किती सांगायचं मला (भाग 6)

Martha adviced about project

आज समायराला जी नौकरी मिळाली होती त्याला ती एक संधी म्हणून बघू लागली होती.... त्यामुळे आता समायरा बरीच टेन्शनफ्री झाली होती.... 

सकाळी समायरा लवकरच उठली आणि लवकरच आवरून छान तयार झाली....

 साधा स्काय ब्लू कलरचा कॉटन ड्रेस घातला... चेहऱ्यावर हलकासा मेक अप केला.... आणि नाश्ता उरकून सोबत डब्बा घेतला... 

डब्बा तीने आठवणीने थोडा जास्तच घेतला आणि वेळेच्या थोडं आधीच निघाली....

लवकरच निघाल्याने समायरा थोडं आधीच कंपनी जवळच्या बस स्टॉप वर पोहोचली.... तुषार देखील आलेला होताच... मग सोबतच दोघे त्यांच्या ऑफिसला पोहोचले.... 

ऑफिस मध्ये तुषार आणि समायराला एक वेगळी केबिन देण्यात आली.... म्हणजे कुणीही  हनिमून पॅकेज साठी आले तर त्यांना डायरेक्ट त्या केबिन मध्ये पाठवले जाई....

तुषार आणि समायरा आपली सेपरेट केबिन बघून खूप खूष झाले... 

पण सतत या तुषार सोबत राहायचं.... समायराला ते थोडं खटकत होतं... पण आता पर्याय नाही.... तिथे नवरा बायको बनून राहायचं ना... 

पण ऑफिस मध्ये गेल्यावर समायराला तुषारचे एक वेगळे रूप दिसायला लागले.... 

कामाव्यतिरिक्त तो फालतू बडबड बिलकुल करत नसे... येता जाता ऑफिस मधील सगळ्यांशी मिळून मिसळून बोलत असे... 

उगाचच एखादा जोक share करत असे.... त्यामुळे ऑफिसमध्ये हसते???? खेळते वातावरण राही..... 

या उलट समायरा एकदम शांत राहात असे.... कुणात मिसळत नसे.... तिला "जर आपली पोल खोल झाली तर??? "याची सतत भीती वाटत असे.... म्हणून एरवी मिसळणारी समायरा तिथे जास्त दूर रहात असे.. 

तिच्या अश्या वागण्यामुळे तीला ऑफिसचे सहकारी खडूस म्हणत असत.... 

तुषारला सगळे म्हणत असत.... कसं काय समायराला इतकं सहन करता.... किती खडूस आहे ती..... नक्कीच तुमच्या दोघांचं लव्ह मॅरेज असलं पाहिजे..... 

तुषार पण मजा घेण्यासाठी हो ना कसाकायकी मीच तिच्या तावडीत सापडलो????...असं म्हणत असे.... 
अशीच मजा मस्ती चालू असताना मार्थाने तुषार आणि समायराला आपल्या केबिन मध्ये  बोलावलं..... 

समायराला परत टेन्शन आलं.....आता काय सांगते 'ही ' मार्था?? 

दोघेही केबिन मध्ये गेले.... 

तुषार आणि समायरा : गुड मॉर्निंग,  मार्था !!

मार्था : very good मॉर्निंग..... बसा, तूम्हाला आता तुमच्या जॉब चार्ट मध्ये खूप  बदल करायचे आहेत....

 एक छानसा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करा.... तूम्हाला आता जाहिरात करावी लागेल.... त्या साठी सोशल मीडियाचा जास्तीत जास्त वापर करा.... 

दोघांचेही नाव जरा प्रकाश झोतात येऊ द्या..... 

समायरा:काय???  मार्थाचे ते बोलणे ऐकून समायराने तुषार कडे बघितले....

तुषारने नजरेनेच काही काळजी करु नको असे समायराला खुणावले.....

मार्था : मला तूम्ही दोघे लवकरात लवकर एक प्रोजेक्ट तयार करा.... जाहिरातीचं बघा... कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त पब्लिसिटी कशी होईल ते बघा.... चला या आता आणि लवकर कामाला लागा 

दोघेही मार्थाच्या केबिन बाहेर आले.... आणि त्यांच्या केबिन मध्ये गेले.... समायरा खुर्ची वर बसली आणि एकदम मुसमुसायला लागली..... 
.
एखाद्या चक्रव्युव्हात आपण अडकलो आहोत.. अशी जाणीव तीला झाली....

तुषार : काय झालं समायरा?? का रडत आहॆस?? 

समायरा :  प्रोजेक्ट करण्याइतपत ठीक होतं.... पण ही जाहिरात आणि सोशल मीडिया.... तिथे आपण पती पत्नी म्हणून दाखवणार का? म्हणजे सगळीकडे  आपोआपच पसरणार.... आणि मग माझे आईवडील???..... समायरा पून्हा रडायला लागली.... 

तुषार : अगं??  तू आधी डोळे पूस बघू..... तुषार आपला रुमाल पूढे करत समायराला म्हणाला..... हे बघ प्रोजेक्ट तयार करू आपले कॉन्टॅक्ट नंबर लिहिताना एकाखाली एक लिहू... फक्त नाव लिहायचं, आडनाव नाही.... मग कशाला कुणाला आपण पती, पत्नी वाटणार.... आपल्या दोघांचीही नावे असल्याने मार्था देखील खूष होईल.... 

अन आता तर सुरुवात आहे..... तू इथेच हार मानलीस तर मग आपण नौकरी कसं काय करू शकणार??   हे बघ जितके प्रश्न आहेत तितके उत्तर आहेत... जितक्या अडचणी येतील त्यातून मार्ग निघतील........ पण असं रडत बसने हा उपाय नाही.... 

माझ्या नावाचा डब्बा आणलेला दिसतो आहे.... तुषार ने विषय बदलला... 

समायरा : हो, ऑफिसच्या लोकांना खरे खुरे पती पत्नी वाटायला पाहीजे न ???? म्हणून आणावा लागला.... 

तुषार : अरे वा म्हणजे त्या निमित्ताने का होईना मला आयता डब्बा मिळेल मग ???????? है ना !!

समायरा : हं, लटक्या रागाने बोलली..... 

क्रमश :
©® डॉ.सुजाता कुटे

🎭 Series Post

View all