Sep 27, 2020
कथामालिका

किती सांगायचं मला (भाग 12)

Read Later
किती सांगायचं मला (भाग 12)

तुषारला दीपकने सांगितलेल्या माहीतीमुळे आपण विचार केलाय त्या पेक्षा देखील सगळं वेगळंच आहे हे कळालं होतं...

नंतर दोघांनीही जेवण केले आणि मग आपापल्या घरी गेले...

तुषार ने समायराला मेसेज केला... उद्या सकाळी आठ वाजता ऑफिसजवळच्या बसस्टॉप जवळ जो कॅफे आहे तिथे भेट... मला महत्वाची माहिती मिळाली आहे... ऑफिसमध्ये सांगता येणार नाही... 

समायराने ok असा रिप्लाय केला.... 

सकाळी ठरल्याप्रमाणे तुषार आणि समायरा दोघेही महत्वाचे काम आहे असे सांगून घराच्या बाहेर पडले...
दोघेही सकाळी ठरलेल्या ठिकाणी भेटले.... कॅफेमध्ये एका कोपऱ्यात असलेल्या टेबल बघून तिथे दोघेही बसले आणि  वेटरला इडली वडा ऑर्डर केला...

समायरा : बोल तुषार काय महत्वाची माहिती काढली आहॆस 

तुषार : ऐक... आशिष मार्थाचा पुतण्या आहे हे तर आपल्याला कालच कळाले होते.... तर आशिषने एम बी ए ची एंट्रन्स exam दिली होती. त्यात त्याचा रँक आला नाही... म्हणून त्याच्या आईवडिलांनी त्याला खूप सुनावले घराच्या बाहेर काढायला निघाले होते... त्या वेळेस मार्थाच्या नवऱ्याने त्यांना आडवले व मी त्याला माझ्या कंपनीत ठेवतो असा विश्वास दाखवला... 

मार्थाच्या नवऱ्याचं(टोनी ) आणि  त्याच्या लहाण्या भावाचे(जॉन ) एकमेकांवर जीवापाड प्रेम होते... मार्थालाही लग्न झाल्यानंतर जवळ जवळ वीस वर्ष काही मुलबाळ झालेले नव्हते... त्यामुळे ती तिच्या दिराच्या जॉनच्या मुलांना खूप जीव लावत असे...त्यांना आशिष आणि जेनी (कन्या )अशी मुले...

नंतर आशिषचे आईवडील एका अपघातात देवाघरी गेले आणि त्यांचा सांभाळ मार्था आणि तीचा नवरा टोनी याने केला...

 टोनीला काही वर्षांपूर्वी एका असाध्य आजाराने पछाडले आणि तो ही त्यात मरण पावला.... मरता मरता  त्याने सुहास सोबतचआशिषचा सांभाळ करायचा असं वचन घेतलं होतं... जेनीचं तेव्हा नुकतंच लग्न झालं होतं... आणि सुहासचे नुकतेच graduation पूर्ण होत आले होते...व तो पोस्ट graduation साठी अमेरिकेला जाणार असे ठरले होते.... 

आशिषने राज टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनी जॉईन केली आणि तो खूप मन लाऊन काम करू लागला... तो एक ना एक पैश्यांचा हिशोब मार्थाला देत असे ....कुठलाही धोका वगैरे करण्याचं त्याच्या मनात नव्हतं.... 

समायरा : मग डाळ कुठे शिजत आहे.... आपल्याला तर सरळ काहीच दिसत नाहीये 

तुषार :समायरा खरा व्हिलन आशिष नाही दिवाकर आहे.... 

समायरा : दिवाकर??  म्हणूनच तो आशिषच्या बाजूने बोलत होता... हो ना 

तुषार :हो, तर ऐक दिवाकर हा सगळ्यात जुना एम्प्लॉयी आहे... मार्थाने जशी कंपनी सुरु केली अगदीच तेव्हापासूनचा... तो मार्थाच्या लक्षात न येता छोटे मोठे हात नेहमीच मारत असे... 
पण आता पाच वर्ष झाले आशिषला कंपनी जॉईन करून 
सुरुवातीला दिवाकरला काही हात मारता येईना.... 

