Sep 27, 2020
कथामालिका

किती सांगायचं मला (भाग 17)

Read Later
किती सांगायचं मला (भाग 17)

समायरा आणि तुषारची जणू मार्थासोबत एक छोटी मिटिंग झाली होती.... दोघेही ती मिटिंग संपल्यावर  त्यांच्या केबिन मध्ये येऊन बसले. 

या मिटिंगची कुणकुण आशिष आणि दिवाकरला लागली.... 

आशिष एकदम चिडून???? तुषार आणि समायराच्या केबिन मध्ये आला..... 

आशिष :तुषार !! आपलं काय ठरलं होतं.... की app बद्दल सगळं मी बघणार म्हणून... मग तूम्ही कसाकाय मार्था जवळ तो विषय काढला..... 

तुषार : अरे आशिष, आम्ही फक्त कल्पना मांडली... याच्या पुढचं तर सगळं तुलाच बघायचं आहे ना... 
आता हे बघ तू जर एकटा किंवा तूम्ही दोघे म्हणजे दिवाकर आणि तू... दोघांनीच कल्पना मांडली असती तर इतकं एफ्फेक्टिव्ह झालं नसतं.... आता आम्ही दोघांनी ही कल्पना मांडली.... तूम्ही दोघेही जाऊन मार्थाजवळ विषय काढा.... म्हणजे तिच्यावर  bombardment होईल आणि तीला ते पटणारच...

जितक्या आवेशात येऊन आशिष तुषारला बोलायला आला तितक्याच शांततेने तो त्यांच्या केबिनच्या बाहेर पडला... 

समायरा : तुषार !! तूला एक गोष्ट स्ट्राईक झाली का??

तुषार :कुठली??? 

समायरा : मार्था ने आपल्याला तूझ्या आईची ख्याली खुशाली विचारण्यासाठी केबिनमध्ये बोलावलं होतं.... ही गोष्ट आपल्या पूर्ण ऑफिसला माहिती होती.... आपली मध्ये मिटिंग झाली हे तूला, मला आणि मार्था तिघांशिवाय अजून कुणाला माहीती होतं.... आपण आपल्या केबिनमध्ये येईपर्यंत त्याच्याकडे ही गोष्ट पोहोचली सुद्धा... तूला थोडं विक्षिप्त नाही का वाटलं.... 

तुषार : हो तू म्हणते त्यात तथ्य आहे.... कोण असेल.... 

गणेश !! दोघेही एकदम म्हणाले...... 

तुषार :या गणेश पासून सावध राहावं लागतं..... हा बऱ्याच गोष्टी इकडच्या तिकडे करतो..... 

तितक्यात एक कस्टमर आला दोघेही त्याला माहीती देण्यात गुंग झाले..... 

ईकडे आशिष दिवाकर जवळ आला.... दिवाकरला तुषारचं बोलणं सांगितलं.... 

दिवाकर : आशिष !! का, कुणास ठाऊक मला हा तुषार गरजेपेक्षा जास्तच हुशार वाटत आहे.... म्हणजे बघ ना तो त्याची प्रत्येक गोष्ट आपल्याला पटवून सांगतो... अन आपल्याला पटतेही...... 

आशिष :मला तर एक नंबरचा मूर्ख वाटतो तो कळत न कळत सगळं आपल्याच फायद्याचं बघतो....  

दोघांनीही आपापल्या परीने तुषार बद्दल अंदाज मांडले होते.... 

तितक्यात तुषार त्यांच्याजवळ त्या कस्टमरला घेऊन आला... 

तुषार : आशिष !!याला इंटरनॅशनल हनिमून पॅकेज बुक करायचं आहे...त्याला स्वित्झर्लंडला जायचं आहे....  मी जॉईन झाल्यापासून इंटरनॅशनल हनिमून पॅकेज एकही हॅन्डल केले नाही.... यांना मी दिलेली documents ची लिस्ट एकदा चेक कर.... काही कमी जास्त तर नाही ना.... 

आशिष :दोघांचेही पासपोर्ट, विजा,.... आणि बाकीचे सर्व documents.... good सगळं कव्हर केलं आहे यात...तुषार !!खर्च सांगितलास का?? लमसम चार ते पाच लाख लागू शकतो.... 

कस्टमर : तूम्ही पैशाचा विचार करू नका हो..... माझं हनिमून आम्हा दोघांनाही यादगार राहिलं पाहिजे... एवढं लक्षात ठेवा.... तुमच्या कंपनीचं नाव आहे म्हणून मी इथे आलो.... पैशाचा माज त्या कस्टमर च्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.... 

तुषार : हो, तूम्ही इथे आलात ते योग्यच केलं.... तूमचा अपेक्षाभंग बिलकुल होणार नाही याची आम्ही पुरेपूर काळजी घेऊ.... तूम्ही लवकरात लवकर जेवढे जमतात तेवढ्या documents ची पूर्तता करा.... उरलेले आम्ही बघतो..... 

कस्टमर : ठीक आहे मिस्टर तुषार, येतो मी म्हणत तिघांच्या हातात हात मिळवून तो निघून गेला..... 

तुषारने देखील त्याच्या पाठोपाठ तिथून काढता पाय घेतला..... 

तुषार त्याच्या केबिनमध्ये पोहोचला... इंटरमिशन ची वेळ झाली... नेहमीप्रमाणे समायराने तुषारच्या नावाचा डब्बा आणलेला होता... 
रिसेसमध्ये ऑफिस मधले सगळे सहकारी कॅन्टीन मध्ये जाऊन डब्बा खात असत.... 

रजनी : काय तुषार काय आणलं आहे डब्ब्यात..... 

तुषार : ते डिपार्टमेंट माझ्या बायकोकडे... मी कुठे पाह्यले काय घेतलंय ते.... तुषार एकदम साळसुदपणाचा आव आणून म्हणाला.... 

समायरा मनातच... कसला भयंकर चालू आहे तुषार ????... मला तर वाटलं इथेच पकडल्या जाऊ....असं म्हणून समायराने डब्बा उघडला.... 

रजनी :अरे वा, ????धपाटे.... 

समायरा ( मनात ) डब्यात काय आहे ते मला तरी कुठे माहीती होतं... आईनेच तर भरून दिलेला ????

हलक्या फुलक्या वातावरणात रजनी, दिवाकर, आशिष, प्रदीप, गणेश, समायरा नी तुषार यांचा रोज डब्बा खाण्याचा कार्यक्रम होत असे.... सगळे मिळून मिसळून डब्बा खात असत... डब्बा खाताना कामाचा विषय काढायचा नाही असा नियम करून ठेवलेला होता.... त्यामुळे कुणी कुणावर कामानिमित्त कितीही चिडलं असेल तरी डब्बाच्या वेळेपर्यंत सगळं विसरून जाई...... 

या अश्या वातावरणामुळे ऑफिसमध्ये सगळ्यांनाच काम करायला मज्जा येई..... 

रिसेस संपली... सगळे जण आपापल्या जागेवर जाऊन बसले.... 

समायरा : मस्त उत्तर दिलंस रजनीला.... 

तुषार : हो सुचलं एकदम.... 

समायरा : बरं आल्यापासून आपण busy च आहोत.... कालचा दिवस कसा गेला... समायराला टेन्शन हे उत्तर अपेक्षित होतं.... 

तुषार : लाजून, खूप छान.... 

समायरा : काय??  खूप छान.... माझा तर जीव नुसता कासावीस झाला होता..... 

तुषार : अं, हो तसं मलाही खूप टेन्शन आलं होतं पण बरं झालं तूझा वेळेवर फोन आला... 

समायरा : तुषार !! तूझं लक्षण मला काही ठीक दिसत नाही...

तुषार :काय झालं आता?? 

समायरा : काल नलिनी आली होती ना....समायराने  मुद्दाम  विषय छेडला... 

तुषार : असं काय करतेस?? तूच तर पाठवलं होतं ना तीला... 

समायरा : हो का?? अच्छा.... म्हणजे तूझा काहीच फायदा झाला नाही तर.... 

तुषार : असा कसा नाही.... मला कळालं होतं ना मार्था येणार म्हणून.... 

समायरा जितकं तुषारला नलिनी बद्दल विचारण्याचा प्रयत्न करत होती तितकंच शिताफीने तो टाळत होता.... 

