सुगरणीचे किस्से
विषय - नाचता येईना अंगण वाकडे
©® सौ.हेमा पाटील.
"आई, मला ना सुजीचा हलवा बनवायचाय. कसा बनवायचा तुला माहीत आहे का? मी युट्यूबवर सर्च केले तर बघून मी बनवू शकते, पण सुजी म्हणजे काय तेच मला समजेना. टिव्हीवर मालिकेत मी बऱ्याचदा पाहिले आहे, नव्या नवरीला सुजीचा हलवा बनवायला सांगतात. मला तर गाजर, दुधी यांचाच हलवा माहीत आहे, आणि माहीमचा हलवा! सांग ना सुजी म्हणजे काय?" मैथिली म्हणाली.
रमाने डोक्यावर हात मारुन घेतला.
" अगं, सुजी म्हणजे रवा."
" रवा? रव्याचा हलवा कसा बनवायचा?" मैथिलीला गहन प्रश्न पडला होता. तिने गाजर, दुधी खिसताना आईला पाहिले होते. रवा कसा खिसायचा? हा तो गहन प्रश्न होता.
" अगं, आपण शिरा बनवतो ना, त्याला ते सुजी का हलवा म्हणतात. तू ड्रायफ्रूटस् घालून तुपातला शिरा बनव."
"बरं . ठेव आता. मी जाते किचनमध्ये."
" अगं, गरज पडली तर सासुबाईंना विचार..." हे रमाचे शब्द तिच्यापर्यंत पोहोचलेच नाहीत कारण तिने त्याआधीच फोन कट केला होता. आता ही काय उजेड पाडते याची रमाला काळजी लागून राहिली.

लग्नाआधी किचनमध्ये मदतीला बोलावले तर तिने कधीच किचनमध्ये पाऊल टाकले नव्हते. बाईच्या जातीला स्वयंपाक करायला यायला हवा असे टुमणे तिच्यामागे लावले तर ती म्हणायची,
" स्वयंपाक करायला काय बुद्धीचा वापर करावा लागतो का? चार पोळ्या लाटायच्या आणि भाजी, आमटी करायची. त्यासाठी आत्तापासूनच माझे डोके खाऊ नकोस. तुझी मुलगी स्काॅलर आहे. ती कशातच कमी पडणार नाही."
" अगं, स्वयंपाक बनवणे पण एक शास्त्र आहे. ते शिकणे आवश्यक आहे. माणसाचा आहार व्यवस्थित असेल तर तो तंदुरुस्त राहू शकतो."
रमा काकुळतीला येऊन म्हणायची.

" वेळ पडल्यावर तेही शास्त्र शिकेन मी. आत्ता माझ्या डोक्यात कांदे बटाटे भरु नकोस बाई. आधीच फिजिक्स केमिस्ट्रीने डोके खाल्ले आहे, त्यात तुझी पाककला नको बाई." मैथिली म्हणायची.
" अगं, थोडे तरी इकडे लक्ष देत जा. रोज स्वयंपाक बनवू नकोस, पण रविवारी तरी थोडेफार किचनमध्ये येत जा." असे रमा वारंवार म्हणायची. यावर माधव म्हणायचा,
" कशाला तिच्या मागे भूणभूण लावतेस गं? तिचा जन्म किचनमध्ये राबण्यासाठी झाला नाही. ती बाई लावेल स्वयंपाकाला."
" बाई लावली तरी थोडेफार ज्ञान असले पाहिजे ना! ठीक आहे. आजपासून तू आणि तुझी लेक काय करायचेय ते करा. लग्नानंतर मुलीला आईने काय शिकवले असा माझाच उद्धार होणार आहे हे मला माहीत आहे."

" आपण मुलाकडच्यांना सांगू, मुलीला तितकासा स्वयंपाक येत नाही म्हणून... आजकाल अशा गोष्टी कुणी मनावर घेत नाही. कशाला टेन्शन घेतेस?" माधव म्हणायचा.
तीच मैथिली आता फोन करून विचारत होती, सुजीचा हलवा कसा बनवू?
क्रमशः ©® सौ.हेमा पाटील.
कसा बनवेल मैथिली सुजीचा हलवा? पाहूया पुढील भागात...

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा