कळत नकळत...मुलांचे मोठेपण...

Kids Grow Very Fast...
आपण अनेकदा म्हणतो की लहान मुलांना काय कळत? पण खरे सांगू का त्यांना सगळेच आपल्या कळत नकळत कळत असते....म्हणून title ची सुरुवात तशी केली...

आजच्या काळातले घर... पात्रांची नावे "तो,ती आणि कळी". ती शिकलेली पण मुलांमुळे homemaker झालेली... तो घरातील कमवता पण बायको घरीच असल्याने घरातील सर्व कामांची जबाबदारी फक्त तिचीच या विचारधारणेचा...संसारवेलीवर एक ५ वर्षांची गोड कळी...कळीच्या अभ्यासाची सर्व जबाबदारी तिचीच...त्याला कळीचे subjects ही माहिती नाहीत.. कारण तो त्याचा "subject" नाही म्हणे ...

एकदा ती आजारी पडली.. कळीची उद्या टेस्ट...तशी कळी हुशार पण आळशी...तिने त्याला request केली की कळीचा अभ्यास घेशील का..त्याचा reply "तो माझा प्रांत नव्हेच".मग तिनेच कळीची revision कशीबशी घेतली.

Parent Meeting.... तिला वाटायचे की वडील या नात्याने एकदा तरी त्याने २ महिन्यातून शनिवारी होणाऱ्या १० मिनिटांच्या meeting ला यावे कळीच्या...
पण त्याला मित्रांबरोबर बाहेर जाणे महत्त्वाचे वाटायचे....मग ती आणि कळीच जायच्या... मीटिंग झाली की फीडबॅक डिस्कस करता करता आइस्क्रीम पार्टी करून घरीही यायच्या...

असे दोन तीन प्रसंग कळी समोर झाले...एकदा काय झालं, ती काही सामान आणायला घराबाहेर पडली...घरात कळीच्याच समवयस्क मैत्रिणी blocks खेळण्यात मग्न आणि तो web series मोबाईलवर पाहत बसलेला... मैत्रिणींचे संभाषण सुरू...आज ना माझ्या school मध्ये PTM होती...बाबा आणि आई दोघेही आलेले...मग आम्ही बाहेर गेलो जेवायला तिघे मिळून...दुसरी मैत्रीण म्हणाली आज ना माझ्या बाबांनी माझा अभ्यास घेतला आणि चॉकलेट पण दिले.आम्ही खूप मज्जा केली..

कळी बोलली की माझा अभ्यास आणि PTM फक्त मम्मीच करते..पप्पा कधीच अभ्यास घेत नाही आणि PTM ला पण येत नाही...त्याचा उल्लेख झाल्याबरोबर त्याने कान टवकारले...कळीच्या मैत्रिणींची विचारणा "पण असे का गा करतात तुझे पप्पा?"...कळीही विचारात....तो ही ऐकतोय बरं..

कळीने शांतपणे उत्तर दिले."पप्पालाना आमच्या mam बरोबर english बोलता येत नाही आणि माझा अभ्यास पण येत नाही.म्हणूनच मम्मालाच सगळं करावे लागते"...मैत्रिणी फिदीफिदी हसायला लागल्या...म्हणू लागल्या "कळीच्या पप्पांना तर काहीच येत नाही,काहीच येत नाही".
तशी कळी रडवेली झाली ... तो चपापून क्षणार्धात बाहेर आला... यावेच लागले..डोक्यात एक वीजच जणू चमकून गेली... आणि कळीला जवळ घेऊन म्हणाला "कळी, जरा school बॅग घेऊन ये बरे...आपण आज स्टडी करू,आज मला वेळ आहे"...कळीच्या मैत्रिणी निघून गेल्या...ती बाहेरून आली तर कोमात जायची बाकी होती...कळी आणि तो चक्क हसतखेळत अभ्यास करत होते.

जे तीला इतक्यांदा जमले नाही ते कळी ने किती सहजगत्या करून दाखविले...खरंय...आपल्या कळत नकळत लहान मुले मोठी होतात ते समजतच नाही...

---शब्दसुधा