 आपल्याला नलिनी आवडते हे कदाचीत समायराला लक्षात आलं आहे.. म्हणूनच ती असे प्रश्न विचारत असावी... ....
असा तुषार मनोमन विचार करू लागला 

तुषारला एक वेळ असं वाटून जायचं सांगावं का समायराला... पण मग वाटायचं ती समजून घेईल का? तीने उलटाच अर्थ काढला तर?? मी तिला दिलेले कॉम्प्लिमेंट देखील तीने सरळ अर्थाने घेतले नाही.... तर माझ्या भावना तीला काय समजणार....
 पण नलिनी !!तिच्या मनात काय आहे... तिला भेटल्यावर तिला काही आपल्या बद्दल वाटते असं काही वाटलं नाही....

समायरा : तुषार !! कुठे हरवलास.... 

तुषार : काही नाही.... 

समायरा :अश्यात एक नवीन हरवण्याची बिमारी लागलेली दिसतेय.... काय झालय?कुणी पोरगी बीरगी आवडली की काय?? समायराने एकदम बॉम्ब टाकला.????... 

तुषार :समायरा !!काहीतरीच काय.... तू असताना ????मला काय अधिकार आहे.... दुसरं कुणी आवडण्याचा..... 

समायरा : काय?? ????

तुषार :समायराला खुणावून.... अरे रजनी काही काम होतं का?? 

रजनी :माझ्याकडे असलेली एक कस्टमरची फाईल दिसत नाहीये... सगळीकडे शोधली...शेवटी तूमची केबिन बघायची राह्यली.... मला खात्री आहे इथेच ती सापडेल.... 

तुषार :आम्ही तर मागवली नाही... मग तूला इतकी खात्री काशीकाय??

रजनी :हा गणेश आहे ना बोलबच्चन... तो नेहमीच असं करतो... ही बघ सापडली.... 

तुषार :तरीच ही फाईल अनोळखी वाटत होती.... 

रजनी : by the way समायरा !!!तुषार एकदम नाकासमोर सरळ चालणारा प्राणी आहे.... i think, he loves you a lot.???? चला निघते मी..... 

रजनी गेल्यावर तुषार ????‍♂️ आणि समायराने ????‍♀️डोक्यावर हात मारला....दोघांनाही हसावं की रडावं अशी स्तिथी निर्माण झाली होती.... तरी दोघे शांत बसले होते...

इकडे नलिनीच्या app प्रोजेक्ट सबमिट करण्याचा आजचा दिवस होता... दिवस रात्र एक करून तीने ते अँप्लिकेशन सॉफ्टवेअर बनवले होते.... ते तीने दिले तीचा पेमेंटचा चेक घेतला आणि स्कुटीवर घरी जाण्यासाठी निघाली.... 

अचानक जोरदार पाऊस सुरु झाला.... पाऊस इतक्या जोराचा होता की नलीनीला समोरचं काहीच दिसत नव्हतं... तिथला एक कोपरा बघून नलिनीने तीची स्कुटी  पार्क केली.... 

तितक्यात तीचा हात कुणीतरी पकडल्याची तिला जाणीव झाली.... तीने बघितले तर तो तुषार होता... तो काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होता... पण पावसाच्या आवाजाने नलिनीला काहीच ऐकू येत नव्हते... 

शेवटी तुषारने तिला ओढूनच बाजूला दुकानाच्या एका शेड खाली नेले.... तिथे एका कोपऱ्यात आता दोघांचे आवाज एकमेकांना ऐकू येत होते..... 

नलिनी :काय झाले तुषार?? तू काय म्हणत होतास?? 

तुषार :अगं नलिनी मी म्हणत होतो की तिथं भिजत उभी राहू नकोस... या शेडखाली चल... 

नलिनी :अच्छा, थँक्स.... 

तुषार : नोमॅन्शन, बाकी ईकडे कुठे?? 

नलिनी :माझं आज app चं काम पूर्ण झालं.... 

तुषार : good, म्हणजे आता फ्री.... आणि मग तो अर्धवट भिजलेल्या नलिनीकडे एकटक बघत बसला.... 

नलिनीला देखील तुषार सतत बघतोय याची जाणीव झाली.... तीची नजर आपोआपच शरमेने खाली झाली 
त्याचं एकटक बघणं तिला मनोमन भावलं होतं.... 

