किती सांगायचं मला (भाग 19)

Aashish searching for developer

तुषार वेळेवरच घरी पोहोचला.... घरी येता येता नलिनीची छोटीसी  का होईना भेट झाली होती... त्यामुळे तो सुखावला ????होता... 
तुषार, नलिनी आणि समायरा तिघेही आपापल्या परीने आनंदी झाले होते.... 

तितक्यात तुषारचा फोन खणखणला.... 

तुषार ने फोन बघितला, आशिष !! याला कशीकाय माझी आठवण झाली... काही घोळ तर नाही झाला ना.... असा विचार करत तुषारने फोन उचलला.... 

आशिष : हॅलो तुषार !!

तुषार : बोल आशिष... 

आशिष : तू app सॉफ्टवेअर तयार करायचं म्हणत होता ना... 

तुषार :हो... 

आशिष : ते आपल्याला लवकरात लवकर चालू करता येईल का?? 

तुषार : हो चालेल ना... मी उद्याच माहिती काढतो.... 

आशिष :तसं नाही... मला या दोन दिवसात हे काम सुरु करायचं आहे.... 

तुषार : बापरे ???? दोन दिवसात??  इतक्या लवकर आपल्याला कोण developer मिळणार?? 

आशिष : म्हणून तर मी फोनवर बोलत आहे.... नाहीतर उद्या ऑफिसला बोललो असतो.... 

तुषार : बरं बघतो कुणी भेटतं का ते?? तसं नलिनीचं नाव तुषारच्या डोक्यात आलं होतं... पण आशिषचा आणि दिवाकरचा स्वभाव बघता नकोच.... पुन्हा तिला कश्यात अडकावयला कमी करणार नाही..... असे नानाविध प्रश्न तुषारच्या डोक्यात चमकून गेले होते.... 

आशिष : चल, ठेवतो फोन, उद्या ऑफिसला भेटू....तो पर्यंत एखादा तरी app devoloper बघ.... मग मी बाकीचे त्याच्याशी  बोलेन....

तुषार : ठीक आहे.... 

आशिषला इतकी घाई का झाली आहे??  एका रात्रीतून मी कुठला developer शोधू??  आशिषचा काय स्वार्थ आहे यात.... तुषार विचार???? करू लागला..... अरे हो मार्थाचा मुलगा काय त्याचं नाव.... सुहास.... तो बरोबर दोन दिवसांनी येणार.... म्हणजे या दोन दिवसाच्या आत काही घबाड मिळतं का ते बघणार...... तुषारला एक एक गोष्टीचा संदर्भ लागत होता...... 

आता तर नलिनीच आपल्या ऑफिसचं app सॉफ्टवेअर तयार करणार पण बरोबर दोन दिवसानंतर ???? बस्स फक्त दोन दिवस या आशिषचा टाईमपास व्हावा..... पण तरी आपण हा अंदाज बांधत आहोत.... त्या सुहासला आपल्या कंपनीत काहीच इंटरेस्ट नसला तर... 

कितीही काहीही झालं तर नलिनी कश्यात अडकली नाही पाहीजे...असा विचार करत करत तुषारला झोप लागली....

समायरा थोडी रिलॅक्स झाल्याने जरा उशीराच उठली.... 

अमोघ : अगं समुताई !!मला जरा पाचशे रुपये मिळतील का?? मला एक पुस्तक घ्यायचं आहे 

समायरा : हो... त्या पर्स ????मधून घे ना... पर्सकडे बोट दाखवत समायरा म्हणाली.... 

अमोघ : अगं ताई माझ्या हातात ????बॅग आहे आणि मी शूज???????? घातलेले आहेत.... तू दे ना.... 

समायराची आई : थांब मी देते... म्हणून समायराच्या पर्स कडे गेली.... 

समायरा काही लक्षात येऊन ती पर्स पर्यंत पोहोचेपर्यंत पर्समधील मंगळसूत्र समायराच्या आईच्या हातात लागले.... 

मंगळसूत्र आणि समुच्या पर्समध्ये.... ते बघून समूच्या आईचे एकदम हातपायच गळून गेले.... 

तितक्यात समायराने तिच्या आईच्या हातातील पर्स घेतली आणि त्यातून 500 रुपयाची नोट काढून अमोघला दिली.... 

 समायरा खरं तर आतून खूप घाबरली होती.... एकदम कावरी बावरी झाली होती.... पण पर्स???? कडे बघून तीने शिताफीने आपले चेहऱ्यावरचे भाव बदलले.... 

अमोघलाही ते मंगळसूत्र ????बघून टेन्शन आलं होतं..... तो स्वतःला दोष द्यायला लागला होता.... आपण पैसे घेतले असते तर बिघडलं असतं का?? आता भोगा... जाऊदे ताई काय उत्तर देते ते बघू.... म्हणून अमोघ तिथेच थांबला होता....

समायराची आई : समु बेटा!! हे काय आहे?? ????आणि तुझ्याकडे कसंकाय??

समायरा : अगं आई !! हे मंगळसूत्र नलीनीने घेतलं होतं... पण गरबडीत माझ्याकडे विसरली वाटतं.... 
 नलिनीने आताच एक app च प्रोजेक्ट पूर्ण केलं.... त्यात तिला भरपूर पैसे मिळाले.... तीला तिच्या आईला एक सोन्याचं मंगळसूत्र बनवायचं आहे.... तिला हे साध्या मंगळसूत्राचं नाजूक डिझाईन आवडलं होतं... 
ते सोनाराला द्यायचं आहे... उद्या आम्ही पुन्हा भेटणार आहोत तेव्हा हे ती त्या सोनाराला देईल.... 

अविचाराने शक्तिहीन झालेल्या हातापायात पून्हा बळ आलं आणि समायराच्या आईने "किती गुणी गं माझ्या पोरी "असं म्हणत कौतुकाची थाप मारली.. 

समायरा मात्र तोंड फिरवून तीचे अश्रू लपवण्याचा प्रयत्न करू लागली.... मनात म्हणत होती.... आई !!माझी लायकी नाहीये तुझे हे कौतुक ऐकण्याची.....

देवा एक खोटं बोललं तर मला किती खोटं बोलावं लागत आहे... अजून किती खोटं बोलावं लागणार?? बघितलंस ना किती विश्वास आहे आईचा माझ्यावर.... का हे पाप माझ्या हातून घडत आहे?? समायरा मनातल्या मनात विचार करत होती.... 

अमोघ : येतो आई, असं म्हणून जोरात आवाज दिला.... 

तोच समायराने तीची नजर वर उचलली.... 

काळजी करू नको... सर्वकाही ठीक होईल असं अमोघने समायराला खुणावलं आणि तिथून निघून गेला..... 

समायराची आई : समु बेटा !! आज ऑफिस नाही का??आज  फारच निवांत चालू आहे 

ते ऐकून समायरा एकदम भानावर आली.... बापरे पावणे आठ होऊन गेले... चल आई लवकर आवरून घेते मी असं म्हणत बाथरूम कडे पळाली...

तुषार आणि समायरा बस स्टॉप वर एकदम वेळेवरच पोहोचले...समायराने स्कार्फ बांधला होता..... तरी तिच्या डोळ्यावरून समायराचे काहीतरी बिनसलेय हे तुषारच्या लक्षात यायला वेळ लागला नाही..... 

तिचं ते रूप पाहून तुषार आपोआपच शांत राहिला.... 
ऑफिसला गेल्यावर दोघांचेही बायोमेट्रिक उपस्थिती दिली...आणि दोघेही आपल्या केबिन मध्ये गेले.... 

समायराचे डोळे रडून रडून सुजल्यासारखे दिसत होते... 

तुषार :काय झालं आहे समायरा?? तूझी तब्येत ठीक नाही का??  इतकी उदास का दिसत आहॆस?? 

समायरा : तुषार !!  मला ही नौकरी सोडून द्यावीशी वाटत आहे?? 
तुषार : ???? काय?? अगं पण का?? तूझ्या घराचा आर्थिक प्रॉब्लेम मिटला ना.... अमोघ ची फीस पण भरली..... 

समायरा : हो ना.... त्याच्यामुळेच मी असे काही पाऊल उचलत नाहीये.... पण आज माझ्या आईच्या हाताला  मंगळसूत्र लागलं.... आणि मला अजून एक खोटी स्टोरी तयार करावी लागली.... 

तुषार :हे बघ समायरा !! आपला हेतू वाईट आहे का?? 

समायरा : नाही... 

तुषार :आपल्या या वागण्यामुळे कुणाचं नुकसान होत आहे का?? 

समायरा : नाही.... 

तितक्यात दोघांनाही आशिषची चाहूल लागली.... दोघेही सावध झाले... 

आशिष : तुषार !! काही माहिती मिळाली का?? 

तुषार : नाही सर !अजून तरी नाही.... पण तूम्ही मला आजचा दिवस द्या... मी संध्याकाळी नक्की सांगतो...तसं तुम्हीही शोध चालू ठेवा.... 

