Sep 27, 2020
कथामालिका

किती सांगायचं मला (भाग 5)

Read Later
किती सांगायचं मला (भाग 5)

समायराचे ते वाक्य ऐकून तिघेही खूप हसले ????????????.. 

तुषार :समायरा किती घाबरवलंस गं !!!.. ????

समायरा : असच मी काल घाबरले होते... समजलं ना?? ????

तुषार : हो, बाई समजलं.... "चला " आपलं काम पूर्ण होईल इतकं फोटोसेशन तर झालं.... आपण लागलीच हे documents सबमिट करू.... समायरा तू पण एकदा फोटोज चेक करून घे.... त्यावर सगळ्यावर same date आहे का ते बघ.... कुठेच चुकायला नको..... 

समायराने आणि तुषारने फोटोज चेक केले... मग सामायरा आणि तुषार ने मेकअप काढून ते दोघेही आपापल्या  पूर्वरूपात आले.... 

तुषार : "प्रमोद " ही गोष्ट फक्त आपल्या तिघांमध्येच राहील याची काळजी घेशील.... सौम्याला देखील सांगू नकोस... कारण ही गोष्ट पसरली तर मार्था आम्हाला जेलमध्ये टाकायला देखील कमी करणार नाही ..... 

प्रमोद : its ok dude, नाही कळणार.... सौम्याला पण नाही सांगणार.... बेस्ट ऑफ लक दोघांनाही.... 

समायरा : थँक्स, तूला भेटून आनंद झाला.... 

तुषार :thanks dude, चल निघतो आम्ही.....

समायरा पूढे निघाली.... 

तुषारला प्रमोदने पटकन मागे ओढलं आणि कानामध्ये  म्हणाला... सुंदर आहे बरं का !!

तुषार : प्रमोदच्या कानामध्ये, काही फायदा नाही, खूप खडूस आहे.... 

प्रमोद : ओ, मग तर तूला डबल बेस्ट लक.... 
दोघेही हसले????????... आणि स्टुडिओच्या बाहेर आले....

 समायरा तुषारच्या गाडीजवळ येऊन थांबली होती....

तुषार आणि समायरा त्याच्या बाईकवर कंपनीकडे निघाले....... ज्या प्रकारे समायरा तुषारच्या मागे बसली होती... तिच्या बॉडी लँग्वेज वरूनच तीचा खडूसपणा दिसत होता... 

ते बघून, "काहीच खरं नाही या तुषारचं आता "असं प्रमोद मनोमन म्हणाला आणि स्टुडिओकडे वळाला... 

समायरा आणि तुषार दोघेही कंपनीत पोहोचले..... तुषारने फोटोज सबमिट केले.... आणि मग दोघेही आपापल्या घरी जाण्यासाठी निघाले......

तितक्यात तिथली रिसेपशनिस्ट ने आवाज दिला.... तूमची नौकरी पक्की झाली आहे तूम्हाला उद्यापासून रुजू व्हावं लागेल.... 

दोघांनीही होकारार्थी मान हलवली.... 
आजचा दिवस तूम्हाला आपल्या ऑफिसची सगळी नियमावली समजून देण्यासाठी आहे आणि तूम्ही ती न माहित करताच निघालात.... ????

तुषार आणि समायरा एकमेकांकडे गोंधळल्या सारखे बघत होते.... 

रिसेप्शनिस्ट : हा consent फॉर्म ????भरा.... आणि ही नियमावली वाचून घ्या..... 

1)सकाळी 9 ते संध्याकाळी 5 असा ऑफिस टाईम राहील !!".. 
2)तुमच्या दोघांपैकी एकाचा फोन नंबर मला viral करावा लागेल...
3) पाच मिन उशीर झाला की पगार कपात होईल.... 
4)सुरुवातीला दोघांनाही दरमहा पंधरा हजार रुपये पगार मिळेल....
5) "महिन्याला दहा पॅकेज "च्या वरती जर आकडा वाढला तर तूम्हाला पाच टक्के बोनस देखील मिळेल.... 
6) कुठेही खोटेपणा आढळून आल्यास तो खपवला जाणार नाही.... 
7) नौकरी सोडताना एक महिन्या आधी नोटीस द्यावी लागेल... एकदम सोडता येणार नाही....

 सहा नंबरचं  वाक्य वाचताच समायराचे धाबे दणाणले.... पण आता नौकरीरुपी पात्रात समायराने उडी टाकली होती... पोहून काठावर जाण्याशिवाय दुसरा काही पर्यायच उरला नव्हता.... ????‍♀️

समायराने तुषारकडे नजर फिरवली.... तुषार मात्र एकदम निर्भीड दिसत होता....

दोघांनीही आपापले consent फॉर्म???? भरले.... आणि ठीक आहे येतो आम्ही उद्यापासून असं म्हणून तिथून रजा घेतली... 

तुषारने समायराला बस स्टॉप वर सोडले आणि उद्या बरोबर 9 ला दहा कमी असताना इथे भेटू व दोघेही सोबतच कंपनीमध्ये जाऊ असे ठरले... 

लागलीच समायराची बस आली????..... समायरा बसने घरी निघाली.... 

बसमध्ये बसल्यावर समायराने एक सुस्कारा सोडला.... आज नौकरीविषयीची तीची भीती जरा थोडी कमी झाली होती...

 जे होईल ते होईल बघता येईल असा विचार ती करायला लागली होती.... 

कालपासून घडणाऱ्या सगळ्या गोष्टी आठवून आज मात्र समायरा हसत होती... विचार करत होती,  कोण, कुठला तुषार समोर उभा राहतो काय??  आणि आपल्याला बायको म्हणतो काय?? ????????

आज तर चक्क आपण हद्दच केली लग्नाचे फोटो देखील काढले.... इतक्या लवकर त्या परक्या माणसावर विश्वास ठेवला.... जाऊदे आता नो ऑप्शन आणि नो टेन्शन.... जे होईल ते बघता येईल.... 

विचारात असतानाच समायराचं स्टॉप आलं.... समायरा घरी आली एका सकारात्मक विचाराने..... 
  क्रमश :
©® डॉ.सुजाता कुटे

Circle Image

DR SUJATA KUTE

Medical officer

I am a doctor, working in govt hospital