तितक्यात थोडा पाऊस कमी झाला.... 

तुषार :नलिनी !!आपण त्या कॅफे मध्ये जायचं का?? तिथे जरा गरम गरम कॉफी घेऊ तूला चालेल ना... 

नलिनी :का नाही.... उलट छान वाटेल....

तुषार :मनातच... yes 

तुषार आणि नलिनी कॅफे मध्ये येऊन बसले.... सुरवातीला दोघेही शांत बसले....मग तुषारने सुरवात केली... 

तुषार :नलिनी !!तूला माझ्या घराचा पत्ता कसा काय माहीती?? 

नलिनी :समायराने तूला काहीच सांगितलं नाही का?? 

तुषार :नाही... 

नलिनी : हे बघ तुषार प्लीज रागावू नकोस... पण तू आणि  समायरा विवाहित जोडपे आहेत असं दाखवण्याचं प्लांनिंग तूझं होतं ना.... मग तू ठरला अनोळखी.... मग तू चांगला आहॆस की नाही याचा शहानिशा करण्यासाठी मी तूझ्या घरी पोहोचले..... 

तुषार :पण माझ्या घराचा पत्ता.... तूझ्या पर्यंत कसा काय आला??  ओ  आलं लक्षात समायराने दिला असेल... तीने एकदा पत्ता मागितला होता मला.... 

नलिनी : हो... एकदम बरोबर.... तूझ्या आईला भेटल्यावर मला खात्री पटली आणि मी लागलीच माझ्या घरून समायराला सांगितलं... 

तुषार :काय??

नलिनी :हेच की तू खरं बोलत आहॆस.... 

तुषार : हम्म... म्हणून शांत बसला त्याचा चेहरा आता थोडा रागीट वाटायला लागला होता....

नलिनी : तुषार !! तूला राग आला आहे का?? 

तुषार :काय बोलू??  रागही ????आला आहे आणि तुमचं कौतुकही???? वाटत आहे.... 

नलिनी : म्हणजे?? ????
तुषार :कौतुक या साठी की तूम्ही अनोळखी व्यक्तीचा शहानिशा केला आजकाल हे काळाची गरज झाली आहे... आणि राग या साठी की समायरा मला एकदा जर म्हणाली असती तर मीच तिला घरी नेलं असतं... 

नलिनी : हे बघ तुषार !! गैरसमज करून घेऊ नको... तुझ्याबद्दल शंका मी उपस्थित केली होती... समायराच्या डोक्यात सुद्धा नव्हतं... आणि तेव्हा आपण भेटलो देखील नव्हतं... तूझं असं अचानक वागणं मला खटकलं होतं... 

तुषार : मग आता भेटल्यावर काय वाटतं माझ्या बद्दल?? 

नलिनी : भेटल्यावर !!!आमचा तो गैरसमज होता... अजून काही नाही. हे लक्षात आलं....

तुषार : अच्छा!! म्हणजे मी तितकासा चांगला वाटलो नाही तर... 

नलिनी :काहीही काय तुषार?? उगाच शब्दात पकडू नकोस... नलिनी जरा लाजलीच 

तुषारला ते नलिनीचं लाजणं खूप आवडलं...... दोघांचीही कॉफ़ी घेऊन झाली होती.... पाऊसही थांबला होता.... 

नलिनी : पाऊस थांबला !!चल तुषार निघते मी.... 

तुषार :ठीक आहे.... nice to meet you..... असं म्हणत हात पुढे केला.... 
नलिनीने लाजून तीचाही हात पुढे केला आणि nice to meet you too असं हळूच म्हणाली..... 

दोघेही आपापल्या घरी निघाले... दोघांच्याही मनात एक वेगळाच आनंद ओसंडून वाहत होता.... दोघांच्याही मनाला एक वेगळीच हुरहूर लागली होती.... दोघांनाही  अजून थोडावेळ बोलत बसलो असतो तर असं वाटायला लागलं होतं...... 

कथा आवडल्यास like करून comment करा. 
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव 

©® डॉ. सुजाता कुट

 

Circle Image

DR SUJATA KUTE

Medical officer

I am a doctor, working in govt hospital