आशिष : ठीक आहे मी अजून माझ्या सासऱ्यांना.. दिवाकररावांना देखील कामाला लावतो.... आज कुठल्याही हालतीमध्ये आपल्याला app developer मिळायलाच हवा.... 

समायरा : app developer??  

तितक्यात तुषारने डोळे मोठे केले... आणि डोळ्यांनीच नाही असं खुणावलं... 

समायरा शांत झाली..... 

आशिष : हो app developer असेल तर सांगा..... 

समायरा आणि तुषार : हो... 

आशिष तिथून निघून गेला.... 

तुषार : समायरा !! बरं झालं तू नलिनीचं नाव घेतलं नाहीस... 

तूला कुणी सांगितलं की,  मी नलिनीचं नाव घेणार होते ते... ???? समायरा फिरकी घेण्याच्या सुरात म्हणाली..... 

तुषार : म्हणजे तुला अजून दुसरा कुणी developer सांगायचा होता का??

समायरा : तसं तर नलिनीचं नाव घ्यायचं होतं... पण आशिषच्या कपटी स्वभावामुळे पण नको वाटले आणि तू सुद्धा खुणावलं होतं ना.... 

तुषार : बरं समायरा !! आपल्या ऑफिसमध्ये नलिनी करेल का?? 

सामायरा : ती आता रिकामीच आहे....पण कशाला?? 

तुषार :तूला माहीती आहे का समायरा?? आशिष कश्यामुळे घाई करतोय... 

समायरा : मला काही कल्पना नाही.... 

तुषार : अगं मार्थाचा मुलगा येणार आहे... त्या आधी चांगला हात मारायचा प्लॅन असेल....

समायरा : अच्छा.... पण दोन दिवसात तरी ते कसं शक्य आहे??

तुषार : अगं समायरा व्यवहारात अडकवून टाकायचं अजून काय?? मग बाकीचं नंतर बघता येईल.... असा विचार तो करत असावा... 

तो सुहास आल्यानंतर त्याला सेटल होईपर्यंत यांचं काम झालेलं असेल.... 

समायरा : मग तू आता काय विचार केला आहॆस.....

तुषार : बस्स हे दोन दिवस वैऱ्याचे आहेत.... त्याच्यानंतर आपली नलिनी जॉईन करू शकेल... 

समायरा : आपली नलिनी???? की माझी खास मैत्रीण नलिनी ????
 तुषार : तेच ते गं... तूझी खास मैत्रीण... समायरा नलीनीला एकदा फोन लाऊन विचार ना ती इच्छुक आहे का? ते.... 
समायराने नलीनीला फोन???? लावला... नलीनीने देखील काही आडे वेढे न घेता होकार दिला...तीचा डबल फायदा होणार होता... ती नकार तरी कसा देणार....

तुषारने युक्ती काढली... just dial वरून चांगले महागडे developer शोधून काढले... जेणेकरून आशिष यांना रीजेक्ट करेल....
 वा तुषार वा !!इथे पण "साप भी मरगया, और लाठी भी नही टुटी "असच होणार असं दिसतंय.... असं मनात वाटून तुषारने मनातच त्याची पाठ थोपटली....

तुषार त्या devloper चे नंबर घेऊन आशिष जवळ गेला... 

आशिष : तुषार !! काय मिळाले का developer?? .... इतक्या लवकर developer मिळतील अशी अपेक्षा नसल्याने आशिषने उपहासात्मक पद्धतीने विचारलं..... 

तुषार : हो, इतक्या अल्पावधीत just dial शिवाय पर्याय नव्हता.... मी हे पाच developer बघितले आहेत.... त्यातला तू कुठलाही बघू शकतोस.... हे त्यांचे फोन नंबर आहेत....

आशिष : good job... तुषार, या पाच मधला तूला कुठला योग्य वाटतो... 

तुषार : मी जे सिलेक्ट केले आहेत त्या सगळ्यांची rating 4.5 ते 5  च्या दरम्यान आहे.... पाचही जण किती अमाऊंट घेतील हे मात्र त्यांना पर्सनली विचारावे लागेल.....

आशिष : ठीक आहे, उद्या पर्यंत मी एक जण ठरवूनच टाकतो.... 

ठीक आहे येतो मी म्हणत तुषारने तिथून काढता पाय घेतला.... आणि आपल्या केबिन मध्ये येऊन बसला... 

समायरा : तुषार तूला खात्री आहे.. आशिष त्या developer पैकी एक जण निवडणार नाही याची..... 

तुषार : अगं त्यांची app बनवण्याची price लिस्ट खूप high आहे... जर त्यांच्यापैकी एक निवडला तर त्याच्या हाती काहीच लागणार नाही.... जेव्हा हवा तसा फायदा होणार नाही तेव्हा आशिष कश्याला कुणासोबत डील करेल... 

समायरा : you are simply great.... काय डोकं चालवलंस... 

तुषार : ????आहे, म्हणून चालवलं....... आता बघ परवा नलिनी कशी सिलेक्ट होती ते.... असं म्हणून तुषार तीचा विचार करायला लागला.... 

समायरा : अच्छा, म्हणजे सर्व काही नलिनीसाठी आहे त????.... 

तुषार : हं.... काय??????फक्त नलिनीसाठी म्हणून नाही तर या ऑफिससाठी.... इथलं फ्रॉड उघडकीस आणण्यासाठी... भलेही आपण वाममार्गाने कामाला सुरवात केली.... आपला हेतू तर चांगलाच आहे ना....

समायरा : काही का असेना या सगळ्या वातावरणामुळे एक  गोष्ट चांगली झाली.... माझे सकाळचे टेन्शन कुठल्या कुठे पळून गेले.... 

तुषार : good, चला आज या आशिषच्या नादात खूप मोठा टाईम पास झाला आहे.... आपले कालच्या कस्टमरच्या फाईल्स एकदा चेक करून घेऊ.... कुणाचं काही राहिलं तर नाही ना..... 

दोघेही आपापल्या कामात व्यस्त झाले....

मार्था मात्र ऑफिसला नुसती धावती भेट देत होती..  तीचा सुहास येणार आहे हे कळाल्यापासून ती त्याच्या स्वागताची  तयारीसाठी लागली होती.... 

इकडे आशिष आणि दिवाकरने पाचही devloper सोबत मिटिंग fix केल्या....वेळ कमी असल्यामुळे आशिष ने तीन developer निवडले आणि दिवाकरने दोन.... 

आणि दोघेही लागलीच मिटिंगसाठी गेले.... मिटींग्स झाल्या दोघांनाही कुठलाच developer आवडला नाही.... 

दिवाकरची शेवटची मिटिंग झाल्यावर दिवाकर आशिष च्या घरी आला.....
दिवाकरच्या लेकीने अस्मि ने दरवाजा उघडला... 

अस्मि : बाबा तूम्ही?? आज इथे...काही झाले आहे का?? 
दिवाकर : बेटा... जावईबापू कुठे आहेत.... 

अस्मि : कुठली तरी मिटिंग आहे.... अजून संपली नसेल... 

दिवाकर खूप बेचैन झालेला होता.... सैरभैर झाल्यासारखं तो तिथल्या हॉल मध्ये फेरे मारत होता.... 

अस्मि : काय झालं बाबा... तूम्ही खूप जास्त परेशान दिसत आहात... 
दिवाकर : हो बेटा !!मला आशिषरावांशी खूप महत्वाचे बोलायचे आहे.... 

अस्मिने दिवाकरला पाणी आणि चहा देत वाचण्यासाठी म्हणून वर्तमान पत्र दिले.आणि म्हणाली.... बाबा तूम्ही जरा निवांत व्हा बरं.... ते येतीलच इतक्यात.....

थोडया वेळाने आशिष त्याच्या घरी आला... बाबा तूम्ही !!आशिष दिवाकरला पाहून म्हणाला.... 

दिवाकर : आशिष मला तूला महत्वाचे बोलायचे आहे.... 

आशिष : हो बाबा बोलूत... मी जरा फ्रेश होऊन येतो.... म्हणून आशिष त्याच्या बेडरूमकडे गेला.... 

दिवाकर :अस्मि बेटा आज मी इथेच जेवणार आहे... छान नॉनव्हेज बनव बरं.... बरेच दिवस तूझ्या हातचं नॉनव्हेज खाल्लं नाहीये मी.... 

अस्मि : बाबा नॉनव्हेज आणि आता... म्हणजे तूम्ही दोघेही ड्रिंक्स ????करणार.... थोडं नाराजीच्या सुरात अस्मि म्हणाली.... 

दिवाकर :अगं ड्रिंक्स नॉमिनल ????जेवणापुरतं... जमेल ना तूला?? .. 

अस्मिने घड्याळाकडे बघितलं आणि म्हणाली जमवावं???? लागेल... बाहेर असलेल्या वाचमनला आवाज देऊन नॉनव्हेज आणण्यासाठी पिशवी आणि पैसे दिले...... 

खरं तर नॉनव्हेज???????? हा बहाणा होता... अस्मिला त्यात गुंतून ठेवण्याचा....  त्यांच बोलणं तीने चुकूनही ऐकू नये अशी त्याची इच्छा होती.... 

आशिष फ्रेश होऊन आला... पहीले किचनमध्ये गेला आणि अस्मि काय करते आहे त्याचा अंदाजा घेतला..

आशिष :अरे वा आज नॉनव्हेज चा बेत दिसतोय... आमचं नाही असं स्वागत होत कधी.... आशिष लाडात  येऊन म्हणाला.. 

अस्मि : असं का? पण हा बेत तुमच्या सासऱ्यांनीच ठरवलाय.. जा बघा काय बोलायचं आहे त्यांना.... नुसतेच सैरभैर झाल्यासारखे वाटत आहेत... 

आशिष : जशी आपली आज्ञा महाराणी साहेबा.... 
असं म्हणून तिला मागूनच मिठीत घेतलं....  अस्मिने अहो हे काय करताय, बाबा बघतील ना,  म्हणून हिसका दिला.. थांव गं बाबा गेल्यावर तूला बघतो मी, अशी प्रेमळ धमकी त्याने अस्मिला दिली ????????.

आशिष हॉल मध्ये आला....
 हॉलच्या शोकेस मधले दोन ग्लास काढून तिथल्याच फ्रिज मधून एक व्हिस्कीची बॉटल, पाणी आणि बर्फ काढून घेतले ..... दोन पेग तयार केले.... आणि दिवाकर च्या हातात एक पेग देऊन स्वतःसाठी दुसरा पेग घेतला आणि आरामखुर्चीवर बसून म्हणाला,  "बोला बाबा.... काय बोलायचे आहे तूम्हाला."... 

दिवाकर :आशिषराव माझी शंका खरी आहे.... तुषार दिसतो तितका साधाभोळा नाही... 

आशिष : कश्यावरुन????..... 

दिवाकर: मी खात्रीने सांगतो की आजच्या मिटिंग मध्ये तुलाही काही साध्य झालं नसणार....तुलाही developer पटला नसणार..... 

आशिष :तुमचं खरं आहे की मला developer पटला नाही ... पण यात तुषार चालू आहे हे कसं सिद्ध होतं.... 

दिवाकर :अरे तो निव्वळ टाईम पास करवत आहे.....आता तर फक्त उद्याचा दिवस.... परवा तर सुहास ऑफिसला  येणारच आहे ना..... 

आशिष : हो तुमच्या गोष्टी मध्ये मला आताही थोडं तथ्य वाटायला लागलं ... त्याने जाहिरातीच्या वेळेस देखील असंच केलं होतं..   उलट हा तुषार आल्यापासून आपल्याला मोठा काय छोटा देखील हात मारता आला नाही .... 

दिवाकर : मी सुरुवातीपासून सांगत होतो की हा दिसतो तितका साधा नाही....  

आशिष : म्हणायला त्याने स्वतःजवळ चार्ज पण घेतलेला नाही.... पण बाबा!! हे तर खरं आहे ना की त्यानी चार्ज घेतला नाही.... त्याला आपला संशय आला असेल का?? 

दिवाकर :, तो जर इतका हुशार असेल तर त्याला नक्कीच आपला संशय आला असेल.....

आशिष : पण आता आपण काय करायचं?? 

दिवाकर : ती NINA मल्टीनॅशनल कंपनी माहीती का तूला.... त्यांची app एका developer ने फक्त दोन लाखात तयार करून दिली.... त्या डेव्हलपरचा नंबर मी आणला आहे..... 

इतकी स्वस्त.... मग आपल्याला आपली app कागदोपत्री सात लाखाला तयार करून घेता येईल ????हो ना... समोरच्या प्लेट मधला रोस्टेड काजू हातात घेत आशिष म्हणाला..... फोन लावू का आता त्या developer ला.... 

दिवाकर : हा तो developer नाही,  ती developer आहे.... आणि आता नको सकाळी फोन लाव तीला....

आशिष : पण आपल्याला तीचे काम कसे आहे ते कसं कळेल.... 

दिवाकर : एकदम परफेक्ट आहे... त्या कंपनीला पाहिजे त्या पेक्षाही जास्त आणि चांगले पॉईंट्स तीने कव्हर केले आहेत म्हणे.... त्या कंपनीत माझा एक मित्र आहे त्यानेच मला तीची सगळी माहीती दिली.....

ठीक आहे सकाळीच तिला फायनल करतो... 
क्रमश:
©® डॉ. सुजाता कुटे.
कथा आवडल्यास like करून comment करा. 
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव 

©® डॉ. सुजाता कुटे 


.

🎭 Series Post

View all