मग दिवाकरने आशिषचे कान भरायला सुरु केले.... त्याला सांगितलं की तुझाच अधिकार जास्त आहे या कंपनीवर!! तूच चांगला सांभाळत आहॆस... पूर्ण कंपनी तुझीच व्हायला हवी... 
आशिषला ते सगळे पटले आणि छोटे मोठे फ्रॉड करत आता दोघेही मोठा हात मारू लागले... मार्थाचा आशिषवर विश्वास असल्याने ती देखील आशिषने समोर केलेल्या कुठल्याही कागदावर अगदीच डोळे झाकून सही करायची.... चेकवर पण सही करायची त्यामुळे आपल्या मागे इतका फ्रॉड होत आहे ते तिच्या लक्षात आले नाही.... 

समायरा : बापरे !!
तुषार : भरीसभर म्हणून दिवाकरने आशिषला आपलं जावई करून घेतलं आहे.... 

समायरा : काय??  बापरे किती प्लांनिंग...कंपनी स्वतःची करून घेण्यासाठी.... 

तुषार :करेक्ट... दिवाकर मास्टर माईंड निघाला..... 

तितक्यात मागवलेला नाश्ता गरम गरम त्यांच्यासमोर आला.... पण विचारात मग्न असल्यामुळे दोघांनाही नाश्त्याची चव देखील समजली नाही.... 

समायरा : पण इतकी डिटेल माहीती... इतक्या लवकर त्या दीपकने कशी काढली... 

तुषार :योगायोगाने दीपकचे वडील आणि दिवाकर मित्र होते... पण दिवाकरच्या अश्या फ्रॉड करण्याच्या स्वभावामुळे त्यांची मैत्री तुटली होती... पण आधी बोलता बोलता दिवाकरने दीपकच्या वडिलांना त्यांचे प्लॅनिंग सांगितले होते.... 

नाश्ता उरकून दोघेही ऑफिस कडे निघाले.... 

तुषार : आता हा विषय बिलकुल तिकडे काढायचा नाही आणि आजच तूझ्या जाहिरातीसाठी आपण मार्थाची  परवानगी घेऊ.....

समायरा  : माझं तर डोकं सुन्न झालं आहे सगळ्या गोष्टी ऐकून....

तुषार : उलट आता टेन्शन कमी झाले आहे.... आपण आशिषसमोर आपली बाजू तितक्याच प्रगल्भतेने मांडायची.... जसं दिवाकर त्याला पटवू शकतो तसंच आपणही... पण आपल्याला आपण या बाबतीत खूप ढ आहोत याचा आव आणावा लागेल.... 
समायरा :बरं झालं आशिषचं कोडं सुटलं.... नाहीतर आपण कुठल्या लेव्हलला यात गोवलो असतो आपल्यालाही कळाले नसते... आणि एखाद्या फ्रॉड मध्ये आपले नाव घेतले गेले असते.... 

तुषार : चला... आता हा विषय बस्स... आपण भलं नी आपलं काम भलं!!!

दोघांनाही आपल्या डोक्यावरचा भार आता खूप हलका झाल्यासारखं वाटत होतं... काम करण्याची एक निश्चित अशी दिशा ठरवता येत होती.... कुणालाही न दुखावता कसे काम करता येईल याच्याकडे त्यांचा कल होता...

दोघेही ऑफिस मध्ये पोहोचले... 

तुषार : आपण जाहिरातीचा विषय आधी आशिषजवळ काढू... त्याला जाहिराती दाखवू!!

समायरा : अरे तुषार,  पण तो objection घेईल ना !!

तुषार : त्याला सांगू की ह्या जाहिराती फक्त पॅकेजच्या आहेत... आपल्याला सॉफ्टवेअर अँप्लिकेशन(app) तयार करायचं आहे तिथे बराच पैसा लागेल.... जवळ जवळ पाच ते सात लाख रुपये... मग कदाचित तो या शुल्लक जाहिराती सोशल मीडियावर टाकण्यासाठी परवानगी देईल.... 

समायरा : हुशार आहॆस !! त्याची परवानगी पण मिळेल आणि कुणी नाराज पण होणार नाही.... आणि app च्या वेळेस घबाड मिळेल या आशेने तो या पॅकेजच्या जाहिरातीत पैसा काढण्याच्या मागे लागणार नाही... 

