कितीदा मन हे अबोल झाले
कितीदा शब्दांचे भरते आले
कितीदा दुःखाने कोमेजून गेले
कितीदा आनंदाने फुलून आले
कितीदा स्वप्न मनी रंगले
कितीदा वास्तवाचे निखारे सोसले
कितीदा आयुष्य नव्याने उमजले
कितीदा आयुष्याला खेळच समजले
कितीदा डोळ्याने अश्रू लपविले
कितीदा अश्रू गंगेचे पाट वाहिले
कितीदा भावनांना आवर घातले
कितीदा भाव ते मोकाट सुटले
कितीदा आयुष्य मनमानी जगले
कितीदा मनोमन गुदमरून मेले.........
कितीदा शब्दांचे भरते आले
कितीदा दुःखाने कोमेजून गेले
कितीदा आनंदाने फुलून आले
कितीदा स्वप्न मनी रंगले
कितीदा वास्तवाचे निखारे सोसले
कितीदा आयुष्य नव्याने उमजले
कितीदा आयुष्याला खेळच समजले
कितीदा डोळ्याने अश्रू लपविले
कितीदा अश्रू गंगेचे पाट वाहिले
कितीदा भावनांना आवर घातले
कितीदा भाव ते मोकाट सुटले
कितीदा आयुष्य मनमानी जगले
कितीदा मनोमन गुदमरून मेले.........
सौ. प्रणाली चंदनशिवे.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा