किती सांगायचं मला (भाग 14)

Tushar saw nalini

समायरा अमोघला  कश्या पद्धतीने सांगायचं याचा विचार करत करत तिच्या घरी पोहोचली... 

अमोघ देखील तिच्या ताईची आतुरतेने वाट पहात होता.... कधी एकदा 'ताई आणि भाऊजी' हे काय गुपित आहे... हे आपल्याला कधी कळेल असं त्याला झालं होतं...

जेवण वगैरे आवरल्यावर समायरा आईला म्हणाली.... आई आज जेवण एकदम झक्कास झाले होते... त्यामुळे जास्तच जेवण झालेय... मी जरा अंगणात शतपावली करून येते.... 

समायरा : अमोघ येतोस का शतपावली करायला माझ्यासोबत. 
अमोघ लागलीच तयार झाला..... 

थोडंही चालण्यासाठी कंटाळा करणारा अमोघ आज ताईच्या एका हाकेत तयार झाला... याचं समायराच्या आईला कौतुकही वाटलं आणि आश्चर्यही.

समायरा आणि अमोघ दोघेही शतपावली ????करायला निघाले

फिरता फिरता दोघेही थोडं दूर गेले तोपर्यंत असीम शांतता होती... अमोघच्या डोक्यात विचारांचं काहूर माजलेलं होतं... ताई आता काय बोलेल या कडे त्याचे कान लागले होते....

समायरा : हे बघ अमोघ आता मी तूला जे काही सांगणार आहे ते फक्त आपल्या दोघांमध्येच राहील... आईबाबांना बिलकुल कळणार नाही याचं मला वचन दे.... आणि तू तूझ्या ताईला पुरेपूर समजून घेण्याचा प्रयत्न करशील . 

अमोघ : पण असं काम करायचंच कश्याला की आपल्याला आईबाबांपासून लपवावे लागेल..... 

समायरा : कधी कधी परिस्थितीसमोर आपल्याला हतबल व्हावे लागते रे.... 

अमोघ :म्हणजे?? 

समायरा :म्हणजे मी आणि तुषार ऑफिस मध्ये खोटे पती पत्नी आहोत?? 

अमोघ : काय ?????  म्हणजे चक्क नाटक... पण का?? 

समायरा : अरे इथे तूझी फीस भरण्यासाठी फक्त एक महिन्याचा अवधी होता आणि तुषारला त्याच्या आईच्या उपचारासाठी हे जरुरी होतं.... 

अमोघ :जाऊ दे ताई, मी नाही शिकत पूढे... माझ्या शिक्षणासाठी तूला हे असे मार्ग अवलंबायला लागले.... 

समायरा : अरे अमोघ काही पण काय असा विचार करतोस?? हे फक्त काही दिवसांसाठी आहे... अन काय करणार त्या कंपनीची अट तशी होती.... 

अमोघ : आणि हा तुषार कोण मग?? ????तूझा कुणी बॉयफ्रेंड वगैरे आहे का?

समायरा ते ऐकून खूप हसली ????????????‍♀️ अरे बॉयफ्रेंड वगैरे कुणी नाही... मग तुषारची भेट कशी झाली, कशी नौकरी मिळाली सगळं काही सांगितलं..... 

अमोघ : काय ताई तूला आमच्यासाठी काय काय करावं लागत आहे?? 

समायरा : तसं नाही अमोघ हे पाऊल मी आपल्या सर्वांसाठी उचलले आहे.... पण मी अशी वागले म्हणून आयुष्यात तू कधी असे पाऊल कधीच उचलू नकोस.... आणि तशी वेळ आलीच तर तूझ्या ताईला आधी सांग आपण नक्की काही तरी यातून मार्ग काढू..... 

आज काय शतपावलीत रात्र काढायची वाटतं?? समायरा च्या आईने दुरूनच असा टोमणा मारला.... 

समायरा : नाही आई येतो गं म्हणून दोघेही घरात आले.... 

अगं आई! आज पौर्णिमेचा चंद्र ????खूप छान वाटत होता... त्याच्या प्रकाशात शतपावली करायला छान वाटत होतं.. हो की नाहीरे अमोघ!!... समायरा जरा लाडात येऊन बोलली... 
  
समायराला आता थोडं हायसं वाटायला लागलं होतं... डोक्यावर ठेवलेला दगड जणू कुणीतरी बाजूला ठेवला असं तिला वाटायला लागलं होतं... 

अमोघला मात्र आपल्या ताईला अश्या प्रकारे आपल्या शिक्षणासाठी नौकरी करावी लागत आहे. हे अजिबात आवडलेलं नव्हतं.....

इकडे तुषार आज एका वेगळ्याच धुंदीत होता...त्याला नलिनीची धुंद चढली होती.... नलिनीचा चेहरा त्याच्या नजरेसमोरून जात नव्हता.... 

तुषारची झोप तर एकदम हरवून गेली होती.... या आडंगावरून त्या आडांगावर असं करत होता.... 

काय करावं सांगावं का? समायराला... पण समायरा कामाव्यतिरिक्त दुसरं काही बोलेल तर शपथ.... बघुयात काहीतरी युक्ती काढून तीची माहिती काढू.... जर समायराने जास्तच नखरे केले तर दीपक तर आहेच....

 असा विचार करत करत मध्यरात्री तुषारला झोप लागली.... 
सकाळी तुषारला उठायला थोडासा उशीरच झाला... आजचं मॉर्निंग वॉक स्कीप झालं.. पण तुषारला त्याचं वाईट वाटलं नाही.... आळस देऊन तो उठला....

 आज झोपेतून उशिरा उठल्यावर देखील तुषारला उठावे वाटत नव्हते.... जागे असताना स्वप्नात रमावे वाटत होते.... अचानक त्याचं घडाळ्याकडे लक्ष गेलं... बापरे फक्त अर्धा तास...असं म्हणत तुषार एकदम धावपळ करत बेडवरून उठला.... आणि तयार झाला.... 

तुषारची आई : आज उठायला उशीर झाला तुषार?? 

तुषार : हो ना आई ! तू मला का नाही उठवलं?? 

तुषारची आई : मी  आले होते तूला उठवायला.... पण तूला इतकी गाढ झोप लागली होती... की तूझी झोप मोडावीशी नाही वाटली... 

तुषार : बरं आई निघतो मी !! डायनिंग टेबल वरचे सँडविच उभ्यानेच खात व सोबतच संत्र्याचा ज्युस रिचवत तुषार म्हणाला... 

तुषारची आई : अरे तुषार, हळू, हळू अश्याने घास घश्यात अडकायचा... 

तुषारने नाष्टा संपवला आणि निघाला....

नौकरी लागल्यापासून आज पहिल्यांदाच असं घडलं होतं की समायरा आधीच बसस्टॉप वर पोहोचली होती आणि तुषार यायचा राहिला होता.... 

समायराला त्यामुळे खूप आश्चर्य वाटत होते.... आणि मनात एक प्रकारची धाकधूक होत होती... 

असं कसं झालं?? अजून तुषार कसाकाय नाही पोहोचला?? कुणी आपल्याला इथे एकटीला पाहिलं तर?? जर तुषार आज आलाच नाही तर?? समायराच्या मनात नुसता विचारांचा कल्लोळ माजला होता.... 

तोच समोरून तुषार येताना दिसला... समायराच्या जीवात जीव आला... 

समायरा : काय तुषार!!आज उशीर?? 

तुषार एकदम हळूच : तूझी मैत्रीण कारणीभूत आहे?? 

समायरा : काय?? 

तुषार :काही नाही, आज जरा उठायला उशीर झाला....

दोघेही बाईक वर ऑफिसला गेले.. .... 

अजून एकही एम्प्लॉयी आलेला नव्हता  तुषार आणि समायराच आलेले होते.... दोघेही आपल्या केबिनमध्ये गेले... 

तुषार :अमोघशी बोलणे झाले का मग?? 

समायरा : हो झाले... आशा आहे तो समजून घेईल... नलिनी मुळे मी बोलू शकले... तिनेच मला सांगितलं की बिनधास्त बोल... 