तुषार : चल समायरा, आशिष जिथे बसतो तिथे आपण जाऊ... म्हणजे त्याला रिस्पेक्ट दिलाय असं वाटेल... 

मग तुषार आणि समायरा आशिषजवळ आले.... 

तुषार : आम्ही एक जाहिरातीचा छोटासा प्रयत्न केला आहे... एक नजर फिरवतोस का?? 

आशिष : मला वाटतं मी तूला सांगितलं होतं की जाहिरातीचं मी बघतो काय ते??  आशिष थोडं रागात येऊन बोलला... 

तुषार :रागात येऊ नको आशिष !!आम्हाला एक खूप छान कल्पना सुचली आहे... ह्या जाहिराती त्याच्यासमोर काही नाही... 

आशिष : म्हणजे?? बरं एक मिनिट थांब... मी आपल्या ऑफिसचे सगळ्यात जूने सहकारी दिवाकर सर यांना बोलावतो.... मग सांगा तुमच्या डोक्यात काय आहे ते.... 

तुषार : ठीक आहे !!

आशिषने गणेशला आवाज देऊन दिवाकरला बोलावून घेतले.... 

तुषार : आपण आपल्या कंपनीचं एक सॉफ्टवेअर app तयार करू... त्यात ही पॅकेजची विभागणी, ratings, review, complaints, ऑनलाईन नोंदणी. ऑनलाईन payment ह्या सगळ्या गोष्टी येतील...

इतकंच काय ज्या हॉटेल सोबत आपण जोडले जाऊ त्यांच्या जाहिराती आपोआपच त्या app वर झळकतील... फायदा आपल्याला होईल 

आशिष : त्यामुळे अजून काय काय फायदा होईल?? 

तुषार : लोकं घरी बसल्या बसल्या माहिती काढून बुकिंग करतील आणि हिशोब करण्यासाठी वेगळ्या व्यक्तीची गरज राहणार नाही.... सगळ्या गोष्टी क्रिस्टल क्लिअर राहतील.... पण आता ते app तयार करण्यासाठी पाच  लाख ते सात लाख रुपये लागतील...
 तूम्हाला एखादा app डेव्हलपर शोधावा लागेल... हे पैश्यांचं काम तूम्ही करा....आम्ही हे छोटं जाहिरातीचं फ्री मधलं काम करतो...
 
तुषार : समायरा ते जाहिरातीचे फोल्डर उघड आणि दाखव बरं..... 

समायराने फोल्डर उघडले आणि एक जाहिरात त्यांना दाखवली... 
 दिवाकरला कंपनीच्या सॉफ्टवेअर अँप्लिकेशन समोर म्हणजेच  सात लाखाच्या व्यवहारासमोर त्यांना जाहिराती चिल्लर वाटायला लागल्या.... 

दिवाकर : आशिषराव!! मला यांच्या जाहिराती खूप आवडल्या... समायरा !! जाहिराती एकदम छान झाल्या आहेत ... you are multi talented.... good keep it up ????

तुषार :मग या आम्ही सोशल मीडियावर पब्लिश करू?? 
एकदम साळसूदपणाचा भाव चेहऱ्यावर आणून तुषारने विचारले.... 

आशिष : हो !!लवकर अपलोड करा... आधीच खूप उशीर झाला आहे... 

तुषार आणि समायराने खूपच युक्तीने आशिषला पटवले  होते....पण एकदा नियमाप्रमाणे दोघांनीही सगळ्याच जाहिराती मार्थाला दाखवल्या.... तिलाही त्या जाहिराती खूप आवडल्या..... तीने देखील जाहिराती अपलोड करण्यासाठी परवानगी दिली.... 

मग वेळ न दवडता समायराने जाहिराती अपलोड केल्या... 

तुषार :"आज तो सेलेब्रेशन बनता है " साप भी मरगया और लाठी भी नही टुटी ???????????? 

समायरा : खरंच... आजचा दिवस काही वेगळाच आहे... सकाळी सगळं किती अवघड वाटत होतं...  पण आता सगळं कोडं सुटलं.... 
क्रमश :
©® डॉ.सुजाता कुटे
 क्रमश :
©® डॉ.सुजाता कुटे

Circle Image

DR SUJATA KUTE

Medical officer

I am a doctor, working in govt hospital