तुषारने आशिषला त्याच्या घरी सोडले.... आणि त्याच्या घरी गेला.....
इकडे समायरापण व्यवस्थित तिच्या घरी पोहोचली....
घरी पोहोचल्यावर समायराने आधी तुषारच्या व्हाट्सअँप वर मेसेज टाकला.... सगळं व्यवस्थित आहे ना ! आशिषला काही संशय???
तुषार चा रिप्लाय आला सगळं व्यवस्थित आहे काळजी करू नकोस...
तुषारच्या त्या उत्तराने समायराच्या जीवातजीव आला
दोघांच्याही डोक्यामध्ये फक्त आशिषचाच विचार घोळत होता.. त्यामुळे दोघांनाही म्हणावं तसं कामावर लक्ष केंद्रित केलं नव्हतं... ते दोघेही सतत एका दबावाखाली वावरत असत.... आणि आता हा आशिष म्हणजे अजून एक डोक्याला ताप......त्यातल्या त्यात समायराने जाहिरात तयार करणे म्हणजे शंभर टक्के आशिषच्या विरोधात जाणे...
पण तरीही समायरा आणि तुषारला आपल्या कंपनीचा फायदाच व्हावा असं वाटत असे....
त्यामुळे समायरा घरी देखील वेळ मिळेल तसा ऑफिसचे काम करत असे... सुंदर ऍनिमेटेड जाहिराती तयार करत असे.. आणि तुषार समायराला काही बारकावे समजून सांगत असे जेणेकरून ते बारकावे जाहिरातीत उतरतील..
समायरा देखील तिच्या आवडीचं काम मिळाल्याने ती घरी देखील जाहिरातीचे काम मन लाऊन करत असे...
समायराची आई मात्र समुला अहोरात्र कामात बघताना खूप परेशान झाली होती
समायराची आई : समु बेटा हे काय गं तूला नौकरी लागल्यापासून बघते आहे तू सतत कामात असते नाहीतर विचारात मग्न असते...
समायरा: नाही गं आई हे फक्त प्रोजेक्ट आणि जाहिरातीचं काम होईपर्यंतच आहे... एकदा का हे सर्व आमलात आणलं की घरी मी एकदम फ्री राहील...
समायराची आई : मग ठीक आहे... नाहीतर उगाचच तब्येतीवर परिणाम व्हायचा...
समायरा : नाही गं आई !तसं काही नाही... तू काळजी करू नकोस... हे काम फक्त काही दिवसच...
समायराचे बाबा : अगं कुसुम ! तू पण काय माझ्या लाडक्या लेकीच्या मागे लागतेस...आता करू दे की तिला जे पाहीजे ते.... तूम्हा बायकांचं तर काही कळतच नाही... लाडक्या लेकीने काही केलं तरी प्रॉब्लेम आणि नाही केलं तरी प्रॉब्लेम.....
अमोघ : हं समु दीदी म्हणजे तूमची लाडकी लेक आणि मी?
समायराचे बाबा : तू म्हणजे आमचं लाडकं शेंडेफळ....
ते ऐकून सगळेच जण मनसोक्त हसले... नौकरी लागल्यानंतर पहिल्यांदाच समायरा आपल्या घरी खदखदून हसली होती... तिला वातावरण हलकं फुलकं झाल्यासारखं वाटत होतं...
इकडे तुषार मात्र जमेल तितकं ऑफिसचं काम घरी करण्याचे टाळत असे...
आईला आपली स्वयंपाक घरात मदत व्हावी असा त्याचा कल असे..
तुषार स्वयंपाक घरात घुसला की तुषारची आई तुषारला म्हणत असे..तुषार तू लग्नाचा विचार कधी करणार आहॆस... मला मेलीला सूनमूख बघायला मिळेल का जिवंतपणी??
तुषार : आई !! तू पण ना... काहीपण काय बोलतेस.. आधीच आत्ता कुठे तरी मला नौकरी लागली आहे.. आणि मला कुणीतरी आवडायला पाहीजे ना !!
तुषारची आई : म्हणजे कुणी नाही आवडली तर तू लग्न करणार नाहीस का??
तुषार :अगं माझी लाडकी आई, मला तसं नाही म्हणायचं आहे गं... बरं !!तू मला फक्त सहा महिन्यांचा अवधी दे... सहा महीने झाले की पक्क लग्नाचं बघू....