तुषार : समायरा!! आपलं मन साफ आहे ना !होईल सगळं ठीक... by the way ही नलिनी काय करते?? 

समायरा : ती M.C.S  झाली आहे... आणि एका कंपनीत ती app डेव्हलोपमेंट चं काम करत आहे....ती एक्स्पर्ट आहे त्यामुळे आणि अवास्तव पैसे पण ती घेत नाही.... म्हणून दोघांचाही फायदा होतो.... 

तुषार :दोघांचाही फायदा म्हणजे?? 

समायरा:????‍♀️ अरे बाबा !!कंपनीचा आणि नलिनीचा फायदा .... 

तुषार : अरे वा !! म्हणजे ही नलिनी आपल्या कामाची आहे तर?? आपल्यालाही आपल्या कंपनीचे app बनवायचे आहे ना !!

समायरा : विचार देखील करू नकोस.... तीला हे काम देणं... म्हणजे या फ्रॉड करणाऱ्या लोकांमध्ये अडकवणं... आणि तसं काही आपल्याला करायचं नाहीये....

तुषार :हूं !! 

ऑफिस मध्ये आता सगळ्यांचा गलबला ऐकायला येऊ लागला...

एक एक कस्टमर यायला सुरुवात झाली होती... 

तुषार आणि समायरा दोघेही आपल्या कामात व्यस्त झाले..... 
अधून मधून तुषारला नलिनीची आठवण यायची... त्याला वाटायचं समायराला अजून तिच्याविषयी विचारायचा पण हिम्मत होत नव्हती.... 
तुषार अधून मधून डिस्टर्ब होताना समायराला जाणवत होतं... 

समायरा : काय झालं तुषार?? आज मला तू जरा भरकटलेला वाटत आहॆस.... 

तुषार : नाहीगं तसं काही नाही.... 

समायरा : तूझं कामात लक्ष नाहीये... घरी काही झालं का? कस्टमरसोबत एरवी बडबड करणारा तू मला एकदम शांत वाटत आहेस.... 

तुषार : नाही गं... खरं तर नाही हा शब्द फक्त त्याच्या तोंडात होता... पण मनात मात्र नलीनीच्या विचाराचे काहूर माजलं होतं....

काय करावं?? समायराला सांगावं का?? पण समायरा मला समजून घेईल का?? की माझ्यावरच चिडेल. असे  एकामागे एक प्रश्न सतत तुषारच्या डोक्यात येत होते... 

समायरा : तुषार !!! तुषार !!अरे तूझं कुठे लक्ष आहे... मी काहीतरी विचारत आहे... तूझं लक्ष कुठे आहे आज?? 

तुषार : सॉरी !! काही म्हणालीस का?? 

समायरा : अरे उटीला आपण जे नवीन फाईव्ह स्टार हॉटेल सिलेक्ट केले आहे ना.... 


तुषार :कुठले गं 

समायरा : HOTEL LAKEVIEW

तुषार :त्याचं काय आता?? 

समायरा : त्याच्या मालकाचा ई-मेल आला आहे आता... तो मालक नवीन आहे...त्याला म्हणे काहीच अनुभव नाही.... तर आपण मार्गदर्शन करावं अशी त्याची इच्छा आहे.... 

तुषार : आपण काय मार्गदर्शन करणार?? हे तर आपल्याला मार्थाला विचारावे लागेल.... 

समायरा : माझ्याकडे एक कल्पना आहे...

तुषार : काय?? 

समायरा : त्यांना एक event मॅनेजर सोबत जोडू.... मग तो event मॅनेजर छान टूर पण plan करेल, नवीन लग्न झालेल्या जोडप्यांसाठी काही games, किंवा सगळ्या जोडप्यांसाठी काही खास कार्यक्रम... डी. जे. वगैरे... ... साईट सीन

तुषार :हो, आयडिया तर छान आहे... आणि तू इतकं डिटेल माहिती देत आहे जसं की तूच हे इव्हेंट organise करू शकशील.....

समायरा :हो करू शकते.... पण आपल्याला हे काम कमी आहे का?? 

तुषार :हूं !!समायरा ती तूझी मैत्रीण आहे ना... नलिनी, तिच्या ऑफिसच्या काय वेळा आहेत??? 

