किती सांगायचं मला (भाग 18)

Nalini told samayra about Tushar

समायरा तिच्या घरी पोहोचली.... 

समायराची आई : समु नीट आलीस ना !! भिजली बिजली नाहीस ना.... 

समायरा : अगं आई बसने येते ना मी.....बरं झालं मी बस मध्ये बसल्यावर पाऊस सुरु झाला....इतकी काळजी करू नकोस गं माझी..... मी घेईल स्वतःची काळजी.... 

समायराची आई : अगं तू घेशीलच काळजी पण एखाद्या राजकुमाराच्या हातात हात देई पर्यंत तर आम्हाला काळजी करावी लागेल ना.... 

समायरा :काय गं आई !!तूला नुसती थट्टा मस्करी सुचतेय.... मी नाही लग्न करणार... मी इथेच राहणार?? 

अमोघ :हो का ???? अमोघने समायराकडे बघून डोळा मारला 

इकडे तुषार आणि नलिनी आपापल्या घरी पोहोचले...

 दोघेही खूप खूष होते.... दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद अगदी ओसंडून वाहात होता....जणू काही त्यांच्या आयुष्यातील तो एक सुवर्ण क्षण होता.... दोघानाही ती भेट अपुरी वाटत होती.... दोघांनाही काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं........ 

तुषार तर खूप विचलित झाला होता..त्याला घरी पोहोचल्यावर आईला मदत देखील करावीशी वाटली नाही.... फक्त नी फक्त नलीनीच्या प्रेमात बेधुंद झाल्यासारखं झालं होतं.... 

तुषारच्या आईला वाटले.... रोज रोज काम करून एक दिवस तुषारला कंटाळा आला असेल.... म्हणून तीने एकटीनेच लवकर स्वयंपाक उरकला......

दोघेही जेवायला बसले....आता जेवणातही तुषारचे लक्ष नाही हे त्याच्या आईला लक्षात आले होते.... 

तुषारची आई :तुषार !!अरे काय झालं आहे तूला....

तुषार : काय झाले आई?? 

तुषारची आई : अरे मी तू घरी आल्यापासून बघत आहे.तूझं कशातच लक्ष लागत नाही... 

तुषार : काही नाही आई... आज काही करावंसं वाटत नाही... 

तुषारची आई : तब्येत ठीक आहे ना तूझी?? 

तुषार :हो आई, तसं काही नाही... जेवण झालं की आराम करतो मग वाटेल बरं.... 

तुषारने कसं बसं जेवण उरकलं आणि त्याच्या फोन कडे पाहू लागला....आपल्याकडे नलिनीचा फोन नंबर असता तर?? 
लागलीच तुषारला एक कल्पना सुचली.... त्याने समायराला फोन लावला..... 

तुषार :हॅलो समायरा !!

समायरा : बोल तुषार !!कसं काय फोन केलास.... 

तुषार :अगं नलिनीचा फोन नंबर मिळू शकेल का मला... माझ्या एका मित्राला app devoloper पाहीजे होता योगायोगाने मी त्याला नलिनीचे नाव सांगितले.... तर तो तिच्याकडून काम करून घेण्याचं म्हणत आहे.... 

समायरा : अच्छा असं आहे तर... पण नक्की तूझ्या मित्रालाच तीचा नंबर हवा आहे ना?? की तूला... 

तुषार : हो हो माझ्या मित्रालाच हवा आहे.... मी असं करतो माझ्या मित्राचा नंबर तूला देतो... तूच मग त्याला नलिनीचा नंबर दे.... 

समायरा : बरं बाबा... राहू दे.... देते मी नंबर असं म्हणत तीने नलिनीचा नंबर पाठवला...

तुषार : थँक्स समायरा, ठेवतो फोन असं म्हणत फोन ठेवून दिला....

नंबर तर मिळाला पण आता फोन काय म्हणून करणार..असा विचार करत असताना तुषारला पुन्हा कल्पना सुचली..... 

तुषारने नलिनीला फोन लावला.... 

नलीनीने फोन नंबर बघितला... "unknown number " truecaller वर.. तुषार नाव आलं.... 

नलिनीला तुषार नाव बघताच एकदम धडधड करायला लागलं.... तुषार आणि फोन... बाबा पण घरी आहेत... फोन घेऊन ती गॅलरीमध्ये गेली... 

नलिनी : हॅलो ... 

तुषार : हॅलो नलिनी मी तुषार बोलतोय.... 

नलिनी : बोल तुषार कसाकाय फोन केलास... 

तुषार : तू busy नाहीस ना... मला थोडीशी माहिती हवी होती.... 

नलिनी : कसली माहीती.... 

