किस्से आपल्या दोघांचे....

दोन ध्रुवावर दोघे आपण याची एक वेगळीच मिसाळ

कवितेचे नाव-किस्से आपल्या दोघांचे....

विषय-दोन ध्रुवावर दोघे आपण

फेरी-राज्यस्तरीय करंडक स्पर्धा कविता, संघ-मुंबई



तुझी न माझी
जोडी खूपच निराळी
तू असा अवली
अन् मी साधी भोळी

आहे आपली छोटीशी
आंबट गोड कहाणी
तुझ्या या आयुष्याची
झाली आहे मी राणी

दोन ध्रुवावरचे दोघे आपण
तू राजा आणि मी राणी
किस्से आपले अतरंगी ऐकून
थक्क होतात माझ्या मैत्रिणी

किस्स्यामध्ये हरवून जातो
वेगळ्याच विश्वात रंगून जातो
जगावेगळे दोघे हटके आपण
असे दोन ध्रुवावर दोघे आपण


©® PanuSid?

संघ-मुंबई