Sep 27, 2020
कथामालिका

किती सांगायचं मला (भाग 1)

Read Later
किती सांगायचं मला (भाग 1)

Hey, you.... समायरा एकदम रागाने बोलली....???? समायराच्या नव्या कोऱ्या ड्रेसवर चिखलाचे शिंतोडे उडाले होते... एका मोटरसायकल स्वाराने ते उडवले होते..

 पण त्याने हेल्मेट नावाचं शिरस्त्राण घातल्याने कुणी एक सुंदर मुलगी आपल्याला शिव्या देत आहे.... याची पुसटशी देखील जाणीव झाली नाही.....

 त्यामुळे समायरा मात्र रागाने लालबुंद झाली होती????... खरं तर तीला तेव्हाच त्या मुलाला अडवून जाब विचारायचं  होतं.. ... तीने गाडी बघून घेतली, काळी स्प्लेंडर.. .. गाडीवरचा नंबर आपल्या मोबाईलवर ????टिपून घेतला.... 

आधी माझं काम करते आणि मग बघते चांगली या मोटरसायकल स्वाराची.......

 पण समायरा नौकरीच्या interview साठी निघाली होती... आणि आता असा चिखल उडाल्याने तीला तीचा ड्रेस बदलणं जरुरी होतं.... 

रस्त्यातच समायराच्या मैत्रिणीचे नलिनीचे घर लागत होते... 

समायरा लागलीच नलीनीच्या घरी गेली.... समायराने नलीनीला घडलेला किस्सा सांगितला.... आणि सांगितलं की तीला लागलीच interview ला जायचं आहे....

नलिनी :कुठे आहे interview? 

समायरा: राज टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीमध्ये... 

नलिनी : अगं काय??  तू जाहिरात नीट वाचली नाहीस का? तूला कॉल आला आहे का? 

समायरा : अगं walk in interview आहे... 

नलिनी : अगं पण तिथे married couple ????‍❤️‍????ला प्राधान्य आहे ना मग तू?? 

समायरा :अगं जर तिथे married couple आले नाही तर माझा विचार करतील ना... 

नलिनी : डोक्यावर हात मारून ???? अगं कोणत्या युगात वावरत आहॆस, स्पर्धेचे युग आहे हे.... नौकरीची खूप जणांना गरज असते... 

समायरा : अगं पण!मला नौकरीची खूप गरज आहे... 
मी असच रिकामं बसण्यापेक्षा हातपाय हलवलेले वाईट नाही का? अगं अमोघ ची क्लास ची फीस भरायची आहे...
 आईच्या औषधांचा खर्चही पप्पाच्या पेन्शन मधून काहीच पुरत नाही गं.... बघू नशिबात असलं तर मिळेल नौकरी... 

नलिनी :बरं बाई, ही घे साडी... ही घाल... married नसलीस तरी असल्यासारखी दिसशील ????

समायरा : हे' wow' किती सुंदर साडी आहे, आणि orange माझा favourate colour... लेस पण किती सुंदर आहे... पण आता रेडिमेड नवरा पण मिळायला हवा ???????????? मग काय माझी नौकरी पक्की... असं बोलत बोलत समायरा तयार होऊ लागली....

नलिनी :खरंच किती खुलून दिसतोय हा कलर तूला... मला तर वाटतं त्या कंपनीचा बॉस तूला पाहूनच नौकरी देऊन टाकेल...

समायरा : hard luck dear, त्या कंपनीचा बॉस तो नाही, ती आहे... आणि सिनियर सिटीझन... म्हणूनच तर अशी काही विचित्र अट ठेवली आहे... 

नलिनी :'ओ' मग तर मनापासून best luck... 

समायरा :interview ची वेळ झाली, निघते मी... समायरा तयार झाल्यावर बोलली... साडीमध्ये तर समायरा खूप सुंदर दिसत होती... orange colour तिला खूपच खुलून दिसत होता... पाहताच तिच्या प्रेमात पडावं इतकी मोहक ती दिसत होती.... 

नलिनी :थांब, मी तूला स्कुटीवर सोडते... म्हणजे वेळेवर पोहोचशील.... 

नलिनीने समायराला कंपनी पर्यंत सोडले.... 

नलिनी : best luck, काही गरज वाटली तर सांग.... 

समायरा: थँक्स डिअर, काही वाटलं तर नक्कीच तूला कॉल करते.... 

नलिनी : चल बाय 

समायराने ऑफिसमध्ये एन्ट्री केली.... तिथे सुरुवातीलाच दोन रूम होत्या... तिथे heading लावलं होतं... married आणि unmarried.... 

interview मध्ये असा नियम ठेवला होता की जर married couple सिलेक्ट नाही झाले तरच unmarried लोकांना संधी मिळणार... 

पण' married,  heading'असणारी रूम तर couples नी खचाखच भरली होती.... 
समायरा ते पाहून टेन्शनमध्ये आली.... ह्या दोन रूम करून तर आपल्याला ऑलरेडी रिजेक्ट झाल्यासारखे वाटत आहे... 

तितक्यात त्या रूममधल्या खिडकीतून समायराची नजर बाहेर गेली... 

ते पाहून तिच्या कपाळावर आठ्या पडल्या... तोच स्प्लेंडरवाला! हेल्मेट काढत होता.... 

समायराने तिच्या फोनवर चेक केलं... स्प्लेंडरचा नंबर कन्फर्म करून घेतला.... 

समायरा : 'हाच नंबर आहे 'आता चेहरा  बघून घेते असा विचार करत त्याच्याकडे बघायला लागली.... 

हेल्मेट काढल्यावर त्याने एकदम केसं झटकले... मानेला झटका दिला, कुणीतरी आपल्याला खिडकीतून पहात आहे हे लक्षात आले.... तो ही मुद्दाम समायराकडे एकटक बघायला लागला.... 

समायरा एकदम कॉन्शियस झाली.... आणि तीने मान खाली घातली... 

त्या मुलाने पॅन्टच्या खिष्यातील कंगवा काढला... स्वतःचे केस विंचरले, गाडीच्या आरशात पाहीले आणि तडक कंपनीमध्ये आला.... 

Unmarried heading असलेल्या रूम मध्ये तो तडक घुसला...  समायरा जवळ गेला आणि म्हणाला.... अगं तू इथे unmarried लोकांच्या रूम मध्ये काय करत आहॆस... सकाळचं भांडण इतकं कुठे मनाला लाऊन घ्यायचं.... 

समायरा :' excuse me' 

तितक्यात आवाज आला, जरा हळू बोला, मध्ये interview चालू आहे.... 

तो मुलगा :प्लीज जरा बाहेर येतेस का? मला बोलायचं आहे तुझ्याशी... 

समायरा :पण मला नाही बोलायचंय... 

पून्हा आवाज आला, तूम्हाला काय बोलायचे आहे बाहेर जाऊन बोला.... इथे डिस्टर्ब होतं सगळं.... 

तो मुलगा : बघा ना, सकाळच्या भांडणाचा राग अजूनही गेला नाही माझ्या बायकोचा... ती चक्क unmarried heading असलेल्या रूम मध्ये जाऊन बसली आहे... 

ते ऐकून समायरा चक्क उडालीच... 'बायको आणि मी '

रिसेप्शनिस्ट : ओ बाई, जरा तुमचे मिस्टर काय म्हणतात ते ऐका ना... बाहेर जा... इथे गोंधळ नको.... 

 समायरा तणतण करत बाहेर निघाली.... 
क्रमश :
©® डॉ सुजाता कुटे

Circle Image

DR SUJATA KUTE

Medical officer

I am a doctor, working in govt hospital