तुषारची आई : हे शेवटचे सहा महीने... ह्या नंतर मी तूझं काही एक ऐकणार नाही....
तुषार :हो गं आई...
दुसऱ्या दिवशी दोघेही सोबतच ऑफिसला पोहोचले...
आज दोघांचेही काम पूर्ण झालेले होते.... खास करून एका रात्रीत समायराने सगळ्या पॅकेजेसच्या जाहिराती तयार केलेल्या होत्या....
समायराने तीचा लॅपटॉप उघडून तुषारला जाहिराती दाखवल्या आणि सोशल मीडियावर तयार केलेले पेज दाखवले..
तुषार :???????? awesome, perfect, खूप सुंदर अगदी तुझ्यासारखं
समायरा : काय?????? तुषार तू पून्हा सुरु झालास का??
तुषार : sorry, sorry.... just chill... पण खरंच एकदम परफेक्ट केलं आहॆस सगळं....
समायरा आता मार्थाने परवानगी दिली की सगळ्या जाहिराती सोशल मीडियावर अपलोड करायच्या बस्स
तुषार : थांब समायरा !! घाई करू नकोस.... मला फक्त दोन दिवस दे... मग मार्थाला आपण जाहिराती दाखवू...
ते ऐकून समायराच्या कपाळावर आठ्या पडल्या.... अख्खी रात्र जागून मी जाहिराती तयार केल्या आहेत आपले काम लवकर सुरु व्हावे म्हणून... समायरा लटक्या रागाने बोलली.....
तुषार : अगं तूला लक्षात येत नाही का?? तू जाहिराती अपलोड केल्या की त्या आशिषच्या नजरेस पडतील.... आणि त्याची पोच कुठपर्यंत आहे... हे माहिती नाही... दोन दिवसात त्याची पूर्ण माहीती काढतो म्हणजे आपल्याला तो यावर कसा react होईल याचा अंदाज येईल....
समायरा : मग ठीक आहे !! पण फक्त दोनच दिवस हं...
तुषार ( मनामध्ये ): असं म्हणत आहे जशी काय खरोखरच माझी बायको आहे....हुं ????
समायराशी बोलून तुषारने लागलीच एका मित्राला फोन???? लावला....
तुषार : हॅलो, दीपक.. एका माणसाची माहीती काढायची आहे...दोन दिवसात... नाव आणि काही डिटेल्स मी तूला व्हाट्सअँप करतो...
तुषारने फोन ठेवून लागलीच आशिषचे काही डिटेल्स दीपकला व्हाट्सअँप केले...
समायरा : हा दीपक कोण आहे?? ????
तुषार : दीपक माझा खास मित्र आणि privet डिटेक्टिव्ह आहे...मी तूला interview च्या वेळी सांगितलं होतं ना... की एका मित्राने मला मॅडम नको म्हणू, मार्था म्हण" असं सांगितलेलं.... तो हाच मित्र दीपक....
समायरा : अच्छा !! चांगलं आहे मग...डिटेक्टिव्ह म्हटल्यावर आपल्याला अगदीच बरोबर माहिती मिळेल...
तुषार चला आता कामाला लागू या... आजपासून आपल्या कंपनीत ज्या couples हनिमून पॅकेजसाठी येतील ते सगळे आपल्याला बघायचे आहे.... काही का असेना आजपासून खऱ्या अर्थाने आपल्याला डायरेक्ट कस्टमरसोबत काम करायचे आहे...
कस्टमर सुरु झाले... समायरा आणि तुषार त्यांच्या कामात व्यग्र झाले... कस्टमरशी संवाद करण्याचा दोघांचाही पहिलाच दिवस होता... त्यांना चांगल्यातले चांगले पॅकेज निवडण्यासाठी दोघेही आपली बाजू अतिशय उत्तम रीतीने मांडत होते....
अधूनमधून आशिष, तुषार आणि समायराकडे येऊन बसत होता... ते कस्टमरशी कसं बोलत आहेत हे बघत होता...
समायरा सगळ्या कस्टमरची नोंद आपल्या लॅपटॉप मध्ये करत होती... तितक्यात समायराला एक युक्ती सुचली...
समायरा : तुषार !!आपण आपल्या कंपनीची app तयार केली तर?? सगळ्या नोंदी, जाहिराती, इतकंच काय कस्टमरच्या सगळ्या सेवा, तक्रारी सगळंच त्यात येऊन जाईल....
