Sep 27, 2020
कथामालिका

किती सांगायचं मला (भाग 7)

Read Later
किती सांगायचं मला (भाग 7)

दोघांनीही आता मन लाऊन प्रोजेक्ट रिपोर्टवर काम सुरु केलं... जाहिरातीसाठी अनिमेशन वापरून कमीत कमी खर्चात आता हनीमून पॅकेजची एक सुंदर जाहिरात तयार केली गेली....त्या साठी दोघांनीही भरपूर मेहनत घेतली....

ऑफिस सुटल्यावर रोज तुषार समायराला बस स्टॉप वर सोडत असे... आणि तिथूनच ती पुढे एकटी जात असे... 

ते दोघे सोबत असताना नलिनीने त्यांना एकत्र दोन ते तीन वेळेस बघितले... पण समायराचे लक्ष नव्हते...

नलिनीचे आणि समायराचे त्यानंतर फोन वर बोलणे झाले.... प्रत्येक वेळेस नलिनीला असे वाटत असे की समायरा काहीतरी तुषारबद्दल बोलेल पण समायरा काहीच बोलली नाही.... फक्त तीला जॉब मिळाला इतकंच सांगितलं.... 

रविवारी सुट्टीच्या दिवशी, " समायरा "नलिनीची साडी  परत करायला गेली.... 

नलिनी : समायरा!! माझी साडी तूला लकी ठरली !!हो ना?? 

समायरा : हो खरंच..... 

नलिनी :अजून काही नवीन जुनं !! नलिनीने मुद्दाम  समायरा सोबत बघितलेल्या मुलाबद्दल काही बोलेल या आशेने विचारले... ... पण समायरा स्वतःहून बोलेल तर शपथ !!

शेवटी न रहावुन नलिनीनेच विषय छेडला.... काय समायरा आजकाल तूझं काय ????सुरु आहे?? 

समायरा : काय सुरु आहे म्हणजे?? कुठे काय?? काही नाही.... 
नलिनी : आता तर हद्दच झाली बाई !! तो मुलगा कोण आहे ज्याच्या मागे बसून आपण आजकाल मोटारसायकल वर फिरता आहात... नलीनीने थोडा आवाज मोठा करून विचारलं????.... 

समायरा : अच्छा तू मला तुषारच्या मागे बसलेलं बघितलंस होय.... मग तर आता तूला सगळं सांगावेच लागेल.... 

नलिनी : म्हणजे काय लपवत आहॆस माझ्यापासून तू?? चांगली मैत्री निभावत आहॆस...  वा रे वा?? 

समायरा : अगं नलिनी तू थोडं तरी समजून घे.... माझी मजबुरी होती तूला न सांगणं... ऐक तर मग..... असं म्हणत समायराने तुषार कसा समोर आला आणि दोघांनी कसा interview दिला.... हे सगळे नलिनीला सांगितले आणि कुणालाही कळू द्यायचं नाही या साठी तीला विनवणी केली.....

नलिनी :असं आहे तर !! म्हणजे तूला आयताच नवरा भेटला म्हणावं?? ????????

समायरा : अगं नवरा कसला.????... मजबुरीने अडकलो आहोत दोघेही..... 

नलिनी :पण काहीही म्हण " तुषार हँडसम आहे हं" नलिनीने समायराच्या मनात काय चाललं आहे याचा अंदाज घेण्यासाठी विचारलं !!

समायरा : एक मिनिट!!!तूला आम्ही मोटरसायकल वरच दिसलो ना फक्त?? 

नलिनी : हो !!

समायरा : मग तूला हेल्मेट मधून तुषारचा चेहरा दिसला का??नलिनी  कळलं बरं तूला काय म्हणायचं ते?????? . 

पण तूला स्पष्ट सांगते.... तुषार माझ्या टाईप मुलगा नाही... ... मला श्रीमंत मुलगा हवा आहे... मी काय आयुष्यभर मध्यमवर्गीय म्हणूनच जगू??? मला काय माझे आयुष्य आनंदात जगण्याचा अधिकार नाही का??आज माझी मजबुरी आहे म्हणून मी त्याच्यासोबत रहात आहे.... मला घरी थोडाफार हातभार लावायचा आहे म्हणून... एकदा अमोघ  चं शिक्षण पूर्ण झालं की मी माझे सगळे स्वप्न पूर्ण करणार.... 

नलिनी : बरं बाई!! कळालं आता मला.... पण सांभाळून आज मी तूम्हा दोघांना एकत्र पाहिलं आहे उद्या अजून कुणी पाहील...बरं तू ते मंगळसूत्र वगैरे घालतेस का?? 

समायरा : 'नशीब ' मार्था जरा अधुनिक विचारांची आहे..... ना मी सुरुवातीपासून मंगळसूत्र घातले ना मार्थाने तितके लक्ष दिले... आणि ऑफिसमध्ये अजूनतरी मी तितकी मिक्स नाही झाले.... पण बरं झालं तू मला आठवण केलीस आता मी एक मंगळसूत्र माझ्या पर्समध्ये ठेवत जाईल.... 

नलिनी : बरं तुषार तूला विश्वासू वाटतो का?? उद्या जर या लग्नाच्या फोटोवरून तूला ब्लॅकमेल वगैरे केलं तर??? 

समायरा : बापरे ???? नलिनी !!!मी तर असा काही विचारच केला नाही.... त्याने सांगितलं की त्याच्या आईची तब्येत खराब असते आणि एक महिना मेडिसिन पुरेल इतकाच पैसा आहे.... म्हणून मी आपला सरळ सरळ विचार केला... मलाही नौकरीची गरज होती म्हणून मी खोलात गेली नाही... 

नलिनी :अशी कशी गं साधी भोळी तू??  तुषारच्या घराचा पत्ता तरी माहीती केलास का तू?? 

सामायरा : नाही, मला गरजच वाटली नाही.... 

नलीनीने आता डोक्यावर हात मारून घेतला????‍♀️.... आणि म्हणाली हे बघ तू त्याचा पत्ता विचारून घे.... मी त्याची सगळी माहीती काढते.... त्याला कळूही देत नाही.... 

"समायराने होकारार्थी मान हलवली"

नलिनी : समु मला खरंच तूझी कमाल वाटते.... इतकी हुशार असणारी इतक्या पटकन अश्या नाटकासाठी कसं काय तयार होऊ शकते.... तो तुषार का कोण आहे तो चांगला निघावा म्हणजे साधलं !!

समायरा आता जाम टेन्शनमध्ये आली.... नलिनीला म्हणाली : आता गं !! मी काय करू?? 

नलिनी : हे बघ जे झालं ते झालं टेन्शन घेऊ नकोस.... माझं म्हणणं इतकंच आहे की तू जरा हुशारीने रहा.... आता मला सगळं कळलंच आहे तर एकदा हा तुषार कितपत खरं बोलतो आहे याची खात्री करून घेऊ..... 

क्रमश :
©® डॉ.सुजाता कुटे

Circle Image

DR SUJATA KUTE

Medical officer

I am a doctor, working in govt hospital