किती सांगायचं मला (भाग 16)

They told martha about event manager

समायरा :हॅलो तुषार !!आम्ही निघत आहे आता तू तूझ्या आईला सगळी कल्पना दिलीस ना... नाहीतर आपला पचका व्हायचा.... 

तुषार काही बोलणार इतक्यात समायरा म्हणाली, मार्था आली आहे.. ठेवते मी फोन... 

मार्था :काय !!तुषारला केला होतास ना फोन?? 

समायरा : हो... आपण निघतोय असं सांगितलं...

इकडे तुषारची आई हातात पिशवी घेऊन निघाली... 

तुषार :आई !!कुठे चालली आहॆस.. 

तुषारची आई :दूध आणायला.... 

तुषारने ते ऐकून डोक्यावर हात मारला.... तू घरी थांब... मी आणतो दूध... 

तुषारने पटकन मोटरसायकल ची चावी घेतली आणि कोपऱ्यावरच्या दुकानातून दूध आणलं... 

तुषारनेच ते दूध पॅकेट फ्रिज मध्ये ठेवलं.... आणि त्याच्या आईचा हात पकडला आणि तीला हॉल मध्ये सोफ्यावर बसवलं....आणि तिला आता काही सांगणार की तुषारचा फोन पून्हा खणखणला.... 
तुषार ने फोन बघितला... समायरा?? 

तुषार :बोल समायरा.... 

समायरा : तू काही आईला सांगितलेस का?? 

तुषार( मनात ):तू सांगू दिलंस तर ना... आता सांगतच होतो.... 

समायरा : नको सांगू..... 

तुषार :एकदम आश्चर्याने... काय??? 

समायरा: हो आमचं येणं कॅन्सल झालं आहे.... 

तुषार : काय?? एकदम अचानक.... 

समायरा : अरे आम्ही निघालो तितक्यात मार्थाच्या मुलाचा सुहासचा फोन आला... तो चार पाच दिवसात अमेरिकेहून कायमस्वरूपी भारतात येणार आहे... मार्थाला त्यामुळे तिथून लागलीच जावं लागलं... काहीतरी वकिलाची भेट घेते urgent असं म्हणाल्या.... आणि तूझ्या घरी येऊ शकणार नाही सॉरी म्हणाल्या.... 

समायराचे ते वाक्य ऐकून तुषारच्या जीवात जीव आला... हुश्श, सुटलो एकदाचा पण आता आईला काय सांगू....
समायरा :काहीही सांग... विषय बदल... चल मला उशीर होत आहे... फोन ठेवते 

असं म्हणून समायराने फोन ठेवला 

तुषारची आई : अरे तुषार !!काय बोलायचं होतं तूला?? बोल ना पटकन... दूध तापवायचं आहे मला.... 

तुषार : अं.. काय?? कुठे काय?? अगं फोन आला... हम्म आता आठवलं मघाशी ती मुलगी आली होती ना तीची आणि तूझी ओळख कशी?? 

तुषारची आई: ती होय.... ती मागे एकदा आली होती आपल्या शेजारी देशमुख  राहतात ना त्यांची चौकशी करायला... भली पोरगी दिसते ती.... 

तुषार :काय ???? आधी घरी आली होती.... बरं ऐक ना आमच्या बॉसचं येणं कॅन्सल झालं बर का... त्यांना urgent वकिलांकडे जावं लागलं.... 

तुषारची आई : असं आहे का?? जाऊ दे.. मला एकदम बरं वाटलं की मीच येईल तुमच्या बॉसला भेटायला..... 

तुषार मनातल्या मनात... नको आई... आताच खूप मोठया संकटातून सुटका झाल्यासारखे वाटत आहे... पण काही का असेना !!! या सगळ्या गोष्टीमुळे माझी आणि नलिनीची भेट झाली तुषारने एक सुस्कारा टाकला.....

