिद्ध.


"अरे वा.. ! आज माझा भाऊ मोठा झाला आहे आणि स्वतःचा निर्णय स्वतः घेतोय..
मी घरी बोलतो, तू फक्त काही दिवस धीर धरशील, कसलीच घाई करू नकोस. नाहीतर घरातले कसे आहेत तुला माहीत आहे..."रवी दादा.


रवी घरी येऊन घरात सगळ्यांना सिद्ध बद्दल सांगतो, पण कोणीच काही बोलत नाही. आता सिद्धार्थचे मन मोडून तो त्यांच्या पासून दूर निघून जाईल, कदाचित लग्न करून वेगळा होईल, म्हणून त्यांनी आता काहीही न बोलणेच समजदारीचे समजले.


सकाळी सकाळी सायलीच्या घरातील फोन वाजू लागला.
"बाबा अरे फोन घे ना, किती वेळ झाला वाजतोय. पेपर वाचायला लागलास की तुला कसलेच भान राहत नाही बघ..."सायली नाश्ता करत ओरडुन बाबाला सांगत होती.


"माझ्या मुलीने केलेल्या बातमी वाचण्यात समाधान मिळते. तुला नाही कळणार कधी…!" बाबाने बोलत बोलत फोन उचलला.


"नमस्कार.. मी सिद्धार्थचा बाबा बोलतोय, तुम्हाला वेळ असेल तर आज आपण भेटू शकतो का.? मला तुमच्याशी सिद्धार्थ आणि सायली बद्दल बोलायाचे आहे. जेव्हा वेळ असेल तेव्हा कळवा."

"आज संध्याकाळी भेटूया, तुम्ही घरी आलात तरी चालेल..."सायलीचे बाबा.


"नको आपण बाहेर भेटूया. मुलांना आता काहीच सांगू नका, आपण त्यांना सरप्राइज देऊयात...." सिद्धार्थचे बाबा.


"ठीक आहे तुम्ही म्हणाल तसे, मी येतो भेटायला.. " सायलीच्या बाबांनी बोलून फोन ठेवून दिला.



सायलीचे बाबा संध्याकाळी वेळेवर सांगितलेल्या ठिकाणी हॉटेलवर येऊन पोहचले. बराच वेळ गेला पण सिद्धार्थचे बाबा आलेच नव्हते, जवळपास तासाभराने सिद्धार्थचे बाबा आले. काहीही ना बोलता हॉटेलमध्ये जाऊन बसले .

"बराच वेळ लागला , काही कामात अडकला होतात का?... "सयलीचे बाबा.


"आमच्या मागे व्याप कमी आहे का? आता हेच बघा हे हॉटेल पण आमचे आहे, एवढा सगळा व्याप वाढवून ठेवला की स्वतःसाठीपण वेळ मिळत नाही.. आणि इथून पुढे आमचा सिद्धार्थ हे सगळे सांभाळणार आहे..."सिद्ध बाबा.


"तुम्ही मोठी हस्ती आहात. खरचं तुमच्या मागे खुप कामे असतात. सिद्धार्थला पण दोन वेळा भेटलो, खूप शांत आणि समजदार आहे. त्याच्याकडे बघूनच कळते तो कामात पण तितकाच हुशार असेल, शेवटी माझ्या सायलीने निवड केली म्हणजे नक्की तो तसा कर्तबगार असणार..." सायली बाबा.


"तुमची मुलगी खूप हुशार आहे, तिने अगदी बरोबर मुलाला घेतले. आता काय एवढ्या श्रीमंत घरातला मुलगा म्हणजे बघायलाच नको..."सिद्ध बाबा.


"मला कळले नाही तुम्हाला काय म्हणायचे आहे ते, तुम्ही सविस्तर बोलाल का.?.."सायली बाबा.


"अहो म्हणजे सिद्धार्थ सारखा हुशार मुगला, त्यात ते कॉलेज पासून एकमेकांना ओळखतात ना..? तिने बरोबर शोधून काढले, शेवटी प्रेम करते ना ती त्याच्यावर.. मग प्रेमात श्रीमंत गरीब काही नसते...."सिद्ध बाबा.


"हो माझ्या सायलीने एवढे दिवस त्याची वाट पाहिली, आता त्यांना लवकर एकत्र यायल पाहिजे, म्हणजे आपल्या आयुष्यातील मोठी जबाबदारी मुक्त होईल.. माझ्या सायलीचे टेन्शन जाईल...."बाबा.


"हो ते तर करायला पाहिजे, पण त्याआधी आमच्या घराण्याच्या रीतिभाती, देण्याघेण्या बद्दल बोलून घेऊयात, म्हणजे पुढील बोलणी सोपी होईल.. "सिद्ध बाबा.


"हो का नाही, सायली आमची एकुलती एक मुलगी आहे तिच्यासाठी आम्ही आमच्या कडून जेव्हढे होईल तेवढे सगळे करूच... शेवटी कन्यादान हे बापाचे कर्तव्यच आहे..."सायली बाबा.


"अरे वा उत्तम. म्हणजे तुम्हाला काही सांगायला नको, तर मग लवकर तारीख काढून साखरपुडा करून घेऊ आणि लवकरच लग्न पण उरकून टाकू... तर उद्या तुम्ही आमच्या घरी आलात तरी चालेल, म्हणजे आपण सगळी बोलणी करून तारीख काढून घेऊयात..."सिद्ध बाबा.


"काही हरकत नाही, मी घरी सांगून ठेवतो, आपण उद्या सकाळी भेटुयात..."सायकलीचे बाबा बोलून आनंदात निघून गेले.


"सायली आज तुझ्या होणाऱ्या सासऱ्यांना भेटलो होतो, उदया तुझ्या घरी जायचे आहे. त्यांनाही लग्नाची तेव्हढीच घाई आहे, जेवढी आम्हाला...."बाबा अगदी आनंदाने सांगत होते.

"बाबा तुझे घर म्हणजे काय रे? माझे तर हेच घर आहे आणि कायम राहणार आहे. अजिबात मला इथून बाहेर काढण्याचा प्रयत्न करू नकोस?"सायली बोलताना थोडी भाऊक झाली होती.


"बाळा एक ना एक दिवस मुलींना घर तर सोडावे लागतेच ना? कितीही नाही बोललो तरी खरे कधी बदलणार आहे का? मुलीला लग्न करून आपल्या आई बाबाला सोडून तर जावेच लागते.. जगाची रीतच आहे ही..."आई तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली.


"आपण सिद्धार्थला घर जावई करून घेऊयात की, म्हणजे मी कायम तुमच्या जवळ राहील.. "सायली.


"पण मग त्याचे घरचे रडतील ना? त्याची पाठवणी करताना..."बाबा वातावरण हलके करण्यासाठी बोलले, त्यांचे बोलणे ऐकून रडता रडता सायलीला हसू आले.

"बाबा तू जगातला बेस्ट बाबा आहेस..."सायली बाबाच्या गळ्यात पडून म्हणाली.


(बघुया सायलीची लग्नाची बोलणी, त्यात काय काय होते? सिध्द आणि सायली कसे जवळ येतात की अजून त्यांना काही अडचणींना तोंड द्यावे लागते.. लवकरच भेटूया पुढील भागात)

क्रमशः…

🎭 Series Post

View all