तुषार : अगं तू app develper आहॆस ना त्या विषयी....

नलिनी : अच्छा, काय माहीती हवी होती... 

तुषार : तिला तिच्या कामाविषयी सगळी माहिती विचारली आणि थँक्स म्हणून फोन ठेवून दिला.... 

नलिनीला आता लक्षात आले होते की माहिती तर हा एक बहाना होता... त्याला तिच्याशी बोलायचं होतं... तसंच नलिनीला देखील तुषारशी  बोलावंसं वाटत होतं म्हणून ती ही खूप खूष झाली होती.... 

तितक्यात तिच्या वडिलांचा खाकरण्याचा आवाज तीला आला.... चला बाबा तूम्हाला मी जेवायला वाढते असं म्हणून नलिनी किचनकडे वळाली.... 

नलिनी आणि तुषार दोघांनाही झोप काही लागत नव्हती.... सारखं सारखं दोघांचंही लक्ष आता फोन कडे चाललं होतं.... 

नलिनीला वाटायचं तुषारने काहीतरी मेसेज करावा आणि तुषारला वाटायचं नलिनीने काहीतरी मेसेज करावा...दोघेही बराच वेळ ऑनलाईन.. पण मेसेज करायची हिम्मत काही होत नव्हती.... शेवटी कंटाळून नलिनीने तीचा मेसेंजर बंद केला....

नलिनी संध्याकाळी घडलेल्या गोष्टी आठवून आनंदी होत होती.... तर तुषार बैचेन होत होता.. ... तुषारला तर काहीच समजत नव्हतं काय करावं... सांगावं का नलिनीला... की समायराची मदत घ्यावी.... काहीच कळत नव्हते.....

नलिनीची तर समायरा एकदम जवळची मैत्रीण होती... नलिनी आणि समायरा कुठलीही गोष्ट एकमेकांपासून लपवत नसत.... त्यामुळे तुषार तीला आवडायला लागला हे समायराला कधी एकदाची सांगते असं झालं होतं... 

 पण समायराचा ऑफिस टाईम 9 ते 5 असल्यामुळे मध्ये तर भेटता येत नव्हतं मग 5 नंतर समायराच्या बस स्टॉप वर तीला भेटू... म्हणजे तुषारची भेट होईल.... आणि नंतर समायरा सोबत गप्पाही करता येईल.....  बस स्टॉप वर जाऊन दोघांनाही सरप्राईज द्यायचे ठरवले....

दिवसभरात नलिनी सारखं सारखं ड्रेसिंग टेबल कडे जात होती... आरश्यात स्वतःला न्याहाळत होती.... स्वतःलाच प्रश्न करत होती.... मी त्याला मनापासून आवडत असेल ना !! त्याचा टाईम पास तर नसेल ना... पुन्हा तिचं मन तीला म्हणायचं नाही नाही त्याच्या डोळ्यात मला सच्चेपणा दिसला होता.....


घड्याळीचे चारचे ठोके पडले तसं नलिनीला एकदम धडधड करायला लागलं... एक अनामिक भीती वाटायला लागली...

 मग ती स्वतःची समजूत काढायला लागली... अगं नलिनी तू काही तुषारला प्रपोज करायला नाही चाललीस... तू समायराला सांगायला चालली... आता जरा कूल व्हा आणि तयारीला लागा... नाहीतर आपलं सरप्राईज, सर प्राईजच राहील......

नलिनीने बरोबर तुषार आणि समायराच्या ऑफिस सुटण्याची वेळ साधली.... बरोबर ती समायराच्या बस स्टॉप वर येऊन थांबली....

नेहमीप्रमाणे तुषार समायरा आणि तुषार बाईक वर आले... दोघांनाही नलिनीला पाहून खूप आश्चर्य वाटले.... तुषार देखील नलिनीला पाहून एकदम खूश झाला....तुषारने  लागलीच हेल्मेटचा ग्लास सरकवला 

समायरा : नलिनी तू इथे?? 

नलिनी :तुषार कडे बघून... अगं मला इथेच जवळपास काम होते ते झालं मग मी घड्याळाकडे बघितलं तर तूझी ऑफिस सुटण्याची वेळ होती..... म्हटलं तूला सरप्राईज देऊ.... आणि कामामुळे आपण आपल्या अड्डयावर पण जाऊ नाही शकलो.... तितकाच आपल्यासाठी वेळ.... 

तुषार : अड्डा?? 

समायरा : आमचं सिक्रेट आहे ते.... 

तुषार : सिक्रेट, ok, ok चालू द्या तुमचं... निघतो मी.... 

नलिनी :अरे हा तर लागलीच निघाला.... 

