Jun 15, 2021
प्रेम

कितीदा नव्याने तुला आठवावे

Read Later
कितीदा नव्याने तुला आठवावे

अचानक रात्री श्वास घ्यायला त्रास सुरू झाला आणि तासाभरात जाणवलं कदाचित हा शेवटचा क्षण आणि ठरवलं.....

अधिरा मध्यमवर्गीय घराण्यातील सुशिक्षीत गहूवर्णीय मुलगी, गहूवर्णीय म्हणण्याऐवजी सावळीच म्हणुया पणं रंगाने जरी सावळी असली तरी प्रत्येक कामात तेवढीच हुशार. दुःखपासून तर लोकांच्या आनंदात सर्व गोष्टी आपुलकीने करणारी, स्वतःसाठी कमी आणि इतरांसाठी जास्त जगणारी. लहानपणापासून  कडक वातावरणात वाढलेली. घरतल्या सर्व जबाबदारी पार पाडून आता स्वतःसाठी जगायला निघाली होती.एवढी वर्षे तिने घरासाठी जे केलं होत ते बघून घरातील मंडळीं तिच्या प्रत्येक निर्णयात आता सोबत होती. लग्नासाठी आता बऱ्यापैकी स्थळ यायला सुरवात झाली होती पणं तिला वेळ हवा होता स्वतःसाठी . स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी ती घराबाहेर पडली. गेल्या कित्येक वर्षात अनेक चढउतार बघितले होते आणि मूळ स्वभाव खमका असल्यामुळे कशाची भिती नव्हती. सर्व काही कालांतराने बऱ्यापैकी सुरू होत आणि अचानक एके दिवशी एक मेसेज येतो. लोकांना ओळखण्यात तरबेज होती म्हणून मेसेजचा रिप्लाय देते, आतापर्यंत जवळपास 15 ते 20 स्थळ नाकारलेली ती अगदी मनापासून त्याच्याशी बोलायला सुरवात करते. सुरवातीला विचार केला, पणं लगेच कळलं की ते स्थळ ओळखीच्या माणसांपैकी होत. आणि त्याच्या बोलण्यात कुठेतरी तिला आपुलकी जाणवतं होती.

सुरवातीला 3 दिवस मेसेज वर बोलताना कुठेतरी तिला जाणवतं होत, "ही इज परफेक्ट वन फॉर मी"आणि तिने त्याला फोनवरिती बोलायचं विचारलं, तसा तोही तयार झाला. पहिल्या बोलण्यात तिने सांगितलेलं, की तुमची अपेक्षा जर असेल की ही मुलगी दिसायला गोरीपान असेल, तर तो तुमचा गैरसमज आहे तशी मी नाही. त्यावर तो जे उत्तरला ते ऐकून ती आणखीच त्याच्याकडे ओढत होती. त्याच प्रत्येक गोष्टीत समजवून सांगणं असो किंवा स्वतःबद्दल असो की त्याच्या कामाबद्दल हे सर्व तो अगदी वेळात वेळ काढून तो तिच्याशी बोलायचा. त्याला कधीही न बघितलेली ती त्याच्याच नव्हे तर त्याच्या घरच्या व्यक्तींच्याही प्रेमात आपसूक पडली. कारण तिला कधी कोणाचं दिसणं महत्वाचं वाटलच नाही, नेहेमी तिचं एकच प्रत्येक व्यक्ती हा त्याच्यानुसार सुंदरच असतो कारण सुंदरता म्हणजे दिसण ही व्याख्याच तिची नव्हती. आता तर जणू तिची सकाळ आणि रात्र दोन्हीं तोच होता कधी नव्हे ती त्याच्यासाठी रात्र जागायची. त्याच्या बोलण्यातून तिला जाणवत होत त्याच्याही त्याच भावना असतील. तिने विचारायचा प्रयत्न केला आणि तो बोलून गेला त्याला तिच्याशी बोलायला आवडते. बोलताना अचानक एकी दिवशी तिच्या तोंडून निघाल, तिचं त्याच्यावर खूप प्रेम आहे.. पणं त्याला मात्र काहीतरी स्पेशल प्रपोजल हवं आणि तो त्याची वाट बघतोय  अस तो बोलून गेला...

रोज होणारा संवाद आणि त्याच तिच्या सोबत असण्याची तिची जाणीव आयुष्यातला सर्वात मोठा आनंद होता तिच्यासाठी. तो म्हणजे तिच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा भाग होता. एके दिवशी तो तिच्याबद्दल त्याच्या बहिणीला सांगणार अस तिला बोलला आणि ती सुखावली, तिला वाटल त्याचंही तिच्यावर प्रेम आहे. आणि हीच सुरू *पंच्छी बनू उडता फिरू मस्त गगन मे* पणं म्हणतात ना,काही चांगल सुरू असेल तर दृष्ट लागायला वेळ लागत नाही.

