ओटा

This is an experience in day to day life of married woman depicted in funny way.. almost all ladies share simliar experiences with their house..

संसार हा शब्द आला की सगळ्या बायकांच्या मनात धडकी भरते. नवनवीन लग्न झालेल्या, स्वप्नाळू जगात जगणाऱ्या मुलींना तर फार सोप्प वाटणारी ही प्रोसेस फारच अवघड वाटते ब्वा.
तर अशाच पाहिले पहिले पिक्चर च्या ट्रेलर सारखा दिल की धडकन बढाने वाला आणि नंतर धाडकन स्वप्नातून जमिनीवर पाडणारा संसार आणि त्यातला महत्त्वाचा भाग म्हणजे स्वयंपाक . तो आला म्हणजे ओटा नामक स्वयंपाक घरातील बहुरूपी आलाच. बहुरूपी कारण तो दिसायला सारखा तरी पदार्थांच्या सामाना नुसार त्याचं रूप बदलत. 
ओटा पहिला की अशी धडधड होते सांगू… आता तुम्हाला काय नवीन सांगणार म्हणा!! काहींना होत नसेल पण समस्त महिला वर्गातील ७०% जणींना तर नक्कीच होत असेल. माझासारख्या नवीन लग्न झालेल्या ना तर फारच. दुसऱ्याचा घरी गेलं की त्यांचा ओटा पाहणं हा माझा आवडता छंद म्हणा. आपण काय डायरेक्ट आता जात नाही. विचारूनच जातो! तर मुद्दा असा की किती स्वच्छ ओटा आहे ते पाहणं. काही घरी ओटा इतका लखलखीत असतो की मला शंका येते जेवण केलेच नसेल . सॉरी हा…. अस काही नाही. मुळात काहींना ओटा असा लखलखीत ठेवायची सवय असते मग ऑफिस ला जाणाऱ्या असो किवा नसो. पण काही घरी आपल्या सारखाच ओटा पहिला की काय आनंद होतो सांगू… अहाहाहा…. आनंद पोटात माझ्या मावेना होतं. कारण नवऱ्याला सासूला सांगता येतं छातीठोक पणे सगळ्यांचाच घरात हे असच असत..
खरं तर मलाही स्वच्छ ओटा आवडतो पण कधी कधीच. एक मिनिट! माझा ओट्यावर घाण नसते हा कधी फक्त थोडा पसरलेला असतो एवढंच.. बऱ्याच वेळा वस्तूंनी असहकार पुकारलेला असतो माझाशी कारण नेमकं त्या वस्तू सासूबाईंनी जागेवर ठेवल्या असतात. म्हणजे कसं ओट्यावर असल्या की पटकन सापडतात खरं. असू दे… माझं बोलणं कळणारच नाही..
पण कोणी पाहुणे (माझ्यासारखेच) घरी आले की माझा ओटा त्यांना कसा दिसणार नाही त्यासाठी तारेवरची कसरत होते.. पण आमचे हट्टी पाहुणे (इथे पण माझ्यासारखेच) पाहतातच. पण त्या वरच्या ७०% मधील असेल तर म्हणते आमच्या कडे पण असच असतं इतकं ऑकवर्ड नको होऊस.. काय भारी हलक वाटत माहित्येय….. 
मनाला कळत असतं ओटा निटका पाहिजे पण वळत नाही.. मजेचा भाग सोडा पण आवरलेला ओटा खूप छान दिसतो आणि काम करायला हुरूप येतो.. असं झटपट उत्साही काम सुचत.. (ही वाक्य माझी नाहीत, असे मला ऐकायची सवय आहे.). कोण एवढं उत्साही असतं जेवण करायला????????. तरी आपण म्हणायचं असतं  त्यामुळे आवरलेला ओटा कीवा पसरलेला ओटा ह्याचा कामाच्या उत्साहाशी काहीही संबंध नाही.. माझा तरी नाही हो!
तुम्ही मला कितीही रुपसुंदर, चकचकीत ओटा द्या तो तसाच राहील याची ग्यारंटी मी तुम्हाला देत नाही.. हां फक्त आगाऊ ( म्हणजे आधी येणारे) कळवून येणारे पाहुणे असतील तर मात्र मी कौतुक करून घ्यायला अस्सा ओटा आवरून ठेवते की येणाऱ्या बाईच्या काळजात धस्स होईल की हिने काही केले की नाही जेवायला..
असो!  सांगण्यासारखा खूप गोष्टी आहेत. पण आता तुम्हाला काय नवीन सांगायचं..  तुम्ही काही ह्याला नवीन नाहीत.. ओटा पसरून ठेवा किंवा आवरून ठेवा पण मैत्रिणींनो ओटा घाण ठेऊ नका.. कारण शेवटी आपण समस्त बायका ह्या ओट्यावरून आपल्या घरच्यांना आणि आपल्याला अन्न खाऊ घालतो जे खूप मोलाचे आहे.!!

(हे माझे अनुभव आहेत तरी कुठल्याही वाचकाने वाईट वाटून घेऊ नये. हा लेख मजा म्हणून घ्यावा ही विनंती.)

स्वराली सौरभ कर्वे..

🎭 Series Post

View all