समायरा : अगं त्याच्या आईची तब्येत खराब झाली होती ना तेव्हापासून तुषार ऑफिस सुटलं की टाईमपास करत बसत नाही.... 

नलिनी :हो का??  पण परवा तर... 

समायरा : काय??

 नलिनी : बरं समायरा !! आधी ऐक .... तू तूझ्या आईला फोन करून सांग... की तूला घरी जायला उशीर होणार आहे म्हणून.... मला तुझ्याशी खूप काही बोलायचं आहे....

समायरा : बरं ठीक आहे... म्हणून समायराने तिच्या आईला फोन लावला.... आई माझी आणि नलिनीची भेट झाली आहे... मी तिच्यासोबत थोडं बाहेर जाणार आहे... मला यायला उशीर होईल.... नलिनी स्कुटीवर सोडून देईल.. 

समायराची आई : ठीक आहे बेटा !!पण जास्त उशीर करू नकोस.... ठीक आहे ठेवते फोन.. 

नलिनी आणि समायरा दोघीही स्कुटीवर निघाल्या त्यांच्या नेहमीच्या अड्डयावर.... 

त्यांचा नेहमीचा अड्डा म्हणजे समुद्री बीच.... तिथे नेहमी येऊन तिथल्या चाट चा आस्वाद घेत त्या दोघी बऱ्याचदा गप्पा मारत असत.... 

त्यांचा अड्डा म्हणजे निसर्गाचा आस्वाद घेत मनातली सगळी गुपित उलगडत असत..... 

दोघीही तिथे पोहोचल्यावर पाणीपुरीचा आस्वाद घेऊन  दोघीही तिथे असलेल्या बाकावर बसल्या.... 

नलिनी : समायरा मला तूला काहीतरी सांगायचं आहे.... 

समायरा : बोल ना... काय सांगायचं आहे?? 

नलिनी : तूझा नवरा मला खूप आवडलाय?? 

समायरा :काय ????

तितक्यात बाजूने आवाज आला  जळलं मेलं लक्षण.????... आजकालची पिढी चक्क नवरा आवडतो सांगण्याइतपत हिम्मत करते.... एक आजी बडबडत होत्या.... 

त्यांची बडबड ऐकून दोघींच्या माना त्यांच्याकडे वळाल्या.... त्या आजीला बघून दोघीनींही डोकयावर हात????‍♀️????‍♀️ मारला 

ती आजी तिथून गेल्यावर दोघीही मनसोक्त हसल्या ????????मग हळूच समायराने नलिनीला चिमटा काढला.... 

समायरा : तूझी हिम्मत काशीकाय झाली... माझ्या नवऱ्यावर डोरे टाकायची..... 

समायराचे ते बोलणे ऐकून नलिनीचा एकदम चेहराच उतरला ????

समायरा : नलिनी !! Just kidding dear.... पण तूला आणि तुषार !!कधीपासून?? 

नलिनी :  समायरा !! मला तर तू घाबरवून टाकलं होतंस... अगं परवा मी माझा प्रोजेक्ट सबमिट करायला गेले होते... असं म्हणत तीने सर्व काही सांगितलं..... 

समायरा : तुषारला माहीती आहे का?? 

नलिनी :नाही गं... मी पहिल्यांदा तुलाच सांगत आहे.... 

समायरा : पण तुषार तर तूला पहिल्यापासून बराच डिस्टर्ब वाटत आहे.... आजकाल बऱ्याच वेळा तूझा विषय तो काढतो.... काल त्याने तूला फोन केला होता का गं?? 

नलिनी : हो app सॉफ्टवेअर बद्दल विचारत होता.... 

समायरा : मला तर वाटतं तो बहाणा होता.... तूझा नंबर मिळवण्यासाठी.....

बरं ऐक !!  जवळ जवळ दोन महीने पूर्ण होत आहेत मी तुषार सोबत काम करत आहे... अनुभवाने सांगते तो खरंच खूप चांगला मुलगा आहे... हं अधून मधून थोडा आगाऊपणा करतो पण त्यामुळे एक जिवंतपणा जाणवतो.... मी त्याच्यासोबत बाईक वर बसते पण तो बाईक खूप व्यवस्थित चालवतो... धक्का पण लागू देत नाही..... जर खरंच त्याला तू आवडत असशील तर तो शेवटपर्यंत साथ देईल इतकी गॅरंटी वाटते.... 

नलिनी : बापरे समायरा तू तर एकदम स्तुतीसुमने उधळतआहॆस.... पण त्याला मी आवडते हे त्याच्या बोलण्यातून आणि वागण्यातून जाणवत आहे खरं... पण देव जाने त्याच्या मनात काय आहे... 

समायरा : तो इमोशनल पण वाटतो.... त्याच्या आईच्या वेळेस बघितलं मी.... तो खूप घाबरला होता..... 

नलिनी : समायरा खरंच तूझ्याशी बोलून मला आता खूप मोकळं वाटत आहे.... नाहीतर मी खूप बेचैन झाले होते... मला बिलकुल करमत नव्हते.... 

समायरा : तुषारला सांगून टाकू का??  म्हणजे उगाचच ही घालमेल कशाला?? 

नलिनी : नाही, नको.... जर तुषारच्या मनात काहीच नसेल तर उगाचच तू वाईट होशील.... 

समायरा :आणि मनात असेल तर??? जास्त प्रिय का ????

नलिनी : अगं तसं नाही.... जे काही असेल त्याला मनापासून वाटत असेल तर?? त्याला प्रयत्न करू देऊ

समायरा : माझा नवरा तूझा नवरा ???????????? पण joke apart... नलिनी समजा तुमचं जमलं तर तू तूझ्या बाबांशी कसं बोलशील... ते तर खूप कडक आहेत??

नलिनी : समायरा मी इतका विचारच नाही केला.... समायराच्या त्या प्रश्नाने नलिनी टेन्शनमध्ये आल????.... 

समायरा: चल चाट पापडी खाऊ... नलिनीला आलेले टेन्शन पाहून समायराने विषय बदलला... 

चला नलिनी घरी जाऊया... खूप दिवसांनी आज एकदम रिलॅक्स झाल्यासारखं वाटत आहे..... नाहीतर रोज एका नवीन आव्हानाला समोर जावे लागत आहे.... कंटाळा आला आहे अश्या गोष्टींचा... आयुष्यात कधी खोटं बोलले नाही पण या नौकरीमुळे रोज काहीना काही खोटं बोलावं लागत आहे.... थँक्स डिअर आज खूप छान वाटलं... 

नलिनी : काहीतरीच काय समायरा !! उलट मला माझे मन मोकळे करायला मिळाले..... 

समायरा : hey... wow तूझ्या पर्सकडे आता लक्ष गेलं माझं... किती सुंदर आहे....बघू... असं म्हणून समायराने नलिनीची पर्स बघितली.... वा कप्पे पण बरेच आहेत.... कुठे घेतली.... 

नलिनी : मॉल मधून घेतली.... पर्सच्या क्वालिटीच्या मानाने किंमत ही कमी आहे.... 

समायरा : माझी उद्या दुसऱ्या महिन्याची सॅलरी होईल.... परवा आपण पुन्हा भेटू.... सोबतच मॉल मध्ये जाऊ मग मला त्या पर्सच्या शॉप मध्ये तू घेऊन जा.... आणि आणि आणि मला दोन दिवसात प्रोग्रेस पाहीजे.... समजलं का?? 

नलिनी : आता ते तूझ्या नवऱ्याच्या हातात आहे ????????????
दोघी मिळून खूप हसल्या 

मग नलिनीने आपली स्कुटी काढली आणि समायराला सोबत घेऊन घरी सोडायला गेली.

घरी पोहोचल्यावर समायराची आई.... अगं नलिनी तू का बाहेर उभी... ये की आत...

नलिनी : नाही काकू येते मी.... खूप उशीर होतोय.... 

समायराची आई : अगं काही होत नाही, जेवण करून जा मी तूझ्या नावाचा पण स्वयंपाक केला आहे.... 

नलिनी : पण बाबा?? 

समायराची आई : भाऊजी??  थांब मी तूझ्या आईला फोन करते मग तर झालं... जा दोघी, हातपाय धुवून घ्या मी ताटं करते..... 

समायरा : आई पण थोडं थोडंच वाढ..... आम्ही बाहेर जरा चाट खाऊन आलो आहे.... 

दोघीही फ्रेश होईपर्यंत समायराच्या आईने नलीनीच्या आईला फोन करून सांगितलं आणि ताटं तयार केले..... 

नलिनी : काकू तूम्ही उगाच त्रास करून घेतला... 
आम्ही वाढून घेतलं असतं ना?? 

समायराची आई :असू देत गं... किती दिवसांनी आलीस तू??... बाकी कसं चालू आहे तूझं... लग्नाचं काही बघत आहेत का?? 

नलीनीने लाजून नकार दिला... 

समायरा : आता लवकरच बघायला लागतील हो की नाही नलिनी ????

नलिनीने एकदम मान वरती केली ????

समायराची आई : व्यवस्थित जेवा पोरींनो... काही लागलं तर पून्हा घ्या?? 

क्रमश :

कथा आवडल्यास like करून comment करा. 
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव 

©® डॉ. सुजाता कुटे 

🎭 Series Post

View all