तुषार : समायरा !! आयडिया चांगली आहे... पण या आधी अशी app तयार का नाही झाली... इतकी मोठी कंपनी आहे आणि app नाही... विचित्रच आहे सगळं...
जाऊदे आधी आशिषची माहीती येऊ दे... मग जाहिरातीचं बघू आणि मगच अँपचा प्रस्ताव मार्था जवळ मांडू... तसंही आपल्याला सगळ्या गोष्टी हळूहळू कराव्या लागणार....
ऑफिसची वेळ संपली... आज मात्र दोघेही खूष होते.. दिवसभरात एकही गोष्ट त्यांच्यावर तणाव येईल असे काही घडले नव्हते...
बस स्टॉप वर उतरताना आता नेहमीच दोघेही आजूबाजूला नजर फिरवत.... कुणी नाही ना याची खात्री करून घेत असत... मगच तुषार समायराला बस स्टॉप वर उतरवत असे....
दोघेही आनंदाने आपापल्या घरी गेले.....
घरी गेल्या गेल्या तुषारला दीपकचा फोन आला...
दीपक : तुषार तू दोन दिवस दिले होतेस माहीती काढायला पण मला दोन तासातच सगळी माहिती मिळाली आहे... स्वतः ची कॉलर वर ओढत दीपक म्हणाला....
तुषार :मला खात्री होती तू हे काम लवकर करशील... बोल आता...
दीपक : फोनवर नको, आता येतोस का?
तुषार :ok, कुठे येऊ ते सांग...
दीपक: हॉटेल सनराईज
तुषार : ठीक आहे, अर्ध्या तासात पोहोचतो म्हणून तुषार तयार व्हायला लागला... आणि त्याच्या आईला म्हणाला आई माझ्या नावाचा स्वयंपाक करू नकोस मी बाहेर जेवणार आहे.... मला एक अर्जंट काम आले आहे....
तुषारची आई : अरे हे काय?? आताच आलास आणि आताच निघालास
तुषार : अगं आई कामच तसं आहे !! बरं ऐक ना मला घरी यायला उशीर होईल... हे लॅच वालं लॉक लाव... मी ही चावी सोबत ठेवतो...
तुषारची आई : ठीक आहे बाबा.. पण तरीही लवकर ये...
तुषार लवकरच हॉटेल सनराईज मध्ये पोहोचला.... तिथल्या गार्डनच्या एका कोपऱ्यात दीपक आधीच येऊन बसलेला होता.... हॉटेलमध्ये गेल्या गेल्या तिथल्या वेटरने त्याला दीपक बसलेला टेबल दाखवला.....
तुषार दीपक जवळ गेला...आणि खुर्ची ओढून बसला
तोच दीपक तुषारवर ओरडला :दगाबाज, गद्दार कुठला
तुषार गोंधळून दीपक !! तू शुद्धीवर आहॆस ना.... असा काय बोलत आहॆस....
दीपक : रागाने मी शुद्धीवरच आहे... तूच सांग तू काय केले आहॆस?? ????
तुषार : मी कुठे काय??
दीपक : मग ही सामायरा कोण??
तुषार :????♂️ दीपक !!आता तर हद्द झाली.. अरे मी तूला माझी जासूसी करायला नव्हती सांगितली.... मी तूला आशिषची जासूसी करायला सांगितली... पण आता तू विषय छेडलाच आहॆस तर ऐक.... तू मला गाईड केलस तसा मी interview द्यायला गेलो... योगायोगाने तिथे समायरा दिसली... मग मला एक कल्पना सुचली... असं सांगून तुषारने समायरा बद्दल सगळं सांगितलं....
दीपक : वा ! म्हणजे तूला आयतीच बायको मिळाली म्हण की... आम्ही इकडे किती संशोधन करा आम्हाला बुवा असं कुणी भेटत नाही...
तुषार :अरे बाबा !! तसं काही नाही... निव्वळ दोघांची मजबुरी होती आणि बस्स कर ना आता !! ज्या गोष्टी साठी इथे आलो आहे ते सांग पटकन....
मग दीपकने सुरुवात केली...जसं जसं दीपक सांगत होता तसे तसे तुषारला धक्के बसत होते....
क्रमश :
©® डॉ.सुजाता कुटे.
क्रमश :
©® डॉ. सुजाता कुटे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा