किती सांगायचं मला (भाग 3)

Tushar and samayra getting job

मार्था???? तशी जवळ पास सत्तर वर्षांची असेल.... पण एक विलक्षण तेज तिच्या चेहऱ्यावर होतं.... सत्तरची ती वाटतच नव्हती.... 

मार्थाला नवीन गोष्टी आत्मसात करण्याची भारी हौस होती.. सगळ्या गोष्टी आधुनिक पद्धतीने व्हाव्यात असा तीचा अट्टाहास होता.....

  तसंच मार्थाला कुणी मॅडम म्हणलेलं देखील आवडत नसे.... त्यामुळे तीला म्हातारे असल्याचं फील येत होतं.... 

मार्था :मला हवं आहे तसं जोडपं ????‍❤️‍????आहात तूम्ही... उद्या सगळ्या documents ????????ची पूर्तता करा आणि परवापासून तुम्ही कामाला येऊ शकता.... 

मला वेळा⌛️ पाळणारे लोक आवडतात समजलं ना... आणि काही महत्वाच्या गोष्टी मी सांगू इच्छिते.... मला इथे विवाहित असलेलं जोडपं पाहीजे होतं त्याचं कारण म्हणजे तूम्हाला हनिमून पॅकेज वर काम करायचं आहे.... 

काय?? ते ऐकून समायरा एकदम म्हणाली 

मार्था :मी माझ्या टूर्स and ट्रॅव्हल्स???????????? चं expansion करत आहे.... पॅकेज नुसार त्याचं विभाजन करत आहे..  .. 
जसं की एकटी व्यक्ती असेल तर त्याचा वेगळा विभाग, फॅमिली पॅकेजचा????‍????‍????‍???? वेगळा विभाग,महिलांसाठी ????‍????पॅकेज असणारा वेगळा विभाग आणि आता हनिमून पॅकेज साठी तूम्ही दोघे...... 

तूमची जबाबदारी राहील ते सगळं बघण्याची.... त्यांचे प्रोजेक्ट तयार करा, इव्हेंट मॅनेज करा.... त्यासाठी जमेल तितक्या अधुनिक पद्धतीचा वापर करा, सोशल मीडिया चा वापर करा..... 

आपल्या टूर्स चं हनिमून पॅकेज वापरलेल्या जोडप्यांनि अगदी आयुष्यभर तूम्हाला लक्षात ठेवलं पाहीजे..... 

म्हणूनच मला जोडपं हवं होतं आणि तूम्ही नवविवाहित असल्यामुळे मला जास्त फायदा होईल 

फायदा?? ???? नवविवाहित ????समायरा ते ऐकून परेशान झाली.... कसं शक्य आहे...मी कुठे अनुभवी आहे?? 

काय जमेल ना??  मार्थाच्या प्रश्नाने समायराची तंद्री तुटली 
.... काही न बोलताच तीने होकारार्थी मान हलवली.... 

तुषार : हो मार्था, आम्ही नवविवाहित असल्याने नुकताच अनुभव असल्याने आम्ही सगळं बऱ्यापैकी करू आणि  समायराला  ???? डोळा मारला....... 

समायरा ????पून्हा रागाने तुषारकडे बघायला लागली... 

मार्था : ठीक आहे, या तूम्ही आता...... 

तुषार आणि समायरा केबिनच्या बाहेर पडले.... समायरा तुषार वर जाम चिडली होती...

समायरा  म्हणाली मला नाही जमणार,  नौकरी करायला.... एकतर आपण विवाहित नाहीत आणि उगाचच लक्षात आले तर... अन' documents' अजून कसले documents द्यावं लागनार आपल्याला.... 

तुषार :हे बघ समायरा! तू शांत हो आधी..... इतक्या लोकांमध्ये मार्थाने आपल्याला निवडलं आहे !!तूला काही कळतं का?? खरं खुरं लग्न झालेलं एकही जोडपं त्यांना आवडलं नाही.....

समायरा : पण कसं शक्य आहे, कुठून आणणार आहात पुरावे?? ते ही आपल्या लग्नाचे... 

तुषार : उद्या करू की लग्न ????????

समायरा : काय ????

तुषार : अगं म्हणजे नशिबाने मार्था ने आपल्याला उद्याचा  वेळ दिला आहे.... फोटोशूट करू.... आणि सबमिट करू.... 

समायरा : हं, बघू,  पण मला एक कळत नाही मार्थाने आपल्याला का निवडलं??  आणि तू देखील मॅडम म्हणायचं सोडून तीला चक्क नावाने हाक मारलीस.... मला तर वाटलं होतं तीचा इगो आड येईल...... 

तुषार : अगं इथे येण्यापूर्वी माझी एका माझ्या मित्राची भेट झाली होती.... तो मला म्हणाला जर तू मार्थाला नावाने संबोधशील तर तूझे काम झालेच समजा.... कारण मार्थाला चिरतरुण राहायला आवडते..... तिला जर मॅडम म्हणालं तर खूप म्हातारं झाल्यासारखं वाटते.... मग तिथूनच तिच्या नकाराला सुरुवात होते.....

 तसंच थोडं स्तूती कर म्हणजे married ची अट देखील ती विसरून जाईल... असं देखील तो म्हणाला होता..... पण तू दिसलीस म्हणून मला ही कल्पना सुचली..... 

By the way,तू पण खूप हुशार आहॆस.... एकदम हजरजबाबी पणे उत्तर दिलंस.....

समायरा :जितकं' तू' मार्था मॅडमशी' बोलत होतास.... त्यांची स्तूती करत होतास त्यावरून माझ्या लक्षात आलं होतं की त्यांची स्तूती करावं लागेल... 

तुषार : मग तर आपले चांगलेच जमेल.????.. 

समायरा : काय?? ????

तुषार : काही नाही, just kidding ????, पण माझ्यासमोर म्हणालीस ते म्हणाली पण मार्थाला मॅडम म्हणू नकोस... आपले सगळे काम बिगडून जाईल.....

चालत चालत तुषार आणि समायरा दोघेही तुषारच्या बाईक जवळ आले..... 

समायरा: ठीक आहे चल निघते मी... 

तुषार : अगं थांब, इथून आपल्याला वेगवेगळे नाही जाता येणार.... उगाचच संशय कश्याला येऊ द्यायचा.... मी तूला सोडतो.... तूझा फोन नंबर दे ना... उद्या आपल्याला आपले फोटो काढावे लागतील ना.... 

समायरा ने आणि तुषारने आपले फोन नंबर exchange केले.... 

समायरा बाईकवर बसता बसता तीला सकाळची गोष्ट आठवली.... आणि तुषारला म्हणाली तू माझ्या अंगावर सकाळी चिखल उडवला होतास.... याचं तरी भान होतं का तूला??? 

तुषार :काय?? कधी??

समायरा : सकाळी, पण तू हेल्मेट घातलेलं होतंस ना... तूझं लक्ष देखील नव्हतं... आता घरी साडी घालून गेल्यावर मला हजारो प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील ते वेगळंच... चिखल उडाल्यावर नलिनी माझी मैत्रीण तिच्या कडे जाऊन साडी घालावी लागली... 

तुषार :ओ, i am very sorry, खरं तर मी खूप सावधपणे बाईक चालवत असतो... पण मला माझ्या जुन्या कंपनी मध्ये जाऊन माझा चार्ज पर्मनंट मेंबरला द्यायचा होता आणि इथे interview ला देखील यायचं होतं.....खरंच सॉरी  

समायरा : its ok, मला त्या bus stop वर सोड.... मी बसने जाईन.... 
तुषार : साडीवर तू खरंच खूप सुंदर दिसत आहॆस... 
समायरा : काय ???? हे बघ तुषार, जरा स्वतःची पायरी ओळखून वाग.... हे फ्लर्टींग वगैरे मला चालणार नाही... आज माझी मजबुरी आहे म्हणून मी interview ला आले होते 

तुषार : ओ, मी तूला दुखावलं का? अगं पण सुंदरला सुंदर नाही म्हणणार तर मी काय म्हणणार?? 

दोघेही बस स्टॉप वर आले... 

तुषार : मला interview साठी साथ दिली या साठी मनापासून thanks.... मला खूप गरज होती गं नौकरीची.... 

समायरा : ते सगळं खरं आहे पण आता हे सगळं निभवायचं कसं?? मला तर अजूनही खूप भीती वाटत आहे... आपण चारसो बीसी केल्यासारखं वाटत आहे... उद्या आपल्यावर काही action घेतली तर.... पोलीस वगैरे?? 

तुषार : हे बघ आजच्या गरजेपुढे उद्याची action वगैरे माझ्यासाठी काहीच नाही.... आणि तुझ्यावर मी काही येऊ देणार नाही.... माझ्यावर विश्वास ठेव.... 

समायरा : ठीक आहे, माझी बस आली.... निघते मी असं म्हणत समायरा बस मध्ये चढली..... 

क्रमश :
©® डॉ. सुजाता कुटे

🎭 Series Post

View all