समायरा : तीने app चे प्रोजेक्ट घेतलेले आहे... ती काही कुठल्या कंपनीला बांधील नाही.... या महिन्याच्या 25 तारखेपर्यंत तीला ते complete करून द्यायचे आहे.... सध्या ती वर्क फ्रॉम होम करते आहे असंच म्हण ना.... 

तुषार : अच्छा म्हणजे बाहेर दिसण्याचे चान्स कमी... तुषार पुन्हा बडबडला.... 

समायरा :काय?? 

तुषार :काही नाही.... 

समायरा :आज नलिनीचा विषय जरा जास्तच निघत आहे हो ना !! 

तुषार : अगं आपल्याला app devoloper लागणार आहे म्हणून.... 

समायरा : are you sure? नक्की तेच कारण आहे ना !!

तुषार : हो, हो अजून काय असणार.... चला घरी जायची वेळ झाली आहे.... तुषारने विषय बदलला.... अजून दोन दिवस मार्था ऑफिसला येणार नाही.... दोन दिवसांनी आपल्याला त्या फाईव्ह स्टार हॉटेल बद्दल मार्थाला बोलावे लागेल...... 
समायराला तुषारमधील हा बदल प्रकर्षाने जाणवला होता... त्याचं अधून मधून हरवणं.... समायरा स्वतःलाच म्हणाली.... दया !!कुछ तो गडबड है | तुषार कुछ बदलसा गया है |

तुषारने समायराला बस स्टॉप वर सोडले... पण तो सतत काहीतरी नलिनीची माहीती मिळावी या साठी काहीतरी विषय काढण्याचा तो बहाना शोधत होता.... 

समायरा : तुषार !! काय झालं... काही बोलायचं आहे का तूला??

तुषार : काही नाही, कुठे काय?? 

समायराची बस आली आणि ती घरी जायला निघाली.... 
समायरा अर्ध्या रस्त्यापर्यंत जाते ना जाते तोच नलिनीचा फोन समायराला आला.... 

नलिनी : समायरा  तू कुठे आहॆस?? 

समायरा : अगं मी बस मध्ये आहे... का? गं 

नलिनी : तूझा so called नवरा इथून जाताना दिसला मला... मला वाटलं तूला आज पण त्याने इथे सोडलं की काय... म्हणून तूझी घरी येण्याची वाट पाहत होते... बराच वेळ झाला तू नाही आलीस म्हणून फोन लावला.... 

समायरा : नलिनी !! कुछ तो हुआ है?? आज तुषारचं कामात बिलकुल मन नव्हतं....तूझा विषय पण बऱ्याचदा काढला... तू app devolper आहे म्हणल्यावर तो app चं काम तूला देऊ असं म्हणत होता...  omg, got it... नलिनी मला वाटतं त्याला तू आवडली आहॆस....

नलिनी : समायरा !! काहीपण काय बोलतेस अगं योगायोग असू शकतो ना.... एखाद्यावेळेस इथे आसपास काही काम असेल?? 

समायरा : its ok dear, माझं स्टॉप आलंय... मी ठेवते फोन.... 

समायराने फोन ठेवला.... पण आता ती तुषारचा विचार वेगळ्या दृष्टीकोनातून करायला लागली होती.... नलिनीने कितीही स्वीकार नाही केलं तरी आज तुषारमध्ये झालेला बदल  समायराला चांगलाच जाणवत होता... 

नलिनी आणि तुषार?? छान जोडी आहे... दोघेही स्वभावाने जरा मिळतेजुळतेच आहेत.... पण नलिनीला तुषार आवडेल का?? नलिनी म्हणजे एकदम नाकासमोर सरळ चालणारी मुलगी..... तिच्या घरी एकदम कडक वातावरण आहे... तिच्या बाबांना तर बिलकुल नाही आवडणार असलंकाही.... 

क्रमश :

कथा आवडल्यास like करून comment करा. 
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा 
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव 

©® डॉ. सुजाता कुटे 

 
क्रमश :
©®डॉ.सुजाता कुटे

🎭 Series Post

View all