इकडे समायरा घरी पोहोचली....दिवसभराच्या टेन्शनमुळे तीचा चेहरा खूप सुकला होता... टेन्शन जरी कमी झालेले असले तरी तिचं डोकं खूप दुखायला लागलं होतं.....

समायराच्या आईने समायराचा चेहरा पाहिल्या पाहिल्या ओळखले.की आज समायराची खूप ओढाताण झाली आहे.... 

समायराची आई: आज माझी समु खूप थकलेली दिसते... काय झालं बेटा?? आज जास्त काम होतं का?? 

समायरा : हो गं आई... तूझ्यापासून तर काहीच लपत नाही.... माझं खूप डोकं दुखत आहे.... जेवण करून जरा आराम करेल मी.... 

समायराची आई :ठीक आहे तू फ्रेश होऊन ये... मी लागलीच ताट वाढते..... 

जेवण झाल्यावर कुणाशीच काही न बोलता समायरा बेडरूम मध्ये गेली.... दिवसभराचा मानसिक ताण.... त्यात तिच्या आईने जेव्हा चेहऱ्यावरून ओळखलं तेव्हा समायराला एक शंका आली... खरंच आपण ही लग्नाची गोष्ट आईपासून लपवू शकू.... ती तर मला नख शिखांत ओळखते...... 

विचार करतच समायराला झोप लागली...... 

दुसऱ्या दिवशी समायरा आणि तुषार दोघेही वेळेवर ऑफिसला पोहोचले..... 

मार्था देखील हजर झालेली होती.... मार्थाने तुषार आणि समायराला गणेश करवी केबिन मध्ये बोलावून घेतले....

मार्था :तुषार !!!आता कशी तब्येत आहे आईची?? 

तुषार :एकदम ठणठणीत.... 

मार्था : काय झालं होतं?? 

तुषार : माझ्या आईला मधुमेह आहे.... तीची रक्तातील साखर कमी झाली होती... बरं झालं मी घरी वेळेवर पोहोचलो..... 

मार्था :मला भेटायला यायचं होतं पण अचानक माझ्या मुलाचा फोन आला... मला काही महत्वाच्या कामांसाठी वकिलाकडे जावं लागलं.....जाऊदे नंतर पुन्हा कधीतरी येईल मी....बरं अजून एक आता माझा मुलगा येणार आहे... technical गोष्टीमध्ये आपल्याला त्याची खूप help होईल....

तुषार : technical गोष्टींमुळे आठवलं.... आपली कंपनी इतकी नावाजलेली आहे पण आपल्या कंपनीची app मला कुठेच दिसली नाही.... 

मार्था :  आपल्याकडे कुणी तितका इंटरेस्ट घेतला नाही... कुणाला कॉम्प्युटर तितकं येत नाही... तूम्ही दोघे करू शकता का?काही दिवसात माझा मुलगा येईलच.... तो पर्यंत तूम्ही त्या app च्या requirements तयार करा... 

तुषार : ठीक आहे मार्था..... आपण केलेल्या जाहिरातीमुळे आपले कस्टमर डबल वाढले आहेत... अरे हो समायरा !!तो फाईव्ह स्टार हॉटेल,काय नाव आहे त्याचं हॉटेल लंकेविरहि ओनरचा  मेल आलेला.... 

समायरा : मार्था !! उटीला आपण एका नवीन फाईव्ह स्टार हॉटेलसोबत डील केलेलं आहे... पण त्या ओनरला आपले मार्गदर्शन हवं आहे... मला असं वाटतं की आपण तिथे एखादा event organise करावा... म्हणजे जे newly married couple आहेत त्यांच्यासाठी खास games, स्पर्धा, साईट सीन, डी.जे. असा event organise होईल.... 

मार्था : कल्पना एकदम भारी आहे.... समायरा तू त्या ओनरला मेल कर आणि त्याला event बद्दल पाठव... ... बघुयात तो ओनर किती इंटरेस्ट घेतो ते.....

कथा आवडल्यास like करून comment करा. 
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा 
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव 

©® डॉ. सुजाता कुटे 

🎭 Series Post

View all