रात्रीचे11,12 वाजले असतील नेहेमीप्रमाणे ती  त्याच्याशी बोलत होती. पणं त्याला काही काम असल्यामुळे त्याने लगेच काम आटोपून फोन करतो असं सांगितलं आणि ही हातात तसाच फोन घेऊन रात्रभर वाट बघत बसली. पणं कधी नव्हे त्या रात्री त्याचा फोन आलाच नाही. सकाळ झाली तरी ती फोन ची वाट बघत होती कारण कामात असला की तो न चुकता सांगायचा. आता मात्र भिती वाढली होती, कारण घरातून निघताना आणि घरी पोहचला की तस तो सांगायचा. डोक्यात चित्र विचित्र विचार सुरू झालेत म्हणतात ना मन चींती ते वैरी न चिंती, दिवस जात होता पणं त्याचा मात्र काही निरोप नाही, मनात भिती असली तरी स्वतःच स्वतःची समजूत काढायची, कामात असेल कदाचित म्हणून.आणि अचानक फोन येतो काल मी घरी आलो आणि आता निघालो सुध्दा. क्षणाचाही विलंब न होता डोक्यात गोंधळ,ते आले आणि मला न भेटताच कस काय गेले, कारण जेव्हा पासून ते बोलायला लागले एकदाही एकमेकांना भेटले नाहीत. पणं म्हणतात ना एकदा विश्वास बसला की तो बसलाच.नसेल मिळाला वेळ, असेल काही काम मीच नाही समजून घेणार तर कोण घेणार म्हणून गप्प बसले. रात्री बोलावं तर साहेबांचा फोन डिस्चार्ज काय करणार? म्हणून सर्व आवरून उरलेल्या तयारीला लागले. प्रश्न असेल ना कसली तयारी, सरप्राइज द्यायचं होत त्यांना इच्छा होती साहेबांची काहीतरी वेगळं प्रपोजल हवं. दुसऱ्या दिवशी सर्व आटोपून काही कामानिमित्त बाहेर पडले. वाटेतच असताना फोन वाजतो आणि परत आपल *पन्छी बनू उडता फिरू मस्त गगन मे*....पणं यावेळी मात्र क्षणार्धात पायाखालची जमीन सरकली, निरोप होता त्यांच्याकडून तू दुसरा मुलगा बघून लग्न कर. काही समजायच्या आत मस्करी समजून तिही बोलून गेली ठीक आहे ना..! तुम्ही लग्न केव्हाही करा मला काय? आणि फोन ठेवला....पणं आतून मात्र पूर्ण खचली. रोज येणारा फोन बंद झाला म्हणून आज तिने केला कारण आतापर्यंत तो तिचा जीव झाला होता. आधीच घाबरलेली म्हणून वाटेल ते बोलू लागली पणं उत्तर एकच..

एका क्षणात सर्व बदलून गेलं, त्याच्या बोलण्याने तिला धक्काच बसला त्यामुळे तिला दवाखान्यात भरती करण्यात आले. स्वतःच्या मनाची समजूत काढत होती काहीतरी झालं असेल तो नाही असा नक्कीच काहीतरी आहे, सारखं तिला वाटे.गेल्या कित्येक रात्री न झोपलेल्या तिला त्याला भेटायचं होत. सरप्राइज द्यायला जाणार तोच त्यानेच चांगल सरप्राइज दिलं होत. तरीसुध्दा गेली त्याला भेटायला त्याला जाणिव सुध्दा न होऊ देता की ती येणारं होती त्याला सरप्राइज द्यायला 750 किमी प्रवास करून शेवटी ती गेलीच.. गेल्या काही दिवसात ती उपाशी असेल याची जाणीव सुध्दा नव्हती  झोप तर नव्हतीच... बाहेर भेटायचं ठरलं पणं त्याची इच्छा होती घ्यायला यायची आणि त्याच्या घरी भेटायची. सुरवातीला नाही म्हणता म्हणता शेवटी घरी जायला होकार दिला. 14 ते 16 तास प्रवास त्यात कित्येक दिवस उपशी आणि न झोपलेली ती त्याला पहिल्यांदाच भेटली आणि त्याच्यासोबत त्याच्या घरी गेली,कारण त्याच्यावर असणारा विश्वास. खर तर त्याला बघताच मिठी मारून खूप रडायचं होत पणं... स्वतःला सावरलं 4 तास सोबत होतो पणं तोंडातून एक शब्द निघेना, सतत एकच मनात होत तुझ खरचं प्रेम नाही? जगासमोर खंबीर असलेली ती त्याच्यापुढे मात्र निशब्द. एवढं समजून सांगणारा समजून घेणारा आज का नाही सांगतोय मला समजून.नाही का मी कुणीच? आज एका अनोळखी व्यक्ती सोबत असताना सुध्दा का त्याचा एवढा आधार वाटतोय सर्व समजण्यापलिकडे होत. एका क्षणाला मनात वाटल कदाचित नसेल आवडली मी त्याला लग्नाचं प्रश्न आहे. त्याला ही हवी असेल सुंदर वेल सेटल बायको. पणं लगेच जाणवलं नाही तो असा नाही. त्याचं प्रेम नसत तर मला जाणवलं असत ते नक्कीच काहीतरी असेल.4 तास निशब्द असणाऱ्या तिची एकच इच्छा होती त्याने मिठीत घ्यावं आणि तिने खूप रडाव बसं. पणं डोळ्यातलं पाणी लपवायच होत ना आणि त्याच्यासाठी तर मी कुणीच नव्हती मग का घेईल तो मिठीत. माझं प्रेम म्हणजे फालतूगिरी वाटली त्याला. हिम्मत नव्हती त्याच्यापासून दूर जाण्याची पणं निघाली परत, शेवटी प्रेम होत काय बोलणारं... रडून रडून शेवटी ठरवलं आता नाही रडायचं विसरायचं त्याला स्वतः ला 24 तास व्यस्त करायचं. आणि परत केला तोच प्रवास आणि घेतल गुंतवून स्वतःला दिवसाचे 18 ते 20तास काम करून सुध्दा सतत मनात त्याचंच विचार. का नाही येणार? स्वप्न होती तेवढी आणि प्रेम सुध्दा. मानसोपचार घ्यायचं ठरवलं पणं मग स्वतः विचार केला. माझं प्रेम आहे ना? मग तो असला काय आणि नसला काय ते तर राहणारच. मग त्याच्या जाण्याने सतत डोळ्यात पाणी ठेवण्याऐवजी त्याच्या आठवणीत आनंदी तर राहूच शकते ना मी. अक्षरशः रस्त्यात दिसणाऱ्या बसं पासून ते काही स्टॉप पर्यंत प्रत्येक ठिकाणी एक आठवण दिसायची.. महिने उलटून गेले पणं त्याला मी कोण कशी आहे याच्याशी काही फरक नाही पडला. आणि जाणवलं नव्हत त्याचं प्रेम कदाचित माझाच गैरसमज झाला असेल. पणं एवढा गैरसमज कसा झाला असेल एवढी लोकं ओळखणारी त्यालाच नसेल ओळखू शकली का?खरतर तो एवढा चांगला आहे की.... शब्द अपुरे पडतील.... आज आठवतात त्याचे शब्द कारण येत्या काही दिवसात त्याचा बर्थ डे आहे. का यार तुझा पणं बर्थ डे नाही आणि माझा पणं  लग्नाआधी येणाऱ्या या दिवसांची मज्जा काही वेगळीच असते,कारण आमची ओळख झाली तेव्हा नुकतेच आमचे वाढदिवस होऊन गेले होते. आज ६ महिने जास्त उलटून गेली प्रयत्न करून प्रेम तर नाही कमी झालं.पणं तुझ्याशिवाय जगायचं शिकले. आई बाबा साठी जगतेय. तुझ्याशिवाय खुश आहे खूप.तुला राग येतो ना माझा खूप का तर मी तुला मेसेज करायची.पणं खर तर सवय नव्हती रे म्हणून करायचे. तू जे बोलला त्याच कधी वाईट नव्हत पणं काही शब्द तुझ्या अबोल्यापेक्षा जास्त लागली.माझं तोंड बघायला पणं नको येऊ कधी? तुझ घर तुझी बहीण सर्व तुझ? माहिती होत मला जेव्हा तुझ माझा नाहीस तर ते तरी कसे माझे असतील.पणं का बोलून दाखवलं हे....म्हणतात कुणाच्या जाण्याने आयुष्य थांबत नाही पणं खरतर श्वास थांबत नाही, त्याचा तिच्यावरचा असलेला राग बघून तिला ही एव्हाना जाणवलं होत, जिवंत असेपर्यंत तर कधीच त्याचा राग जाणार नाही. पणं गेलीच जग सोडून तर देवच जाणे.भावना व्यक्त करण म्हणजे inmatured असेल तर येस I m. प्रत्येक क्षण आनंदाने जगायचं आहे तू असला काय आणि नसला काय परत एकदा उडायचं आहे.... पणं आता मात्र भावनाशून्य ती.... सतत कामात असणारी आणि परत एकदा दुसऱ्यांसाठी जगणारी स्वतःच्या पायावर जरी उभी असली तरी आता लोकांपासून दूर असलेली ती त्याच्याशिवाय अपूर्ण आणि इतरांसाठी पूर्ण सुध्दा.... प्रेम म्हणजे तिच्यासाठी फक्त तो, जो कधीही न येणारा आणि मनाच्या एका कोपऱ्यात त्याच्या आठवणी जपणारी ती.... कितीदा नव्याने तुला आठवावे, डोळ्यातले पाणी नव्याने वाहावे...